Tag: आरोग्यम धनसंपदा

कोथिंबीर खा, निरोगी रहा!

कोथिंबीर खा, निरोगी रहा!

#कोथिंबीर खाण्याचे फायदे->   #Benefits of Eating @Cilantro  #घरचा वैद्य   #आरोग्यम धनसंपदा

ताजी हिरवी कोथिंबीर आपण भाजी किंवा सलाडमध्ये वापरतोच. पण तुम्हाला माहितेय का, कोथिंबीरच्या एका पानामध्ये बरंच पोटॅशिअम असतं. ज्यामुळे अनेक व्याधी दूर शकतात. जाणून घेऊयात कोंथबीरच्या पानाच्या सेवनाने होणारे फायदे.

कोथिंबीरमध्ये आढळून येणारं पोटॅशिअम हे फारच उपयुक्त आहे. ज्यामुळे #केस गळणं थांबतं. एक कप कोथिंबीरमध्ये मेथी टाकून वाटून घ्यावं त्यामध्ये नारळाचं दूध घालून ते मिश्रण केसांना लावावं. एक तासानंतर हे मिश्रण धुऊन टाकावं. ज्यामुळे नक्कीच फायदा होईल.

#पींपल्सवर अनेकदा क्रिम किंवा लोशन काम करत नाही. मात्र कोथिंबीरची पेस्ट तिथे लावल्यास पींपल्स जाण्यास मदत होते.

अन्नपचन न झाल्यास त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. मात्र कोथिंबीरच्या सेवनानं अन्नपचन चांगलं होतं. एक ग्लास पाणी आणि त्यात कोथींबीरची पानं आणि लिंबूचे तुकडे टाकून ते पाणी प्यावं.

कोथिंबीरमध्ये असणारं व्हिटॅमिन ‘के’ मुळे हाडांना फायदा होता. हाडं मजबूत होतात.

कोथिंबीरमध्ये मिनरल्स, लोह, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम यासारखे गुण आढळतात. ज्यामुळे हृदयाचे ठोके, ब्लडप्रेशन कंट्रोल होतं.

latenightedition.in

उन्हाळ्यात कलिंगड खा!

उन्हाळ्यात कलिंगड खा!

#आरोग्यम धनसंपदा!

#Watermelon In Summer

कलिंगडासोबत बियाही खाल्ल्याने काय होतं?

आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बाजारामध्ये कलिंगडच कलिंगड दिसू लागले आहेत. कलिंगड खाल्ल्याने उन्हामुळे शरीरातील कमी झालेले पाण्यावर आणि अवेळी लागण्याऱ्या भुकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. मात्र, कलिंगड खाताना त्यातील बिया आपण फेकून देतो. मात्र, कलिंगडाप्रमाणेच त्याच्या बियाही आपल्या शरीरास फायद्याच्याच असतात.

-> कलिंगडासोबत बियाही खाल्ल्याने रक्तदाब कमी करण्यास मदत होते. कलिंगडाच्या बियांमध्ये #सिट्रालाइन हे अमायनो अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात आढळते. याचा उपयोग रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास होतो.

-> हृदयविकाराचा त्रास कमी करण्यासाठीही कलिंगडाच्या बिया उपयुक्त आहेत. बियांमधील अ‍ॅन्टीऑक्सिडंट गुणर्धम हृदयाचे कार्य सुधारण्यास मदत करतात.

->अमेरीकन हार्ट असोसिएशननुसार कलिंगडाच्या बियांमधील फॅट्स घातक कोलेस्ट्रॉलचा धोका कमी करतात.

->#किटाणूंच्या संसर्गाचा प्रतिकार करण्यासाठीही #कलिंगडाच्या बियांचा उपयोग होऊ शकतो. या बिया क्लेबसिएला न्युमोनिया आणि सुडोमोनास एरुगीनासाचा  प्रतिकार करण्यास फायदेशीर ठरतात.

error: Content is protected !!