अदृश्य – Adrishya On Epic TV

अदृश्य – Adrishya On Epic TV

Epic वाहिनीवर आणखी एक मालिका बघण्यात आली. अदृश्य! ह्या मालिकेचीही जातकुळी वेगळीच आहे. आपल्या पुराणात, इतिहासात किंवा ऐकिवात असलेल्या गुप्तहेर यांच्या कथा म्हणजे अदृश्य मालिकेचा सार. कुठलही राज्य असो ते जर राजाला सुरक्षित ठेवायचं असेल तर शत्रूची खडान-खडा माहिती ठेवण हे राजाला अपरिहार्य आहे. शत्रूच्या काय हालचाली आहेत हे ओळखून आपली रणनीती ठरवणे ही कुठल्याही मत्सुद्दी आणि जागरूक राज्याची गरज असते अन अशा कार्यक्रमात राजाची खरी मदत करत असते त्याची खास अशी निष्ठावान फौज ज्याला ओळख नसते ना स्वतःची खरी ओळख, माहीत असत ते मृत्यूच्या भोवती वावरण. अशा फौजेला गुप्तहेर खात म्हणतात. हे खात थेट राजाला उत्तरदायी असत. आणि अशा गुप्तहेराला आपली कामगिरी ‘अदृश्य’ होऊनच पार पाडावी लागते, म्हणून मालिकेच नाव अदृश्य ठेवलं असेल.

                       मालिकेतील प्रत्येक भागात इतिहासातील किंवा पुराणातील एखाद्या सत्य गुप्तहेराच्या आयुष्याची कहाणी सांगण्यात येते. यात तो हेर स्वतः स्वतःचीच कथा आपल्या तोंडून सांगत असतो जे खूपच परिणामकारक वाटत राहत. प्रथम भागात ज्या गुप्तहेराच्या आयुष्याची कथा सांगितली आहे तो आहे, तुमच्या-आमच्या केवळ ओळखीचाच नव्हे तर जिव्हाळ्याचा बहिर्जी नाईक! छत्रपती शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख. तो भाग अप्रतिम होता इतकच सांगणं पुरेसं आहे.
                         एका गुप्तहेराच्या आयुष्यात नेमकं काय असत हे सांगण्याचा मालिकेत केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. ती लोक ज्यांच्यामुळे इतिहासात मोठे-मोठे युद्धं झाले असतील, थांबले असतील, जिंकले असतील, हरले असतील असे प्यादे. गुप्तहेर हे इतिहासातील ‘Unknown Hero’ आहेत ज्यांच्याबद्दल फार चर्चा केली जात नाही. अशाच हिरोंना जगासमोर आणण म्हणजे त्यांचा सन्मानच आहे. शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या, अनेकदा शत्रूंना परास्त केल, अनेकदा जीवाला वाचवण्याच कसब साधता आल ते केवळ अशा इतिहासाला माहीत नसलेल्या गुप्तहेरांच्या भरवश्यावरच. गुप्तहेर याला दुसर नाव आहे निष्ठा, त्याग किंवा मृत्यू! मालिकेत इतिहास उलगडून सांगण्यात आला नसला तरी त्या हेराच्या आयुष्यावर लक्ष केन्द्रित केल आहे.
                       नूर इनायत खान यांच्यावरील भागतर विशेष महत्वाचा होता जो सांगतो की भारतातील एका नवाबची कन्या ही भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कोणता त्याग करू शकते. ही वस्तुस्थिती अनेकांना माहीत नसणार जी या मालिकेतून सर्वांसमोर आली आहे.
                      आज जो भाग होता तो आपल्या पुराणातील कच्छ या इंद्राच्या (किंवा देवतांच्या) गुप्तहेराची ज्याने असुरांचे गुरु शुक्राचार्य यांच्याकडून मृत संजीवनी विद्या मिळवण्यास एक हजार वर्षे प्रयत्न केले. हीसुद्धा पुराणातील जास्त ऐकिवात नसलेली कथा समजली.
                      मालिकेचा विषय अर्थात Outline ही खूप वेगळी अन नावीन्यपूर्ण आहे. ही मालिकाही माहिती देऊन जाणारी असल्याने ज्यांना ‘बौद्धिक’ आवडतात त्यांना भावेल अशी आहे, बाकीच्यांच सांगता येणार नाही. माहितीची अन रहस्यांची आवड असेल तर ही मालिका नक्कीच बघावी.

© 2014 – 2016, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!