आपल्याला जर आपल्या रचना, संकल्पना, मत येथे मांडायचं असेल किंवा कुठलीही जाहिरात ह्या संकेतस्थळावर करायची असेल तर latenightedition.in@gmail.com यावर संपर्क करावा!

Tag: गुंतवणूक

Share Market Posts (All Posts)

Share Market Posts (All Posts)

Share Market Beginners  ||  शेअर बाजार मराठीत  || Share Market In Marathi   || Stock Market  || गुंतवणूक ||

All Posts In One Post 

आजपर्यंत आपण विविध posts द्वारे शेअर बाजारासंबंधित विविध माहिती बघितली. ह्या एका post मध्ये आजपर्यंतच्या सर्व Posts update करुयात जेणेकरून शोधाशोध करणे अवघड जाणार नाही.

 

1. सर्वात आधी बघूयात SHARE MARKET BEGINNERS हे e-book ज्यामध्ये सर्व basic माहिती मिळेल अन नवीन गुंतवणूकदार या क्षेत्राशी संलग्न होऊ शकतील. खालील लिंकवर ती post… 

शेअर बाजार e-book – मराठीत

 

2. IPO म्हणजे काय आणि IPO ऑनलाइन कसा घेऊ शकतो याच्या दोन वेगवेगळ्या posts खालील लिंक वर…

IPO म्हणजे काय ?

How to apply for IPO (Initial Public Offering) Online

 

3. Dividend म्हणजे काय याबद्दल मूलभूत माहिती खालील लिंकवर…

Dividend Information In Marathi

4. सध्या शेअर बाजारात मंदी आहे. पण ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य संधी मानली जाते. त्याबद्दल थोडीशी माहिती अन NIFTY मधील चांगले shares खालील लिंकवर…

गुंतवणुकीसाठी योग्य संधी

 

5. माझ्या क्षमतेनुसार काही shares मी लांब व मध्यमकालीन गुंतवणुकीसाठी निवडले आहेत. त्याबद्दलच्या दोन वेगवेगळ्या posts ची लिंक खाली आहे…

Midcap Money 1

 

Top Stocks To BUY

 

6. लहान किमतीचे शेअर हे गुंतवणूकदारांना आकर्षित करत असतात. त्याबद्दल माहिती आणि काही shares खालील लिंकवर…

Good Shares With Low Price

 

7. गुंतवणूक गुरु वार्रेन बफेट चा एक interview इथे आहे.

Warren Buffett interview

 

8. आता सर्वात महत्वाचं… वाचलंच पाहिजे असं… 

गुंतवणूक-फसवणूक

 

[ खुलासा – We are not SEBI Registered Advisor. आम्ही SEBI द्वारे प्रमाणपत्र प्राप्त असलेले गुंतवणूक सल्लागार नाही. ही सर्व माहिती वैयक्तिक अनुभव व आकलनानुसार लिहिलेली आहे… ]

अभिषेक बुचके – latenightedition.in@gmail.com

Good Shares With Low Price

Good Shares With Low Price

Low Value Shares  ||  Shares Below 100 Rupees  ||  कमी किमतीचे चांगले शेअर  ||  Good Stocks With Low Value  ||  Stock Recommendation ||  गुंतवणूक संधी  || शेअर मार्केट मराठीत  || Share Market In Marathi  || Share Market Beginners

 

शेअर बाजारात जेंव्हा केंव्हा एखादा माणूस नव्याने येतो तेंव्हा त्याचे काही गैरसमज किंवा चुकीच्या संकल्पना असतात. त्या संकल्पनांच्या आधारावर तो व्यक्ति गुंतवणूक किंवा trading करू बघतो पण शेवटी त्याचा अपेक्षाभंग होतो. या अशा चुकीच्या संकल्पनेपैकी एक आहे “Low Value Stocks” buy करायची इच्छा होणे.

नव्याने येणार्‍या गुंतवणूकदारांना वाटत असतं की ज्या शेअर ची किम्मत कमी आहे तो आपण buy करावा. कारण त्यात आपल्याला Quantity Of Shares जास्त येतील आणि जरासा रेट वाढताच आपण तो विकून टाकू आणि नफा कमवू असा त्यांचा समज असतो. मग 100 च्या खाली असलेले shares ते शोधू लागतात. दोन आकडी किमतीत असलेले shares त्यांना गुंतवणुकीस जास्त अनुकूल वाटत असतात.

उदाहरण द्यायचं झालं तर, एक शेअर असतो ज्याची किम्मत 20 रुपये असते. त्यांना तो attractive वाटतो. आपण याचे 100 shares घेतले तरी आपली गुंतवणूक 2000 होईल. मग पाच-सहा महिन्यांत याची किम्मत 25-30 तरी होईलच; त्यानंतर आपण तो विकुया. म्हणजे 5 ते 10 रुपये नफा गुणिले माझे 100 shares असे पाचशे ते हजार रुपये माझा नफा होईल.

पण ही संकल्पना चुकीची आहे. एखादा शेअर जरी कमी किमतीला दिसत असेल तरी तो गुंतवणुकीस योग्य आहेच असं नाही म्हणता येत. कारण असे छोटे shares वर्ष-वर्ष दोन-तीन रुपये सुद्धा वाढत नाहीत. उलट एखादी नकारात्मक न्यूज येताच ते कोसळत जातात. याउलट जे दर्जेदार shares आहेत, जरी त्यांची किम्मत जास्त असली तरी ते वाढत जातात. त्यांचा वाढण्याचा वेगही लक्षणीय असतो. म्हणजे, TCS सारखा शेअर, ज्याची किम्मत 3000 च्या आसपास आहे तो दिवसाला 100-150 रुपये वाढतो किंवा पडतो. SBI सारखा शेअर, ज्याची किम्मत 300 च्या आसपास आहे तो दिवसाला फार तर 10-15-20 रुपये वाढतो किंवा पडतो; कधी-कधी 2-4 रुपये सुद्धा हलत नाही. तर हे छोटे shares दिवसाला एखाद रुपया कमी जास्त होत असतात.

तुम्ही जर 3000 रुपये गुंतवणार असाल आणि TCS चा एक share buy केला तर तो 50-100 असा वाढत जाऊन 3200 होईल. तुमचा नफा 200 रुपये. आणि जर समजा, 20 रुपयाचे 150 shares घेतले आणि तो फक्त 2 रुपये वाढला तरीही तुम्हाला 200-300 इतकाच नफा होणार आहे.

त्यामुळे शेअरची किम्मत किती आहे यापेक्षा तुम्हाला किती रुपये गुंतवायचे आहेत ते योग्य शेअर मध्ये लावणे उत्तम असतं. त्यामुळे येथे Quantity पेक्षा Quality ही महत्वाची असते. त्यामुळे महाग असले तरी योग्य shares च तुमची गुंतवणूक वाढवू शकतात.

इतकं सांगूनही छोट्या shares च्या बाबतीत गुंतवणूकदारांचं आकर्षण काही कमी होत नाही. असे shares दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी घेतले जातात. त्यामुळे गुंतवणूकदार PENNY STOCKS मध्ये अडकण्याची शक्यता असते. असं असूनही असे काही shares आहेत ज्यांची किम्मत दोन आकडी अर्थात 100 पेक्षा कमी आहे आणि ते तुलनेने सुरक्षित व चांगला परतावा देऊ शकतात. आज आपण असेच कमी किमतीचे shares बघणार आहोत.

सांगायची गोष्ट म्हणजे, Ashok Leyland हा शेअर तीन वर्षांखाली 20-25 रुपयांना होता आणि आज 130 रुपयांवर कार्यरत आहे. TVS Electronics, Yes Bank, DCB Bank व असे अनेक shares कधीकाळी दोन आकडी होते आणि आज खूप वाढले आहेत. या shares ना आपण Multibagger Shares म्हणतो.  मी आज जे shares सांगतो आहे ते काही Multibagger नाहीत, कमी किमतीचे चांगले shares आहेत. त्या-त्या सेक्टर मध्ये त्यांच्यापेक्षा चांगले shares ही आहेत, पण ह्या लेखात आपण केवळ ‘कमी किम्मत’ हा निकष लावला आहे.

खाली मी काही कंपन्यांची यादी दिली आहे. त्यात A Category आणि B Category असे दोन भाग केले आहेत. यात A Category मध्ये दर्जेदार, Nifty मधील, सरकारी, अशा कंपन्यांचा समावेश आहे. यात पैसे गुंतवले तर जोखीम कमी आहे. दुसरीकडे, B Category मध्ये असलेले stocks ही चांगलेच आहेत, पण त्यात थोडी अधिक जोखीम आहे.

हे stocks कसे निवडले याचाही खुलासा करतो. दर्जेदार असलेले stocks तर सर्वश्रूत आहेत. त्यानंतर काही stocks चा मी स्वतः अभ्यास केला आहे. काही stocks हे मला Business Channel आणि पेपरमधील लेखातून मिळालेले आहेत. असे विविध पातळीवरून हे stocks शोधून एकत्रित केले आहेत.

[ खुलासा – मी काही SEBI Registered Advisor किंवा Fund Manager नाही. माझ्या क्षमतेनुसार हे stocks मी निवडले आहेत. यापैकी काही stocks मध्ये माझी गुंतवणूक आहेच. ]

 

A Grade

 1. BHEL

 2. SAIL

 3. RCF

 4. NALCO

 5. IDFC

 6. IDFC Bank

 7. HUDCO

 8. NHPC

 9. Idea

 10. Tata Power

 11. Dish TV

 12. IDBI Bank

 13. HCL Infosystem

 14. South Indian Bank

 15. Nalco [National Aluminium]

 16. SPTL

 17. Crompton Greave

 18. Shivam Auto

 19. Hindustan Copper

 20. Rico Auto

 21. Z Learn

B Category

 1. TV18

 2. Welspun India

 3. Alembic Pharma

 4. PTC India

 5. Fineotex Chemical

 6. VLS Finance

 7. Snowman Logistics

 8. Marketer Limited

 9. Patel Integrated

 10. Hindustan Tin Works

 11. Sumeet Securities

 12. Monnet Ispat

 13. A2Z Infra

 14. Vascon Engineers

 15. VIP Clothing

 16. Rolta India

 17. Nectar Life

 

लवकरच या यादीत आणखी काही stocks समाविष्ट करण्याचा प्रयत्न आहे. शिवाय या shares बद्दल अधिक माहिती देण्याचा प्रयत्न करेन.

 

Documentation – Abhishek Buchake  ||  @Late_Night1991

संपर्क – latenightedition.in@gmail.com

महत्वाचं पुस्तक खालील लिंकवर… 

शेअर बाजार e-book – मराठीत

गुंतवणूक-फसवणूक

गुंतवणूक-फसवणूक

{जनहितार्थ}

[ संबंधित लेख whatsapp वर मिळालेला आहे. हा लेख Chandrashekhar Thakur यांनी लिहिलेला आहे असं त्या मेसेज मध्ये नमूद केलेलं होतं ते जसच्या तसं, जराही बदल न करता इथे प्रकाशित करण्यात आलेलं आहे. शेअर बाजारातील एका महत्वाच्या भागाबद्दल अत्यंत उत्तमरीत्या मांडणी केली असल्याने आणि सामान्य जनतेला ही माहिती अतिशय उपयुक्त ठरेल अशी असल्याने येथे प्रकाशित करत आहोत. ]

शेअर बाजार मराठीत  ||  Share Market In Marathi  || गुंतवणूक-फसवणूक  || सावधान ||

एखाद्या कंपनीच्या शेअरचा भाव एक दिवसात उदाहरणार्थ ७३५, ७२८, ७१०,६५५ ६३५ असा घसरत गेला की अशा परिस्थितीत मी Intra Day Trading करून प्रथम त्या कंपनीचे १००० शेअर्स ७३५ या भावाने विक्री करीन व भाव ६३५ वर गेला की १००० शेअर्स खरेदी करीन म्हणजे १०० गुणिले १००० बरोबर एक लाख रुपये एका दिवसात कमवीन… नव्हे ते आमच्या विद्यार्थ्यांना सांगून “मंदीतही पैसे कसे कमवावे” वगैरे पांडित्य सांगून अनेक शेअर गुरू लोकांना भुरळ घालतात.

वर सांगितले हे अंकगणित म्हणून ठीक आहे. पण या गमजा ते मारतात त्या कधी तर दिवसाचा शेवट झाला की. बाजार उघडते वेळी त्या शेअर्सचा भाव अशा प्रकारे खाली जाईल की वर जाईल हे त्यांना स्वप्न पडलेले असते का? पडले असेल तर मग एखाद्या बँक मधून दहा लाख रुपये कर्ज घेऊन ते स्वत:च असे ट्रेडिंग करून एका दिवसात करोडपती का होत नाहीत?

ज्यालोकाना शेअर बाजाराचा गंध देखील नाही अशा लोकांना आजकाल अनेक शेअर गुरू “मंदीतही तुम्ही कमवू शकता” अशा प्रकारे थापा देऊन आपले उखळ पांढरे करीत असतात. दहा पैकी एक दोन वेळा यांचा होरा बरोबर ठरला की दसपट जोमाने “मी सांगितले तसेच झाले की नाही पहा” अश गमजा मारतात. आठ वेळा यांचा होरा चुकलेला असतो तेव्हा मात्र अळीमिळी गुपचिळी. या अशा लोकांमुळे हे शेअर बाजार बदनाम होत होता आणि होत आहे. दुर्दैव असे की जेव्हा ही मंडळी सेमिनार घेऊन लोकांना भूलथापा देत असतात तेव्हा एकाही श्रोता ” मग तुम्ही क्लास का चालवता? स्वत :च हे करू करोडपती का होत नाही? “ असा प्रश्न विचारीत नाही.

मायबाप वाचकहो गेेली पन्नास वर्षे या क्षेत्रातील अनुभावावरून हात जोडून विनंती करतो की अशा भूलथापांना बळी पडू नका. चांगल्या कंपनींचे शेअरस घेऊन किमान आठ दहा वर्षे वाट पहा. जोडीला दरमहा म्युच्युअल फंडाच्या योजनेतून एस आय पी करा. तो राजमार्ग आहे. शेअर बाजार हे झटपट श्रीमंतीचे माध्यम नव्हे तर ते आंब्याचे झाड आहे कारण आंबे लागायला किमान आठ वर्षे वाट पहावी लागते हे सीडीएसेलच्या माध्यमातून गेली १७ वर्षे मी विनामूल्य सेमिनारच्या द्वारे सांगत आहे. पण भूल थापा देणार्यांच्या मागे मेंढरांच्या प्रमाणे माणसे जातात त्याचे वाईट वाटते. इथे शिकलेले लोकही मागे नाहीत. नुकतेच कोल्हापूर येथे अशाच एका महाभागाने साठ सत्तर डॉक्टर ना याच प्रकारे गंडा घातला . ते डॉक्टर तर अशिक्षित नव्हते न? पु ल म्हणतात तेच खरे ,” बेन्बट्यां तू कुंभार हो गाढवांस तोटा नाही ” या लेखाचा प्रपंच कुणा विशिष्ट व्यक्तीला किंवा व्यक्तीना डोळ्यासमोर ठेऊन लिहिला नाही. केवळ प्रबोधन हाच उद्देश आहे.

लेखक – चंद्रशेखर ठाकुर .

Image result for share market

Dividend Information In Marathi

Dividend Information In Marathi

Share Market In Marathi  ||  Share Market Beginners  ||  शेअर बाजार मराठीतून  ||  What Is Dividend?  ||  डिविडेंड म्हणजे काय?  ||  सर्वाधिक डिविडेंड देणार्‍या कंपन्या  ||   अर्थवृत्तांत

= > DIVIDEND

साध्या सरळ भाषेत सांगायचं झालं तर कंपनीकडून त्यांच्या भागधारकांना अर्थात shareholders ना (ज्यांच्याकडे त्या कंपनीचे shares आहेत ते) काही रक्कम दिली जाते त्याला dividend म्हणतात. ही रक्कम कंपनीच्या नफ्यातून दिली जाते. म्हणजे कंपनी जर नफा कमावत असेल तर त्या नफ्यातून ही रक्कम अदा केली जाते. कंपनी dividend देते म्हणजे कंपनीला नफा होत आहे, आणि नफा होत आहे म्हणजे कंपनी योग्यापणे कारभार करत आहे; आणि पर्यायाने गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित आहेत असा अर्थ काढला जातो.

ही रक्कम फार जास्त नसते आणि प्रत्येक share च्या मागे दिली जाते. कंपनीच्या Face Value च्या प्रमाणात ही calculate केली जाते. म्हणजे समजा, कंपनीने 200% dividend जाहीर केला अन कंपनीची Face Value 1 रुपये आहे तर, dividend आहे 2 रुपये. तुमच्याकडे जर कंपनीचे 200 shares आहेत तर 200*2= 400 इतकी रक्कम तुम्हाला dividend म्हणून मिळेल.

Dividend ची मिळणारी रक्कम ही tax free असते आणि त्यावर कसलाही brokerage लागत नाही. ही रक्कम साधारणपणे तुमच्या Demat खात्याला link असलेल्या savings खात्यात जमा होते.

जे गुंतवणूकदार दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी shares घेतात त्यांना dividend चा फायदा होत राहतो. चांगला dividend देणारी कंपनी बघूनही काहीजण त्या share मध्ये गुंतवणूक करतात.

Dividend हा सामान्यतः Quarterly Results (त्रैमासिक निकाल) किंवा Annual Results (वार्षिक) दरम्यान जाहिर करतात. यात Interim dividend [अंतरिम लाभांश] आणि Final dividend [अंतिम लाभांश] असे दोन प्रकार आहेत.

INTERIM DIVIDEND

हा Quarterly Results किंवा Semi-Annual Results च्या दरम्यान दिला जातो.

[[[एका आर्थिक वर्षात कंपनीला तीन महिन्याला एकदा याप्रकारे वर्षातून चार वेळा कंपनीचे निकाल जाहीर करावे लागतात. त्यापैकी March महिन्यातील निकाल हा Final अर्थात Annual Result अर्थात वार्षिक निकाल असतो तर September चे निकाल हे Semi-Annual असतात.]]]

Interim Dividend हे कंपनीचा वार्षिक नफा,उत्पन्न इत्यादी निर्धारित होण्याची आधी दिला जातो.Interim Dividend हा Board Of Directors जाहीर करतात अन shareholder च्या approval मंजूरीद्वारे होतो.

FINAL DIVIDEND

हे कंपांनीच्या वार्षिक निकालाच्या (Final Results in March) वेळेस दिला जातो. कंपनीचा वार्षिक नफा, उत्पन्न, खर्च इत्यादी बाबी स्पष्ट झालेल्या असतात त्यानुसार हा Dividend दिला जातो.Final Dividend हा कंपांनीच्या AGM (Annual General Meeting) मध्ये मंजूर केला जातो.

कंपनीचे Quarterly Results जेंव्हा जाहीर होतात तेंव्हा dividend ची घोषणा होते आणि तो केंव्हा मिळेल याचीही तारीख दिली जाते. त्यात Record Date आणि Effective Date या महत्वाच्या असतात.या Record Date आणि Effective Date नुसारच dividend चे लाभार्थी (अर्थात जे dividend मिळण्यास पात्र आहेत असे shareholders)ठरतात.

IPO म्हणजे काय ?

Infosys, TCS, SBI, Coal India, Tata Steel, Maruti Suzuki सारख्या मोठ्या व दर्जेदार कंपन्या चांगला dividend देतात. त्यामुळे अशा shares मध्ये long term ची गुंतवणूक ही फायदेशीर ठरते.

समजा, XYZ कंपनीने 10 रुपये dividend दिला आहे आणि 20 Nov ही त्याची Record Date आहे, तर 20 Nov ला त्या share चा भाव 10 रुपये कमी ने सुरू होतो. नंतर buyers आणि sellers आल्याच्या नंतर नेहमीच्या व्यवहाराप्रमाणे त्याची किम्मत कमी जास्त होत असते.

 

DIVIDEND YIELD

हा एक Financial Ratio आहे जो असं निर्देशित करतो की प्रत्येक कंपनी त्याच्या शेअर मूल्यानुसार प्रत्येक वर्षी किती dividend देते. The dividend yield would become as Dividend paid upon the current share price.

Dividend yield calculate करण्यासाठी कंपनीने दिलेला वार्षिक dividend ला त्या कंपनीच्या share price ने divide करावे लागेल.

समजा, XYZ कंपनीचा share price आहे 50 आणि वार्षिक dividend आहे 1 रुपये. सूत्रानुसार, 1/50=0.02 इतका dividend yield येईल आणि टक्केवारीच्या दृष्टीने तो 2% इतका असेल.

Dividend yield जास्त असणे हे गुंतवणूकदारच्या दृष्टीने चांगलं असतं. मुळात Dividend हा कंपांनीच्या नफ्यातून दिला जातो, नफा जास्त म्हणजे dividend जास्त.

ABC ही कंपनीचा share price आहे 100 आणि dividend pay केला आहे 1 रुपये. तसेच PQR ह्या कंपनीचा share price आहे 200 आणि dividend pay केला आहे 1 रुपये. यात ABC चा dividend yield आहे 1/100=0.01 म्हणजेच 1% आणि PQR चा dividend yield आहे 1/200=0.005 म्हणजेच 0.5%

त्यामुळे ABC ही कंपनी चांगला नफा कमावत आहे अन त्याचा लाभांश गुंतवणूकदारांना देत आहे असा काढला जातो.

ही फक्त मूलभूत माहिती आहे. यामध्ये अजून काही संकल्पना आहेत ज्या या लेखामध्ये नमूद केलेल्या नाहीत.

चांगल्या Dividend देणार्‍या कंपनी-  ||  Highest Dividend Paying Stocks in India

गेल्या पाच वर्षात Nifty मधील या कंपन्यांनी चांगला dividend दिलेला आहे. याशिवाय अशा अन्य कंपनीही आहेत ज्या चांगला dividend देतात. मार्चच्या आसपास जे वार्षिक निकाल येतात त्यात IOC, Coal India, NMDC सारख्या दिग्गज कंपन्या मोठा dividend देतात त्या कारणाने काही गुंतवणूकदार तो dividend मिळावा यासाठीही छोट्या कालावधीसाठी तो share घेतात. गेल्या वर्षी TCS ने 27.5 रुपये इतका dividend दिला होता.

Axis Bank,

BPCL, Bajaj Auto,

Coal India,

Gail,

HCL Tech, HUL, HPCL, Hero Motocomp, Hind Zinc, HDFC, HDFC Bank,

Infosys, ICICI Bank, Indian Oil Corporation, ITC,

LT,

M&M, Maruti Suzuki.

NMDC, NTPC,

ONGC,

Power Grid,

REC, Reliance Ind,

SBI,

Tata Steel, TCS,

Vedanta,

Wipro,

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

 

शेअर बाजारातील सर्व मूलभूत माहिती एका क्लिकवर… तेही मराठीत… 

शेअर बाजार e-book – मराठीत

शेअर बाजार e-book – मराठीत

शेअर बाजार e-book – मराठीत

Share Market Beginners  ||  Share Market In Marathi  ||  शेअर बाजार मराठीत  ||  Share Market E-Book  || शेअर बाजार पुस्तक  || गुंतवणूक || Basic Terminologies In Share Market  ||  

 

शेअर बाजाराचं विश्व वरचेवर विस्तारत आहे. पण अनेकजण या विश्वाशी, यातील संकल्पना व चढ-उताराशी अनभिज्ञ आहेत. शेअर मार्केट बद्दल काहीजण फक्त ऐकून असतील, पण त्या क्षेत्रात प्रवेश कसा करायचा याबद्दल धाडस होत नसेल. काहीजण या क्षेत्राबद्दल थोडीशी माहिती बाळगून असतील, पण त्यातील मूलभूत माहिती नसल्यामुळे पूर्ण ताकदीने त्यात उतरू शकत नसतील. अशा SHARE MARKET BEGINNERS साठी मी अभिषेक बुचके, घेऊन आलोय एक BASIC USER GUIDE, एक माहिती पुस्तक… तेही मराठीत, तेही विनामूल्य, मोफत, FREE…

FREE E-Book For Share Market Beginners

शेअर बाजार म्हणजे सट्टा, जुगार नाही. ते तंत्र आहे, शास्त्र आहे आणि एक संधी आहे. गुंतवणुकीचं योग्य साधन म्हणता येईल. या क्षेत्रात जे येतात त्या प्रत्येकाचे हेतु वेगळे असतात. आपण या क्षेत्रात येत आहोत त्याचा निर्णय आपल्याला घ्यायचा असतो. जोपर्यंत शेअर बाजार काय आहे हे माहीत होत नाही तोपर्यंत जास्त पैसे लावण्याचं धाडस करू नये. आधी मूलभूत माहिती घ्यावी अन मग गुंतवणूक करावी.

शेअर बाजारात लावलेला पैसा बुडतो हे सत्य असलं तरी तो साधारणपणे स्वतःच्या अट्टहास, अयोग्य मार्गदर्शन व अपुरी माहिती यामुळेच बुडतो. फेरफार व गैरव्यवहार करणार्‍या कंपन्या यामुळेही तो बुडू शकतो.

या e-book मध्ये काय आहे???

गुंतवणूक म्हणजे काय, ती कशी करतात, शेअर बाजारातील गुंतवणूक, शेअर बाजारातील प्रवेश, Demat Account, Depository, DP, share म्हणजे काय?, शेअर कसा खरेदी करतात?, कमीत-कमी किती रुपयांचे shares खरेदी करता येतात?, नेमका कोणता शेअर खरेदी करावा?, शेअर खरेदी करताना कोणते निकष असतात?, Sensex आणि Nifty म्हणजे काय?, Primary आणि secondary मार्केट म्हणजे काय?, IPO म्हणजे काय?, Corporate Action म्हणजे काय?, Dividend म्हणजे काय?, Bonus, Split, Right Issue, 52 Week High-Low, Intraday-Positional-Delivery-Long Term Position म्हणजे काय?, Upper Circuit आणि lower circuit म्हणजे काय?, Bearish-Bullish, Overbought-oversold म्हणजे काय?, Record Date आणि Effective Date मध्ये काय फरक असतो? वगैरे वगैरे सर्व संकल्पना थोडक्यात आणि मराठीत नमूद केलेल्या आहेत.

एकंदरीत शेअर मार्केट या क्षेत्राशी अगदीच अनभिज्ञ असलेल्या व्यक्तिला किमान मूलभूत माहिती मिळावी या हेतूने या Document ची निर्मिती झाली आहे.

शेअर मार्केट हे खूप मोठं विश्व आहे. त्यात रोज नवनवे अध्याय लिहिले जात असतात. हे Document त्या सर्व मुद्द्यांना स्पर्श करणार नाही. पण शेअर बाजारात नव्याने येऊ इच्छिणार्‍या अन मूलभूत माहिती वाढवू इच्छिणार्‍या लोकांसाठी हे Document उपयुक्त ठरेल अशी मी आशा करतो…

[[ Disclaimer – खुलासा – मी शेअर मार्केट मधील तज्ञ नाही किंवा SEBI registered Analyst वगैरे नाही. काही वर्षांपासून स्वतः ह्या क्षेत्रात कार्यरत आहे आणि सध्या Share Broker आहे. मला या क्षेत्रात आल्यावर काही अडचणी आल्या अन त्याची उत्तरे शोधताना बरेच प्रयास करावे लागले. ती सर्व माहिती मराठीत आणि एका ठिकाणी करता यावी यासाठी हा खटाटोप. ]]

जरूर वाचा अन अभिप्राय कळवा… आणि आवडलं असेल तर Playstore वर नक्की चांगलं rating द्या, share करा… तुमचं Rating हेच माझं Earning…

खालील लिंकवर क्लिक करून e-book download करू शकता… किंवा Google Playstore वर जाऊन Abhishek Buchake search करू शकता… 

LINK

https://play.google.com/store/apps/details?id=com.sharemarket.marathi.sharebazaar&hl=en

शेअर मार्केट मराठीत…

Top Stocks To BUY

Top Stocks To BUY

Share Market In Marathi   || शेअर बाजार मराठीत  ||  गुंतवणूक टिपा  ||  Which Stocks To Buy   ||  Top Shares  || Share Recommendations   ||  Share Market Investment 

[Date – 10 Feb 2018]

2018 चा केंद्रीय अर्थसंकल्प झाल्यानंतर शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड बघायला मिळाली. 11000 च्या वर असलेला NIFTY थेट 10500 च्या खाली आला. अनेकांनी आपले अडकलेले पैसे काढून घेतले. सलग दोन दिवस पडझड आणि परत एक बाऊन्स बॅक. परत पडझड आणि परत तेजी. बजेट नंतरचा आठवडा खूपच रंजक राहिला. Index खूपच volatile होते. अशात अनेकांचं नुकसान तर झालं पण अनेकांनी चांगल्या नव्या positions घेतल्या. अजून एकदा असा मोठा डाउनफॉल अपेक्षित आहे, तो केंव्हा येईल सांगता येत नाही, पण तो NIFTY ला 10000 पर्यन्त खाली खेचू शकतो. पण हेसुद्धा short term correction असेल. त्यानंतर पुन्हा टप्प्याटप्प्याने BUYING सुरू होईल आणि धीम्या गतीने बाजार पुन्हा वर सरकू लागेल. आशा परिस्थितीत चांगल्या व दर्जेदार shares मध्ये दीर्घ पल्ल्यासाठी गुंतवणूक खूपच फायद्याची ठरेल. NIFTY 100 व काही Midcap किंवा Smallcap मधील दर्जेदार कंपन्या गुंतवणुकीसाठी नक्की आकर्षक असतील. बाजारातील गुंतवणुकीची ती योग्य संधी समजून आपल्याकडील काही (सरसकट सर्व नाही) रक्कम बाजारात गुंतवू शकता.

मागच्या लेखात आपण NIFTY 50 मधील दहा कंपन्या बघितल्या आणि त्यानंतर Midcap मधील काही कंपन्या बघितल्या. आता त्यापुढे जाऊन गुंतवणुकीस आकर्षक इतर shares बघूयात…

 

 1. Apollo Tyres

जवळपास 15000 कोटींचा market cap असलेली Tyre क्षेत्रातील कंपनी. वाहन क्षेत्रातील तेजीचा परिणाम या क्षेत्रावर थेट संबंध. एका बाजूला MRF सारख्या दिग्गज कंपनीशी स्पर्धा आणि योग्य वाटणारी शेअर प्राइस ही जमेची बाजू. खरं तर शेअर split झालेला आहे. 1 रुपये Face Value आहे. पण बाजारात हा शेअर 230 च्या रेंजमध्ये मिळत असल्यास नक्की घ्यावा असा. सध्या 260 च्या आसपास कार्यरत आहे. एकंदरीत क्षेत्रातील तेजीचा लाभ या कंपनीलाही होत आहे.

 

 1. Berger Paints

रंग क्षेत्रातील कंपनी. क्रूड ऑइलच्या वाढत्या किमतीमुळे कंपनीच्या नफ्यावर परिणाम होताना दिसतो. पण भारतासारख्या देशात कंपनीला वाढीसाठी पोषक परिस्थिती. येणार्‍या काळात गृहनिर्माण क्षेत्रात वाढ झाली तर हे क्षेत्रही तेजी अनुभवेल. सध्या शेअर 250 च्या आसपास कार्यरत आहे, पण split आणि bonus सारख्या corporate action नंतरचा हा रेट आहे याची नोंद घ्यावी. ह्या पातळीवर गुंतवणूक करण्यासारखा शेअर आहे.

 

 1. ICICI General Insurance | HDFC लाइफ | SBILife

अर्थसंकल्प 2018 मध्ये आरोग्याच्या योजना राबवत असतांना Insurance क्षेत्राला सुगीचे दिवस येतील असं चिन्हं आहे. या क्षेत्रातील कंपन्या नजीकच्या काळात आपला व्यवसाय गतीने वाढताना दिसून येईल. बाजारात जोरदार पडझड होत असतांना Insurance shares फार पडझड होताना दिसलं नाही. या तीनही कंपनीत, योग्य भाव भेटताच समप्रमाणात गुंतवणूक करून ठेवावी.

 

 1. Bajaj Electricals

Domestic Appliance मधील कंपनी. या क्षेत्रातील दर्जेदार कंपनी. नुकतेच कंपनीचे वार्षिक निकाल आले त्यात कंपनीचा performance चांगला दिसून आलाय. बाजारातील पडझडीचा फटका कंपनीला बसलेला आहे. येणार्‍या काळात चांगला परतावा अपेक्षित आहे.

 

 1. Indian Hotels

पुन्हा एकदा Tata ग्रुपमधील कंपनी. मुंबईतील Hotel Taj याच कंपनीचे. Hotel क्षेत्रातील दिग्गज कंपनी. Tourism चा या क्षेत्रावर थेट परिणाम होत असतो. Luxurious सुविधा ह्या रोजच्या आयुष्यातील गरज नसल्याने वाढ मर्यादित वाटते. मंदीचे चटके या क्षेत्राला बसू शकतात. पण दर्जेदार कंपनी असल्याने Low Risk. अलीकडेच कंपनीने Right Issue दिलेला. सध्या 140 च्या आसपास कार्यरत आहे. 160 या 52 week high ला नुकताच गवसणी घालून आला आहे. बाजारातील पडझडीत correction झालेला. सध्याच्या position पासून Mid to Long Term साठी घ्यावा असा शेअर. खालच्या बाजूला 122 आणि 110 च्या आसपास support.

 

 1. UPL

खरं तर ही NIFTY100 मधील कंपनी. LARGE CAP. केमिकल क्षेत्रात कार्यरत. सध्या 700 रुपयांवर कार्यरत आहे. 52 week low च्या आसपास. अनेक market analyst कडून कंपनीला BUY च recommendation आहे.  सध्याच्या क्मतीवर नक्कीच Buy करावी अशी…

 

 1. NALCO – National Aluminium

Metal क्षेत्रातील कंपनी. Government undertaking. सध्या विविध aluminium व इतर metal manufacturing चा व्यवसाय. शिवाय power plant ही. चांगला performance करण्याची अपेक्षा. 70 रुपयांच्या आसपास कार्यरत. 52 wk low 61 आहे व 52 wk high 97 आहे. आपल्या पोर्टफोलियोत छोटीशी जागा या शेअर साठी काढून ठेवता येईल.

 

 1. Hindustan Copper

एकमेव कंपनी ज्या कंपनीला Copper mining चे अधिकार आहेत. सरकारी भागीदारी असलेली कंपनी. सध्या काही कारणास्तव share price कोसळत आहे. 52 wk low आहे 56 आणि high आहे 110. सध्या 75 ते 80 च्या दरम्यान कार्यरत आहे. Long term साठी गुंतवणुकीस चांगला शेअर.

 

 1. Hindustan Zinc

वर चर्चा केलेल्या दोन कंपनी याच क्षेत्रातील. हासुद्धा गुंतवणुकीस चांगला शेअर आहे. 300 रुपयांच्या आसपास कार्यरत. अनेक market analyst ने हा recommend केला आहे. सरसकट एकाच क्षेत्रात सर्व गुंतवणूक करू नये, वरीलपैकी योग्य वेळी योग्य shares गुंतवणुकीस निवडावा.

 1. Ambuja Cements

जेंव्हा इनफ्रास्ट्रक्चर किंवा गृहनिर्माण क्षेत्रात तेजी येईल तेंव्हा cement sector सुद्धा तेजीत असतं. पण ह्या सेक्टरच्या काही मूलभूत अडचणी आहेत. एकतर जे दिग्गज आहेत त्यांची किम्मत जास्त दिसत आल्याने सामान्य गुंतवणूकदार त्यापासून दुरावतो. या क्षेत्रात Ambuja Cement ही सध्या attractive वाटत आहे. अर्थात, चांगला परतावा मिळवण्यासाठी यात patience ठेवावे लागतील. Diversified व balanced portfolio बनवताना या क्षेत्राचा विचार करत असाल तर हा शेअर बरा वाटतोय. सध्या 250 च्या आसपास कार्यरत आहे, अजून तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. टप्प्याटप्प्याने योग्य गुंतवणूक करता येईल.

 

 1. NLC Industries

लोकसत्ताच्या अर्थवृत्तांत पुरवणीत शेअर मार्केट तज्ञ अजय वाळिंबे यांनी हा शेअर सुचवलेला होता. सीमेंट क्षेत्रातील मिनी कंपनी म्हणता येईल. मलाही हा गुंतवणुकीस चांगला वाटतो. बाजारात पडझड होत असताना जर हा अजून खाली आला तर गुंतवणूक करावी.

 

 1. Bharat Forge

Forging क्षेत्रातील दर्जेदार कंपनी. Large Cap. शेअर बाजार कोसळत असताना हा शेअर मात्र 52 wk high च्या जवळ कार्यरत आहे. विविध Brokerage Houses कडून या शेअर ला BUY चं recommendation आहे. ह्या levels वर शेअर थोडा महाग वाटत आहे. थोडासा correction आल्यानंतर यात गुंतवणूक करता येईल.

 

 1. Gati

सध्या Online Product Selling क्षेत्र विस्तारत आहे. वाढतं शहरीकरण आणि digitization यामुळे ते आणखीन वाढत जाईल असं दिसतंय. या क्षेत्रातील BlueDart सध्या मोठ्या पोर्टलसोबत टाय अप असल्याने तेजीने वाढत आहे. त्याचप्रमाणे Gati ही कंपनीसुद्धा याच तर्‍हेने वाढ नोंदवू शकते. या शेअर बाबत समिश्र प्रतिक्रिया बघायला मिळतात. पण थोडीशी risk घेऊन यात गुंतवणूक केली तर Long Term साठी ती फायदेशीर ठरू शकते. सध्या 115 च्या आसपास आहे, अजून कमी आल्यास आपल्या पैशांतील छोटा हिस्सा यात गुंतवू शकता.

 

 1. Jagran Prakashan

विविध Brokerage Houses या शेअर ला नेहमीच focus मध्ये ठेवत असतात. माध्यम क्षेत्रातील मोठा समूह. सध्या 165 च्या आसपास कार्यरत आहे. म्हणजे 52 wk low च्या आसपास. गुंतवणूक करता येईल असा शेअर.

 

 1. Avenue Supermart

Dmart चे मॉल चालवणारी ही कंपनी. हे shares IPO मध्ये मिळावेत यासाठी गुंतवणूकदारांच्या अक्षरशः उड्या पडल्या होत्या. परिणामही तसाच आला. 300 रुपयांना Issue केलेला हा share listing ला 640 पर्यन्त गेला आणि आज तो 1200 रुपयांवर कार्यरत आहे. बर्‍याच ठिकाणी असेलेले मॉल अन कंपनीचे चांगले fundamentals बघता कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणूक खूप फायद्याची ठरेल. Long Term साठी उत्तम शेअर.

 

 1. L&T Infotech

सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपनी. मागे सांगितल्याप्रमाणे हे वर्ष IT Sector साठी चांगलं मानलं जात आहे. या क्षेत्रातील अनेक कंपन्या गुंतवणुकीस आकर्षक आहेत त्यात हा शेअर अग्रेसर आहे. थोडही correction आल्यास या शेअर मध्ये गुंतवणूक जरूर करावी.

 

 1. Dabur India

मोठी कंपनी. ह्या कंपनीचे अनेक उत्पादने वापरले असतील. चांगली balance sheet आणि fundamentals. बराच काळ consolidate झाल्यानंतर हा शेअर वाढत गेला. सध्या 52 wk high च्या आसपास कार्यरत आहे. Assured returns साठी असे शेअर आपल्या पोर्टफोलियो मध्ये असायलाच हवेत.

 

 1. Tata Power

पुन्हा एकदा Tata ग्रुपमधील कंपनी. हा फार गमतीशीर शेअर आहे. जवळपास वर्षभर हा शेअर 80 च्या आसपास कार्यरत होता. वाढही नाही आणि तूटही नाही. पण Tata चा शेअर असल्याने गुंतवणूकदार यातून बाहेरही पडत नाहीत. पण अलीकडे या शेअर ने आपला तो पॅटर्न तोडून 100 च्या वर झेप घेतली होती. पण बाजार कोसळताच पुन्हा 82 ते 83 च्या आसपास आला. सध्या पॉवर सेक्टर ला चांगले दिवस आहेत. या क्षेत्रातील दिग्गज या नात्याने ह्या शेअरकडे बघता येईल. हा शेअर 90-92 च्या वर गेला की चांगली तेजी दाखवेल. पण त्यासाठी patience हवेत. सुरक्षित गुंतवणुकीसाठी घ्यावा असा शेअर.

  अभिषेक बुचके  || @Late_Night1991

[[[ Disclaimer – खुलासा – I’m not financial adviser nor fund manager.  मी गुंतवणूक सल्लागार नाही. The stocks advised here, are based on my own market research and analysis. संबंधित लेख माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अभ्यासातून लिहिलेला आहे. ]]]

गुंतवणुकीसाठी योग्य संधी

 

Midcap Money 1

Midcap Money 1

Midcap Money 1

MIDCAP MANTRA  ||  कमी किम्मत जास्त परतावा shares  || share बाजार मराठीत  || Midcaps तो Buy  ||  Stocks To Buy In This Downfall  || Share Market Beginners  ||  शेअर बाजारातील पडझड ||  Long Term Investment

 

शेअर बाजार सध्या लाल रंगात न्हाऊन निघाला आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. आधीच्या आर्टिकलमध्ये आपण NIFTY 50 मधील shares बद्दल माहिती घेतली. त्यामध्ये कोणते shares सध्या buy करण्याच्या रेंजमध्ये आहेत तेही बघितलं. पण ह्या बाजारातील लाल रंगाला अजूनच गहिरं करण्याचं काम केलं आहे MIDCAP shares ने… ज्या shares ने गेल्या वर्षात दामदुप्पट, तिप्पट परतावे दिले ते आज तळाकडे कूच करताना दिसत आहेत.

Midcap shares मध्ये गुंतवणूक ही NIFTY मधील shares पेक्षा जास्त जोखमीची मानली जाते. कारण अर्थव्यवस्थेतील चढ-उताराचा पहिला परिणाम छोट्या व माध्यम कंपन्यांना बसतो. मोठ्या कंपन्या ह्या त्या मानाने सुरक्षित मानल्या जातात. पण midcap, smallcap कंपन्या खूप चांगले परतावे देण्याची शक्यता असल्याने त्यामध्ये गुंतवणूक ही आकर्षणाची बाब असते.

समजा, आपण जर शेअर बाजारात दीर्घ काळासाठी 100 रुपये गुंतवणूक करणार असाल तर त्यातील 30 ते 35 रुपये हे Midcap व smallcap कंपण्यात गुंतवण्यास हरकत नाही. पण त्यात महत्वाची अट अशी की, तुम्ही जे shares गुंतवणुकीसाठी निवडत आहात ते अभ्यासपूर्वक आणि सर्व माहिती घेऊन निवडले पाहिजेत. उगीच कमी किमतीचे कुठलेही shares खरेदी करणे याला काही गुंतवणूक म्हणता येत नाही.

महत्वाचा भाग म्हणजे, असे छोटे व योग्य shares हे NIFTY मधील shares पेक्षा अधिक परतावाही देऊ शकतात. शेअर बाजारात आठ नऊ हजारांपेक्षा अधिक कंपन्यांचे shares आहेत. त्यातून योग्य शेअर निवडणे हे खूपच कठीण आणि मेहनतीचं काम आहे. आपआपल्या आकलनानुसार ते निवडता येतात… शेअर बाजारात चुकीला माफी नसते!!! एक चुकीचा निर्णय थेट नुकसानीच्या अन मनस्तापाच्या फेर्‍यात नेऊन अडकवू शकतो.

 

असे अनेक MIDCAP व SMALLCAP shares आहेत जे आज BUY करता येतील. सर्वच सांगता नाहीत येणार, पण मला सुचलेले आणि अवगत असलेले असे काही shares मी share करतो…

 

 1. BSE

मागील IPO च्या आर्टिकलमध्ये याबद्दल माहिती बघितली आहे. सध्या हा शेअर 52 week low च्या जवळ आहे. ह्या वर्षी कंपनीने 1100 रुपयांच्या दराने shares BUYBACK करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर October 2018 पासून BSE वर commodity चे व्यवहार करण्याची मुभा असेल. देशातील मोठ्या Exchange पैकी एक असल्याने कंपनीची balance sheet तगडी आहे.

शेअर सध्या 825 च्या आसपास आहे. अजून पडझड झाली तरी घेता येईल असा.

 

 1. FIEM

ही एक Auto Ancillary कंपनी आहे. CNBC Awaaz TV वर 2018 च्या गुंतवणूक list मध्ये या कंपनीच नाव आहे. 839 चा 52 week low आहे आणि सध्या शेअर 870 च्या आसपास कार्यरत आहे. Auto Sector यंदाही चांगली कामगिरी करेल असं म्हंटलं जात असल्याने यामध्ये तेजी येण्याची शक्यता आहे. घेण्यासारखा शेअर…

 

 1. BEL – Bharat Electronics

बजेट येताच ह्या शेअर मध्ये तेजी येते. प्रत्येक बजेटमध्ये संरक्षण क्षेत्रासाठी विशेष तरतूद असते. ही कंपनीही संरक्षण क्षेत्रातील सामुग्री व जनरल इलेक्ट्रॉनिक्स निर्माण करणार्‍या पैकी महत्वाची कंपनी आहे. पण यंदाच्या बजेटमध्ये संरक्षण क्षेत्र फार लक्षणीय तरतूद नसल्याने हा शेअर कोसळला. पण चांगला शेअर आहे. Split आणि Bonus झालेला. सध्या 150 रुपयांना आहे. अजून कमी येईल असं वाटत नाही. मध्यम कालावधी ते दीर्घ कालावधीसाठी चांगला असेल. [ माझ्याकडे हा शेअर आहे.]

 

 1. NBCC

ही public sector कंपनी आहे. सरकारचे यात shares आहेत. प्रामुख्याने Infrastructure संबंधित कामे. चांगला शेअर. सरकारचे Infra related धोरण वेगवान असल्याने अशा कंपन्यांना फायदा होऊ शकतो. बाजारातील पडझडीत सहभाग घेत हा शेअरही कोसळला आहे. येत्या काळात शेअर Split होण्याची शक्यता आहे. घ्यावा असा शेअर…

 

 1. Ashok Leyland

आवडता शेअर. वाहननिर्मिती क्षेत्रातील कंपनी तीन-चार वर्षांपूर्वी 20-25 रुपयांवर कार्यरत असलेला शेअर आज 120 च्या वर कार्यरत आहे. बाजार पडझडीच्या स्थितीत असताना हा शेअर मात्र हिरवा रंग राखून आहे. यात correction येईल का नाही ते सांगता नाही येत, पण दीर्घ काळाच्या गुंतवणुकीसाठी घ्यावाच असा शेअर…

 

 1. AB Capital – Aditya Birla Group

Aditya Birla समूहातील कंपनी. फायनॅन्स व investment क्षेत्रातील कंपनी. सध्या Financial Services च्या बाबतीत बरे दिवस आहेत. अलीकडे कंपनीने फार चांगला परतावा दिला नसला तरी येणार्‍या काळात चांगले returns देण्याची क्षमता असलेली कंपनी. सध्या 52 week low अर्थात 165 वर कार्यरत आहे. थोडीशी Risk घेऊन गुंतवणूक करावी.

 

 1. CDSL

मागील IPO आर्टिकलमध्ये याबद्दल माहिती घेतली आहे. पडझडीत शेअर तुटला असला तरी खालच्या पातळीवर लागलीच खरेदीकर्ते शेअर घेण्यास उत्सुक होते. दर्जेदार स्टॉक आहे. सध्या 320 च्या आसपास कार्यरत. IPO नंतर पहिल्यांदाच खालच्या रेंजमध्ये. आपल्या पोर्टफोलियोमध्ये ठेवावा असा शेअर.

 

 1. PVR

आपण चित्रपटगृहात जातो तोच हा pvr चा शेअर. एखादा चांगला, सुपरस्टारचा किंवा big budget चित्रपट येणार असेल तर हा शेअर नक्की वाढतो. तिकडे चित्रपट हिट झाला आणि गल्ला वाढला की इकडे या शेअरची किम्मत वाढते. सेंटिमेंट आणि थोडसं अर्थकारण लक्षात घेऊन यात खरेदी होत असते. मध्यंतरी overbought होता, पण बाजार पडझडीत खाली आला आहे. अजून तुटण्याची शक्यता आहे. त्या पातळीवर घेता येईल असा शेअर. पण मध्यम काळातील गुंतवणुकीसाठी बरा आहे. ह्या क्षेत्रात नेहमीच काहीतरी ‘happening’ असल्याने दीर्घकाळ ठेवता येईल का नाही याबद्दल शाश्वती नाही.

 

 1. SPTL – Sintex Plastics

Sintex च्या पाणी टाक्या सर्वांना माहीत असतीलच. त्याचीच ही कंपनी. दरवर्षी उन्हाळा आला की याचे दर वाढतात. यामागे लॉजिक असं असतं की, टाक्यांचा खप वाढेल, कंपनीचा नफा होईल, quarterly results मध्ये त्याचा इफेक्ट दिसेल आणि नफा कमावता येईल!! कंपनी नेमकी कशी आहे हे सांगता येणार नाही. पण एका वृत्तपत्रात ही कंपनी 100 चा टप्पा गाठू शकते असा अंदाज वर्तवला आहे. मला तरी थोडीशी risk घेऊन खरेदीसाठी आकर्षक वाटते. सध्या 52 wk low, जो 66 आहे, त्याच्या आसपास कार्यरत आहे.

 

 1. Tata Coffee AND Tata Global

दोन्हीही tata समूहातील कंपन्या. दोन्हीही चहा-कॉफी निर्मिती क्षेत्रातील. FMCG सेक्टर मधील कंपन्या. भारतातील चहाची सवय काही कमी होणे शक्य नाही. हे दोन्हीही shares दीर्घकाळ गुंतवणुकीच्या दर्जाच्या आहेत. शेअर बाजारातील पडझड झळ या दोन्हीही shares ला बसलेली आहे. दोन्हीपैकी एक शेअर हा आपल्या portfolio मध्ये असायला हरकत नाही. [माझ्याकडे आहे हा शेअर]

 

 1. Apollo Hospital

Hospitality क्षेत्रातील दिग्गज कंपनी. स्व. विलासराव देशमुख किंवा स्व. जयललिता यांना याच हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं होतं हे सांगावं वाटतं. यावरून हॉस्पिटल किती दर्जेदार आहे याचा अंदाज बांधता येईल. यंदाच्या बजेटमध्ये सरकारने आरोग्य क्षेत्रासाठी भरभरून पैसे दिले आहेत. त्याच दिवशी हा शेअर खूप वाढला होता. सध्या 1150 च्या आसपास कार्यरत आहे. 52 wk low 1000 च्या खाली असला तरी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करावी. दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी उत्तम असा शेअर. [माझ्याकडे आहे हा शेअर]

 

 1. RCF – Rashtriy chemical Fertilizers

सरकारी कंपनी म्हणता येईल. अर्थात govn undertaking board असतात तसे. कृषी क्षेत्राशी संबंधित. नेहमी बजेटमध्ये ह्या क्षेत्राला काहीतरी दिलं जातं, पण यंदा काही मोठी घोषणा न झाल्याने यात विक्री वाढली. शेअर अजून खाली येऊ शकतो. पण सहा महिन्यांच्या अवधिसाठी चांगला आहे. सध्या 85 च्या आसपास आहे. अजून खाली आल्यास घ्यावा.

 

 1. Granules

ही small cap pharma कंपनी. एका रेंजमध्ये कार्यरत आहे. थोडीशी रिस्क घेऊन खरेदी करता येईल असा शेअर.

 

 1. Ajanta Pharma

बाजारातील पडझडीत हा शेअर जर अजून correction mode मध्ये आला तर share price attractive असेल. Pharma sector विविध अडचणीतून जात असतं. स्थिर काळात शेअर वाढतात अन एखादी खराब बातमी शेअर ला खाली ओढायला पुरेशी असते. सध्या हा शेअर 1300 च्या आसपास खेळतो आहे. इतर pharma stocks च्या गर्दीत बरा वाटत आहे. एकंदरीत sectorial risk लक्षात घेऊन गुंतवणूक करावी.

 

 1. HUDCO

बजेट 2018 मध्ये गृहनिर्माण बाबतील कसलीच घोषणा नसल्याने हाऊसिंग व हाऊसिंग फायनॅन्स च्या कंपन्यांचे shares कोसळले. HUDCO हासुद्धा त्यातीलच एक. हाऊसिंग क्षेत्रात कार्यरत असणारं सरकारी महामंडळ. याच वर्षी IPO आलेला आणि मर्यादित वाढ झालेला. पण कमी किम्मत हे या शेअर ल आकर्षक बनवत आहे. सध्या हा शेअर 79 वर कार्यरत आहे. 75 ची पातळी तोडेल असं वाटत नाही. 84 च्या आसपास resistance आहे, पण वाढ सुरू झाली तर ती ह्या शेअर ला उंचावर नेऊ शकते. जरूर घ्यावा असा शेअर!

 

 1. Dish TV

हा शेअर सुचवावा की नाही याबाबतीत संभ्रम आहे. काही दिग्गजांनी हा शेअर सुचवला आहे, तर काहींनी लांब राहण्याचा सल्ला दिला आहे. गेले काही महीने हा शेअर 72 ते 82 ह्या रेंजमध्ये खेळत आहे. 86 ची पातळी तोडली तर हा 93 वर पोहचू शकतो आणि त्यापुढे 102 वगैरे. पण fundamental काही अडचणी आहेत असं वाटत आहे. माझ्याकडे याचे shares आहेत. पण रिस्क लक्षात घेऊन यात गुंतवणूक करावी असं सांगावसं वाटतं.

 

 1. Idea

वर्ष झाला, वोडाफोन आणि आयडिया कंपनी मर्ज होण्याची प्रक्रिया चालू आहे असं ऐकून. शेअर 75 च्या पातळीपासून थेट 110 च्या आसपास जाऊन पोचला अन नंतर थोडासा पुढे जाऊन परत खाली आला. हे सेक्टर खूपच sensitive आहे. 93 ची पातळी तोडल्याने शेअर पुन्हा 82 आणि मग 75 कडे जाईल अशी शक्यता आहे. पण याच्या levels लक्षात घेतल्या तर हा 82 वरून पुन्हा 93 आणि मग 110 कडे झेपावू शकतो. आणि जर merger झालं तर हा शेअर खूप वेगाने वाढेल. त्यामुळे risk घेऊन हा शेअर खरेदी करता येऊ शकतो.

 

 1. KPIT

Midcap IT शेअर. IT shares ला मागणी वाढली आहे आणि त्यातच KPIT साठी काही सकारात्मक बातम्या आहेत. त्यात त्यांच्या softwares ला मागणी आणि Birla Soft सोबत merger अशा बातम्या समोर येत आहेत. बरीच महीने 110 ते 125 मध्ये अडकून झाल्यानंतर शेअर 155 ची पातळी तोडून वर आला. आता तो 200 च्या आसपास कार्यरत आहे. येणारं वर्ष IT साठी चांगलं असेल असं म्हणतात. त्या दृष्टीने यात खरीददारी करता येऊ शकते.

tbc…. 

हे झाले पहिले 18 shares. असे अनेक midcap आणि smallcap shares बघायचे आहेत जे गुंतवणुकीस लायक आहेत. मला जे सुचतात अन बरे वाटतात ते shares सुचवत राहीन…

 

[[[ Disclaimer – खुलासा – I’m not financial advisor nor fund manager.  मी गुंतवणूक सल्लागार किंवा तज्ञ नाही. The stocks advised here, are based on my own market research and analysis. संबंधित लेख अन सुचवलेले shares हे माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अभ्यासातून सांगितले आहेत. यातील काही shares मध्ये माझी गुंतवणूक असू शकते.]]]

संपर्क = latenightedition@gmail.com

गुंतवणुकीसाठी योग्य संधी

गुंतवणुकीसाठी योग्य संधी

गुंतवणुकीसाठी योग्य संधी

शेअर बाजार मराठीत   ||  Share Market Beginners   ||  Stock Market   ||  गुंतवणूक टिपा  || Share बाजारातील पडझड   ||  Long Term Investment Shares

 

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2018 साठीचा अर्थसंकल्प मांडला. हा ह्या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आहे असं म्हंटलं जात आहे. निवडणुका कधीही होऊ शकतात अशी शक्यताही वर्तवली जात आहे. असेल ते असेल… पण अर्थसंकल्प झाल्यानंतरच्या दुसर्‍याच दिवशी शेअर बाजाराने जोरदार पडझड अनुभवली…

शेअर बाजारात ही पडझड नेमकी कशामुळे झाली याबद्दल वेगवेगळ्या पातळीवर चर्चा सुरू आहे. सरकारने Long Term Capital Gain लावल्यामुळे गुंतवनूकदारांमध्ये उत्साह कमी होऊन भीती वाढली आहे असं म्हंटलं जातं; अर्थसंकल्पात अपेक्षित असलेल्या कुठल्याच क्षेत्रासाठी भरीव तरतूद नाही असही म्हंटलं जात आहे; तर आरोग्य बिमा आणि शेतकर्‍यांसाठी हमीभाव यामुळे सरकार election mode मध्ये आहे असं म्हंटलं जात आहे; तिकडे राजस्थान व पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झाले, चंद्राबाबू अन शिवसेना NDA मधून बाहेर पडण्याच्या हालचाली यामुळे राजकीय अस्थैर्य हे कारणही पुढे केलं जात आहे; तर काहीजण leverage positions, profit booking, FII-डीएलएल वगैरे गोष्टी पुढे करत आहे.

दुसरीकडे जागतिक बाजारही all time high पासून खाली कोसळत असतांनाचं चित्र आहे. येणार्‍या काळात अमेरिकेतही निवडणुका आहेत त्याचेही परिणाम असू शकतात. पण ते वगळता फार कुठली नकारात्मक न्यूज नाहीये.

कारण काहीही असलं तरी शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे हे सत्य आहे आणि ती पुढे तशीच चालू राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही. बाजार उद्या पडणार की परत वाढणार हे कोणीही सांगू शकत नाही, पण सामान्य गुंतवणूकदार काही पैसे घरी किंवा बँकेत ठेऊ इच्छित नाही हेही तितकच खरं आहे. कारण नोटबंदी नंतर घरात पैसे ठेवण्याचं धाडस सामान्य माणूस करणार नाही. दुसरीकडे, बँकांनी ठेवीचे व्याजदर कमी केल्याने तेथेही गुंतवणुकीला वाव नाही. रीयल इस्टेट तर सध्या पुर्णपणे बेभरवशाचा झालेला आहे. मग उरतो पर्याय तो शेती, सोनं आणि शेअर बाजार (MF, SIP वगैरे मार्गानेही) यांचा!

प्रत्येक मध्यमवर्गीय माणूस शेतीमध्ये गुंतवणूक करू शकत नाही. एकतर शेतीतून येणारा परतावा हा निश्चित नसतो त्यामुळे तो गुंतवणुकीचा मार्ग समजला जाऊ शकत नाही. त्यामुळे शेअर बाजार शिवाय सामान्य व सुशिक्षित माणसाला गुंतवणुकीचा दूसरा मार्ग उपलब्ध नाही. आज नाही उद्या, हा पैसा शेअर बाजारातच येणार आहे हे सत्य आहे. कदाचित सरकारनेच अशी व्यवस्था केली असू शकते. जे असेल ते असेल… त्यामुळे शेअर बाजारात जी मंदी येईल ती फार काळ टिकणार नाही असं वाटत आहे. काही काळाचा ठेहराव घेऊन बाजार परत नवीन शिखराकडे जाईल असं वाटत आहे.

आज पडझड होत असलेला बाजार अनादी अनंत काळासाठी असाच राहील किंवा अर्थव्यवस्था ठप्प होईल असही होत नाही. निवडणुका येतात, नेतृत्व बदल होतात ह्या सामान्य लोकशाही प्रक्रियेचा भाग आहे. त्याचा देशातील आर्थिक, सामाजिक व औद्योगिक परिस्थितीवर परिणाम होत असला तरी जागतिकीकरणच्या रेट्यात फार मोठ्या पॉलिसी बदलून शेअर बाजार संपुष्टात येईल असं काही शक्य नाही. शेवटी, आपल्याला किती काळासाठी गुंतवणूक करायची आहे, काय परतावा अपेक्षित आहे, कितपत रिस्क घेण्याची तयारी आहे, का नुसताच सट्टा खेळायचा आहे हे गुंतवणूकदार स्वतः ठरवत असतो.

इतके दिवस ज्या गुंतवणूकदारांना, महाग शेअर price मुळे बाजारात येता आलेलं नाही ते आता टप्प्याटप्याने गुंतवणुकीची संधी शोधू शकतात. आजच्या पडझडीच्या काळात काही प्रमाणात गुंतवणूक करता येईल; नंतर निवडणूक काळात बाजार मंदीत असेल तर तेंव्हा काही गुंतवणूक करता येईल; तत्सम परिस्थितीत आपली गुंतवणूक करून दोन ते तीन वर्षाच्या कालावधीसाठी ही गुंतवणूक केल्यास बर्‍यापैकी परतावा मिळू शकतो. फक्त ही गुंतवणूक long term आणि योग्य शेअर मध्ये असावी ही काळजी सामान्य गुंतवणूकदाराला घ्यावीच लागणार आहे.

NIFTY, SENSEX व MIDCAP मध्ये अचानक आलेली विक्री ही अनेक महिन्यांच्या नंतर असल्याने चांगले चांगले shares सुद्धा कमी भावात मिळत आहेत. ही गुंतवणुकीची योग्य संधी वाटत आहे. लग्नात जेवणाची एक पंगत उठते आणि नवी पंगत बसते तोच प्रकार. जे पोटभरून जेवण करून गेले आहेत ते आता हॉलच्या बाहेर जातील अन जे वाट बघत होते ते हळूहळू आतमध्ये येऊन बसतील.

NIFTY मधील अनेक चांगले shares सध्या BUY करण्याच्या परिस्थितीत आहेत असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. शिवाय काही MIDCAP आणि small cap सुद्धा घेण्याची तयारी केली पाहिजे.

Image result for share market

पाहुयात असे काही stocks जे ह्या पडझडीत योग्य किमतीला भेटत आहेत आणि जे मध्यम व दीर्घ पल्ल्याच्या गुंतवणुकीसाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतात…

 1. Tata Motors

Nifty मधील stock. त्यात Tata समूहातील. याचा दर्जाबद्दल शंका असण्याचं कारण नाही. पण अलीकडच्या काळात किंवा गेल्या वर्षभरात ह्या stock ने चांगला परतावा दिलेला नाही. पण auto क्षेत्राशी संबंधित कंपन्या वाढत असताना हा फार काळ मागे राहणार नाही. सध्या कंपनीच्या ज्या अडचणी आहेत त्या कालांतराने कमी होतील अन हा शेअर चांगला कामगिरी करेल अशी आशा आपण नक्कीच करू शकतो.

सध्या हा शेअर 385 वर कार्यरत आहे.

 1. Sunpharma

बाजारातील पडझडीचा भार या कंपनीलाही सोसावा लागला. वर्षभर वाईट काळातून, अडचनीतून पार पडलेल्या या दिग्गज शेअर ला अलीकडेच चांगल्या बातम्या मिळत होत्या अन उद्योगातील अडचणी कमी होताहेत असं वाटत होतं. 52 week च्या तळापासून तेजीकडे जात असलेला हा शेअर परत मागे ओढल्या गेला. पण हासुद्धा चांगली कामगिरी करेल आणि बाजार पुन्हा चांगला होत असताना हा शेअर नक्कीच चांगला परतावा देऊ शकतो.

सध्या हा 550 च्या आसपास कार्यरत आहे. 500 ते 520 च्या रेंजमध्ये buy करावा असा.

 1. Maruti Suzuki

सध्या हा शेअर आपल्या All Time High पासून खालच्या दिशेने प्रवास करत आहे. ह्या शेअर ने आजपर्यंत अनेक गुंतवणूकदारांना चांगले returns दिले आहेत. बाजारात पडझड होत असल्याने हासुद्धा कोसळू शकतो. खालच्या पातळीवर यात टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करता येऊ शकते.

 1. ITC

प्रत्येक बजेट ह्या शेअर साठी नकारात्मक बातमी घेऊ येत असतं. प्रत्येक बजेटमध्ये तंबाखू, गुटखा, सिगारेट इत्यादी वस्तूंवर टॅक्स वाढवला की हा शेअर कोसळू लागतो. पण बजेट 2018 त्यासाठी अपवाद आहे. या बजेटमध्ये त्या वस्तूंवर कसलेच वाढीव टॅक्स लादले नाहीत. दुसर्‍या बाजूला या कंपनीचे इतर FMCG प्रोडक्टस सुद्धा चांगला व्यवसाय करत आहेत. कृषी क्षेत्रातील भरीव तरतुदीमुळे या कंपनीला अजूनच फायदा होईल असं दिसत आहे. इतक्या पडझडीतही हा शेअर कोसळला नाही यातच सर्व आलं. Long Term गुंतवणुकीसाठी हा शेअर घ्यावा असाच आहे.

 1. HDFC

दर्जेदार शेअर. सध्या overbought आहे, पण पडझडीत खाली आल्याच्या नंतर गुंतवणुकीस उत्तम. 1750 च्या आसपास गुंतवणूक करता येईल असा.

 1. IOC – Indian Oil Corporation

एका बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे (क्रूड ऑइल) दर वाढत आहेत आणि पर्यायाने भारतात पेट्रोल-डिसेल चे दर वाढत आहेत. अशा परिस्थितीत Oil Refinery कंपन्या तेजीत असतात. शिवाय IOC ने नुकताच 1:1 बोनस दिलेला आहे. नजीकच्या काळात चांगला परतावा देईल असा शेअर.

 1. Yes Bank OR ICICI Bank

Public Sector banks कडून चांगल्या परताव्याची कसलीच हमी नसल्याने Private Sector बंकांकडून गुंतवणूकदार अपेक्षा ठेवत आहेत. सध्या Private Sector Banks चांगला परतावा देतील असं म्हंटलं जात आहे. Private Sector मध्ये अनेक बँका आहेत. Axis, HDFC सारख्या मोठ्या बँका असेल किंवा KTK, RBL सारख्या नव्या midcap बँका. पण अलीकडच्या काळातील results आणि भविष्यातील तरतूद बघता Yes bank आणि ICICI बँक गुंतवणुकीस आकर्षक वाटत आहेत.

 1. TCS, HCL Tech आणि Infosys

शेअर बाजारात 2018 हे वर्ष IT कंपनीचे असेल अशी शक्यता आहे. गेल्या वर्षी ह्या सेक्टर ने फार चमक दाखवली नाही. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध अडचणी असल्याने हे सेक्टर धोक्यात आलं आहे असं म्हंटलं जायचं. त्यात Infosys सारखी कंपनी अंतर्गत management वादातून जात असल्याने गुंतवणूकदार या क्षेत्रापासुन दूर होते. पण आता दिवस बदलताना दिसत आहेत. बाजार वेगाने कोसळत असताना IT shares तुटत नव्हते. TCS सारखा शेअर 52 week high जवळ कार्यरत आहे. सर्व बाबी तपासून, या तीन Large Cap IT कंपनी पैकी कोणताही शेअर गुंतवणुकीस निवडता येऊ शकतो.

 1. LT – Larsen & Toubro

Infrastructure क्षेत्रातील दिग्गज कंपनी. बजेटमध्ये इन्फ्रा व defence क्षेत्राला काहीतरी भरीव मिळेल अशा अपेक्षेने हा शेअर तेजीत होता. पण बजेटमध्ये काहीच सकारात्मक न्यूज नव्हती. आता हा शेअर थोडा correction mode मध्ये आहे. अजूनही तुटू शकतो. पण दीर्घ काळाच्या गुंतवणुकीसाठी हा शेअर चांगला म्हणता येईल.

हे आहेत NIFTY 50 मधील shares जे सध्या गुंतवणुकीच्या दृष्टीने योग्य वाटत आहेत. अर्थात, सुचवलेल्या सर्वच shares मध्ये उत्तम परताव्याची 100% खात्री देता येत नसली तरी सध्याचा बाजार मूड बघता हे मला योग्य वाटत आहेत. वेळोवेळी पॉलिसीमध्ये होणारे बदल, sectorial risks किंवा कंपनीचे मूलभूत अडचणी यामुळे काही shares अपेक्षित वाढ नोंदवणार नाहीत ही शक्यता सुद्धा अधोरेखित करावी लागेल. पण NIFTY मधील दर्जेदार shares असल्याने यात पुर्णपणे risk नाही. फार तर कमी परतावा मिळेल इतकच.

येणार्‍या काळात Midcap व smallcap मधील काही shares बघता येतील.

[[[ Disclaimer – खुलासा – I’m not financial advisor nor fund manager.  मी गुंतवणूक सल्लागार नाही. The stocks advised here, are based on my own market research and analysis. संबंधित लेख माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अभ्यासातून लिहिलेला आहे. ]]]

शेअर मार्केट मराठीत…

IPO म्हणजे काय ?

IPO म्हणजे काय ?

IPO – Initial Public Offering   ||  share बाजारातील नफ्याचं समीकरण  || IPO ची मराठीतून माहिती || IPO that made Investors Rich  ||  IPO History 2017  ||  IPO Information || SHARE MARKET || लखपती होण्यासाठी लॉटरी

अनेकांना लॉटरी खरेदी करण्याची सवय असते. त्यातून एकना एक दिवस आपलं भाग्य उजाळेल, लक्ष्मी दारात उभी राहील अशी त्यांची स्वप्नं असतात. आयुष्यभर ते लॉटरी घेतात पण त्यातील सर्वांना काही लॉटरी लागत नाही.

पण शेअर बाजारात अगदी अशीच लॉटरी पद्धत आहे जी तुम्हाला लखपती तरी नक्कीच बनवू शकते. शिवाय यात फार जास्त जोखीम नसते. योग्य नियोजन अन योग्य सल्ला असेल तर यात चांगले पैसे मिळतात. या लॉटरी ला म्हणतात IPO अर्थात Initial Public Offering

IPO म्हणजे काय ???

शेअर बाजारातील मूलभूत माहिती असणार्‍या लोकांना, गुंतवणूकदारांना याबद्दल बर्‍यापैकी माहिती असते. पण नवख्यांना हे काहीतरी अवघड माध्यम अन साधन वाटू शकतं. पण ही अतिशय सोपी, सुरक्षित व legal प्रक्रिया आहे.

IPO (INITIAL PUBLIC OFFER)

जेंव्हा एखादी अस्तीत्वात असलेली कंपनी share बाजारात नव्याने उतरत असते, ज्या प्रक्रियेतून त्या कंपनीला भांडवल निर्मिती करता येते, तेंव्हा SEBI च्या परवानगीने Stock Exchange मध्ये list होत असते.

IPO मुळे सामान्य गुंतवणूकदार थेट कंपनीकडून Shares विकत घेतल्याने कंपनीला नवीन भांडवल मिळतं.

सामान्य गुंतवणूकदारांना त्यात सहभाग घेता यावा अन त्या कंपनीचे shares घेऊन कंपनीत भागधारक होता यावे यासाठी ती प्रक्रिया असते. या प्रक्रियेला IPO – Initial Public Offering प्रक्रिया म्हणतात. किंवा यालाच Primary Market असही म्हणतात कारण सामान्य गुंतवणूकदार थेट कंपनीकडून shares विकत घेत असतो. यात कंपनीला स्वतःची सर्व माहिती जाहीर करावी लागते.

या प्रक्रियेत Share चा दर ठरवलेला असतो, ज्याला आपण ISSUE PRICE म्हणतो. म्हणजे ज्या दराला कंपनी आपले shares गुंतवणूकदाराला देऊ करत आहे तो दर. उदाहरणार्थ, BSE IPO मध्ये Issue Price 806 आहे म्हणजे गुंतवणूकदाराला BSE चा एक share 806 रुपयांस घ्यावा लागेल.

नंतर येतो LOT SIZE. Lot Size (अर्थात एका गुंतवणूकदाराला किमान किती shares घ्यावे लागतात – 20, 30, 50 असे lot size असतात) असते. उदाहरणार्थ, BSE चा lot size आहे 18. म्हणजे एका गुंतवणूकदाराला BSE चे किमान 18 shares घ्यावे लागतील आणि 18 च्या multiple मध्येच घ्यावे लागतील.

एका IPO ची किम्मत ही साधारणपणे 15000 च्या आसपास असते. जशी BSE ची 806*18 = 14508 आहे. सामान्य गुंतवणूकदाराला कितीही Lot साठी apply करता येतं, पण शक्यतो एकच Lot Allocate केला जातो.

IPO ही प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण होत असते. म्हणजे IPO ला apply करण्यासाठी तीन दिवस असतात. त्या तीन दिवसांत सामान्य गुंतवणूकदार IPO साठी apply करू शकतो.

IPO तून shares घ्यायचे असतील तर ते तुम्हाला ब्रोकरच्या माध्यमातून Apply करता येतं किंवा तुमच्या Demat ला लिंक असलेल्या savings बँक खात्याच्या OnlineBanking वापरुन तुम्हाला Apply करता येतं. पण त्या खात्याला ASBA ही सुविधा उपलब्ध असायला हवी. IPO ला apply करण्यासाठी कसलेच वेगळे पैसे भरण्याची गरज नसते.

जर तुम्ही IPO मध्ये एका LOT साठी apply करत असाल तर तितके पैसे तुम्हाला तुमच्या SAVINGS ACCOUNT (जे Demat शी link आहे तेच) मध्ये ठेवावे लागतात. म्हणजे मला जर BSE च्या IPO साठी apply करायचं असेल तर मला माझ्या Savings account मध्ये 14508 रुपये ठेवावेच लागतील त्याशिवाय मी apply करू शकत नाही.

जोपर्यंत ही IPO प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत हे 14508 रुपये HOLD वर असतील. म्हणजे ते पैसे तुम्ही काढू किंवा वापरू शकत नाहीत. ते freeze केले जातात. जर तुम्हाला IPO मधून shares मिळाले तर ते पैसे debit होतात (कंपनीला जातात) आणि जर तुम्हाला IPO मधून shares मिळाले नाहीत तर ते तुम्हाला लागलीच परत मिळतात.

त्यानंतर चार-पाच दिवसांनी Allotment Date असते जेंव्हा apply केलेल्यापैकी कोणत्या गुंतवणूकदाराला IPO मधून shares मिळाले आहेत ते जाहीर होतं.

सर्वात महत्वाचं म्हणजे, तुम्ही IPO ला apply केलं आहे म्हणजे तुम्हाला ते shares मिळतीलच असे नसतं. ही प्रक्रिया लॉटरी पद्धतीने पार पाडली जाते. LOTTERY आहे…

समजा, PQR कंपनी आहे. ती कंपनी भांडवल उभं करण्यासाठी बाजारात shares घेऊन येते. समजा कंपनी 500 कोटींचे भांडवल उभं करण्यासाठी 1 लाख shares बाजारात आणत आहे. कंपनी दर्जेदार असेल तर अनेक गुंतवणूकदार कंपनीत गुंतवणूक करू बघतात. समजा 2 लाख गुंतवणूकदारांनी त्या IPO प्रक्रियेत सहभाग घेतला असेल. Shares 1 लाख आणि त्यासाठी 2 लाख लोक apply करत आहेत म्हणजे सर्वांना ते shares मिळणार नाहीत. मग लॉटरी पद्धतीने गुंतवणूकदारांना shares allocate केले जातात. इथे मागणी जास्त आहे आणि shares कमी, म्हणजे IPO तून दिल्या जाणारे shares ची किम्मत वाढू शकते. ह्या सर्व प्रक्रियेसाठी तारखा निश्चित केलेल्या असतात.

IPO मिळवण्यासाठी कसले गैरव्यवहार होत नसतात. ही अतिशय शिस्तबद्ध अशी प्रक्रिया आहे.

त्यानंतर येते LISTING DATE. या दिवशी त्या कंपनीचा share सामान्य गुंतव्नुक्दारांसाठी बाजारात खुला होतो. म्हणजे आता कोणीही Exchange through तो share घेऊ शकतो.

Share कोणत्या price ला list होईल हे सांगता येत नाही. तो ISSUE PRICE पेक्षा जास्तच price ने list होतोच असं काही नाही. एकंदरीत खरेदी आणि विक्री करणारे यावर ते मूल्य निश्चित होतं. त्यामुळे ज्या rate ला IPO मिळाला आहे त्यापेक्षा जास्त rate लाच तो LIST होईल असं काही नसतं. जर IPO मधून आलेल्या एखाद्या कंपनीच्या share खरेदी करण्यास कोणी गुंतवणूकदार तयार नसतील तर त्याचा तो share कमीलाच list होणार.

कोणते IPO चांगले, कोणत्या IPO साठी apply करावं हा निर्णय विचार करून घ्यावा लागतो. यासंबंधित माहिती टीव्ही चॅनल वर किंवा विविध वेबसाइटवर मिळेल.  सगळेच IPO चांगले असतात असं काही नाही. योग्य सल्ला घेऊन तुम्ही IPO साठी apply करू शकतात. चांगल्या कंपनीचे IPO सुद्धा नुकसानीत जाऊ शकतात. पण असं क्वचित घडतं. कोणत्या IPO साठी apply करायचं, कधी व कसं apply करायचं हे तंत्र आहे जे अभ्यासानंतर समजतं. पण एक निश्चितपणे सांगता येईल की IPO हे कमी कालावधीत चांगला परतावा देऊन जातात. एखाद्या लॉटरी प्रमाणे!!!

Image result for ipo

सण 2017 मधील असे काही IPO ज्यांनी गुंतवणूकदारांना जोरदार रिटर्न्स दिले.

 1. BSE

Bambay Stock Of Exchange. देशातील मोठ्या Exchange board पैकी एक. गुंतवणूकदारांना आवडेल असाच हा share आहे.

806 रुपयांना दिलेला हा share listing ला 1085 पर्यन्त गेला आणि नंतर 1250 पर्यन्त. म्हणजे 5000 ते 7000 इतका नफा.

2. Avenue Supermart

Dmart चे मॉल चालवणारी ही कंपनी. हे shares IPO मध्ये मिळावेत यासाठी गुंतवणूकदारांच्या अक्षरशः उड्या पडल्या होत्या. परिणामही तसाच आला. 300 रुपयांना Issue केलेला हा share listing ला 640 पर्यन्त गेला आणि आज तो 1200 रुपयांवर कार्यरत आहे. म्हणजे 15000 ते 40000 इथपर्यंतचा नफा….

3. HUDCO

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कंपनी. गृहनिर्माण क्षेत्रातील महत्वाची संस्था. कोणताही सरकार सत्तेवर आलं तरी या क्षेत्रावर लक्ष केन्द्रित करतच असतं. त्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने उत्तम कंपनी.

58 रुपये ही Issue Price असताना listing price होती 75. नंतर share price 100 पर्यन्त आणि आत्ता 82 वर आहे. म्हणजे 3 ते 8 हजार रूपयांचा नफा.

4. Shankara Builder

दक्षिणेतील या Construction कंपनीने चांगलाच नफा मिळवून दिला. 460 ही Issue Price आणि Listing Price 600 वगैरे. आणि आजची market price ही 1500 आहे. म्हणजे minimum 5000 आणि maximum 30000 चा नफा.

5. CDSL

देशात दोनच depositories आहेत त्यातील ही एक. दर्जेदार म्हणतात तशी कंपनी. 149 रुपये अशा सुयोग्य premium price वर हा IPO दिलेला जो पहिल्याच दिवशी 250 पर्यन्त पोचला आणि काहीच काळात 350 च्याही अधिक जाऊन पोचला. म्हणजे पहिल्या दिवशीचं profit 10000 आणि नंतरच ते 20000 च्या आसपास.

6. AU Small Finance

Finance क्षेत्रातील एक कंपनी. NBFC क्षेत्राची सध्याच्या परिस्थितीनुसार ही कंपनी चांगली म्हंटली पाहिजे.

358 रुपये Issue Price असलेला IPO listing ला 540 रुपये पर्यन्त गेला. आज त्या share ची price आहे 630.

First day gain 7000 रुपये वगैरे आणि होल्ड केला असता तर more than 10000.

7. Salasar Technology

साधारणपणे 108 रुपये Issue Price असलेला हा IPO 270 रुपयांपर्यंत सेटल झाला. म्हणजे 20000 रुपये नफा!!!

9. Cochin Shipyard

नावावरून अंदाज येतो की जहाजबांधणी व बंदर क्षेत्राशी संबंधित कंपनी असावी. सध्याच्या सरकारचा transportation वर अधिक भर आहे हेही काही लपून राहिलेलं नाही.

432 च्या Issue Price ने दिलेला share listing day ला 520 पर्यन्त गेला. म्हणजे एका लॉटमागे 2000 रूपयांचा नफा.

शेअर बाजार e-book – मराठीत

10. Apex Frozen

अन्नप्रक्रिया क्षेत्राशी संबंधित असलेली ही कंपनी. 175 च्या दराने दिलेला IPO listing च्या दिवशी 200 रुपयांवर जरी अडकला असला तरी आज त्या share ची किम्मत आहे 650 च्या अधिक. म्हणजे पहिल्या दिवशी 2000 चा नफा आणि तोच जर होल्ड केला असेल तर 30000 अधिक नफा!!! लॉटरी याहून वेगळी काय असू शकते???

10. Dixon Technology

कधी कधी अनपेक्षितरीत्या लॉटरी लागते तो किस्सा इथे आहे. कंपनी नेमकी कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे किंवा अजून काय याबाबत फार चर्चा नव्हती. पण listing झाल्यावर कंपनीने अनेक गुंतवणूकदारांचं वेधून घेतलं. जोरदार नफा मिळवून देणारा IPO म्हणता येईल. Electronics व तंत्रज्ञान क्षेत्रात diversified असलेली कंपनी.

1766 ची Issue Price असलेला share पहिल्याच दिवशी, listing ला थेट 2800 चा टप्पा ओलांडतो. म्हणजे जवळपास एका लॉटमागे 8000 नफा!

11. Prataap Snacks

सप्टेंबर 2017 मध्ये आलेल्या ह्या IPO ने अपेक्षा नसतानाही जोरदार नफा मिळवून दिला. त्या अर्थाने अपरिचित अन फार ऐकिवात नसलेली ही कंपनी. Packed food चा व्यवसाय असलेली ही कंपनी.

938 च्या issue price वर सामान्य गुंतवणूकदारांना shares देणारी कंपनी list झाली ते 1200 च्या आसपास. पहिल्याच दिवशी IPO ने चार ते पाच हजार रूपयांचा नफा मिळवून दिला.

12. Godrej Agrovet

Godrej सारखा दर्जेदार आणि माहितीतील उद्योग समूह. कंपनीचा उद्योग हा poultry processing, animal feed, oil palm plantations and agri inputs अशा क्षेत्राशी निगडीत. एका Diversified portfolio मध्ये रिकामी जागा भरून काढता येईल असा share. सामान्य गुंतवणूकदाराला बर्‍यापैकी आकर्षित करणारा IPO.

460 ची Issue Price असताना listing च्या दिवशी 600 चा आकडा या share ने ओलांडला. अजूनही हा share बर्‍यापैकी तेजीत आहे. साधारणपणे 5000 रूपयांचा नफा या IPO share ने मिळवून दिला.

13. Reliance Nippon

अनिल अंबानी ग्रुपमधील कंपनी. अनिल अंबानी यांचा उद्योगसमूहातील कंपन्या विविध अडचणीमधून जात असताना हा IPO बाजारात आला. हा IPO सामान्य गुंतवणूकदाराला फार आकर्षित करू शकला नसला तरी बर्‍यापैकी परतावा या कंपनीने दिला.

252 ची Issue price असताना listing day ला share 290 पर्यन्त झेपावला. साधारणपणे 2000 हजारांचा नफा पहिल्या दिवशी या IPO ने मिळवून दिला.

14. HDFC Life

Non-banking Finance संस्थेला बरे दिवस येत असताना ह्या कंपनीने IPO बाजारात आणायचं ठरवलं. Insurance आणि काही अंशी NBFC क्षेत्रात कार्यरत असलेली ही कंपनी. ICICI General Insurance, SBI Life, GIC इत्यादी कंपन्यांचे IPO बाजारात फार चमक दाखवू शकले नसताना हा IPO बाजारात आला. एका बाजूला Share बाजार नवनवे शिखर गाठत असल्याचा फायदा ह्या share ला तर झालाच पण योग्य Issue Price आणि Brand यामुळे IPO ला चांगला प्रतिसाद मिळाला.

नोवेंबर 2017 मध्ये 290 च्या rate ने हा शेअर सामान्य गुंतवणूकदाराला देऊ केला होता. बाजारात याची listing 315 च्या आसपास झाली असताना अनेक गुंतवणूकदारांनी याला खुल्या बाजारातून विकत घेतल्याने पहिल्याच दिवशी या शेअर ची किम्मत 350 जवळ गेली. आज हा शेअर 400 च्या वर कार्यरत आहे.

साधारणपणे listing च्या दिवशीचा हिशोब गृहीत धरला तरी एका lot मागे सामान्य गुंतवणूकदारणे 3000 रुपये नफा मिळवला.

15. Astron Papers

2017 वर्षाच्या शेवटाला हा IPO आलेला. पेपर क्षेत्राशी संबंधित कंपनी. चीनमधील पेपर सेक्टरवर निर्बंध आल्याने भारतातील पेपर सेक्टर ला चांगले दिवस येतील अशी शक्यता निर्माण झाली होती अशा काळात हा IPO बाजारात आला. शिवाय Share बाजारही तेजीत होता.

फक्त 50 रुपयाने सामान्य गुंतवणूकदाराला हा share देऊ केला होता. सर्व सकारात्मक वातावरणात हा share बाजारात 120 रुपयाने list झाला. साधारणपणे अडीच पट!!!

या share च्या एका lot मागे जवळजवळ वीस हजार रूपयांचा नफा. तोही फक्त दहा दिवसांत!!!

16. Apollo Microsystems

Quality Electronics क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या ह्या कंपनीने 2017 च्या शेवटाला IPO आणलेला. सामान्य गुंतवणूकदारांसाठी 275 रुपयांच्या rate ने दिलेला हा IPO बाजारात List झाला 478 rate ला. या IPO च्या एका Lot मागे सामान्य गुंतवणूकदाराला जवळपास 8000-10000 रूपयांचा नफा दिला.

याशिवाय अन्य काही IPO आहेत ज्यांनी छोट्या प्रमाणात नफा मिळवून दिला आहे. दुसर्‍या बाजूला असेही काही IPO आहेत जे गुंतवणूकदारांच्या अपेक्षेवर खरे उतरू शकले नाहीत. SBI Life किंवा ICICI General Insurance किंवा GIC, New India Insurance अशा काही IPO नी निराशा केली. ह्या सर्व दर्जेदार कंपन्या आहेत. सुरूवातीला यांनी नुकसानीची बाजू दाखवली असली तरी नंतरच्या काळात यांनी चांगला नफा दिला. पण याव्यतिरिक्त बरेच IPO आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग केला. पण कोणत्या IPO साठी appy करायचं हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. त्यामुळे जाणकाराचा सल्ला घेऊन आपण IPO तून चांगला नफा कमवू शकतो.

 

How to apply for IPO (Initial Public Offering) Online

error: Content is protected !!