Tag: आरोग्यम धंनसंपदा

आरोग्यदायक मटकी

आरोग्यदायक मटकी

{{ COPY }}

#मटकी  ||  #आरोग्यवर्धक  ||  आरोग्याम धनसंपदा  || Health Tips

आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे हे कडधान्य आणि बऱ्याच जणांना आवडणारे देखील. मटकीची मिसळ, उसळ, दही घालून केलेली भेळ, तसेच विविध चाटचे प्रकारात मटकीचा वापर केला जातो.

मटकी ही चवीला गोड, थंड गुणाची, पचायला हल्की, रूक्ष, वात वाढविते, कफपित्त कमी करते. मल बांधून ठेवते, कृमी उत्तपन्न करते.

आता मटकीच्या वेगवेगळ्या खाद्य पदार्थांची शरीरावर काय परिणाम होतो ते आपण पाहूया:

१) मटकीचा कट:
गोड, थंड, पचायला हल्का, कोरडा, भुक वाढविणारा, वातकर, तापात पथ्यकर.

२) मटकीचे सुप:
अल्प बलकारक, पाचक, पचायला हल्के, डोळ्यांना हितकर, रक्तविकारात उपयुक्त, चवीला गोड, पित्तकफ कमी करणारा.

३) मटकीची उसळ:
पचायला जड, तिखट, गोड, कृमी उत्पन्न करणारी, वात वाढविणारी, कफ पित्तनाशक, धातु पोषक.

Related image

मटकी आपण सर्वच जण मोड काढुन वापरतो पण असे करत असताना एक लक्षात घेणे आवश्यक आहे ते म्हणजे कोणतेही कडधान्य पाणी घालून भिजत घालून मोड आणायला ठेवले असता त्यात पाण्याचा अंश वाढतो आणि मटकी अशा प्रकारे मोड काढुन खाण्याने तिच्या कृमी उत्पन्न करायच्या गुणात अधिकच भर पडणार ह्यात शंकाच नाही. मोड काढलेली मटकी कच्ची कधी ही खाऊ नये. तसेच मटकी वारंवार नियमीत खाऊ नये.

मटकी अतिप्रमाणात खाल्ल्याने भुक मंदावणे व कृमींचा त्रास बळावण्याची शक्यता वाढते.

मटकीच्या अजीर्णावर दह्यावरचे पाणी प्यावे.

सूचना – ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे ही विनंती

POST BY = स्वाती अणवेकर.

नहाने का वैज्ञानिक तरीका

वेळेवर झोपा, उत्साही रहा!

वेळेवर झोपा, उत्साही रहा!

#झोप घेण्याची सर्वोत्तम वेळ कोणती ? #वेळेवर न झोपण्याचे दुष्परिणाम  #रात्रीचे जागरण  #Night Jobs  #निद्रानाश Insomnia

आजची जीवनशैली इतकी बदलली आहे की त्यात वैयक्तिक शरीराची काळजी हा खूप दुर्लक्षित विषय बनून गेला आहे. पैसा मिळवत असताना आरोग्य नावाची संपत्ती आपण गमावत आहोत याची अनेकांना माहिती नसते. आजकालची बरीच तरुण मुलं ही मध्यरात्र उलटल्याशिवाय अंथरुणातही जात नाहीत. बर्‍याच जणांचे जॉब हे रात्रीचे असतता तर काही जॉब वरुण घरी येऊनही बराच वेळ जागत असतात. रात्रीचे जागरण हे तर फॅड अन फॅशन बनत आहे. मी किती वेळ जागलो याचं कौतुकाने वर्णन चालू असतं. इंजीनीरिंग मध्ये तर ‘night मारली’ हा शब्दप्रयोग केल्याशिवाय डिग्री पूर्णच होत नाही. पण ह्या सगळ्याचे आपल्या नाजुक अन प्रचंड गुंतागुंतीच्या शरीरावर काय परिणाम होतात याची कल्पना अनेकांना नसते. बघूयात रात्री उशिरापर्यंत जगारणाचे परिणाम….

#रात_जागरण

खरे तर तुमच्या शरीरात एक जैवीक घड्याळ सातत्याने टीकटीक करत असते. आणि ते अतिशय तंतोतत कार्यरत असते. ते तुमच्या शरीरातील विविध क्रियांसोबतच तुमच्या झोपण्याच्या वेळेचेही नियमन करत असते.

 रात्री 11 ते पहाटे 3 या कालावधीत तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया मुख्यत्वे तुमच्या यकृतात(Liver) रोखलेलीअसते.तुमचे यकृत अधिकचे रक्त साठल्यामुळे मोठे होते. ह्या महत्वाच्या वेळेस खरेतर तुमच्या शरीरातून  विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची(Detoxification) महत्वाची प्रक्रिया होत असते. तुमचे यकृत तुमच्या शरीरातील दिवसभरात  साठलेल्या विषद्रव्यांचे निष्क्रियीकरण करुन त्याना बाहेर काढण्याचे अतिमहत्वाचे कार्य ह्या रात्री 11 ते पहाटे 3च्या वेळेत होत असते.

तथापि जर तुम्ही ह्या वेळेस झोप घेऊ शकला नाहीत तर तुमचे यकृत ही विषद्रव्ये बाहेर फेकण्याचे काम सुलभरित्या करू शकणार नाही.

.  जर तुम्ही रात्री 11 वाजता झोपी गेलात तर तुमच्या यकृताला तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी पुर्ण 4 तासांचा वेळ मिळतो.
जर 12 वाजता झोपलात तर 3तास
. जर 1 वाजता झोपलात तर 2 तास
.   आणि जर 2 वाजता झोपलात तर फक्त 1 तास तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी…..
आणि जर तुम्ही पहाटे 3 नंतर झोपलात तर ?

दुर्दैवाने तुमच्या शरीराकडे खरेतर विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी वेळ नाही.जर तुम्ही तुमच्या झोपेची ही चुकीची वेळ अशीच पाळली तर हे विषारी द्रव्ये तुमच्या शरीरात  कालानुक्रमे वाढत जातील.. आणि तुम्हाला माहीत आहे पुढे काय होईल ?

काय होते जेव्हा तुम्ही ऊशिरा झोपता आणि ऊशिरा ऊठता ?

ऊशिरा झोपण्याचा तुम्ही कधी प्रयोग केला आहे का ? तुम्ही रात्रभर कीतीही तास झोपला तरी सकाळी खुप थकल्यासारखे वाटले असेल ?
ऊशिरा झोपुन ऊशिरा उठणे खरेतर तुमच्या आरोग्यासाठी खुप धोकादायक आहे. तुम्ही विषद्रव्ये बाहेर टाकण्याच्या प्रक्रीयेशिवाय शरीराच्या आणखी अतिमहत्वाच्या क्रियांचे वेळापत्रक सुद्धा बिघडवता.
पहाटे 3 ते 5 वाजण्याच्या वेळेत तुमच्या शरीरात रक्ताभिसरणाची क्रिया ही फुफ्फुसांच्या मधे केंद्रीत होते. ह्या वेळेस तुम्ही काय करणे योग्य आहे ? खरेतर, तुम्ही शारिरीक हलचाली आणि मोकळ्या हवेत श्वास घेऊन शरीरात ऊर्जा साठवण्यासाठी बागेत फिरायला जायला हवे. ह्या सकाळच्या वेळेस हवा ही खुप शुद्ध असते आणि शरीरास आवश्यक अशा ऋण भाराच्या विद्युत कणानी परीपुर्ण असते.

सकाळच्या 5 ते 7 ह्या वेळेस रक्ताभिसरणाची क्रिया मोठ्या आतड्यात केंद्रित होते. आता तुम्ही काय करायला हवे ? तुम्ही शौचकर्म ऊरकून घ्यायला हवे. तुमच्या मोठ्या आतड्यातून सर्व मैला बाहेर जाऊ द्या. तुमच्या शरीराला दिवसभरात आवश्यक असणारी पोषणद्रव्ये आत्मसात करण्यासाठी तयार करा.

सकाळी 7 ते 9 च्या वेळेत रक्ताभिसरण तुमच्या पोटाच्या ठिकाणी केंद्रीत होते. आता तुम्ही काय करायला हवे ? तुमचा नाश्ता ऊरकून घ्या. हा नाश्ता तुमच्या संपुर्ण दिवसभरातील सर्वात महत्वाचा आहार आहे. आणि तुम्हाला आवश्यक ती सर्व पोषणद्रव्ये मिळतील याची काळजी घ्या. परीपुर्ण नाश्ता न केल्यामुळे तुम्हाला भविष्यात अनेक आरोग्यविषयक तक्रारीना सामोरे जावे लागू शकते.

असा आहे तुमचा दिवस ऊत्तम प्रकारे सुरु करण्याचा राजमार्ग….

अश्याप्रकारे ह्या आदर्श पद्धतीने तुम्ही तुमचा दिवस आरंभ करा. निद्रावस्थेत विषद्रव्ये निष्कासीत केल्यानंतर तुम्ही श्वसनाद्वारे आवश्यक ऊर्जा सामावून घेण्यासाठी  ताजेतवाने होऊन  ऊठा.
त्यानंतर तुम्ही मोठया आतड्यातील मैला बाहेर टाकून द्या.
आणि त्यानंतर तुम्ही नवीन दिवसाच्या नव्या सुरवातीला आवश्यक तो पोषणयुक्त आहार योग्य प्रमाणात घ्या.

ह्यात काहीच आश्चर्य नाही की ग्रामिण भागातील किंवा शेतावर राहणारे शेतकरी हे सदृढ असतात.ते लवकर झोपून लवकर ऊठतात. ते त्यांचे शरीरीचे नैसर्गिक जैविक घड्याळ पाळतात.

शहरात रहात असताना आपल्याला झोपेचे वेळापत्रक पाळताना खुप अवघड जाते. आपल्याकडे चांगला विद्युत  प्रकाश , टी व्ही , आणि ईंटरनेट असल्यामुळे आपण आपली अमुल्य अशी झोपेची वेळ पाळत नाही.

आपले नैसर्गिक वेळापत्रक पाळताना….
एकदा मला माझ्या शरीरातील जैविक घड्याळाची माहीती मिळाल्यावर मी ते पाळण्याचा पुरेपुर प्रयत्न करीन. जर मी लवकर ऊठलो तर जरी माझा दिवस नेहमीप्रमाणे कंप्युटर वर चालू झाला आणि मला घड्याळात 7  वाजलेले दिसले तर मला माहीत आहे की ही नाश्त्याची सर्वोत्तम वेळ आहे. तर मी माझा नाश्ता आहार शरीराद्वारे ऊत्तम प्रकारे शोषण करण्यासाठी 9 च्या वेळेआधी करण्याचा प्रयत्न करीन.

जर तुम्हाला कुणी रात्रपाळीची नोकरी देऊ केली तर ? मी तुम्हाला जरी जास्त पगार दिला तरी नोकरी नाकारण्याचा सल्ला देईन. दूरदृष्टीने विचार केला तर तुम्हाला कमाईपेक्षा जास्त पैसे आरोग्यविषयक तक्रारींवर खर्च करावे लागतील.

ह्याप्रकारे जास्तत जास्त ह्या वेळा पाळण्याचा प्रयत्न करा. तुमचे दैनंदीन वेळापत्रक असे तयार करा. मला खात्री आहे तुम्ही संपुर्ण दिवस अधिक उत्साही आणि ताजेतवाने रहाल.

रात्री झोप येत नाही?

आरोग्यम धनसंपदा!

आरोग्यम धनसंपदा!

#Health Issues   #आयुर्वेद अन आरोग्य

१०० वर्षे निरोगी जगण्याचा मंत्र हे सर्व पाळल्यास आजारपणापासुन दूर राहु आणि सतत तरुण व निरोगी राहण्याचा अनुभव घेवु.

*प्रामुख्याने शरीरात तिन प्रकारचे दोष असतात*
१) वात २) पित्त ३) कफ
वरील दोष समप्रमाणात ठेवणे यालाच आयुर्वेद म्हणतात .यामध्ये बिघाड झाला की आपल्याला त्या दोषाचा आजार होतो. यावर उपाय म्हणजे आपली जीवनशैली थोड़ी बदलली की आपल्याला त्याचे चांगले परिणाम अनुभवायला मिळतात
*आपण नुसते बोलतो की जुने लोक जास्त वर्ष जग़ायचे पण आपण हे कधी पाहिले नाही की ते लोक एवढे वर्ष तंदुरुस्त कसे जगायचे* ?

*त्यासाठी हे वाचुन कृतीत आणा*, *जादु होईल*
———————————————-
१) सकाळी लवकर उठावे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर ४.३० ते ५.०० यावेळेत उठावे.

२) दात घासण्याआधी कोमट पाणी हळुवारपणे प्यावे म्हणजे तोंडातील सर्व लाळ पोटात जावी याप्रमाणे १- ३ ग्लास पाणी खाली बसुनच प्यावे. (अनेक रोग दूर होतात)

३) पाणी पिल्यावर पोटावर दाब पडतो आणि प्रातः विधि करुन घ्यावा.

४) त्यानंतर दात घासावे त्यामध्ये कडु निंबाची काडी,आंब्याची काड़ी, करंजेची काड़ी, बाभळीची काड़ी ई. किंवा कोणतेही स्वदेशी दंतमंजन किवा पेस्ट वापरु शकता. (पंचगव्य दंतमंजन)
दंत रोग दूर राहतात

५) नंतर अंघोळ करावी शक्यतो थंड पाणी किंवा कोमट पाणी वापरावे. अंघोळ करताना गरम पानी कधीच वापरु नये.
A Practical Approch to the Science of Ayurveda Acharya Balkrishna

६) सकाळी ७.३० ते ९.३० च्या दरम्यान जठराग्नि सर्वात तेज असतो त्यावेळी पोट भरून जेवण करावे. जमीनीवर मांडी घालून बसुन शांतचित्ताने जेवणे आदर्श. (अन्न पचन उत्तम होते)
जेवण नेहमी सूर्याच्या उपस्थितीतच करावे.

७) जेवणाच्या अगोदर ४५मिनीट आणि जेवणानंतर १ तासाने पाणी प्यावे.जेवताना एक ते दोन घोट पाणी प्यायला हरकत नाही.

८) सकाळी फळांचा ज्युस प्या, दुपारी दही ताक किंवा मठ्ठा प्या, आणि झोपताना देशी गाईचे दूध देशी गाईचे तुप व हळद टाकुन प्या.

९) नेहमी पाणी पिताना हळुवार व खाली बसूनच घोट घोट पाणी प्यावे उभे राहून, गड़बडीने पाणी पिवु नये.
(शरीराला दररोज लाळेची गरज असते जेवताना थोड़ी लाळ पोटात जाते आणि बाकीची लाळ आपल्याला पाण्यातुनच शरीरात घालवावी लागते त्यासाठी पाणी घोट घोट करूनच प्या तसे केल्यास बरेच आजार दूर राहतात )

१०) नेहमी जेवण केल्यावर १० ते १५ मिनिट वज्रासनात बसावे. दुपारी जेवण केले की वामकुक्षी (२० मिनीट झोपावे) घ्यावी. आणि संध्याकाळी जेवण केल्यावर ३तास झोपु नये व शतपावली करावी.

११) अॅल्युमिनियमच्या भांड्यातील भोजन तसेच पाणी कधीच पिवु नये व काहीही खावु नये. अॅल्युमिनियम मधे बनवलेले जेवण करणे म्हणजे विष प्राशन करणे होय .

१२) भोजन करतांना नेहमी मातीच्या भांड्यांचा वापर करावा त्याबरोबर तांब्या,पितळाची भांडी पण वापरु शकतो.थोडक्यात ज्याचा वितळबिन्दु जास्त आहे अशीच भांडी वापरा.

१३) झोपताना नेहमी आकाशाकडे डोळे असावे असेच झोपावे आणि जमिनीशी जेवढा संपर्क तेवढे चांगले

१४) मैदा,डालडा,वनस्पती तेल, पामतेल, बेकरीचे पदार्थ अजिबातच खावु नयेत.
फिल्टर तेलच वापरा (रिफाईंड तेल विष आहे)

१५) सेंन्द्रिय गुळाचा वापर करावा (साखरेत गंधक असल्यामुळे विष आहे)
Garbh Sanskar Amitabh Bachchan

१६) पचन लवकर होण्यासाठी जेवणानंतर थोडासा गुळ खावा.

१७) जेवण बनवण्यासाठी फक्त सेंधा मीठ वापरा. (समुद्री मीठ वैद्यकीय सल्लानेच घ्यावे)

१८) कमीत कमी ६ ते ७ तास झोप आरोग्यासाठी पुरेशी आहे.

१९) दररोज एक तास प्राणायाम, १५ मिनीट योगासने, व जेवढे जमेल तेवढे सूर्यनमस्कार करणे.

२०) प्राणायाम मात्र नियमित करणेच

२१) रोज न चुकता एक आवळा किंवा आवळ्याचा रस प्यावा तसेच दुधी भोपळा, गाजर, बिट, मुळा, काकड़ी,कोबी यांचा वापर करावा

२२) जास्त वेळ पाय सोडून बसणे टाळावे, जास्त वेळ उभे राहणे, जास्त वेळ ड्रायव्हिंग करणे टाळावे. त्यापेक्षा जास्त वेळ मांडी घालून बसावे,उकड़ु बसावे, ज्यामुळे आपले मणके व सांधे चांगले राहतील

२३) भारतीय रस म्हणजे उसाचा रस,कोकम सरबत,आवळा रस, लिंबु सरबत, फळांचा ज्युस हेच आपल्या शरीराला उत्तम पोषक आहेत.

२४) भारतीय पोशाख घाला व तो सैल असावा, जास्त फिट टाईट नसावा. व शक्यतो पांढराच असावा.
Ayurved Uwach – Part 1 Shree Balaji Tambe

२५) शरीराचे हे वेग आले की त्यांना रोखु नये. जर रोखले तर शरीरामध्ये ८४ प्रकारच्या व्याधि निर्माण होतात.
लघवीला आली की थांबवु नये, बसुनच लघवी करावी, अश्रु बाहेर येवु द्यावेत, रडायला आले तर ऱडावेच, हसायला आले की भरपुर हसावे, जांभई आली की द्यावीच, शिंक आली की बिनधास्त द्यावी

२६) कफ कधीच गिळु नये.

*वरील नियमांचे जर पालन केले तर नक्कीच आपण जास्त वर्ष निरोगी जीवन जगु शकतो*

Paralysis Treatment.

Paralysis Treatment.

#लकवा   #पँरालिसीस  #paralysis  #health issues

#नागरमुन्नोळी ->मिरज पासुन ७० कि.मी चिक्कोडी पासुन १० किमी.

” नागरमुनोळ्ळी  ता.चिक्कोडी जि.बेळगाव.”

चिक्कोडी  पासून १० कि.मी.नागरमुन्नोळी म्हणून गाव आहे, त्या गावा मध्ये श्री डाँ .पांडुरंग कुंभार म्हणून आयर्वेदिक डाँक्टरआहेत,
ते फक्त लकव्या/ पँरालिसीस वरच औषध देतात, लकवा कितीही पण जूना व गंभीर असू द्या, ते १००% बरा होनारच.  पेशंटचे केस पेपर्सचे
फक्त ५०/- रुपये घेतले जातात व ईंजेक्शनचे २०० रूपये. महिन्यात फक्त ५ वेळा विझीट द्यावी लागते पन पेशंट १००% कव्हरच होतो मित्राच्या वडिलांचा अनुभव आहे मित्राने आत्ता परीयेंत ३०-३५ पेशंट पाठवले जे गेले  अँब्युलन्स मध्ये पण आले चालत…    ते सर्व आता चालतात फिरतात… normal आहेत…
जर कोणाला माहिती हवी असेल तर ते मला कधीही फोन करू शकतात आपल्याकडून जर कोणाचा जीव वाचत असेल,तर या पेक्षा दुसरी कुठली सेवा असेल.
धन्यवाद.
Parkinson Aur Lakwa Ke Liye Yog

#कसे जाणार?  #How To Reach???
मार्ग-: १
मिरज- चिक्कोडी- नागरमुन्नोळी

कोल्हापुर -कागल- चिक्कोडी नागरमुन्नोळी

टीप:- चिक्कोडी वरून गोकाक जानारी बस पकडणे
Yoga For Wellness – Live Well – Relief From Parkinson and Paralysis

शेयर करा कोणत्याही गरजूला उपयोगी पडेल
🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹-
VPS Kolhapur
Mob:-9021237236
          8421755550

महत्वाची सूचना – संबंधित माहिती WhatsApp वरुन मिळालेली आहे. त्याची खात्री latenightedition.in देऊ शकत नाही. पण ही माहिती खरी असेल असं गृहीत धरून जनहितार्थ प्रकाशित केली आहे. जनहित में जारी!

error: Content is protected !!