CHAPTER 4 :  INDICES & PORTFOLIO : Period 11

CHAPTER 4 :  INDICES & PORTFOLIO : Period 11

Share Market In Marathi  ||  शेअर बाजार मराठीत  ||  Share Market Classes  ||  Investment || मराठी गुंतवणूकदार

Period 11

= > DIFFERENT INDICES

ज्याप्रमाणे NIFTY आणि SENSEX हे index आहेत तसेच विविध क्षेत्राचे काही separate Indices आहेत. NIFTY आणि SENSEX मध्ये सर्वच क्षेत्रातील कंपन्या असतात, पण ज्या Index मध्ये फक्त एका क्षेत्राशी संबंधित stocks असतात त्यांना आपण sectorial indices म्हणतो. यात सर्वाधिक Active Index आहे BankNifty. BankNifty मध्ये टॉपच्या Public Sector Banks आणि Private Banks समाविष्ट केलेल्या असतात.

त्यानंतर Nifty PSU Bank या Index मध्ये विविध Public Sector Banks समाविष्ट असतात तर Nifty Private Bank या Index मध्ये Private Banks असतात.

Nifty Pharma हा Index विविध pharma shares साठी आहे. उदाहरणार्थ Sunpharma, Ajanta Pharma, Cipla

Nifty IT यात टॉपच्या IT कंपन्या असतात. उदाहरणार्थ, Infosys, TCS, KPIT Technology

जशी NIFTY आणि SENSEX ची किम्मत ठरली जाते तशीच या Indices ची किम्मत ठरते.

पण ह्या Indices मध्ये सरसकट त्या-त्या क्षेत्रातील सर्वच कंपन्या असतात असं नाही. Large Cap, Midcap अशा दर्जेदार कंपन्या त्या Sector Index मध्ये List असतात. कोणत्या कंपन्या INDEX मध्ये INCLUDE करायच्या यासाठी काही निकष असतात.

असे विविध Index आहेत. त्याची Link खाली नमूद केली आहे…

https://www.nseindia.com/live_market/dynaContent/live_watch/live_index_watch.htm

किंवा Google वर NSE Index सर्च करा

= > SMALL CAP, MID CAP & LARGE CAP

Market Capitalization म्हणजे कंपनीची बाजारातील किम्मत multiplied by total outstanding shares. यानुसारच ठरतं की तो share कोणत्या वर्गवारीत मोडतो.

SMALL CAP

कंपनीचे Market Capitalization 1 Billion कोटींपेक्षा कमी असेल तर त्याला Small Cap म्हणतात. ज्या कंपन्या सुरुवातीच्या पायरीवर असतात त्या small cap मध्ये गणल्या जातात. या stocks मध्ये बरीच volatility असते. कमी capital असल्याने यांच्या वाढण्याचा अन घसरण्याचा वेग बराच असतो.

उदाहरणार्थ – HDIL, Welspun, Just Dial

MID CAP

कंपनीचे market capitalization जर  2B ते 10B कोटी असेल तर त्याला Mid Cap म्हणतात. या कंपन्यांचं कॅपिटल हे कमीही नसतं आणि Large Cap इतकं जास्तही नसतं, पण त्यांच्यात क्षमता असते Large Cap बनण्याची. Midcap कंपन्या बर्‍याचदा दीर्घकाळ गुंतवणुकीस आकर्षित मानल्या जातात.

उदाहरणार्थ – Ashok Leyland, Bata, CG India, Bank Of India

LARGE CAP

ज्या कंपन्यांचे market cap HUGE असतं त्यांना Large Cap म्हणतात. सर्व Large Cap ह्या सुरुवातीपासून Large Cap नसतात, तर काही Small Cap ते Mid Cap असा प्रवास करून आलेल्या असतात.

उदाहरणार्थ, Large Cap – TCS, Maruti Suzuki, ITC

= > UPPER CIRCUIT & LOWER CIRCUIT

बाजारात एखाद्या वस्तूला खूप मागणी असते याचा अर्थ त्या वस्तुला खरेदी करणारे (Buyers) खूप असतात. Buyers जास्त म्हणजे त्या वस्तूची किम्मत वाढते आणि विक्री करणारा स्वतःला हव्या त्या किमतीला ती वस्तु विकायला उत्सुक असतो.

पण बर्‍याचदा असं होतं की Demand अर्थात मागणी खूप असली तरी विकायला विक्रेते नसतात; अर्थात Demand (Buyers) आहे पण पुरवठा (Supply) करणारे विक्रेते नाहीत. हा एककल्ली व्यवहार होऊ लागतो.

युद्धाच्या किंवा आणीबाणीच्या प्रसंगी अन्नवस्तूंची किम्मत वाढते आणि स्वतःकडे असलेला कोठार कोणीही विकायला तयार नसतो त्याप्रमाणे.

                  Share बाजारातही अशी परिस्थिती निर्माण होत असते. म्हणजे, बाजारासाठी खूप सकारात्मक (आर्थिक पॅकेज, निवडणूक निकाल, स्थिर सरकार इत्यादि) बातमी असेल तर सगळे लोक shares ची खरेदी करत सुटतात अन विकायला कोणी तयार नसतं. अशा One Side Movement मुळे एखादा share किंवा संपूर्ण बाजार अर्थात Nifty, Sensex सारखे Indices सरसकट वाढू लागतात.

अशा तीव्र वाढीची परिस्थितीत SEBI ने (ती संस्था जी share बाजारावर देखरेख अन नियंत्रण करते) घालून दिलेल्या नियमांनुसार NSE/BSE सारखे exchanges त्या share किंवा Index ची trading काही काळ थांबवते… म्हणजे, काही काळ trading अर्थात खरेदी-विक्री बंद केली जाते. या अशा परिस्थितीला upper circuit (वरचा अटकाव) म्हणतात. साधारणतः निर्देशांक (Index) किंवा share 10%, 15% , 20% पेक्षा अधिकची वाढ सलग काही trading sessions नोंदवत असेल तर हा Upper Circuit लावला जातो. ही टक्केवारी share आणि Index नुसार बदलू शकते. याचे नियम SEBI ने तयार केलेले असतात अन Exchanges त्याची अमलबजावणी करत असतात. त्यामुळे Upper/lower Circuit लावताना विविध परिमानांचा विचार केला जातो.

बाजारात याउलटही स्थिती असू शकते. ती म्हणजे, जर खूप नकारात्मक (भूकंप, राष्ट्रीय आपत्ती, राजकीय घडामोड) घटना घडली तर गुंतवणूकदार आपला पैसा बाहेर काढून घेऊ बघतात, कोणीही shares खरेदी करायला तयार नसतं, सर्वच्या सर्व विकणारे (Only Sellers) असतात तेंव्हा share किंवा निर्देशांक कोसळू लागतो. अशा परिस्थितीत बाजारावर देखरेख अन नियंत्रण करणार्‍या संस्था ट्रेडिंग, अर्थात खरेदी-विक्री प्रक्रिया काही काळ बंद ठेवते…. याला Lower Circuit म्हणतात.

Upper Circuit किंवा Lower Circuit वैयक्तिक share ला किंवा Nifty किंवा Sensex सारख्या Index ला लागू असतं.

याला circuit filters म्हणतात. अस्थिरतेवर मर्यादा असावी म्हणून SEBI ने हे नियम केलेले असतात. Share किंवा Index दिवसात कमाल व किमान किती वाढू किंवा कोसळू शकतो याला मर्यादा असतात. ही मर्यादा व त्याची टक्केवारी SEBI बदलू शकते. यासाठीही काही गणितं आणि ठोकताळे असतात.

आपल्या Order काय होतात…?

Upper किंवा Lower circuit लागू झाल्याच्या नंतर order टाकता येत नाही. जेंव्हा परत व्यवहार सुरू होतील तेंव्हा orders परत टाकता येतील. पण तुम्ही आधीच टाकून ठेवलेल्या orders pending राहतात.

हेतु –

असे Circuit लावण्याचा हेतु असा असतो की, खरेदीकर्ते किंवा विक्रीकर्ते कमी होतील. काही सकारात्मक/नकारात्मक न्यूजमुळे गुंतवणूकदार आणि traders सेंटिमेंट ने विचार करून खरेदी-विक्री करत सुटतात. दरम्यानच्या काळात ही मानसिकता कमी होऊन सुरळीत व्यवहार व्हावेत यासाठी circuit लावतात. एकंदरीत पॅनिक परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी.

Upper Circuit लागू होणं एकप्रकारे चांगलं असतं, कारण त्यामुळे बाजारात तेजी अन नवचैतन्य येण्याची चिन्हं असतात.

तुम्ही गुंतवणूक केलेल्या share ला जर Upper Circuit लागू झालं असेल तर ती चांगली गोष्ट आहे कारण त्यामुळे त्याची किम्मत वाढती राहून तुम्ही नफ्यात राहता.

निर्देशांकना (Nifty & Sensex) Lower Circuit हे अर्थव्यवस्था व गुंतवणुकीसाठी धोक्याची घंटा समजलं जातं. हे बाजारात नकारात्मक बाजूला घेऊन जात असतं. यात अनेक गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावं लागतं अन पैसे अडकून राहण्याची शक्यता असते.

PRICE BAND म्हणजे SEBI ने घालून दिलेली ती Range ज्यामध्ये तो share दिवसभरात कार्यरत राहू शकतो. अर्थात, Upper Circuit आणि Lower Circuit मधील ही range.

-*-*-*-

OPEN DEMAT ACCOUNT ONLINE // सुरू करा डिमॅट अकाऊंट घरबसल्या

https://5minwebsite.angelbroking.com/Diykyc/SubbrokerLead?SbTag=QkJDQg==

अभिषेक बुचके (शेअर ब्रोकर) 

© 2019, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!