शेअर बाजार मराठीत || मराठी गुंतवणूकदार || Share Market
शेअर बाजार म्हणजे पैसे छापण्याची मशीन नाही हे अनेकदा सांगावं लागतं. आज पैसे लावले आणि उद्या जोरदार नफा झाला असं होतंच असं नाही. शेअर बाजार बर्याचदा संयमाची परीक्षा बघत असतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे #DABUR या #FMCG क्षेत्रातील कंपनीचा शेअर!
गेल्या सहा महिन्यांत हा शेअर 500 ते 540 इतक्या चाळीस रुपयांच्या रेंजमध्ये खेळतो आहे. दरम्यानच्या काळात शेअर बाजारात अर्थात Nifty मध्ये नवीन High सुद्धा बनला आणि काही अंशी घसरणही पाहायला मिळाली. पण हा शेअर आहे की कोणालाच जुमानायला तयार नाही. नेमकं असं का.? याचं उत्तर आहे त्या सेक्टर आणि शेअरचे Characters! शेअर बाजारात तेजी असताना बँकिंग, फायनान्स, मेटल्स असे क्षेत्र वाढत असताना FMCG क्षेत्र शांत असतं. आणि जेंव्हा शेअर बाजारात पडझड असते तेंव्हा मात्र हे क्षेत्र टिकून असतं. त्यामुळेच एफएमसीजी क्षेत्राला Defensive म्हंटलं जातं.
गेल्या वर्षी जेंव्हा कोरोंनाचा कहर सुरू झाला आणि देशात Lockdown लावला गेला तेंव्हा शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली पण त्याच वेळी Hindustan Unilever सारखे शेअर्स मात्र नवीन उंचीवर होते. त्यावेळी आपला हा Dabur 515 च्या High पासून 400 पर्यन्त घसरला होता पण काहीच काळात तो पुन्हा वाढू लागला. गेला मार्च ते 2021 चा मार्च बघितला तर Nifty साधारणपणे 7500 ते 15300 असा दुपटीचा प्रवास करताना दिसून येईल. अनेक छोटे-मोठे शेअर्सही दुप्पट, तिप्पट वाढताना दिसून आले पण Dabur आणि यासारखे काही FMCG शेअर्स मात्र आपल्या संथगतीने चालत होते.
डाबर सारखे एफएमसीजी क्षेत्रातील चांगले शेअर्स आपल्या पोर्टफोलियोमध्ये ठेवण्याचे अनेक फायदे असतात. एकतर हे शेअर्स दीर्घकालीन विचार करता चांगला परतावा देतात. काही अंशी डिविडेंड मिळतो. मुख्य म्हणजे शेअर बाजारात पडझड असेल आणि इतर शेअर्स कोसळत असतील तर हा शेअर तुमच्या Portfolio ला आधार देताना दिसतो.
आज हे सगळं सांगायचं निमित्त म्हणजे या Dabur ने आपली सहा महिन्यांची रेंज ब्रेक केली आहे. यापूर्वीचा 550 रूपयांचा All Time High मोडून सध्या तो शेअर 555 वर ट्रेड करत आहे. कोरोंनाची दुसरी लाट, पुन्हा लॉकडाउनची भीती यामुळे बँकिंग, फायनान्स क्षेत्र नकारात्मक दिशेने वाटचाल करत असताना FMCG मधील शेअर्स पुन्हा तेजीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. ज्या लोकांनी 500 ते 520 च्या आसपास या शेअरमध्ये गुंतवणूक केली असेल त्यांना आनंद होत असेल कारण कित्येक दिवसांनी त्यांच्या पोर्टफोलियोमधील हा शेअर 10% प्रॉफिट दाखवत आहे.
जाणून घेऊ Dabur बद्दल अधिक माहिती!
भारतातील सर्वात जुन्या कंपनीपैकी एक म्हणजे डाबर! साधारपणे १८८५ साली आयुर्वेदिक डॉक्टर असलेल्या एस. के. बर्मन यांनी आयुर्वेदिक उत्पादने बनवणारी Dabur ही कंपनी सुरू केली. सुरुवातीच्या काळात आयुर्वेदिक औषधे आणि उत्पादने बनवणारी आणि विकणारी कंपनी आज एक अग्रगण्य FMCG (Fastly Moving Consumer Good) कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीचं नाव Daktar + Burman या शब्दांतील पहिल्या अक्षरापासून बनलेलं आहे.
कंपनीची उत्पादने
डाबर च्यवनप्राश, डाबर हनी, डाबर लाल दंतमंजन, डाबर हाजमोला, डाबर मेस्वाक, ओडोमास, ग्लुकोस-डी, शिलाजीत, ओडोनील असे अनेक नावाजलेली उत्पादने डाबरची आहेत.

कंपनीचे Fundamentals
साधारणपणे एक लाख कोटीच्या जवळपास Market Capital असलेल्या या कंपनीची Management खूप तगडी मानली जाते.
कंपनी Debt Free आहे याचा अर्थ कंपनीवर कसलंही कर्ज नाही. म्हणजे कंपनी जो व्यवसाय करते त्यात मिळणारा नफा हा कंपनीच्या वाढीसाठीच वापरला जातो.
कंपनी चांगला नफा जरी कमावत असली तरी त्यातील काहीच भाग भागधारकांना देते हे कंपनीच्या 1% Dividend Yield वरून लक्षात येईल.
याच एफएमसीजी क्षेत्रातील डाबरच्या स्पर्धक असलेल्या काही कंपन्यांचे शेअर स्वस्तात आहेत हे P/E Ratio च्या आधारे सांगता येईल पण FMCG क्षेत्राचा P/E Ratio हा जास्तच असतो. त्यामुळे डाबरचा शेअर महाग आहे असंही नाही.
परतावा
अशा बर्याच कंपन्या आहेत ज्या कंपन्यांचे शेअर्स अगदी कमी कालावधीत चांगले रिटर्न्स देऊन जातात. डाबरचा शेअर २०१० साली साधारणपणे १०० रुपयांना होता जो आता ५०० रुपयांना आहे. म्हणजे दहा वर्षात कंपनीने पाचपट परतावा दिला आहे.
भवितव्य
सध्या कंपनीचा Performance उत्तम आहे. कंपनीने Everready सारख्या कंपन्यांत गुंतवणूक करून आपला व्यवसाय अजून Diversify करायला सुरुवात केली आहे. येणार्या काळात कंपनी चांगला परतावा देऊ शकते.
(टीप- या लेखात सादर केलेली माहिती अभ्यास हेतूने केलेली आहे. गुंतवणूक करण्यापूर्वि गुंतवणूक सल्लागाराशी चर्चा करावी.)