About us

About us

 

Late Night Edition! ची सुरुवात?

एकदा मित्र-मित्र बसलो असताना सहजच म्हणून एक ब्लॉग सुरू केला. तसं पाहता त्या ब्लॉग ला फार काही अर्थ नव्हता. पण नंतर त्यातून लिखाणाची एक शैली विकसित होत गेली. सुरूवातीला आमच्यातील एकटाच हा ब्लॉग चालवायचा, पण नंतर हळूहळू इतर join होत गेले. आज चार-पाच जण मिळून वेगवेगळ्या विषयावर लिखाण करत असतो.

सुरूवातीला ab5nights.blogspot.com ह्या संकेतस्थळाखाली Late Night Edition! नावाचा ब्लॉग चालू होता. त्या ब्लॉगला आमच्यातील एकटाच मित्र सांभाळत होता. ब्लॉग ला अन त्यावरील विविध विषयांना चांगला प्रतिसाद मिळत गेला. मध्यंतरी काही कारणास्तव ब्लॉग वर पोस्ट पब्लिश होत नव्हत्या तरीही त्यावर प्रतिक्रिया येणं चालूच होतं. ब्लॉग यशस्वी होत होता. मित्रांनाही ह्या चांगल्या वाटू लागल्या. नंतर मग काही मित्रांनाही यात सहभाग घ्यावा वाटू लागला. अर्थात, अशा partnership ला blogspot वर काही मर्यादा येऊ लागल्या, त्यामुळे मग ह्याच नावाने थोडीशी सुकर अन सुंदर अशी एक website बनवण्याची कल्पना सुचली अन विचार बदलायच्या आत त्यावर अमल सुरू केला. शिवाय ब्लॉग वर नव्याने लिखाणाची सुरुवात करत असताना नवीन website घेऊन येणं हेही जरा भारी वाटत होतं. …आणि ह्या website ने जन्म घेतला… अजून टाहो फोडणं चालूच आहे…

 

Late Night Edition! च का?

नावात काय? असं काही जण म्हणत असतात. पण नावात बरच काही असतं हे काही जणांनाच कळतं. त्या समजूतदार लोकांपैकी आम्ही एक आहोत. ब्लॉग सुरू करत असताना ‘बारसं काय करायचं?’ असा प्रश्न फार काही त्रास देणारा नव्हता. रात्रीचा रिकामटेकडा वेळ हाच ह्या ब्लॉगचं आयुष्य असणार हे माहीत होतं. म्हणून मग Late Night Edition! अर्थात, ज्याचा उगम रात्री होणार अशी ही आमच्याच लिखाणाची गंगा! (गंगा वगैरे जरा अति होत आहे) खरं तर याचं नाव मराठीत ठेवावं अशी ‘आत्याची’ खूप इच्छा होती, पण ते ह्या ब्लॉग च्या प्रकृतीला शोभत नव्हतं. सुचलेलं नाव होतं, ‘रात्रीची शाळा’… पण अल्प विचाराअंती हे नाव reject झालं. Late Night Edition! वर रात्रीचे पराक्रम सुरू झाले. नंतर जे मित्र join झाले त्यातील बरेच जण engineering चेच होते, त्यामुळे रात्र ही त्यांना article posting ला उत्तमच होती… आणि नावही… त्यामुळे नावावर फार गहन चर्चा न होता Late Night Edition! हे नाव चिटकलं गेलं आणि latenightedition.in हा संकेतस्थळ जन्माला आला.

 

Late Night Edition! वरील मजकूर?

यावर एखादा विशिष्ट मजकूरच ठेवायचा असले विचार काही मनात आले नाहीत. एखादं वृत्तपत्र ज्याप्रमाणे सर्व प्रकारच्या गोष्टी-घटनांचा मागोवा घेत असतं त्याप्रमाणेच आम्हीही जमतील त्या गोष्टी, घटना, मजकूर यावर publish करत असतो. ज्याला जे विषय जमतात, अशी त्याची समजूत असते तो तशा प्रकारचे मजकूर publish करत असतो. त्यामुळे Late Night Edition! वर राजकारण, कथा, कविता, विज्ञान, अध्यात्म, आरोग्य, चित्रपट, पदार्थज्ञान, मनोरंजन वगैरे विचारांचं ज्ञान (मर्यादित) पाझरलं जातं. यामुळे अगदी ‘काहीही’ तुम्हाला Late Night Edition! वर सापडेल!

 

भाषा प्रश्न?

यावर थोडे मतभेद होते अन अजूनही आहेत. काही मित्र म्हणत होते की Late Night Edition! वर पुर्णपणे English भाषेचा वापर करावा. पण ही कृती अशक्य होती. एक तर आमच्यातील सगळे पट्टीचे English वाले नाहीत, त्यामुळे हा गहन प्रश्न होता. दुसरी गोष्ट म्हणजे यावरील आधीचं बरचसं content मराठीत असल्याने त्याचं भाष्यांतर शक्य नव्हतं. तिसरी गोष्ट म्हणजे, आमच्यातील काही राष्ट्रवादी आहेत. म्हणजे ‘मराठी’ यावर तडजोड अर्थात compromise शक्य नव्हतं. खरं तर प्रत्येक माणूस आपल्या मातृभाषेतचं उत्तम प्रकारे व्यक्त होऊ शकतो. शिवाय मराठीचा प्रसारही आवश्यक आहे हे आम्हाला पटत होतं. आणि महत्वाची गोष्ट अशी की आम्ही जरी मराठीत लिहीत असलो तरी Translator हे उपलब्ध आहे. कुठलाही वाचक असो, तो मराठीतील content त्याच्या मातृभाषेत वाचू शकतो. यात अडसर नाहीत.

 

खुलासा:-

आम्ही कुठल्याही इतर भाषेचा द्वेष करत नाहीत. English तर नाहीच नाही. फक्त, जमत असेल तर मातृभाषा वापरणे हे आमचं कर्तव्य (आणि अडचण, कारण इतर भाषा तितक्याशा जमत नाहीत आम्हाला) आहे.

 

एक उपक्रम

आम्ही तर सध्या यावर विविध विषय हाताळत आहोत. पण विषय अमर्याद असतात हे आमच्या मर्यादित बुद्धीला पटतं. त्यामुळे आम्हाला content ची कायम आवश्यकता आहेच आहे. तुमच्यातील, अर्थात वाचकतील कोण जर स्वतःचे विचार यावर मांडू इच्छित असेल तर तुमचं सहर्ष स्वागत आहे. तुमचे कुठल्याही प्रकारचे विचार असू देत, ते आमच्यापर्यंत पोचवा, आम्ही ते कायद्याच्या चौकटीत बसत असतील तर नक्कीच publish करू. म्हणत असाल तर नावासोबत अन नावाशिवायही छापायची आमची तयारी आहे.

Article publish करायला काहीच अडचण नाही. तुम्ही जर स्वतःची कादंबरी, कथासंग्रह, कविता, शोधनिबंध किंवा इतर प्रकारचे साहित्य प्रकाशित करू इच्छित असाल तर तेही अतिशय कमीत कमी किमतीत (Nominal Fee Of Processing Only or conditionally free) प्रकाशित करायची आमची तयारी आहे.

तुम्हाला खाली दिलेल्या email-id वर तुमच्या आर्टिकल किंवा साहित्य संबंधी माहिती द्यायची आहे किंवा संपर्क साधायचा आहे. त्याद्वारे आम्ही आपल्याशी चर्चा करू.

ईमेल/Email      latenightedition.in@gmail.com

error: Content is protected !!