Tag: उत्सव

होळीचा सण लई भारी…

होळीचा सण लई भारी…

होळी हा संपूर्ण भारतामध्ये विशेषत: उत्तर भारतामध्ये अतिशय उत्साहाने साजरा होणारा सण आहे. या सणाला “होळी पौर्णिमा” असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते तर काही ठिकाणी एकत्रितरीत्या तो साजरा होतो. फाल्गुनी पौर्णिमा या दिवसापासून पासून पंचमीपयर्त या ५-६ दिवसांत कुठे दोन दिवस तर कुठे पाचदिवस हा उत्सव साजरा केला जातो.

भारतातल्या वेगवेगळ्या भागांत फाल्गुन पौर्णिमेला एक लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. ह्या उत्सवाला “होलिकादहन” किंवा “होळी”, “शिमगा”, “हुताशनी महोत्सव”, “दोलायात्रा”, “कामदहन” अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला “फाल्गुनोत्सव”, आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त “वसंतागमनोत्सव” किंवा “वसंतोत्सव” असेही म्हणण्यात येते.

महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती ‘बोंबा’ मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.

होळीचे महत्त्व

होळी मनुष्याला मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी अशी कल्पना आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते.

होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. यात वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. पण या हल्लीच्या काळात किमती लाकडे जाळून होळी साजरी करतात . दुसऱ्या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला धुळवड असेही म्हणतात. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते. या दिवशी लोक आपसातील भेदभाव, भांडण, गरिबी-श्रीमंती विसरून एकत्र येतात. होळीचे मानसिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे. लोकांच्या मनात बऱ्याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात. ते समाजात भीतीने किंवा शालीनतेमुळे प्रकट होऊ शकत नाहीत. होळीच्या दुसऱ्या दिवशी ते सगळे बाहेर काढण्याची संधी असते. होळीच्या दिवशी शिव्या देणे हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे.

थंडी गेली असून गरम पाण्याने स्नान करण्याचा ऋतू संपला. आता थंड पाण्याने स्नान करू शकता असे सांगतही होळी येते. यानंतरची रंगपंचमीही सृष्टीचा नवा रंग दर्शवणारी असते.

पौराणिक दाखले

लहान मुलांना पीडा देणाऱ्या “होलिका”, “ढुंढा”, “पुतना” ह्यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे ह्या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात. (एका पौराणिक कथेनुसार विष्णूभक्त प्रल्हादला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिकादेवीचा श्रीविष्णू देवाने वध केला होता. होलिकेला वर होत की तिला अग्नि जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळ्ण्यासाठी त्याला मांडीवर घेऊन अग्नीकुडांत प्रवेश केला व प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले) “मदनदहना”च्या कथेत ह्या उत्सवाची परंपराही काही लोक सांगतात.

विद्वानांच्या मते हा उत्सव प्राचीन अग्निपूजनपरंपरेचा आविष्कार आहे. होळीच्या सणाचे आज सगळीकडे प्रचलित असलेले स्वरूप पाहिले तर लक्षात येते ते असे की हा सण मुळात लौकिक पालळीवरचा असावा. त्यात कालांतराने उच्च संस्कृतीच्या लोकांकडून धार्मिक/सांस्कृतिक विधिविधानांची भर पडली असावी.

आजच्या लोकोत्सवात “होलिकोत्सव” (होळी), “धूलिकोत्सव” धूळवड आणि “रंगोत्सव” रंगपंचमी हे तीन मुख्य पदर उठून दिसतात. जडवाद आणि भोगवाद ह्यांना जाळून, त्यांची धूळवड करून आयुष्यातल्या आनंदाचा रंगोत्सव साजरा करायचा किंवा समाजातल्या असद्वृत्ती भस्मसात करून त्यांच्या नावाने “शिमगा” करत सदवृत्तींचा जयघोष करायचा हा उत्सव आहे.

कोकणातील शिमगोत्सव / होलिकोत्सव

कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा हा सण अधिक मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तिथे हा सण सुमारे ५ ते १५ दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो.

पालखी व मुख्य विधी

यामध्ये मुख्य काम म्हणजे ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रुपे (देवीच्या उत्सवमूर्ती) ठेवून पालखी देवळातून सहाणेवर आणणे. सहाण ही जागा मुख्यत्वेकरून गावातील चावडी असते. तर गावदेवीचे देऊळ हे दूर जंगलात असते. तर पालखी सजवून ढोल-ताशाच्या गजरात सहाणेवर आणायची ती होळीच्या दिवशी संध्याकाळी. त्यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू होतो.

त्यानंतर रात्री आंब्याच्या किंवा सुरमाडाच्या झाडाची होळी तोडून आणणे. हे काम जिकिरीचे आणि जबाबदारीचे असते. प्रसंगी सुमारे ५० ते ७० फूट उंचीचे, अंदाजे १५ वर्षे वयाचे, आणि सुमारे १२०० ते १५०० किलो वजनाचे झाड तोडून ते गावकरी खांद्यावरून नाचवत सहाणेवर पालखीसमोर आणून उभे करतात. हे सगळे होईपर्यंत पहाट होते. मागच्या वर्षीच्या होळीचा जो खुंट ज्या खड्ड्यात शिल्लक असतो, तोच खड्डा मोठा खणून त्यात होळीसाठी आणलेले झाड उभे करतात ,व त्याभोवती गवत रचून मग पालखी प्रदक्षिणा होते, आणि मग होम जाळला जातो. गावातील नवीन जोडपी या होमात नारळ देतात.

गार्‍हाणे, खुणा काढणे

दुसर्‍या दिवशी गावकरी परत सहाणेवर जमतात. तिथे होळीच्या शेंड्याखाली सगळं गाव उभा राहून ~गार्‍हाणे ~ नावाचा कार्यक्रम होतो,ज्यात मागच्या वर्षीचे नवस फेडणे आणि यावर्षी नवीन नवस करणे असा प्रकार असतो. त्यानंतर बैठक(गावची सभा) असते, ज्यात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते.

त्यानंतर तिसर्‍या दिवशी पालखीने खुणा काढणे हा कार्यक्रम असतो, यामध्ये गावचा गुरव आदल्या रात्री एक नारळ सहाणे समोर पटांगणात जमिनीत लपवून ठेवतो . तो नारळ पालखी हुडकून काढते. हा कार्यक्रम पाहण्यासाठीही गर्दी होते.

समारोप

त्यानंतर सत्यनारायण पूजा आणि भजन व रात्री गावचे खेळे-नमन हा लोकनृत्यप्रकार असतो. काही ठिकाणी पालखीनृत्य स्पर्धा ही असतात. त्यानंतर पुढील दिवसात पालखी घरोघरी दर्शन देते. याचा समारोप काही ठिकाणी शिंपणे या कार्यक्रमाने तर काही ठिकाणी देवीचा दिवट्या गोंधळ घालून होते.

 

शिमगो इलो रे!!!!

शिमगो इलो रे!!!!

#याका म्हणतात कोकणचो गारानो… काय समजलो…

#Holi Special   #Happy Holi

हे बारा गावच्या, बारा

वेशीच्या, बारा बावडीच्या,

बारा नाक्याच्या, बारा

गल्लीच्या, बारा शहराच्या देवा

महाराजा…..

होय महाराजा…

आज जो शिमग्याचो सण सगळे

पोरा टोरा, म्हातारे कोतारे,

मिळान साजारो करतत, त्यांचो तू

नेहमी सांभाळ कर आणि जी काय

इडा पिडा, वाकडा नाकडा

असात त दूर कर रे महाराजा….

होय महाराजा…..

कोणी काय कोणावर वाकडा

नाकडा केला असात तर ता

बाहेरच्या बाहेर निघाण जाऊं दे रे

महाराजा……

होय महाराजा…..

कोणाक पोर होत नसात तर त्याक

पोर होऊ दे, काम धंद्यात सर्वानका

यश दे, पोरा टोराक शिक्षणात यश

दे, कोणाचा लग्न जुळत नसात तर ता

तुझ्या क्रुपेन जमानदे रे

महाराजा……

होय महाराजा……..

हे देवा महाराजा आज जो काय

महाराष्ट्रात दुष्काळ पडलो हा,

त्याचो तू नाय नाट कर आणि तुझ्या

कृपा दुष्टीने भरभरून पाणी दे रे

महाराजा……..

होय महाराजा…….

हे देवा महाराजा आणि जो काय

आजकाल पोरी टोरीन वर

अत्याचार होतंत आणि जे करतत

त्याचो नाय नाट कर रे

महाराजा…..

होय महाराजा….

ह्या बघा देवक मी नारळ देऊन

सगळ्यांच्या वतीने गराणा

घातलाय. चला आता सगळ्यांनी

पाय पडा आणि शिमगो खेळाक

यवा आणि पाणी नाय वापरलास

तर बरा व्हयत.

बोला होळी रे होळी,

पुरणाची पोळी

*** आपणा सर्वाना शिमग्याच्या मनपुर्वक शुभेच्छा***

मराठी भाषा दिन!!!

मराठी भाषा दिन!!!

27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आहे त्यानिमित्ताने…

संबंधित रचना कोणाची आहे मला माहीत नाही… आपल्या ब्लॉगच्या मेल वर ही पाठवण्यात आली आणि पोस्ट करा अशी विनंती होती… ज्याची रचना आहे त्याला धन्यवाद!!!

 

एक होतं गाव.

“महाराष्ट्र” त्याचं नाव.

 

गाव खूप छान 👌होतं,

लोक खूप चांगले👌 होते.

 

“मराठी” भाषा बोलत होते,

 

गुण्यागोविंदानं 💑 नांदत होते.

त्यांचं मन ❤ खूप मोठ्ठं होतं.

वृत्ती खूप दयाळू होती.

 

दुखलं- खुपलं तर एकमेकांच्या हाकेसरशी धावून 🏃​🏃​जायचे.

आल्या-गेल्याला सांभाळून घ्यायचे. एकमेकांना साथ

देऊन जगण्याचं गाणं शिकवायचे,

 

महाराष्ट्रात होता एक भाग.

“मुंबई” त्याचं नाव.

 

मुंबईसुद्धा छान 👌होती;

महाराष्ट्राची शान होती.

 

सर्वांच्या आकर्षणाची बाब होती.

आजूबाजूचे सगळेच मुंबईसाठी धडपडत होते.

 

इथं आले, की इथलेच होऊन

राहत होते.

 

“अतिथी देवो भव…!” 👏

 

या उक्तीनुसार महाराष्ट्रातील लोकांनी सर्वांचं आदरातिथ्य केलं.

पाहुण्यांचा मान म्हणून मागतील ते देऊ लागले.

 

हळूहळू परिस्थिती बदलू

लागली. “अतिथी” 👪👪

जास्त आणि “यजमान” कमी झाले.

 

मुंबई 🏢🏩🏨🏬  कमी पडू लागली, आजूबाजूला पसरू लागली. सगळ्यांचीच भाषा वेगवेगळी होती.

 

मराठी आपली वाटत नव्हती.

 

प्रश्न ?मोठा गहन होता,पण माणसं मात्र हुशार होती, दूरदृष्टीची होती.

 

त्यांना एक युक्ती सुचली.

दूरदेशीची ✈✈परदेशातील

भाषा त्यांना जवळची वाटली.

 

त्यांना वाटलं आपली मुलं शिकतील, 🇺🇸🇦🇺 परदेशात ✈✈✈जातील, उच्चशिक्षित 📖होतील. सर्वांचाच,अगदी “महाराष्ट्राचा” ही 💰💰 विकास होईल, म्हणून त्यांनी याच भाषेतील शिक्षणाची सोय केली.

 

आजूबाजूला या भाषेत बोलणारे पाहून मराठी माणसंही खंतावली.

आपल्यालाही हे आलंच पाहिजे म्हणून याच भाषेत शिकू लागली, शिकवू लागली,

 

आणि मग हळूहळू मराठी कोणीच शिकेना, मराठी कोणीच बोलेना,

बोलीभाषा ही बदलली.

 

सगळ्याचा नुसता काला झाला.

शुद्ध, सुंदर मराठीचा लोप⚫ झाला.

 

?

?

?

?

?

?

?

?

?

 

अशा या महाराष्ट्रातील एक छोटा मुलगा🚶​आपल्या आईबरोबर💃​

 

माफ करा हं……..

 

आपल्या ‘मम्मी’ बरोबर एकदा वाचनालयात गेला.

 

चुकून त्याचा हात एका 📖 पुस्तकावर पडलं, त्यानं ते उघडलं. पुस्तक शहारलं,

पानं फडफडली, आनंदित झाली.

 

त्यांना वाटलं, चला निदान आज तरी आपल्याला कोणी वाचेल.

 

इतक्यात त्या मुलानं

विचारलं, (त्याच्या भाषेत)

“मम्मी” कोणत्या भाषेतलं 😳😳 पुस्तक आहे गं हे ?”

 

‘मम्मी’ 💃​खूप सजग होती,

मुलाचं हित जाणत होती, सगळं ज्ञान पुरवत होती.

 

पुस्तक 📖 परत जागेवर ठेवत म्हणाली, “अरे, खूप पूर्वी म्हणजे तुझ्या �👳​​​😐आजोबांच्या वेळेस,

 

“मराठी भाषा” प्रचलित होती;

आता कोणी नाही ती बोलत.

 

पुस्तक कोमेजलं, पानं आक्रसली,

पानांपानांतून अश्रू 💧ठिबकले;

पण……………….

 

हळहळ वाटण्याचं काही कारण नव्हतं. कारण, आता मराठी साठी दुःखी 😩 होणारं काळीज❤ कोणाचंच उरलं नव्हतं.!!

 

महाराष्ट्राची शान “मराठी”भाषा!!!

 

मला एकानी विचारले तू मराठीत का ‘पोस्ट’ टाकतो….??? आणि,

मी त्यांना एवढंच म्हटलं,

 

आमच्या घरात “तुळस”🌿आहे,

‘Money plant’🎍नाही.

 

आमच्या घरच्या स्त्रीया 👵​​ “मंदीरात” जातात,

‘PUB’ 💃​मध्ये नाही.

 

आम्ही मोठ्यांच्या 👏👏 पायाच पडतो, त्यांच्या डायरेक्ट गळ्यात मिठी मारत नाही.

 

आम्ही “मराठी” आहोत,

आणि मराठीच राहणार 👍!!!

 

तूम्ही English मध्ये मेसेज केलात तरी मी रिप्लाय

मराठीतूनच देतो,

 

याचा अर्थ असा नाही की, मला English येत नाही,

 

अर्थ असा आहे की, मी आपल्याला मराठी शिकवतोय.

 

अरे गर्व बाळगा तुम्ही मराठी असल्याचा…

 

“तुळशी” ची जागा आता

‘Money Plant’ ने घेतलीय…!!

 

“काकी” ची जागा आता ‘Aunti’ घेतलीय…!!!

 

‘वडील’ जिवंतपणीच “डेड” झालेत.

 

अजुन बरंच काही आहे, आणि तुम्ही आत्ताच Glad झाले….???

 

“भाऊ”👬 ‘Bro’ झाला…!!

आणि “बहीण “👰 ‘Sis’…!!!

 

दिवसभर मुलगा “CHATTING” च करतो… नाही तर रात्री झोपताना Mobile वर ‘SETTING’ पण करतो…!!!

 

🍼 दुध पाजणारी “आई” जिवंतपणीच ‘Mummy’झाली.!!

 

घरची “भाकर” आता कशी आवडणार हो…

 

५ रु. ची ‘Maggi’ आता किती “Yummy” झाली…!!!

 

माझा मराठी माणूसच “मराठी” ला विसरू लागलाय….😩😩😩

🌹💐🌹💐🌹💐🌹💐

संत गाडगेमहाराज यांची जयंती

संत गाडगेमहाराज यांची जयंती

#Sant Gadagebaba

आज २३ फेब्रुवारी: स्वच्छतेचे उपासक व विज्ञानवादी संत गाडगेमहाराज यांचा जन्मदिवस

गाडगे महाराज :

जन्म २३ फेब्रुवारी १८७६

मृत्यु – २० डिंसेंबर १९५६

एक थोर आधुनिक मराठी संत व समाजसुधारक. त्यांचा जन्म शेणगाव (जि.  अमरावती ) येथे परीट जातीत  झाला. वडिलांचे नाव झिंगराजी व  आईचे सखूबाई. आडनाव जाणोरकार. त्यांचे मूळ नाव डेबूजी असे होते. त्यांचा वेश म्हणजे अंगावर फाटकी गोधडी आणि हातात गाडगे असा असल्यामुळे लोक त्यांना ‘गोधडे महाराज’ किंवा  ‘गाडगे महाराज’ म्हणूनच ओळखत. १९१२ मध्ये त्यांचा कुंताबाईशी विवाह झाला; परंतु संसारात त्यांचे मन रमले नाही. पुढे काही वर्षांनी घर सोडून तीर्थयात्रा करीत ते फिरू लागले. समाजातील कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष लोकसेवेचे व लोकशिक्षणाचे व्रत स्वीकारले.

लहानपणापासूनच त्यांना भजन-कीर्तनांची आवड होती आणि त्यांची वृत्तीही धार्मिक व परोपकारी होती. समाजसुधारणेसाठी व लोकशिक्षणासाठी त्यांनी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. ते निरक्षर असले, तरी त्यांची भाषा सुबोध व सर्वसामान्यांच्या एकदम हृदयाला जाऊन भिडणारी होती. महाराष्ट्रात सर्वत्र तसेच गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेशाच्या काही भागांत त्यांनी गावोगाव कीर्तने करून लोकजागृती केली. त्यांचा नैतिक उपदेश साधा व सर्वसामान्यांना उपयुक्त ठरावा असाच होता. ‘ चोरी करू नये, कर्ज काढून चैन करू नये, दारू पिऊ नये, देवापुढे पशूंचा बळी देऊ नये ’, अशा प्रकारचा उपदेश ते आपल्या कीर्तनांतून मार्मिक उदाहरणे देऊन करीत. पारंपरिक, पारमार्थिक विषयांसोबतच व्यावहारीक व नैतिक विषयांचाही त्यांनी आपल्या कीर्तनांतून लोकजागृतीसाठी चांगला उपयोग करून घेतला.

स्वच्छता, प्रमाणिकपणा व भूतदया यांवर त्यांचा विशेष भर असे. तीर्थयात्रेच्या ठिकाणी ते जात; परंतु देवदर्शन न घेता मंदिराच्या बाहेर थांबून यात्रेकरूंची सेवा करीत व तेथील परिसर स्वतःच्या हातांनी स्वच्छ करी. खाण्यापिण्याच्या बाबतीतही त्यांचा कमालीचा साधेपणा होता. श्रीमंत भक्तांनी दिलेले चांगले अन्न ते भिकाऱ्यांना वाटून टाकीत आणि स्वतः गरिबाच्या घरची चटणी- भाकरी मागून आणून खात.

लहानपणापासूनच ते जातिपंथभेदातीत होते. जातिभेद नष्ट करून एकजिनसी समाज निर्माण व्हावा, असे त्यांना मनापासून वाटे व त्या दृष्टीने यांचे आचरण आणि प्रयत्‍नही  असत. पंढरपूर, नासिक, त्र्यंबकेश्वर, आळंदी इ. ठिकाणी यात्रेकरूंचे अत्यंत हाल होत, म्हणून त्यांनी त्यांच्या सोयीसाठी प्रशस्त धर्मशाळा बांधल्या. विदर्भातील ऋणमोचन येथे त्यांनी  लक्ष्मीनारायणाचे मंदिर उभारले व नदीवर घाटही बांधला. अनेक ठिकाणी त्यांनी गोरक्षण संस्थाही उभारल्या; तसेच अनाथांसाठी व अपंगांसाठी अनेक प्रकारे कार्य केले. समाजसेवा करणाऱ्या अनेक संस्थांनाही त्यांनी उदारहस्ते देणग्या दिल्या. अनेक ठिकाणी देवाधर्माच्या नावावर चालणारी पशुहत्या त्यांनी बंद केली. अध्यात्माच्या जंजाळात न शिरताही, संसारातच राहून ईश्वरभक्ती करता येते, अशी साधी व सरळ शिकवण त्यांनी  समाजास दिली. ‘संत तुकाराम महाराज आमचे गुरू आहेत व माझा कोणीही शिष्य नाही ’, असे ते म्हणत. त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांची गादी अथवा मठ कोठेही निर्माण झाला नाही. समाजात शिक्षणप्रसार करून अनेक शिक्षणसंस्थांना त्यांनी मदत केली. लोकांची त्यांच्यावर नितांत श्रद्धा होती; त्यामुळे लोकांनी त्यांना विपुल पैसा दिला. तो सर्व  त्यांनी लोकोपयोगी कार्यात वेचला. त्यांनी उभारलेल्या सर्वच संस्थांचा कारभार विश्वस्त मंडळेच पाहतात. गाडगे महाराजांविषयी बहुजनसमाजात कमालीचा आदरभाव आहे. त्यांनी महाराष्ट्रात केलेले लोकजागृतीचे व लोकसेवेचे कार्य अत्यंत मोलाचे आहे. प्रवास करीत असता अमरावतीजवळ त्यांचे अचानक निधन झाले. त्यांची समाधी अमरावती येथे आहे.

error: Content is protected !!