.
रिच मदर , रिच सन
लेखक – प्रा. नामदेव जाधव
नामदेव जाधव हे लेखक – वक्ता – उद्योजग – बिजनेस कोच आहेत . त्यांनी वरील विषयावर अनेक प्रकारची पुस्तकं लिहलेली आहेत .
या पुस्तकात प्रामुख्याने एका आईने आपल्या मुलाला पैशाबाबत असे काय शिकवले की तो मुलगा जगातील सर्वात श्रीमंत माणूस झाला .आणि त्याचीच ही गोष्ट आहे .
ही गोष्ट सुरू होते जिजामाता आणि त्यांचा मुलगा शिवाजी यांच्या सवांदाने .
लहान शिवबा ते छत्रपती शिवाजी महाराज हा प्रवास कसा झाला हे पुस्तकात सांगितले आहे .
मनुष्याच्या चार जाती असतात , त्यात एक जात ही गुंतवणूकदार असते , जेव्हा कधी हातात पैसा येईल तेव्हा त्या पैश्याची उधळपट्टी न करता तो पैसा इन्व्हेस्ट केला पाहिजे म्हणजेच हाथी पैसा आला की किल्ला बांध . हा सल्ला म्हणजेच आजच्या युगात हाथी पैसा आला की इन्व्हेस्ट कर .
मग वास्तविक गुंतवणूकदार कोण ?
ज्याच्याकडे नवे विचार ,नवीन कल्पना , नवीन उमेद , जोखीम , विज्ञान , तंत्रज्ञान आणि नवीन समीकरणे .
गुंतवणूक करण्या अगोदर चांगले शिक्षण घ्या , आपल्या मित्रांची काळजीपूर्वक निवड करा .
जेव्हा कुठे जाल तेव्हा नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा . आणि त्या गोष्टी लवकरात लवकर शिकण्याचा प्रयत्न करा . चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी अजिबात वेळ घालू नका . काहीतरी करून दाखवायचे असेल तर लवकर शिकणे गरजेचे आहे .
शिकत असताना चांगल्या मित्रांची ही गरज असते . चुकीची संगत माणसाला चुकीच्या पंगतीला घेऊन जाते .
तुमच्या कडे स्वयंशिस्त असली पाहिजे , जी गोष्ट शिकाल ती अगोदर पक्की शिका आणि मगच दुसरी गोष्ट शिकायला घ्या . एखादी गोष्ट शिकताना अर्धवट शिकू नका . आणि जास्त गोष्टी शिकण्यापेक्षा एखादीच गोष्ट शिका जी पुढे जाऊन तुमची ओळख होईल .
तुम्हाला शिस्तही असणे गरजेचे आहे , नाहीतर आलेला पैसा आहे तसाच निघून जाईल .
पैशांचे गुलाम न होता तुम्ही पैशालाच गुलाम करा .
चंगळ वादावर पैसे खर्च करू नका , तर पैसे इन्व्हेस्ट करून पैशाला कामाला लावा .
तुमचे आदर्श तुम्ही निवडले पाहिजेत ,
अनेकदा शिकूनही श्रीमंत न होण्याचं प्रमुख कारण हे आळस , भीती , अपेक्षावाद , वाईट सवयी , उद्धटपणा ही कारणे असतात ही कारणे दूर केली पाहिजेत . आळस , भीती ही झटकली पाहिजे .
जे इतरांना दिसत नाही ते तुम्ही पहायला शिकले पाहिजे , जी संधी व संकट इतरांना दिसत नाही ते तुम्ही अगोदरच ओळखायला शिकले पाहिजे .
मोठमोठी कामे ही पैशाने होत नसतात तर योग्य नियोजनाने होत असतात .
हाथी पैसा कमी असेल किंवा नसेल किंवा असेल ही पण तो नियोजनापेक्षा महत्वाचा नाही . पैश्या अगोदर तुमच्याकडे नियोजन असले पाहिजे . ते ही पक्के .
नियोजनाशिवाय कोणतेही काम हाथी घेऊ नये .
आपली कामे करायला आपणापेक्षा हुशार माणसे शोधा .
खरा हुशार तोच असतो , जो आपल्या पेक्षा हुशार माणसे एकत्र करतो व त्यांना मोठमोठी कामे करण्याची प्रेरणा देतो . अनेकदा काम करत असताना आपला पराभव होऊ शकतो पण त्याच पराभवाला आपले प्रेरणास्थान बनवा .
जर आर्थिक यश मिळवायचे असेल तर सुरक्षित खेळ खेळू नका . आपल्या कन्फर्ट झोन मधून पहिले बाहेर पडा .
जोखीम घ्यायला शिका .
क्रमशः
भाग -१
© 2020, ||-अभिषेकी-||. All rights reserved.
Leave a Reply
Be the First to Comment!