CHAPTER 4 :  INDICES & PORTFOLIO : Period 10

CHAPTER 4 :  INDICES & PORTFOLIO : Period 10

Share Market In Marathi  ||  शेअर बाजार मराठीत  ||  Share Market Classes  ||  Investment || मराठी गुंतवणूकदार

Period 10

WHAT IS NIFTY AND SENSEX?

तुम्ही टीव्हीमध्ये NIFTY कोसळला, SENSEX कोसळला किंवा वधारला असे शब्द ऐकले असतील. हे नेमके काय असतात ते आता बघूयात.

त्यापूर्वी Index काय असतो हे जाणून घेऊ. जसं या पुस्तकाचा एक index आहे जे पाहिल्यावर आपल्याला अंदाज येईल की या पुस्तकात काय आहे. एक ‘अंदाज’ येईल एकंदरीत ‘रूप’ समजेल!

शेअर बाजारच्या भाषेत Index हा वेगवेगळ्या stock चा असू शकतो किंवा एकसारख्या स्टॉकचा. म्हणजे विविध बँका मिळून त्यांचा एक BankNifty असा index आहे. विविध Pharma stocks चा मिळून एक Pharma index आहे. तसेच banks, pharma, metal, IT अशा विविध क्षेत्रातील मिळून एक Index असू शकतो.

NIFTY

Image result for nifty

NIFTY म्हणजे NSE वर listed असलेल्या टॉप 50 कंपन्यांचा average…

NSE [National Stock Of Exchange] वर अनेक कंपन्या list असतात त्यातील market capitalization नुसार ज्या well established कंपन्या असतात त्यांना NIFTY ह्या Index मध्ये स्थान दिलं जातं.

त्या 50 कंपन्याच्या वाढण्या आणि कमी होण्यावर NIFTY ची किम्मत अवलंबून असते. एक प्रकारचे average… NIFTYमध्ये विविध क्षेत्रातील (Sector) दिग्गज कंपन्या असतात. ह्या 50 कंपन्याना कायमचे सदस्यत्व नसतं, तर त्या बदलल्या जातात. त्याचेही निकष आहेत.

सामान्यतः विविध क्षेत्रातील कंपण्याचे shares NIFTYत असल्याने हा निर्देशांक कमी किंवा जास्त होणे हे भारतीय अर्थव्यवस्थेशी जोडून पाहिलं जातं. म्हणजे, जर NIFTY वाढत असेल तर विविध sector आणि कंपन्या चांगल्या वाढत आहेत आणि पर्यायाने प्रगती होत आहे असं समजलं जातं. यालाच आपण बाजार वाढला असं म्हणतो.

सध्या NIFTY या निर्देशांकाची किम्मत 11500 च्या वर आहे.

SENSEX

Image result for sensex

ज्याप्रकारे NIFTY हा निर्देशांक आहे त्याचप्रकारे SENSEX हासुद्धा एक निर्देशांक आहे. SENSEX अर्थात Sensitive Index वगैरे.

याला BSE 30 असेही म्हणतात.

BSE [Bombay Stock Of Exchange] मध्ये list असलेल्या अनेक कंपन्यांपैकी financially well established टॉप 30 कंपन्यांचा निर्देशांक म्हणजे SENSEX.

या तीस कंपन्यांची निवड त्यांच्या market capitalization, volume वगैरे अशा अनेक निकष, parameters वर केली जाते.

सध्या SENSEX ची किम्मत 38000 च्या आसपास आहे.

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर Nifty व Sensex हे समूह आहेत, ते shares च्या समूहाला represent करतात.

उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या मार्कशीटचं! आपण पास झालो की नाही किंवा हुशार आहोत की नाही हे कशावर ठरतं? तर आपल्याला एकूण किती टक्के पडले यावरून. समझा 73% आहेत मला. पण याचा अर्थ असा नाही की मला इतिहास, भूगोल, गणित अशा सर्व विषयात 73% च पडले असतील. वेगवेगळ्या विषयात वेगवेगळे मार्क पडले तरी overall 73% आहेत म्हणजे मी हुशार आहे असा निष्कर्ष काढता येतो. साधारणतः Index हे त्यासाठीच असतात. बाजारात एकंदरीत काय हालहवाल आहेत हे जाणून घेण्यासाठी. बाजारात विविध क्षेत्रातील विविध आणि भरपूर shares आहेत. आज बाजाराचा TREND (कल) काय आहे हे कळणार कसं? आपण काही प्रत्येक share चा rate बघू शकत नाही. तेथे हे Index कामाला येतात. Nifty मध्ये विविध क्षेत्रातील कंपन्या आहेत. जर Nifty वाढत असेल तर आपण असं म्हणू शकतो की बाजाराचा Trend positive आहे. एकंदरीत Nifty हा कल नोंदवतो. आता कोणते shares वाढत आहे हे बघायचं असेल तर Sectorial Index बघता येतो. म्हणजे BankNifty वाढत असेल तर असं निष्पन्न होईल की आज बँक शेअरमध्ये तेजी आहे.

बाजाराचा कल, मूड जाणून घेण्यासाठी आणि कोणत्या क्षेत्रात तेजी-मंदी आहे हे जाणून घेण्यात या Indices ची खूप मदत होते.

-*-*-*-

OPEN DEMAT ACCOUNT ONLINE // सुरू करा डिमॅट अकाऊंट घरबसल्या

https://5minwebsite.angelbroking.com/Diykyc/SubbrokerLead?SbTag=QkJDQg==

अभिषेक बुचके (शेअर ब्रोकर)

© 2019, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!