Daanav Hunters

Daanav Hunters

 

Epic TV  Channel वरील अजून एक interestingमालिका, दानव hunters! नावातच सर्वकाही आहे. दानव म्हणजे भूत, राक्षस, पिशाच, असुर, चूडईल, चेटकीण आणि काय काय. आणि hunters म्हणजे शिकारी. याचा अर्थ असा की दानवांची शिकार करणारे. पण शिकार ही बर्‍याचदा नशा, शौक आणि मजा म्हणून करत असतात, पण येथे ही शिकार ‘दुनिया की भलाई’, ‘सच्चाई की लढाई’ वगैरे वगैरे कारणांसाठी आहे.
           कथा अशी आहे की भागवत नावाचे एक प्रोफेसर आहेत (किंवा होते) ज्यांच्या रक्तात दैवी अंश आहे. त्यामुळे संपूर्ण भागवत चे पूर्वज हे दानवांच्या विरुद्ध लढाई लढत आहेत. त्यांच्या ह्या लढाईत त्यांचे विविध सहकारी, उदाहरणार्थ शुंडी, मेजर, गॉर्डन वगैरे मंडळी आहेत. दुसर्‍या बाजूला आहेत राक्षस व तमाम नकारात्मक वर्ग जो जो त्यांच्या दैवताला भूमिवर आणून त्यांचं राज्य प्रस्थापित करू इच्छितात. दानव ज्यांना आपण रामायण-महाभारत युद्धानंतर संपले अस समजत होतो ते शतकाणू-शतके दानव राज्य प्रस्थापित करू पाहत आहेत पण भागवतांचे पूर्वज त्यांना हे करण्यापासून रोखत आहेत. पण ह्यात आता एक अडचण निर्माण झाली आहे. भागवंतांचे आत्ताचे वंशज प्रोफेसर हे दानवांचा प्रतिकार करताना मृत पावले आहेत ज्यामुळे दांनवांशी चालू असलेल्या लढाईला सेनापती उरला नाही. पण अचानक प्रोफेसर यांची मुलगी जी परदेशात असते (जिच्या संरक्षणासाठी खुद्द प्रोफेसर तिला परदेशात पाठवतात) ती आपल्या वडलांच्या शोधत भारतात परतली आहे. आणि बाकी सिरियल चा भाग आहे…..

            कथा ही आपण अनेकदा वाचलेली, ऐकलेली किंवा बघितलेली आहे. आपल्याला आठवत असेल तर आपल्या लहानपणीचा नायक शक्तिमान किंवा अलिकडचा हॅरी पॉटर हे त्याच क्षेत्रातील होते. कथेत जरी साम्य वाटत असेल तरी बाकी विविधता बरीच आहे. कथेत दम आहे. आपल्याकडे sci-fi चित्रपट किंवा मालिका फार येत नाहीत, पण ही मालिका त्याची कमी नक्कीच भरून काढेल. कथा लिहिताना सर्व गोष्टींचा विचार केला आहे, अगदी पुरणापासून विज्ञानापर्यन्त सर्वच गोष्टीचा विचार करून कथेची आखणी केली गेली आहे. कथेत भारतीय परंपरेनुसार बर्‍याच गोष्टी टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मालिकेत वाण्या नावाची परदेशातून फिज़िक्स शिकून आलेली भागवंतांची मुलगी आहे, तिच्याशी भांडणारा (नंतर प्रेम वगैरे जुळेल हे सांगायची आवश्यकता नाही) मेजर आहे, एक संस्कृतप्रेमी ज्याला आपण बाबा टाइप म्हणू शकतो असा शुंडी नावाचा मांत्रिक आहे, गॉर्डन नावाचा टेक्नॉलजी आणि पुराणातील संबंध जोडून नवीन शोध लावणारा तरुण आहे, एक रजनीकांत प्रेमी मुत्थू आहे. ही पात्रे कथेत अतिशय योग्यरीत्या बसले आहेत.
           मालिकेची खासियत सांगायची म्हंटली तर ती आहे मालिकेतील रिचनेस. मालिकेत अॅनिमेशनचा चांगला वापर केला आहे, पौराणिक वस्तु दाखवल्या आहेत त्याही सुंदर आहेत, रंगभूषा-वेशभूषा (costume & make-up) हा तर अप्रतिम आहे. मालिकेतील ही श्रीमंती मालिकेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. मालिका बघताना आपण एका वेगळ्या विश्वाबद्धल बघतो आहोत, ऐकतो आहोत अशी जाणीव नक्कीच होते. पुराणातील गोष्टींचा योग्य वापर केल्याने सर्वकाही थोतांड आहे अस आपण म्हणत बसत नाहीत.
             मालिकेतील कलाकारांचा अभिनयही चांगला आहे. विशेषतः वाण्या च्या भूमिकेतील तारा डिसुजा हिचा अभिनय विशेष उल्लेखनीय आहे. एक परदेशातून आलेली मुलगी ही भूमिका तिने खूप चांगली सजवली आहे, त्यातील हिंदीचं इंग्लिश (परदेशी) उच्चार हे खूप चांगले जमले आहेत. शुंडी, मेजर आणि बाकीचे महत्वाची पात्रे हीसुद्धा चांगली जमून आली आहेत.  
             आपण हॅरी पॉटर, द हॉबीट किंवा तद्सम चित्रपट आवडीने बघतो तशीच ही मालिकाही बघण काही जड जाणार नाही. मालिकेची मांडणी खूप चांगली आहे. कथेत भारतीय फोडणी आहे. पण आत्तापर्यन्त तरी मालिका एक नावीन्यपूर्ण अन वेगळी वाटत आहे.

© 2014 – 2016, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!