Tag: अध्यात्म

उत्तरायण – कर्ण का आवडतो?

उत्तरायण – कर्ण का आवडतो?

उत्तरायण  ||  कर्ण का आवडतो ?  ||  महाभारत  ||  अध्यात्म  ||  मृत्युंजय  ||

 

महाभारतातील तुमचं आवडतं पात्र कोणतं हा प्रश्न विचारला तर त्यात कृष्ण आणि कर्ण ही दोन उत्तरे प्रामुख्याने मिळतात. त्यातल्या त्यात पुरुषांकडून कर्ण हे उत्तर मिळतं आणि स्त्री वर्गाकडून कृष्ण हे उत्तर मिळतं. तुम्हाला दुसरं पात्र आवडत असेल तरी ठीक आहे. त्यात वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही.

पण ज्यांना कर्ण हे महाभारतातील सर्वात उत्तम व्यक्तिमत्व वाटतं त्यांच्यापैकी बहुसंख्य मंडळींनी “मृत्युंजय” किंवा “राधेय” ही कादंबरी वाचलेली असते. म्हणजे,त्यांच्यावर त्या लेखनाचा,त्या लेखकाने ज्या पद्धतीने कर्ण मांडला आहे त्याचा प्रभाव जाणवतो. त्या कादंबरीच्या,म्हणजेच त्या लेखनाने त्यांच्यावर इतका प्रभाव झालेला असतो की त्यांना कर्ण हाच महाभारतातील महानायक वाटू लागतो. (खुलासा – तो महानायक नाहीये असं काही माझं म्हणणं नाहीये.) पण असं म्हंटलं जातं की महाभारतातील कुठलंच पात्र,कुठलीच व्यक्ति पुर्णपणे निष्पाप किंवा पुर्णपणे धर्मानुसरण करणारी नव्हती. प्रत्येकाची काळी-पांढरी बाजू होती,प्रत्येकात गुण-दोष होते. असं असतांनाही कर्ण उजवा वाटतो यामागे काय रहस्य असलं पाहिजे?हा केवळ लेखनाचा प्रभाव असेल की आणखी काही…?म्हणजे,तशी पात्रांची तुलना करायची नाहीये,पण राजकुमार हिराणी चा “संजू” बघितल्यानंतर संजय दत्त जर कोणाला आवडत असेल तर त्याचं श्रेय लेखक-दिग्दर्शकाला नक्कीच दिलं पाहिजे. असो!

मूळ विषय असा आहे की पुरूषांना (बर्‍याच) कर्ण का आवडतो?त्यामागचा शोध घेतला असतो खूप भारी कारण मिळालं!

कर्ण म्हणजे खरं तर राजपुत्र. पराक्रमी! धाडसी! त्यागवीर! दानशूर! वगैरे वगैरे. पण त्याला काय मिळालं?तर जन्मापासून अवहेलना… केवळ माणसांकडूनच नाही तरी नियतीने त्याची अवहेलना केली,उपेक्षा केली. त्याला कधीच न्याय मिळाला नाही. त्याच्या नशिबी फक्त भोग आले. अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत!

कर्ण एक चांगला मुलगा होता,चांगला पती होता,चांगला भाऊ होता,चांगला मित्र होता,चांगला शासक होता,चांगला योद्धा होता… सगळी कर्तव्ये प्राणपणाने निभावली असताना त्याच्यावर नेहमीच अन्याय झाला हे कर्णाबद्दल सर्वश्रूत आहे. म्हणजे,“मृत्युंजय” किंवा “राधेय” किंवा अन्य कादंबरीमधून हेच प्रतीत होत राहतं.

मी इतका चांगला मुलगा होतो,आई-बापाला सांभाळतो,त्यांच्यासाठी सर्व करतो तरी आई-बाप माझ्यापेक्षा इतर भावंडांवर जास्त प्रेम करतात. मी माझ्या भावंडांना इतकं सांभाळतो,आयुष्यभर त्यांच्यासाठी कमी केलं का,तरीही लेकाचे संपत्तीच्या वाटणीत जास्तीचा हिस्सा मागतात. मी ऑफिसमध्ये इतकं राबतो तरीही बॉस त्याला भाव देतात,पगारवाढ देत नाहीत. मी इतका चांगला मित्र आहे त्याचा तरीही त्याने मला अशी वागणूक का द्यावी. वगैरे वगैरे वगैरे…

प्रत्येक पुरुष स्वतःशी असा संवाद करत असतो. पुरुष हे स्वतःची दुखं,वेदना,भावना जे काही असेल ते उघडपणे व्यक्त करीत नाहीत असं म्हणतात. त्यांना नेहमी असं वाटत असतं की आपल्यावर काहीतरी अन्याय झालाय (वाटणे आणि असणे यात फरक),आपण सर्वांसाठी सर्वकाही करतो तरीही आपल्याला योग्य न्याय मिळत नाही. अशा प्रकारच्या भावना उरात दडपून ठेवणारा हा पुरुष जेंव्हा मृत्युंजय,राधेय किंवा कर्णबद्दल कुठे वाचतो-बघतो तेंव्हा त्याच्या भावनेचे-वेदनेचे बांध फुटतात आणि तो स्वतःला कर्णामध्ये पाहू लागतो. कर्णाची आणि आपली दुखे सारखीच आहेत असं त्याला वाटायला लागतं. अगदी द्रौपदी खरी तर माझीच होती,माझ्याच पराक्रमाला शोभून दिसणारी होती पण केवळ सुतपुत्र (आपल्याकडे पैसा,घर वगैरे नसल्याने एखाद्या मुलीने नाकारणे ही भावना) असल्याने तिने आपल्याला झिडकारलं ही भावनाही कर्ण आवडण्यासाठी पुरेशी असते.

असो! इतकी कारणीमीमांसा पुरेशी आहे की कर्ण हेच महाभारतातील सर्वोत्तम व्यक्तिमत्व आहे असं वाटायला.

खुलासा – लेखातून महारथी कर्णाला कुठेही कमी लेखण्याचा प्रयत्न केला नाही. कर्ण हा महाभारतातील शूर योद्धा तर होताच शिवाय सर्वांपेक्षा सरस होता. लेखाचा उद्देश एवढाच की कुठलाही व्यक्ति पुस्तक वाचत असताना किंवा चित्रपट बघत असताना स्वतःला relate करत असतो. स्वतःला शोधत असतो. स्वतःशी संवाद साधायचा प्रयत्न करत असतो. यामधून समजण्यासारखी एक गोष्ट म्हणजे,लेखक आणि दिग्दर्शकात इतकी ताकद असते की तो एखाद्या व्यक्तीबद्दल,घटंनेबद्दल,प्रश्नाबद्दल जगाचा दृष्टीकोण बदलू शकतो. लेखन जर तितकं प्रभावी असेल तर त्यात जगाला दृष्टी देण्याची क्षमता असते. त्यामुळे लेखकाने (म्हणजे प्रभावी लेखकाने,माझ्या सरख्यांनी नाही) ते भान नेहमी जपायला हवं!

Abhishek Buchake   ||   @Late_Night1991

उत्तरायण

 

उत्तरायण

उत्तरायण

महाभारत  ||  मैत्री  ||  दुसरी बाजू  ||  सत्य आणि आभास  ||  कर्ण आणि दुर्योधन 
मित्र कर्ण, मीच तो दुर्योधन ज्याने तुला सर्वप्रथम आपलां मित्र बनवलं। तुझ्या कर्तुत्वाला पारखून तुला सिंहासन दिलं। ज्यावेळेस तू अस्पृश्य होतास, सुतपुत्र म्हणून हिनवला जात होतास तेंव्हा तुझ्यातील प्रखरता पाहूनच तुझ्या खांद्यावर मैत्रीचा हात ठेवला।

तुझा पराक्रम बघून तुझा वापर करून घेता येईल ह्या स्वार्थी भावनेनेच तुझ्यासाठी मैत्रीचा हात लवकर समोर केला। पण आपल्या मैत्रीतील ओलावा इतका होता की कधीच तुझा मत्सर केला नाही। एक योद्धा म्हणून तर तू हवाच होतास पण नंतर निर्माण झालेल्या मैत्रीच्या अनुबंधामुळे माझ्या 99 भवांपेक्षा तू अधिक जवळचा अन विश्वासू वाटत आलास!
हीच मैत्री अखेरच्या श्वासापर्यंत कायम राहील!

पण भीती वाटते! हेच की तुही पितामह किंवा गुरुवर्य प्रमाणे त्या पांडवांचाच हितचिंतक निघालास तर???

तर मग मी पुरता कोलमडून जाईन। मग कुठेतरी मला अश्वत्थामा या पराक्रमी अन निष्ठावंत सैनिकाची आठवण येईल। तुझ्या पराक्रमापेक्षा त्याची निष्ठा अधिक महत्वाची होती हे मला मृत्यूनंतर समजलं! पण मित्रांप्रति काय तो राग कर्ण!

तू तुझ्या प्राक्तनाचे भोग भोगलेस अन मी माझ्या! अजूनही आपण तितकेच गाढे मित्र आहोत! पुढच्या जन्मी जर हाच जन्म मिळाला तर पुन्हा तुझा मित्र व्हायला नक्कीच आवडेल!

जेष्ठ कुंतीपुत्र म्हणून तुला तुझा हक्क कधीच मिळाला नाही अन कौरवांचा मित्र म्हणूनही तुला सर्व स्वीकारू शकले नाहीत। तुला जिवंतपणीच अंतराळात भटकणाऱ्या अतृप्त आत्म्याचे भोग नशिबी आले। तुझा जन्म हा अपघात असला तरी तुझा मृत्यू हा साक्षात ईश्वरनियोजित होता। ह्या अनादी अनंत विश्वात एक जन्म तरी तुला असा भेटेल जेथे तुझ्या ह्या त्यागाचं अन पराक्रमाचं फलित तुला मिळेल। तू भूपती झालेलं मला बघायचं आहे। त्या जन्मातही तुझ्या मैत्रीचा आधार मला हवाच असेल। माझ्या स्वतःच्या पदरी कसलं पुण्य नसेलही, पण सूर्यपुत्रा, पूर्वजांकडून पुण्याचं जे दान मिळालं असेल तो संचय मी तुला अर्पण करेन!

अंधार होतोय… सगळं धूसर दिसू लागलंय… बहुदा जाण्याची वेळ आली असावी… काही प्रश्नांची उत्तरे हवी होती म्हणून मृत्यूनंतर ही भेट घडवली असेल… तू कौंतेय ? राधेय ? जेष्ठ पांडव ? सूर्यपुत्र ? महारथी कर्ण ? नाही… माझ्यासाठी तू फक्त मित्र!!!

टीप – माझ्या #उत्तरायण या येऊ पाहणार्‍या एका लेखनसंग्रहातील हा उतारा! मृत्यूपश्चात कर्ण आणि दुर्योधन यांच्यातील हा संवाद!

– अभिषेक बुचके

Harry Potter Characters are Like Mahabharata

मार्गस्थ…!

मार्गस्थ…!

मराठी कथा   ||  भावनिक  || संन्यास  ||  स्वलेखन  ||  Marathi Stories  ||  काहीतरी वेगळं  ||  आत्मभान  || विरक्ती

सगळं सोडून दिलं. अजून किती काळ आठवणींना उराशी कवटाळून जगायचं. भूतकाळात जगणं म्हणजे आजचं अस्तित्व झुगारून देणे. ह्या जुन्या आठवणी म्हणजे निव्वळ दलदलीप्रमाणे असतात; जितकं त्याच्यात अडकत जाऊ तितकं अजून खोलात अडकत जाणार. म्हणूनच त्यात अडकायला नको असं ठरवलं. रात्रीचं अंगणात शतपावली करत असताना सहज आकाशाकडे लक्ष जातं आणि आठवतं की आज तर पोर्णिमा. मग त्या चंद्राच्या सौन्दर्यत आपण हरखून जातो. आठवणीही अशाच कधीतर अचानक समोर येतात अन आपण त्यात हरवून जातो.

पण आता हे सगळं थांबवायला हवं. मनावर, मेंदूवर ताबा मिळवायलाच हवा.

घरात एक पेटी होती ज्यात जुन्या आठवणींचा खजिना होता. खजिना होता की जळमट होते कोणास ठाऊक. आठवणी कोणासाठी खजिना असतात तर कोणासाठी मनाला लागलेली जळमट.

ती पेटी खूप जुनी होती. आजोबा गावाला जाताना ती घेऊन जात असत. सगळं ठरलं होतं. ती पेटी तशीच उचलली अन अंगणात गेलो. अंगणात ती पेटी आदळली तोच त्याची कडी तुटली अन त्यातील सगळ्या वस्तु बाहेर पडल्या. वस्तु कसल्या आठवणींचा खजिना… पण जुनाट अमूल्य खजिन्यावर नाग रक्षणाला फना काढून उभा असतो तसा ह्या आठवणीवरही विषारी नाग सतत पहारेकरी म्हणून तत्पर असायचा. मन त्या आठवणीकडे गेलं की नैराश्यरूपी नाग सतत फना काढून डंख मारायचा. तीव्र वेदना व्हायच्या! पण मग पुन्हा पुन्हा तिकडे वळायचं!

भूतकाळातल्या आठवणीना जितकं जपून ठेवतो तितक्या त्या वारंवार उफाळून येत असतात अन आपण काल्पनिक जगात वावरू लागतो. आजचं अस्तित्व विसरून होऊन गेलेल्या गोष्टींचा विचार करत बसतो अन भविष्यात त्या आठवणींचं काय होईल याचा विचार करत बसतो. आधी ह्या आठवणी जपून ठेवायची मला खूप हौस होती, पण आता त्या आठवणी घराला लागलेले जळमट वाटू लागली आहेत. सगळी काढून टाकायची होती अन मन स्वच्छ करायचं होतं.

घरात शिरताच समोरच्या टेबलवर आजीने स्वतः बनवलेले एक चित्र ठेवलेलं दिसायचं. कधी निवांत बसलो अन त्याच्याकडे लक्ष गेलं की दहा-बारा वर्षांपूर्वी गेलेल्या आजीच्या आठवणी जाग्या होतात. ती मरताना आपण तिच्यासोबत नव्हतो हे शल्य मनात आजही दाटून येतं. मग तिच्यासोबत घालवलेले क्षण आठवतात अन कधी-कधी तिच्याकडे केलेलं दुर्लक्ष आठवून मनाला तीव्र वेदना होऊ लागतात. मग झोप लागेपर्यंत तेच विचार डोक्यात लोलकासारखे फिरत राहतात. डोळ्यातून पाणी काढायची परवानगी नसते. मग आजी अनाहूतपणे स्वप्नात येते अन “तुझं काहीच चुकलं नाही रे राजा” असं सांगते तेंव्हा कुठे मनाला आधार मिळतो… सकाळ झाली की अंधुकसं आठवणारं स्वप्न विसरून जातो अन कामाला लागतो… काही दिवसांनी ते चित्र काढून पेटीत टाकून दिलं… कारण तिच्या आठवणीत रमल्यावर आजचं भान उंबर्‍याच्या आत येतच नाही. मला त्यावर नियंत्रण मिळवायचं होतं. नको असलेलं पण व्यसनासारख्या चिटकुन बसलेल्या गोष्टींना सोडून द्यायला शिकत होतो.

Related image

आजोबांची ती पेटीही खूप विचित्र होती. त्या पेटीच्याही आठवणी होत्या. आजोबा गावाला जाताना ती वापरायचे, पण मी लहान असताना त्यांनी मला ती देऊन टाकली. लहानपणी शाळेची पुस्तके वगैरे त्यात ठेवायचो. मग ती कायमस्वरूपी माझीच झाली. मग त्या पेटीत वाट्टेल ते ठेवायला लागलो. आजोबांनी मला दिलेली तेंव्हा तिचा रंग निळसर होता, पण माझ्या आठवणींचा भार सोसत ती कधी गंजून गेली हे लक्षातच आलं नाही. आठवणींचा गोतावळा सांभाळत सांभाळत माझ्या मनाप्रमाणेच तिचीही दयनीय अवस्था झाली होती. नको साला अडकायला!

ती पेटी उघडली. त्या पेटीतून फ्रेंडशिप बॅंड चा एक संचचं बाहेर पडला. लहानपणी फ्रेंडशीप डे ला सगळे मित्र ते बॅंड बांधायचे. त्यातल्या जवळच्या मित्रांनी बांधलेले बॅंडस जपून ठेवलेले होते. शंकरने बांधलेला बॅंड दिसताच गहिवरून आलं. तो कमी वयातच वारला होता. खूप जवळचा मित्र होता. सुरूवातीला आठवण यायची पण मग ती स्मृती कुठेतरी मेंदूच्या अडगळीत जाऊन पडली. आज हा बॅंड दिसताच त्या कुप्पीतून ती बाहेर आली. पण भावुक व्हायचं नाही हे आधीच ठरवलं होतं.

मग मला काहीतरी आठवलं अन त्या पेटर्‍यातील सामानत ती वस्तु धुंडाळू लागलो. सामान खाली-वर केल्यावर त्यात जांभळ्या रंगाची ती डायरीसारखी वस्तु सापडली. स्लमबुक!!! ते उघडताच आठवणींचे अनेक पक्षी अंगावर धावून आले. अनेक मित्रांचे नाव दिसत होते, त्यांचे आवडते रंग, खाद्य वगैरे वगैरे मी बघू लागलो. लहानपणी काय काय फॅड असतात. मोठेपणी या गोष्टी क्षुल्लक वाटत असल्या तरी त्यावेळेस त्याना खूप महत्व असायचं. जसे-जसे पानं उलटत गेलो आणि आता मात्र डोळ्यातून पाणी येत होतं. मी इतका कसा दुर्दैवी की त्यातील एकाशीही आज मी संपर्कात नव्हतो. आज ते कुठे आहेत हेही मला माहीत नव्हतं. खूप म्हणजे खूपच वाईट वाटलं. डाव्या छातीत जोरजोरात आवाज येऊ लागले. मी डोळे पुसले अन ते पुस्तक लांब फेकून दिलं.

सावरायला बराच वेळ लागला. पण आज सगळं संपवायचं मी ठरवलं होतंच. त्यात एक डबी दिसली. हसू आलं. मी ती आधाशासारखी उघडली. त्यात लहानपणी पडलेले दात जपून ठेवले होते. इथे आता फक्त चिकट काहीतरी दिसत होतं. मी स्वतःशीच हसलो. किती लहान लहान गोष्टीत विश्वाचं सुख मानायचो तेंव्हा… कुठे बिनसत गेलं अन स्वतःशी खेळणं सोडून दिलं…? आयुष्याचा पसारा इतका वाढवत गेलो अन स्वतःचं मन मात्र पोकळ होत असल्याच विसरून गेलो. पण आता विचार नाही करायचा… बास…

कधीतरी कार्यक्रमानिमित्त भेटवस्तू म्हणून दिलेली पुस्तके दिसली. त्यातली काही वाचायची राहूनच गेली होती. त्यावरचे नाव वाचले अन ती ती माणसे डोळ्यासमोर उभी राहिली. ती कदाचित मेलीही असतील आता!

मोठ्या भावापासून लपवलेले पाच रुपयाचा बंदा दिसला. तो मात्र परत खिशात ठेवला. वाटणी मागताना दोघांनीही ह्या पाच रूपयांचा हिशोब केला असता तर वाटणीच झाली नसती. हळहळ वाटली. पण आता परत उकरून नाही काढायचं. चला पुढे! छोड दो!

यामध्ये कुठल्याही मुलीची कसलीच आठवण नाहीये हीसुद्धा एक कटू आठवण म्हणावी लागेल.

खजिन्यातून चमकणारा हिरा किंवा मणी चमकावा तसा जुन्या फोटोंचा संच दिसला. अतिशय काळवंडलेला अन धुळीने खराब झालेला. तो उघडायची हिम्मत होत नव्हती. पण हात आपसूकच तिकडे वळले अन ते फोटो मी बघू लागलो. अनेक फोटो होते. अनेकजण नव्याने आठवू लागले. त्या धुळीने माखलेल्या अन त्या पिवळसर फोटोतून मायेची ऊब माझ्यापर्यंत पोहोचत असल्याची जाणीव होत होती. मित्र, भावंडे, नातेवाईक यांचे फोटो बघून गहिवरून आलं. कम्प्युटरची खूप मोठी मेमोरी फोटोंनी व्यापली असतांनाही ह्या निवडक फोटोंची सर त्यांना कधीच येणार नव्हती. पण ही स्मृतीसुद्धा मला जीवंत ठेवायची नव्हती. तोही बाजूला टाकून दिला.

त्या पेटीत बर्‍याच वस्तु सापडल्या. प्रत्येकाची खास काहीतरी आठवण होती म्हणूनच त्यांना त्या पेटीत जागा मिळाली होती. घरात अशा कितीतरी वस्तु असतात ज्या केवळ आठवणीच्या नावाखाली जागा अडवून ठेवतात. मनातील एक-एक स्वतंत्र कोपरा त्यांच्यासाठी आरक्षित ठेवलेला असतो, पण तो आपल्या मर्जीवर कुठे उघडतो. ते अनियंत्रित होऊ लागतं अन सगळा विचका होतो.

त्या सगळ्या वस्तु परत त्या पेटीत टाकून दिल्या. घरातून रॉकेल आणलं अन अंगणातच त्याची भडाग्नी दिली. आग लावून टाकली. सगळ्या सगळ्या स्मृती, आठवणी जाळून टाकल्या. त्या पेटीसोबत माझ्या आत्म्याचा एक भागही जळत होता. मी देहभान विसरून रडू लागलो. माझ्या शरीरातून कसलीतरी ऊर्जा निघून जातेय असं वाटत होतं. कोणत्यातरी जवळच्या मानसाच्या चितेला उभं असल्याप्रमाणे वाटत होतं.

काही वेळ मी अंगनातच बसून होतो. कवटी फुटेपर्यंत थांबतात तसं जुन्या आठवणींचे चलचित्र डोळ्यासमोरून पुसट होईपर्यंत तसाच बसलो. संध्याकाळ झाली होती. मी घरात गेलो. मोठं अन सर्वात अवघड काम झालं होतं. गडद आठवणीला मूठमाती दिली होती. आता छोट्या मोठ्या आठवणी अन स्मृतींना मारायचं होतं. समोर मी स्वतःच्या हाताने बनवलेल्या कागदांच्या आकृत्या होत्या. त्या क्षणात मोडून टाकल्या. गाडीच्या चावीला असलेलं गिटारचं किचन मला खूप लकी आहे असं मी समजायचो. तेही टाकून दिलं. सोशल मीडियावर जे accounts होते तिथे Good By केला अन ते बंद केले. बँक खातीही बंद केली होती. माझं अस्तित्व अन आठवणी मी पुसून टाकल्या होत्या. कसल्याच पाऊलखुणा ठेवल्या नाहीत.

घरातील इतर वस्तु घेऊन जाण्यासाठी लोक आले. सगळं सामान घेऊन गेले. फक्त माझ्या गरजेपुरता, म्हणजे मानवाला मूलभूत गरजा भागवण्यासाठी जी किमान साधने लागतात ती तेवढी होती. घराचा ताबा मावशीकडे द्यायचं ठरवलं होतं.

अजून एक काम राहिलं होतं. काल रात्री बसून एक यादी तयार केली होती. आयुष्यात काय-काय करायचं राहून गेलं, कुठे काय करायला हवं होतं, सगळ्या आकांक्षा, अपराध, न्युंनगंड, अहनगंड वगैरे वगैरे त्या यादीत होत्या. आई-वडलांची माफी मागितली होती. मला स्विमिंग शिकायची खूप इच्छा होती, ती कधीच शिकू शकलो नाही. कॉलेजमधील एका मेडमसोबत शारीरिक संबंध ठेवले होते ती आयुष्यातील मोठी चूक वाटायची. मित्राला पैसे असतांनाही आर्थिक मदत केली नव्हती. परदेशी जायचीही इच्छा होती. अशी वीस एकवीस नंबरपर्यन्त यादी होती. आता हे सगळं मनातून-मेंदुतून काढून टाकायचं होतं. ते परत एकदा वाचलं आणि एक मोठा निश्वास सोडून त्यालाही काडी लावली.

पूर्ण तयारी झाली होती. कधीतरी ठरवल्याप्रमाणे मी संन्यास घेत होतो. उद्या ४५ वा वाढदिवस होता. खूप पूर्वी डोक्यात जे होतं ते खरं करण्याची वेळ आली होती. इतकी वर्षे ह्या देहाने जगातील भौतिक सुखाचा पुरेपूर आनंद लुटला होता. उपभोगी, विलासी जीवन जगलो होतो. अनेक चुका केल्या. आता बास करुयात हा विचार आला. सगळं त्यागून मोक्ष व मुक्तिच्या मार्गावर निघावं असा निश्चय झाला होता.

जगात आपलं असं काय असतं? आठवणी अन स्मृती वेगळ्या केल्या तर आपल्या असण्या नसण्याला काहीच अर्थ नसतात. जगात कोणाच्याच लक्षात आपण नसू तर आपलं ह्या भूतलावावर काहीच अस्तित्व नाही आणि आपल्या आठवणीत, स्मृतीत कोणीच नसणं म्हणजेही आपलं असं कोणी नसणं ज्यांच्यासाठी आपण असावेत. शेवटी ह्या आठवणीमुळेच तर भूतकाळ, वर्तमान अन भविष्य आहे. या आठवणीच जर मोडून टाकल्या तर आपण ईश्वराच्या भेटीला निघालेले निर्मळ आत्मा म्हंटला पाहिजे. एका बिंदुचं अस्तित्व अन रेषेचं अस्तित्व यात फरक असतो.

सगळ्यात महत्वाचं आहे ते “सोडून देणे’! म्हणजे कसलाच मोह, माया न ठेवणे. कसलीच आसक्ती न ठेवणे. जीव अडकून राहील असं काहीच नसणे. एखादी गोष्ट जाऊ देणे यापेक्षा प्रभावी त्याग कुठलाच असू शकत नाही. एखादी गोष्ट माझी असणे म्हणजे काय? तर आपल्या मेंदूने त्या वस्तूवर मान्य केलेली मालकी. तीच मालकी जर मेंदूने सोडून दिली तर ती वस्तु आपल्याशी बांधील नाही. आपल्याकडे आपल्या मालकीच्या असलेल्या वस्तु देऊन टाकणे हा मोहातून मुक्त होण्याचा पहिला मार्ग. एखाद्या बॅगेत काहीच नसते म्हणजे ती हलकी असते तसं मनात-मेंदूत काहीच नसणं हेसुद्धा तसच! मुक्त!

मी माझ्या सर्व स्मूती, आठवणी, भौतिक संपत्ती, भावना सर्व त्यागून आपल्या मार्गाला प्रस्थान करणार होतो. संन्यास घेतोय म्हणजे भगवी वस्त्रे घालून गावोगाव फिरणार नव्हतो, पण जवळ गरजेपुरताच घेऊन पुढे जाण्याची वेळ आयुष्यात आली होती. अगदी प्रकृतीच्या नियमांनुसार. प्राणीही असेच राहतात. त्यांनाही काही देणं घेणं नाही ह्या जगाशी. जन्माला आले अन जगले एवढच त्यांचं आयुष्य. उगाच फालतू भानगडीत ते पडत नाहीत. त्यांना भावना नसतात असं नाही, पण त्या नैसर्गिक असतात. मानवाने प्रत्येक ठिकाणी कृत्रिमता आणून ठेवली आहे. ती मला सोडायची आहे… सोडतो आहे… एखाद्या प्राण्याप्रमाणे निसर्गाच्या नियमांनुसार जगायचं अन त्याच मार्गाने जात असताना मरून जायचं होतं… मागे वळून बघायची गरज नव्हती… कसले बंधन ठेवायचे नव्हते…

मी मार्गस्थ झालो होतो…

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

निवृत्ती

 

चेहरे आणि मुखवटे

चेहरे आणि मुखवटे

पुराणातील वांगी ट्विटरवर   ||  निरीक्षण  ||  अध्यात्म ते आभासी जग  || ट्विटरजीवन   ||  सहज सुचलेलं

 

हल्ली महाभारतात वगैरे मन रमत आहे. त्याबद्दल वाचत-बघत असताना सहज विचार आला की ही पात्रे आजच्या काळात एका ठिकाणी सापडतील का? उत्तर लगेच मिळालं. ज्या आभासी विश्वात रोजचा मुक्त विहार चालू असतो तिथे अशा प्रवृत्तीची मंडळी भेटतील का? काही साधर्म्य आढळेल का?

 

महाभारत, रामायण यांसारख्या पुराणात जे पात्र आहेत किंवा घटना आहेत तसे पात्र ट्विटरवर आहेत तशाच घटना ट्विटरवरही घडताना दिसतात असं माझं निरीक्षण आहे. तुलनात्मक दृष्ट्या मांडलं आहे, पण थेटपणे सर्वच्या सर्व संदर्भ लागू होत नाहीत.

 

पुराणात जसे राक्षस रूप बदलून येतात किंवा देव अवतार धारण करून येतात तसेच ट्विटरवरही आहेत. आपण त्यांना फेक अकाउंट किंवा मुखवटाधारी म्हणतो.

रावण साधूच्या रुपात येतो अन भिक्षा मागायचं सोंग करून सीतेचे हरण करतो. पण तत्पूर्वी सीतेला लक्ष्मणरेषा ओलांडावी लागते. जेंव्हा सीता सुरक्षित कवचातून बाहेर येते तेंव्हा रावणाचं खरं रूप समोर येतं, पण आता मात्र उशीर झालेला असतो. फेक अकाऊंटचा हेतु लक्षात येईपर्यंत जर आपण बेसावध असू तर मात्र आपली फसगत होऊ शकते.

दुसरं उदाहरण बघूया. मारीच नावाचा राक्षस जसे सुंदर हरिणाच्या रुपात येऊन मोहात पाडतो अन घात करतो. सुंदर दिसणारं खातं हे चांगल्याच हेतूने प्रेरित आहे याची काही शास्वति नाही. असेही गोत्यात आणणरे काही फेक खाते असतात. त्यांचे वाईट उद्दीष्ट रूप धारण करत असतानाच त्यांच्या डोक्यात असतात. त्यामुळे अशा खात्यांपासून सावध असावं लागतं.

कधी-कधी देवेंद्रही कोणाचीतरी तपश्चर्या मोडण्यासाठी मेणकेसारख्या सुंदर सुंदर स्त्रिया पाठवतो. याला हनी ट्रॅप म्हणता येईल. अशा खात्यांच्या मागे डोकं दुसर्‍यांचं असतं आणि actual execution मात्र दुसराच करत असतो. हे सगळ्यात खतरनाक असतात. कारण तुमची तपश्चर्या भंग करणे हेच त्या खात्याचा हेतु असतो. जर ते खातं सापडल्या गेलं तर मात्र डोकं लावणारा बाजूला राहतो अन actual execution करणारा अडकतो. अशांपासून अखंड सावध.

 

एवढंच कशाला, देवाधिदेवालाही राक्षसांचा संहार करण्यासाठी अवतार घेणं भाग पडतं. काही दुष्ट प्रवृत्तींना ताळ्यावर आणण्यासाठी हे खाते जन्म घेतात. पण अडचण अशी आहे की, माणूस नंतर त्यांच्या मूर्तीचीही पुजा करू लागतो. मग त्यांच्या भरवश्यावर अंधश्रद्धा सुरू होतात.

 

काही फेक खाती फक्त स्वतःची खरी ओळख लपवण्यासाठी  असतात. म्हणजे अज्ञातवासात असतात तसं. अर्जुनाला स्त्रीच्या वेशात वावरावं लागलं होतं तर भीमाला आचार्‍याच्या रूपात… हे खाते घातक नसतात. आपली खरी ओळख कोणाला कळू नये एवढाच त्यांचा हेतु असतो.

 

हे जे फेक अकाउंट आहेत ते सगळेच काही वाईट नसतात… त्यांचा हेतु ओळखणे महत्वाचं असतं. कारण प्रत्येकाचे हेतू वेगळे असू शकतात… मुखवटे असतात…

 

आता थोडं पात्रांकडे वळूयात. ट्विटरवर अर्जुन बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून काहीजण ट्विटत असतात, पण त्यांचा कधी एकलव्य होतो तर कधी अभिमन्यू!

शिष्य आपल्या पुढे जाऊ नये म्हणून इथे गुरुच त्याचा अंगठा गुरूदक्षिणा म्हणून मागतात. ट्विटरवर हा प्रकार मोठ्या खात्यांकडून होताना आढळून येतो. काल-परवा आलेला तो माझ्यापेक्षा अधिक प्रसिद्ध कसा होतो. मग त्याला कुठेतरी अडकवा…

 

अभिमन्यू त्वेषाने चक्रव्यूह भेदत आत शिरत असतो. त्याला वाटतं आपण जिंकून येऊ. पण तिथे गेल्यावर “तुम यहां आए नही, तुम्हे यहां लाया गया है” असं म्हणणारे आप्तच असतात… पुरता अडकतो… अतिआत्मविश्वासाच्या भरात अन अर्धवट ज्ञांनाच्या आधारावर तो हे ओढवून घेतो…

 

संपूर्ण महाभारतातील वजनदार पात्र म्हणजे भीष्माचार्य! जिथे भीष्माने ठाम भूमिका घेऊन न्याय करण्याची अपेक्षा असते, अन्याय होऊ न देण्यासाठी आवाज उठवावा अशी अपेक्षा असते पण तो निव्वळ धर्म अन प्रतिज्ञेच्या तत्वात अडकून बसतो अन सगळा विचका होतो… भूमिका न घेणे हाच जेंव्हा गुन्हा ठरतो ते हे….

 

भीष्माचार्यचा वध करण्यासाठी अर्जुन सक्षम नसताना त्याच्या आडून शिखंडी अस्त्र चालवतो अन विजय प्राप्त करतो… दुसऱ्यांच्या खांद्यावरून बाण मारायचे खेळ तर ह्या आभासी जगात रोजचेच…

 

सदासर्वकाळ भ्रमंती करणारे, ‘मी तूमच्यातीलच’ असं भासवणारे नारदमुनींचीही काही कमी नाहीत… ते सर्वच ग्रुपमध्ये असतात.. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, हे हेरगिरी करत नसतात, तर तो त्यांचा उपजत स्वभावधर्म अन कर्तव्य असतं…

 

सगळ्यात बेक्कार असतात ते शकुनी सारखे पात्र… त्यांच्या मनात प्रतिशोधाची अग्नी कायम धगत असते अन त्यातून ते सारा खेळ रचत असतात… अचाट लावालाव्या करणे अन एखाद्याला सतत गॅसवर ठेवणे जेणेकरून त्याचे इस्पित साध्य होतील.. असे खाते असतीलही, पण ते नेमके कोण याचा शोध घेणे अशक्य आहे…

 

दुर्योधन! जे माझं आहे ते माझं, अन तुझं तेही माझं असं म्हणणारे। यांना दुसऱ्यांशी फरक पडत नाही, ते स्वतःच्याच गर्वात असतात. आपल्याकडे कर्ण, भीष्माचार्य, द्रोणाचार्य सारखे योध्ये आहेत, त्यांच्या कवचकुंडलात आपण कायम सुरक्षित राहू याची त्यांना खात्री असते… याच माजात ते वाट्टेल त्या रणभूमीवर उतरू बघत असतात. त्यांच्यात अनेक चांगले गुण असतांनाही केवळ ह्या एका गुणामुळे ते विलन ठरतात.

 

दृष्टद्युम्न, द्रुपद, शिखंडी यांना युद्धापेक्षा स्वतःच्या असूयेमुळे कोणाचातरी पराभव करायचा असतो. त्यांची उद्दिष्टे निश्चित असतात, अन त्यासाठी सर्वस्व अर्पण करायची त्यांची तयारी असते. मुळात त्यांचा जन्मच त्या विशिष्ट कामासाठी झाला असतो. काही फेक अकाऊंटस या निकषात बसतात.

 

खरी कुचंबणा होते ती विदुर, संजय, बलराम सारख्यांची. सर्वांचं भलं व्हावं, न्याय व्हावा यासाठी ते झटत असतात, पण त्यांच्या पदरी केवळ मानहानी येते. होणारे अत्याचार अन अधर्म त्यांनाहतबल होऊन बघावे लागतात. ट्विटरवर अशी अनेक खाती आहेत जे या प्रकारात मोडतात. पण त्यांचं कोण ऐकत नाही.

 

धृतराष्ट्र तर दृष्टीने अन विचारांनीही आंधळा झालेला असतो… अधर्माला मोकळी वाट करून देणे, निर्णय न घेणे यामुळेच त्याला त्याच्या वंशाच्या संहाराचा साक्षीदार व्हावं लागतं…

 

राहिला तो कर्ण! एका बाजूला सर्वात जेष्ठ, पराक्रमी अन कर्तबगार असताना केवळ नियतीच्या सोंगट्या फिरल्याने त्याची अवहेलना होत राहते. एका बाजूला परममित्र अन दुसऱ्या बाजूला धर्म अशा विवंचनेत तो नेहमी मित्राची बाजू निवडतो. परोपकारच्या ओझ्याखाली अन नात्यांच्या बंधनात हे स्वतःचं अस्तित्व विसरून जातात. मित्र चुकतोय हे माहीत असतांनाही ती बाजू घेण्याची अपरिहार्यता असते… ट्विटरवर फार कमी खाती आहेत अशी.

 

धर्मराज युधिष्ठिर हा न्यायाच्या बाजूने असतो, पण केवळ तत्वाच्या बंधनात अडकल्याने स्वतःच्या डोळ्यासमोर स्वतःच्या अनुमतीने अत्याचाराची परवानगी द्यावी लागते.. प्रत्येक वेळी कोणाच्यातरी सल्ल्याशिवाय तो निर्णय घेत असतो.. पण न्यायची अपेक्षा याच्याकडूनच पूर्ण होत असते.

 

नकुल, सहदेव, दूषशासन, शिशुपाल वगैरे सहाय्यक पात्रे तर असतातच… यांचं महत्व मर्यादित.

 

पांचाली, कुंती, गांधारी यांनी काय गमावलं हे कोण सांगावं… यावर काय बोलावं ते कळत नाही अन तुलना कशी करावी तेही सुचत नाही.

 

अशी अनेक उदाहरणे आपल्याला पुराणात आढळतील ज्यांची तुलना आपण ह्या ट्विटर जगाशी करू शकतो.

 

शेवटी महत्वाचा प्रश्न उरतो की मी कोण ? अरे भैताडहो मी व्यासमुनी है…  :}

 

[ खुलासा – गमतीने घेतलं तर सोयिस्कर होईल. वादग्रस्त असेल तर क्षमस्व! पण मनातील मळमळ मांडली आहे ही…]

 

@Late_Night1991  ||  अभिषेक बुचके

चेहरे आणि मुखवटे

दुर्गेची नऊ रुपे

दुर्गेची नऊ रुपे

{{ COPY }}

अध्यात्म  ||  देव-धर्म  || माहिती

दुर्गेची  नऊ रुपे – ५ – स्कंदमाता

दुर्गेचे पाचवे रूप ‘स्कंदमाता’ या नावाने ओळखले जाते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन ‘विशुद्ध’ चक्रात स्थिर झालेले असते. भगवान स्कंद लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते. भगवान स्कंद ‘कुमार कार्तिकेय’ नावानेही ओळखले जातात. ते देवासूर संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते. पुराणात त्यांना कुमार आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केलेला आहे. भगवान स्कंदची आई असल्यामुळे दुर्गाच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते.

स्कंदमाता चारभुजाधारी आहे. तिच्या उजव्या बाजूकडील खालील भुजा, जी वर उचललेली आहे, त्या हातात कमळाचे फूल आहे. डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा तसेच खालील भुजा वरच्या बाजुला उचललेली आहे त्यामध्ये कमळाचे फूल घेतलेले आहे. या देवीचा रंग पूर्णत: शुभ्र आहे. ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते. यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते. तिचे वाहन सिंह आहे.

नवरात्रीतील पाचव्या दिवसाचे शास्त्रात विशेष महत्त्व सांगितले आहे. यावेळी चक्रात स्थिर झालेल्या साधकांची चित्तवृत्ती लोप पावते. सर्व बंधनातून साधकाचे मन मुक्त होऊन पदमासना स्कंदमातेच्या रूपात तल्लीन होते. यादरम्यान साधकाला पूर्ण सावधगिरीने उपासना करणे आवश्यक आहे. सर्वतोपरी एकाग्र होऊन साधनेच्या मार्गावर जायला पाहिजे. स्कंदमातेच्या उपासनेने भक्ताची इच्छा पूर्ण होते. मृत्यूलोकातच त्याला परम शांती आणि सुखाचा अनुभव मिळतो. त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग सोपा होतो. स्कंदमातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची उपासनाही सफल होते. सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकीक तेज प्राप्त होते. आपण एकाग्र मनाने पवित्र होवून मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या भवसागरात दु:खापासून मुक्ती मिळवून मोक्षाचा मार्ग सुलभ करण्यासाठी यापेक्षा चांगला पर्याय दुसरा नाही.

संग्रहीत माहिती 

रामरक्षेच्या एका श्लोकाबद्दल…

रामरक्षेच्या एका श्लोकाबद्दल…

{{ COPY  }}

#रामरक्षा  #RamRaksha  #Scientific_अध्यात्म

रामरक्षेच्या एका श्लोकाबद्दल…

रामो राजमणिः सदा विजयते रामं रामेशं भजे ।

रामेणाभिहतो निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।

रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासो$सम्यहम् ।

रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ।।

या श्लोकात राम या नामाच्या सगळ्या विभक्ती आल्या आहेत. रामो=रामः(प्रथमा) रामं(द्वितीया), रामेण(तृतीया), रामाय(चतुर्थी), रामान्नास्ति=रामात् (पंचमी)रामस्य(षष्ठी), रामे(सप्तमी),भो राम(संबोधन).

ह्या श्लोकात रकाराची पुनरावृत्ती असल्याने गर्भारपणात हा श्लोक म्हणल्याने जन्माला येणारे बाळ बोबडे (किंवा जीभ जड असलेले) होत नाही.

#रामरक्षा: आरोग्यरक्षक कवच!!!

एक वेगळा पैलू तुमच्यासमोर मांडत आहे. श्रीरामरक्षा स्तोत्र हे आजही कित्येक घरांमध्ये तिन्हीसांजेला आवर्जून म्हटले जाते. आजारी व्यक्ती वा शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या रुग्णाला रामरक्षा ऐकवली जाते. रामरक्षाच का? असे काय रहस्य या मंत्रात दडले आहे?

#रामनामकवच:

शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥४॥

कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।

घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥५॥

जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवंदितः ।

स्कंधौ दिव्यायुधः पातुभुजौ भग्नेशकार्मुकः ॥६॥

करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित्‌ ।

मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥७॥

सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।

उरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत्‌ ॥८॥

जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखान्तकः ।

पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥९॥

असे कवच या स्तोत्रात आलेले आहे. कवच म्हणजे आपल्या प्रत्येक अवयवाचे रक्षण करण्यासाठी मंत्र धारण करणे!! थोडक्यात; आपले संपूर्ण शरीरच रामनामाने अभिमंत्रित करणे.

पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः ।

न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥ ११ ॥

म्हणजे, पाताळ, भूमी आणि आकाश या तिन्ही लोकांत संचार करणारे, छद्मचारिणः म्हणजे खोटे सोंग घेणारे असे (राक्षस) रामनामाने रक्षिलेल्या लोकांकडे नजर वर उचलून पण पाहू शकत नाहीत!!

आता, थोडं थांबा….’छद्मचारिणः’ हा शब्द पुन्हा वाचा. काही आठवलं? विज्ञान शिकत असताना ‘pseudopodium’ हा शब्द आपण शिकलेला असतो. अमिबासारखे जीव हे pseudopodium म्हणजे छद्मपाद म्हणून ओळखले जातात!! थोडक्यात; इथे ‘राक्षस’ हे अलिफ-लैला सारखे शिंगं वगैरे असलेले राक्षस नसून सूक्ष्मजीव आहेत. आयुर्वेदात विशेषतः सुश्रुत संहितेत कृमी, राक्षस असे शब्द अनेक ठिकाणी सूक्ष्मजीवांसाठी वापरण्यात आलेले आहेत.

आजवर वैद्यकीय उपचार करत असताना; अनेक वेळेला रामरक्षेचा लाभ झालेला ऐकण्यात आहे. यामागील कारण शोधता-शोधता ही गोष्ट हाती लागली.

#महत्वाची सूचना – ही माहिती संपादित व संकलित आहे. ही मान्यताही असू शकते. मनाला पटणारी आहे म्हणून आपल्या वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत. लेखक कोण आहे माहीत नाही. नाव समजल्यास अवश्य उल्लेख करू.

पितृपक्ष

पुत्र असावा ऐसा

पुत्र असावा ऐसा

संतान के रूप में कौन आता है???  #Who’s your chindren?  #कर्म और फलप्राप्ती

पूर्व जन्म के कर्मों से ही हमें इस जन्म में
माता-पिता,
भाई बहिन,
पति-पत्नि,
प्रेमिका,
मित्र-शत्रु,
सगे-सम्बंधी इत्यादि संसार के जितने भी रिश्ते नाते है, सब मिलते है ।
क्योंकि इन सबको हमें या तो कुछ देना होता है, या इनसे कुछ लेना होता है ।
.
वैसे ही संतान के रूप में हमारा कोई #पूर्वजन्म का ‘सम्बन्धी’ ही आकर जन्म लेता है ।
.
जिसे #शास्त्रों में चार प्रकार का बताया गया है :-
.
#ऋणानुबन्ध :-
पूर्व जन्म का कोई ऐसा जीव जिससे आपने ऋण लिया हो या उसका किसी भी प्रकार से धननष्ट किया हो, तो वो आपके घर में संतान बनकर जन्म लेगा और आपका धन बीमारी में या व्यर्थ के कार्यों में तब तक नष्ट करेगा जब तक उसका हिसाब पूरा ना हो ।

Ashtawakra Gita: Adhyatm Vigyan Ka Anupam Granth
#शत्रु पुत्र :-
पूर्व जन्म का कोई दुश्मन आपसे बदला लेने के लिये आपके घर में संतान बनकर आयेगा और बड़ा होने पर माता-पिता से मारपीट, झगड़ा या उन्हें सारी जिन्दगी किसी भी प्रकार से सताता ही रहेगा । हमेशा कड़वा बोल कर उनकी बेइज्जती करेगा व उन्हें दुःखी रख कर खुश होगा ।

#उदासीन पुत्र :-
इस प्रकार की ‘सन्तान’, ना तो माता-पिता की सेवा करती है, और ना ही कोई सुख देती है और उनको उनके हाल पर मरने के लिए छोड़ देती है । विवाह होने पर यह माता-पिता से अलग हो जाते हैं ।

PITRA DOSH – MATRA DOSH : KAARAN AUR NIVAARAN
#सेवक पुत्र :-
पूर्व जन्म में यदि आपने किसी की खूब सेवा की है, तो वह अपनी की हुई सेवा का ऋण उतारने के लिये, आपकी सेवा करने के लिये पुत्र बन कर आता है । जो बोया है, वही तो काटोगे, अपने माँ-बाप की सेवा की है, तो ही आपकी औलाद बुढ़ापे में आपकी सेवा करेगी । वरना कोई पानी पिलाने वाला भी पास ना होगा ।
.
आप यह ना समझें कि यह सब बातें केवल मनुष्य पर ही लागू होती है । इन चार प्रकार में कोई सा भी जीव आ सकता है ।
.
जैसे आपने किसी गाय कि निःस्वार्थ भाव से सेवा की है तो वह भी पुत्र या पुत्री बनकर आ सकती है ।
.
यदि आपने गाय को स्वार्थ वश पालकर उसको दूध देना बन्द करने के पश्चात घर से निकाल दिया हो तो वह ऋणानुबन्ध पुत्र या पुत्री बनकर जन्म लेगी
. ShubhBhakti Gold Plated Pitra Dosh Nivaran Yantra
यदि आपने किसी निरपराध जीव को सताया है तो वह आपके जीवन में शत्रु बनकर आयेगा ।
.
“इसलिये जीवन में कभी किसी का बुरा नहीं करें ।”
. It’s Okay to Fail My Son
क्योंकि प्रकृति का नियम है कि आप जो भी करोगे, उसे वह आपको इस जन्म या अगले जन्म में, सौ गुना करके देगी ।
.
यदि आपने किसी को एक रूपया दिया है, तो समझो आपके खाते में सौ रूपये जमा हो गये है।
.
यदि आपने किसी का एक रूपया छीना है, तो समझो आपकी जमा राशि से सौ रूपये निकल गये।
.
ज़रा सोचे, आप “कौन सा धन” साथ लेकर आये थे, और कितना साथ ले कर जाओगे ?
.
जो चले गये, वो कितना सोना-चाँदी साथ ले गये ?
मरने पर जो सोना-चाँदी, धन-दौलत, बैंक में पड़ा रह गया, समझो वो व्यर्थ ही कमाया ?
.  The Secret of God’s Son  Usha Narayanan
औलाद अगर अच्छी और लायक है, तो उसके लिये कुछ भी छोड़ कर जाने की जरुरत नहीं, खुद ही खा-कमा लेगा, और अगर बिगड़ी और नालायक औलाद है, तो उसके लिए जितना मर्ज़ी धन छोड़ कर जाओ, वह चंद दिनों में सब बरबाद कर के ही चैन लेगा ।
.
मैं, मेरा-तेरा, सारा धन यहीं का यहीं धरा रह जाना है, कुछ भी साथ नहीं जाना है, साथ सिर्फ अर्जन किया हुआ पुण्य कर्म ही साथ जाना है.

सूचना – ये सब मान्यताए है| इसका अबतक कोई वैज्ञानिक आधार नही है| ये सिर्फ आपके दुसरो के प्रती अच्छा बर्ताव के लिए है|

स्रोत – WhatsApp

विज्ञानू गणेशा

विज्ञानू गणेशा

त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि   #Vishwas_Sakrikar   #आधुनिक अध्यात्म   #Scientific_अध्यात्म

आपण गणपती का बसवतो? तोही १० च दिवस, ५ दिवस, दीड दिवस वगैरे? गणेशाला दूर्वा का वाहतात? गणेशाचे वाहन उंदीर (मूषक) का? हे सगळं आपण करतो कारण अध्यात्मात सांगितलं आहे, आपले वडीलधारी सांगत आली आहेत म्हणून वगैरे हे हजारो वर्षांपासून आजही टिकून आहे….!

ह्या सर्व आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अन शंकांचे निरसन विश्वास साक्रीकर ह्या ‘विज्ञानवादी’ गणेश भक्ताने केले आहे. गणपती हा Science Related & Oriented कसा आहे याची उत्तरे आपल्याला ह्या मुलाखतीद्वारे मिळतील.

Must Visit: Scientific अध्यात्म विज्ञानू गणेश

त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि

संपूर्ण आरती संग्रह

संपूर्ण आरती संग्रह

संपूर्ण आरती संग्रह  ||  विविध देवांच्या आरत्या  ||   पोथी ||  Aarati Collection

श्री गणपतीची आरती

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची | नुरवी पुरवी प्रेम कृपा जायची | सर्वांग सुंदर उटी शेंदुराची | कंठी झळके माळ मुक्ताफळाची | जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती | दर्शनमात्रे मन:कामना पुरती जय देव जय देव || धृ ||

रत्नखचित फार तुज गौरीकुमरा | चान्दांची उटी कुंकुमकेशरा | हिरेजडीत मुगुट शोभती बरा | रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ||जय || २ ||

लंबोदर पितांबर फणीवरबंधना | सरळ तोंड वक्रतुंड त्रिनयना | दास रामाचा वाट पाहे सदना | संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना | जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती | दर्शनमात्रे मन:कामना पुरती || ३ ||
……………………………………………

श्री गणपतीची आरती

नाना परिमल दुर्वा शेंदूर शमीपत्रे| लाडू मोदकअन्ने परिपूरित पात्रे| ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे|अष्टहीसिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रे|| १ ||

जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती || जय || धृ ||

तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती | त्यांची सकलही पापे विघ्नेही हरती | वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती | सर्वही पावुनी अंती भवसागर तरती || जयदेव || २ ||

शरणागत सर्वस्वे भजती तव चरणी | कीर्ती तयांची राहे जोवरी शशि – तरणी | त्रेलोक्यी ते विजयी अदभूत हे करणी | गोसावीनंदन रात नाम स्मरणी | जयदेव जय || ३ ||
……………………………………………

श्री गणपतीची आरती

शेंदूर लाल चढायो अच्छा गज मुखको | दोंदिल लाल विराजे सुत गौरीहरको | हाथ लिये गुडलड्डू साई सुरवरको | महिमा काहे न जाय लागत हुं पदको || १ ||

जय जय जी गणराज विद्यासुखदाता | धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता || धृ ||

अष्टौ सिद्धी दासी संकटको बैरी | विघ्नविनाशक मंगल मुरत अधिकारी | कोटीसुरजप्रकाश ऐसी छबी तेरी | गंडस्थलमदमस्तक झुले शशिबिहारी || जय || २ ||

भावभगतसे कोई शरणागत आवे | संतत संपत सबही भरपूर पावे | ऐसे तुम महाराज मोको अति भावे | गोसावीवंदन निशिदिन गुण गावे | जय जय जी गणराज विद्यासुखदाता || धन्य || ३ ||
……………………………………………

श्री शंकराची आरती

लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा | वीषे कंठी कला त्रिनेत्री ज्वाळा | लावण्यसुंदर मस्तकी बाळा | तेथुनिया जल निर्मळ वाहे झुळझुळा || १ ||

जय देव जय देव जय श्रीशंकरा | आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा || धृ ||

कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा | अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा | विभूतीचे उधळण शितिकंठ निळा | ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा | जय देव || २ ||

देवी दैत्यी सागर मंथन पै केले | त्यामाजी अवचित हळहळ जें उठिले | तें त्वां असुरपणे प्राशन केलें | नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले | जय || ३ ||

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी | पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी | शतकोटीचे बीज वाचे उच्चारी | रघुकुळटिळक रामदासाअंतरी || जय देव || ४ ||
……………………………………………

श्री देवीची आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी | अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी | वारी वारी जन्ममरणाते वारी | हरी पडलो आता संकट निवारी || १ ||

जय देवी जय देवी महिषसूरमथिनी | सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी || धृ ||

त्रिभुवन भुवनी पाहता तुजऐसी नाही | चारी श्रमले परंतु न बोलवे काही | साही विवाद करिता पडिले प्रवाही | तें तू भक्तालागी पावसी लवलाही || जय || २ ||

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा | क्लेशापासुनि सोडावि तोडी भवपाषा अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा | नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा | जय देवी जय देवी जय महिषासुरमथिनी | सुरवरईश्वरवरदे तारक || ३ ||
……………………………………………

श्री दत्ताची आरती

त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा | त्रिगुणी अवतार त्रिलोक्यराणा | नेति नेति शब्द नये अनुमाना | सुरवरमुनिजन योगी समाधी न ये ध्याना || १ ||

जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता | आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव जय देव || धृ ||

सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त | अभाग्यासी कैची कळेल हे मात | पराही परतली तेथे कैचा हा हेत | जन्ममरणाचा पुरलासे अंत || जय || २ ||

दत्त येउनिया उभा ठाकला भावे सांष्टागेसी प्रणिपात केला | प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला | जन्ममरणाचा फेरा चुकविला || जय || ३ ||

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान | हारपले मन झाले उन्मन | मी तू झाली बोळवण | एका जनार्दनी श्रीदत्तध्यान || जय देव || ४ ||
……………………………………………

श्री विठोबाची आरती

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा | वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा | पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गा | चरणी वाहे भीमा उद्धरी जगा || १ ||

जय देव जय देव जय पांडुरंगा || रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा पावे जिवलगा जय देव जय देव || धृ ||

तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी | कांसे पितांबर कस्तुरी लल्लाटी | देव सुरवर नित्य येती भेटी | गरुड हनुमंत पुढे उभे राहती || जय || २ ||

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा | सुवर्णाची कमळे वनमाळा गळा | राई रखुमाई राणीया सकळा | ओवाळिती राजा विठोबा सावळा || जय || ३ ||

ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती | चंद्रभागेमाजी सोडुनिया देती | दिंड्या पताका वैष्णव नाचती | पंढरीचा महिमा वर्णावा किती || जय || ४ ||

आषाढी कार्तिकी भक्तजन येती | चंद्रभागेमध्ये स्नाने जें करिती | दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती | केशवासी नामदेव भावे ओवाळिती || जय देव जय देव जय || ५ ||
……………………………………………

श्री विष्णूची आरती

आवडी गंगाजळे देवा न्हाणीले | भक्तीचे भूषण प्रेमासुगंध अर्पिले | अहं हा धूप जाळू श्रीहरीपुढे | जंव जंव धूप जळे | तंव तंव देवा आवडे | रमावल्लमदासे अहं धूप जाळिला | एकारतीचा मग प्रारंभ केला | सोहं हा दीप ओवाळू गोविंदा | समाधी लागली पाहतां मुखारविंदा | हरीख हरीख हातो मुख पाहतां | चाकाटल्या ह्या नारी सर्वही अवस्था | सदभवालागी बहु हा देव भुकेला | रमावल्लभदासे नैवेद्य अर्पिला | फल तांबूल दक्षिणा अर्पीली | तयाउपरी नीरांजने मांडिली

|| आरती आरती करू गोपाळा | मी तू पण सांडोनी वेळोवेळा || धृ ||

पंचप्राण पंचज्योती आरती उजळिली | दृश्य हे लोपलें तथा प्रकाशांतळी | आरतीप्रकाशे चंद्र सूर्य लोपलें | सुरवर सकळीक तटस्थ ठेले | देवभक्तपण न दिसे कांही | ऐशापरी दास रमावल्लभ पायीं || आरती ||
……………………………………………

नवरात्राची आरती

आश्विनशुध्दपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो | प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो | मूलमंत्रजप करुनी भोवते रक्षक ठेवुनी हो | ब्रम्हा विष्णू आईचे पूजन करिती हो || १ ||

उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो | उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो || धृ ||

द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो | सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो | कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो | उदोकारे गर्जती सकळ चामुंडा मिळूनी हो | उदो ||

तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो | मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो | कंठीची पदके कांसे पितांबर पिवळा हो | अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो | उदो || ३ ||

चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो | उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंत:करणी हो | पूर्ण कृपे तारिसी जगन्माते मनमोहिनी हो | भक्तांच्या माउली सुर तें येती लोटांगणी हो | उदो || ४ ||

पंचमीचे दिवशी व्रत तें उपांगललिता हो | अर्ध्यपाद्यपूजने तुजला भवानी स्तविती हो | रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो | आनंदे प्रेम तें आले सदभावे क्रीडता हो | उदो || ५ ||

षष्ठीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला हो | घेउनी दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो | कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ताफळा हो | जोगवा मांगता प्रसन्न झाली भक्तकुळा हो | उदो || ६ ||

सप्तमीचे दिवशी सप्तशृंगगडावरी हो | तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो | जाईजुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो | भक्त संकटी पडतां झेलुनी घेसी वरचेवरी हो | उदो || ७ ||

अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो | सह्याद्रीपर्वती राहिली उभी जगज्जननी हो | मन माझे मोहिले शरण आलो तुजलागुनी हो | स्तनपान देऊनी सुखी केलें अंत:करणी हो | उदो || ८ ||

नवमीचे दिवशी नवदिवसाचे पारणे हो | सप्तशतीजप होमहवने सदभक्तीकरुनी हो | षड्रस अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो | आचार्य ब्राम्हणा तृप्त केलें कृपेकरुनी हो | उदो || ९ ||

दशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोल्लघनी हो | सिंहारूढ करी दारूण शस्त्रे अंबे त्वां घेउनी हो | शुंभनिशुभादिक राक्षसा किती मारिसी रणी हो | विप्रा रामदासा आश्रम दिधला तो चरणी हो | उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो || १० ||
……………………………………………

मारुतीची आरती

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी | करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी || कडाडिले ब्रम्हांड धाक त्रिभुवनी | सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी || १ ||

जय देव जय देव जय श्रीहनुमंता | तुमचेनी प्रसादे न भी कृतांता || धृ || दुमदुमले पाताळ उठिला प्रतिशब्द | थरथरला धरणीधर मानिला खेद | कडकडिले पर्वत उद्दगण उच्छेद | रामी रामदासा शक्तीचा शोध || जय || २ ||
……………………………………………

श्री कृष्णाची आरती

ओवाळू आरती मदनगोपाळा | श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा || धृ ||

चरणकमल ज्याचे अति सुकुमार | ध्वजवज्रांकृश ब्रीदाचे तोडर ओवाळू || १ ||

नाभिकमल ज्याचे ब्रम्हयाचे स्थान | हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांछन | ओवाळू || २ ||

मुखकमल पाहतां सुखाचिया कोटी | वेधले मानस हारपली दृष्टी | ओवाळू || ३ ||

जडित मुगुट ज्याचा देदिप्यमान | तेणे तेजे कोंदले अवघे त्रिभुवन | ओवाळू || ४ ||

एका जनार्दनी देखियले रूप | रूप पाहतां जाहले अवघे तद्रूप | ओवाळू || ५ ||
……………………………………………

श्री ज्ञानदेवाची आरती

आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा | सेविती साधुसंत || मनु वेधला माझा || आरती || धृ ||

लोपलें ज्ञान जगी | हित नेणती कोणी | अवतार पांडुरंग | नाम ठेविले ज्ञानी || १ ||

कनकाचे ताट करी | उभ्या गोपिका नारी | नारद तुंबर हो || साम गायन
करी || २ ||

प्रकट गुह्य बोले | विश्र्व ब्रम्हाची केलें | रामजनार्दनी | पायी मस्तक ठेविले | आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा || सेविती || ३ ||
……………………………………………

श्री एकनाथाची आरती

आरती एकनाथा | महाराजा समर्था | त्रिभुवनी तूंचि थोर | जगदगुरू जगन्नाथा || धृ ||

एकनाथ नाम सार | वेदशास्त्रांचे गूज | संसारदु:ख नाम | महामंत्राचे बीज | आरती || १ ||

एकनाथ नाम घेतां | सुख वाटले चित्ता | अनंत गोपाळदासा | धणी न पुरे गातां | आरती एकनाथा | महाराजा समर्था || २ ||
……………………………………………

श्री तुकारामाची आरती

आरती तुकारामा | स्वामी सदगुरूधामा | सच्चिदानंदमूर्ती | पाय दाखवी आम्हा || आरती || धृ ||

राघवे सागरांत | पाषाण तारिले | तैसे हे तुकोबाचे | अभंग उदकी रक्षिले || आरती || १ ||

तुकिता तुलनेसी | ब्रम्ह तुकासि आलें | म्हणुनी रामेश्वरे | चरणी मस्तक ठेविले || आरती तुकारामा || २ ||
……………………………………………

श्री रामदासाची आरती

आरती रामदासा | भक्त विरक्त ईशा | उगवला ज्ञानसूर्य || उजळोनी प्रकाशा || धृ ||

साक्षात शंकराचा | अवतार मारुती | कलिमाजी तेचि झाली | रामदासाची मूर्ती || १ ||

वीसही दशकांचा | दासबोध ग्रंथ केला | जडजीवां उद्धरिले नृप शिवासी तारीले || २ ||

ब्रम्हचर्य व्रत ज्याचे | रामरूप सृष्टी पाहे | कल्याण तिही लोकी | समर्थ सद्गुरुपाय || ३ || आरती रामदासा ||
……………………………………………

श्री पांडुरंगाची आरती

जय देव जय देव जय पांडुरंगा | आरती ओवाळू भावे जिवलगा || धृ ||

पंढरीक्षेत्रासी तू अवतरलासी | जगदुद्धारासाठी राया तू फिरसी | भक्तवत्सल खरा तू एक होसी | म्हणुनी शरण आलो तुझे चरणांसी || १ ||

त्रिगुण परब्रम्ह तुझा अवतार || त्याची काय वर्णू लीला पामर | शेषादिक शिणले त्यां न लागे पार | तेथे कैसा मूढ मी करू विस्तार || २ ||

देवाधिदेवा तू पंढरीराया | निर्जर मुनिजन घ्याती भावें तंव पायां | तुजसी अर्पण केली आपुली मी काया | शरणागता तारी तू देवराया || ३ ||

अघटीत लीला करुनी जड मूढ उद्धरिले | कीर्ती ऐकुनी क नी चरणी मी लोळे | चरणप्रसाद मोठा मज हे अनुभवले | तुझ्या भक्तां न लागे चरणांवेगळे | जय देव जय देव जय पांडुरंगा | आरती || ४ ||
……………………………………………

आरती जय जय जगदीश हरे

ॐ जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे | भक्त जनो कें संकट क्षण में दूर करे || ओSम ||

जो घ्यावे फल पावे दु:ख विनशे मनका | सुख संपती घर आवे कष्ट मिटे तनका || ओSम ||

मात पिता तुम मेरे शरण गहू किसकी | तुम बिन और न दूजा आस करू किसकी || ओsम ||

तुम हो पुरण परमात्मा तुम अंतरयामी | पार ब्रम्ह परमेश्वर तुम सबके स्वामी || ओSम ||

तुम करुणा कें सागर तुम पालन कर्ता | मैं मुरख खल कामी कृपा करि भरता || ओSम ||

तुम हो एक अगोचर सबके प्राणपती | स्वामी किस विधी मिलू दयामय तुमको मैं कुमति || ॐ ||

दिन बंधू दुखहर्ता तुम रक्षक मेरे अपने हाथ उठाओ शरण पडा तेरे || ॐ ||

विषय विकार मिटाओ पापा हरे देवा | श्रद्धा भक्ति बधाओ संतन की देवा || ॐ ||

…………………………………………

जय जय श्री शनिदेवाची आरती

जय जय श्रीशनिदेवा | पद्मकर शिरी ठेवा | आरती ओवाळिती | मनोभावे करुनी सेवा || धृ ||

सूर्यसुता शनीमूर्ती || तुझी अगाध कीर्ती | एक मुखे काय वर्णू | शेषा न चले स्फूर्ती || जय ||

नवग्रहांमाजी श्रेष्ठ | पराक्रम थोर तुझा | ज्यावरी कृपा करिसी | होय रंकाचा राजा || जय || २ ||

विक्रमासारीखा हो शककर्ता पुण्यराशी | गर्व धरितां शिक्षा केली | बहु छळियले त्यासी || जय || ३ ||

शंकराच्या वरदाने | गर्व रावणे केला | साडेसाती येतां त्यासी | समूळ नाशासी नेला || जय || ४ ||

प्रत्यक्ष गुरुनाथा | चमत्कार दावियेला | नेऊनि शूलापाशी | पुन्हा सन्मान केला || जय || ५ ||

ऐसे गुण किती गाऊ | धनी न पुरे गातां || कृपा करी दीनावरी | महाराजा समर्था || जय || ६ ||

दोन्ही कर जोडूनिया रखमां लीन सदा पायीं | प्रसाद हाची मागे | उदयकाळ सौख्य दावी | जय जय श्री शनिदेवा | पद्मकर शिरी ठेवा || ७ ||
……………………………………………

श्री संतोषीमातेची प्रासादिक आरती

जय देवी श्रीदेवी संतोषी माते | वंदन भावे माझे तंव पद कमलाते || धृ || श्रीलक्ष्मीदेवी तू श्रीविष्णुपत्नी ||

पावसी भक्तालागी अति सोप्या यत्नी || जननी विश्वाची तू जीवन चितशक्ती | शरण तुला मी आलो नुरवी आपत्ती || १ ||

भृगुवारी श्रद्धेने उपास तंव करिती | आंबट कोणी कांही अन्न न सेविती || गूळचण्याचा साधा प्रसाद भक्षिती | मंगल व्हावे म्हणुनी कथा श्रवण करिती || २ ||

जें कोणी नरनारी व्रत तंव आचरिती | अनन्य भावे तुजला स्मरूनी प्रार्थिती || त्यांच्या हाकेला तू धावूनिया येसी | संतति वैभव कीर्ती धनदौलत देसी || ३ ||

विश्र्वाधारे माते प्रसन्न तू व्हावे | भवभय हरुनी आम्हा सदैव रक्षावे || मनिची इच्छा व्हावी परिपूर्ण सगळी | म्हणुनी मिलिंदमाधव आरती ओवाळी || ४ ||
……………………………………………

आरती महालक्ष्मीची

जयदेवी जयदेवी जय लक्ष्मीमाता | प्रसन्न होऊनिया वर देई आता || धृ ||

विष्णुप्रिये तुझी सर्वांतरी सत्ता | धन दौलत देई लक्ष्मीव्रत करिता || १ ||

विश्वव्यापक जननी तुज ऐसी नाही | धावसी आम्हालागी पावसी लवलाही || २ ||

त्रैलोक्य धारिणी तू भक्ता लाभो  सुखशांती  | सर्व सर्वही दु:ख सर्व ती पळती || ३ ||

वैभव ऐश्वर्याचे तसेच द्रव्याचे | देसी दान वरदे सदैव सौख्याचे || ४ ||

यास्तव अगस्ती बंधू आरती ओवाळी | प्रेमे भक्तासवे लोटांगण घाली || ५ ||

error: Content is protected !!