सह्याद्रीच्या साक्षीने…

सह्याद्रीच्या साक्षीने…

बाजी प्रभू देशपांडे यांची पावनखिंडीतली लढाई…

पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे लढले। तोफांचे आवाज ऐकू येईपर्यंत ते झुंजतच होते. पन्हाळ्यावरून निसटल्यापासून पावनखिंडीत पोहोचेपर्यंत ते सतत झपझप चालत होते. भर पावसांत. गडद अंधारात. पन्हाळ्याहून निघाले दि. १२ जुलैच्या रात्री सुमारे १० वाजता. अन् पावनखिंडीत पोहोचले १ 3 जुलैच्या दुपारी सुमारे एक वाजता म्हणजे सतत १५ तासांची धाव चालू होती त्यांची.

तिथेच लढाई सुरू झाली। ती रात्री जवळजवळ सात-साडेसातपर्यंत. म्हणजे सतत सहा तास ते तलवारी हाती घेऊन झुंजत होते. सतत २२ तास शारीरिक श्रम. अविश्रांत. मृत्यूशी झुंज. ही शक्ती त्यांच्या आणि मावळ्यांच्या हातापायात आली कुठून ? यावेळी बाजीप्रभूंचं वय काय असावं ? इतिहासाला माहीत नाही. पण सात पुत्रांचा हा बाप , निदान पन्नाशी उलटलेला शमीचा वृक्षच होता. त्यांना उद्दिष्टाचा गड गाठायचा होता. त्यांची निष्ठा रुदासारखी होती.

‘ अंगी निश्चयाचे बळ , तुका म्हणे तेचि फळ। ‘ फुटो हे मस्तक , तुटो हे शरीर , हाच त्यांचा हट्ट होता. उद्दिष्ट साधेपर्यंत मरायला त्यांना सवडच नव्हती. ‘ तोफेआधी मरे न बाजी , सांगा मृत्यूला! ‘ हा त्यांचा मृत्यूला निरोप होता. बाजी , फुलाजी आणि असंख्य मावळे सहजसहज मेले. सूर्यमंडळ भेदून गेले.

पाय
रोवुनी उभा ठाकलो
मनी आता
तमा कुणाची
मर्द मराठा मावळा
मी
नोहे साधारण सैनिक
कुणी
राजंसुखरूप जा
गडावरी

उभा राहिलो घोड
खिंडी
शत्रुसैन्याचा काळ बनुनी
पावन ती खिंड
जाहली
मर्द मराठी वेड
पाहुनी
राजंसुखरूप जा
गडावरी

रक्त पिउनी प्यासी
अजुनी
दांडपट्ट्यांची पाती
कितेक शिरं कापुनी
काढली
सामोरी पडती लाशींच्या
राशी
राजंसुखरूप जा
गडावरी

अनेक जाहले घाव
वर्मी
केली देहाची चाळण
पुरती
महामेरुसम निश्चय मनी
शीणली जिद्द
अजुनी
राजंसुखरूप जा
गडावरी

प्राण एकवटले सारे
कानी
अजून मिळे
तोफांची वर्दी
गळुनी पडले खड्ग
हातुनी
राजं.. नाही हरला
तुमचा बाजी

सुखरूप जा तुम्ही
गडावरी
शेवटाकडे आली लढाई
देहातुनी चालले प्राण
सुटुनी
उजाडेल नवा सूर्य
स्वराज्यी
मालवून आमची प्राणज्योती
राजंसुखरूप जा
गडावरी

© 2014 – 2016, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!