CHAPTER 3 : MARKET BASICS: Period 9

CHAPTER 3 : MARKET BASICS: Period 9

Share Market In Marathi  ||  शेअर बाजार मराठीत  ||  Share Market Classes  ||  Investment || मराठी गुंतवणूकदार

Period 9

= > TYPES OF STOCKS // विविध प्रकारचे shares

Share काय असतो हे आपण बघितलं पण ते shares कोणकोणत्या प्रकारचे असतात ते बघूयात.

Share बाजारात आठ हजारांपेक्षा जास्त कंपनीचे shares आहेत. शेअर बाजारात आहेत म्हणजे Exchange वर Listed आहेत ज्यामध्ये trade करता येतो. त्यात रोजच्या व्यवहारात असलेली State Bank Of India पासून ते IT company Infosys, दुचाकी गाड्यांची कंपनी Bajaj, चहाची Tata Coffee अशा विविध प्रकारच्या कंपन्यांचे shares असतात. ह्या वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्या बाजारात असतात अन त्या क्षेत्रांना आपण Sector म्हणतो…

Banking Sector मध्ये SBI, AXIS Bank, ICICI Bank, Bank Of Maharashtra अशा विविध बँका येतात.

दुचाकी गाडी निर्मिती क्षेत्रात (sector) Bajaj, Hero Motocomp, TVS अशा कंपन्या येतात.

औषधनिर्मिती क्षेत्रात Sunpharma, Cipla, Lupin अशा कंपन्यांचा समावेश होतो.

FMCG (Fastly Moving Consumer Goods) अंतर्गत Asian Paints, Hindustan Unilever, ITC अशा रोजच्या वापरत लागणार्‍या वस्तूंची निर्मिती करणार्‍या कंपन्या असतात.

असे विविध सेक्टर असतात. हे सेक्टर अन त्याअंतर्गत असलेले stocks nse च्या वेबसाइटवर मिळतील. वेगवेगळ्या कंपनींचे shares आहेत आणि त्यांचे सेक्टरही आहेत. या सर्वांवर अर्थव्यवस्थेतील निर्णयांचे पडसाद उमटत असतात. मान्सून पासून ते निवडणुकापर्यन्त या सर्व घटना या shares आणि sectors वर प्रभाव टाकतात.

-*-*-*-

OPEN DEMAT ACCOUNT ONLINE // सुरू करा डिमॅट अकाऊंट घरबसल्या

https://5minwebsite.angelbroking.com/Diykyc/SubbrokerLead?SbTag=QkJDQg==

अभिषेक बुचके (शेअर ब्रोकर)

© 2019, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!