आज अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी संसदेत 2022-23 या वर्षीसाठी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. यापैकीच एक म्हणजे आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्फत डिजिटल रुपया आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. या डिजिटल रुपयांमुळे अर्थव्यवस्थेला चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. पण हे डिजिटल रुपया म्हणजे काय? जाणून घेऊया.
डिजिटल रुपया म्हणजे काय?
डिजिटल रुपया हे एकप्रकारचे आभासी चलन आहे. हे नोटा किंवा कॉईनच्या स्वरूपात म्हणजेच आपल्या नेहमीच्या रुपयांसारख हे चलन नसेल. मात्र, या रुपयांचा वापर करून तुम्हाला दुकानांमधून थेट सामान विकत घेता येणार नाही. या डिजीटल रुपयाचे मुल्य नेहमीच्या रुपयाएवढंच असणार आहे. पण हे डिजीटल रुपये तुम्ही फक्त ऑनलाईन स्टोरमध्येच खर्च करू शकता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जुलै 2021मध्ये याबाबतची घोषणा केली होती. या डिजीटल रूपयांना सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) असेही म्हणतात.
आरबीआय ने केली होती घोषणा –
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जुलै 2021 मध्ये याबाबतची घोषणा केली होती. याबाबत बोलताना रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर टी. रवी शंकर म्हणाले होते. CBDC एकप्रकारचं अधिकृत चलन आहे, जे रिझर्व्ह बँकेद्वारे जारी करण्यात येईल. हे अगदी नेहमीच्या पैशांसारखंच असेल आणि त्याचे मूल्यसुद्धा तितकेच असेल.