Tag: माहिती

#महिलाउद्योजक

#महिलाउद्योजक

#उद्योजकमहाराष्ट्र  ||  महाराष्ट्र उद्योजक मंडळ   ||  महाराष्ट्रातील लघुउद्योग  || उद्योजक महिला   ||

नमस्कार महाराष्ट्र!

गुढीपाडव्याला #उद्योजकमहाराष्ट्र ही संकल्पना सुरू केली. एखादी संकल्पना फक्त सुरू करून उपयोग नसतो तर ती राबविण्यासाठी तितकीच मेहनत घ्यावी लागते. याबाबत आमच्याकडून दिरंगाई होत असेल तर क्षमा! पण आमच्या क्षमतेनुसार आम्ही पुर्णपणे प्रयत्न करत राहू.

 

आज आम्ही #उद्योजकमहाराष्ट्र अंतर्गत दुसरा अत्यंत महत्वाचा उपक्रम सुरू करू इच्छितो!

#महिलाउद्योजक

उद्योजक हे केवळ पुरुषच असतात असं नाही. ते काही केवळ पुरुषांच्या मक्तेदारीचं क्षेत्र नाही. महिलाही या क्षेत्रात अत्यंत मेहनतीने काम करत असतात.

आजही गावागावात अनेक कष्टकरी माता-भगिनी गृहोद्योग, महिला बचत गट सारख्या माध्यमातून एक प्रकारचा व्यवसायच करत असतात. शेतकऱ्याची पत्नी ही त्याची व्यवसाय भागीदारच असते. ही कामे बर्याेचदा घर-कुटुंब जबाबदारी सांभाळून “पार्ट टाईम” केल्याने याला उद्योग म्हणायचं की नाही असा प्रश्न असतो. पण स्वतःच्या मेहनतीने, कौशल्याने काम करून मिळवलेला पैसा हा नक्कीच व्यवसाय म्हंटला गेला पाहिजे.

#महिलाउद्योजक

उन्हाळा आला की वाळवण, कुरड्या, पापड, लोणाचं सारखे खाद्यपदार्थ बनवणे हा ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्वाचा धागा आहे. ही संपूर्ण कामे महिलांच्या माध्यमातून होतात. ह्या कालावधीतील अशा गृहोद्योग व बचत गटातून होणारी आर्थिक उलाढाल मोठी असते. अशा महिला उद्योजकांना जर #उद्योजकमहाराष्ट्र ह्या व्यासपीठाचा थोडासाही लाभ झाला तर त्याचं आम्हाला समाधान असेल.

 

शिवाय, रांगोळी, मेहंदी, पर्स बनवणे इत्यादी सारख्या कलेच्या माध्यमातून अनेक मुली महिला काम करत असतात. आपल्या ओळखीच्या अशा अनेक महिला असतील ज्या असा व्यवसाय करत असतील. त्यांना, त्यांच्या उत्पादनाला आणि त्यांचे अनुभवाला जर आपण येथे स्थान देऊ शकलो तर सर्वांनाच आनंद होईल.

केवळ कुरड्या, पापड्या, मसाले, लोणचे असं कुठेही मर्यादित न राहता कोणतीही महिला आपल्या कला-कौशल्याच्या माध्यमातून आपलं उत्पादन लोकांसमोर आणू इच्छित असेल तर सर्वांचं स्वागत आहे!

अनेक महिला, तरुणी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना जर आपले अनुभव share करायचे असल्यास त्यांचीही या उपक्रमाला खूप मदत होईल.

#उद्योजकमहाराष्ट्र

#महिलाउद्योजक

संपर्क

ईमेल – mhudyojakmandal@gmail.com

ट्विटर – @mh_udyog

ब्लॉग – mhudyojakmandal.blogspot.in 

#उद्योजकमहाराष्ट्र – १

Share Market Posts (All Posts)

Share Market Posts (All Posts)

Share Market Beginners  ||  शेअर बाजार मराठीत  || Share Market In Marathi   || Stock Market  || गुंतवणूक ||

All Posts In One Post 

आजपर्यंत आपण विविध posts द्वारे शेअर बाजारासंबंधित विविध माहिती बघितली. ह्या एका post मध्ये आजपर्यंतच्या सर्व Posts update करुयात जेणेकरून शोधाशोध करणे अवघड जाणार नाही.

 

1. सर्वात आधी बघूयात SHARE MARKET BEGINNERS हे e-book ज्यामध्ये सर्व basic माहिती मिळेल अन नवीन गुंतवणूकदार या क्षेत्राशी संलग्न होऊ शकतील. खालील लिंकवर ती post… 

शेअर बाजार e-book – मराठीत

 

2. IPO म्हणजे काय आणि IPO ऑनलाइन कसा घेऊ शकतो याच्या दोन वेगवेगळ्या posts खालील लिंक वर…

IPO म्हणजे काय ?

How to apply for IPO (Initial Public Offering) Online

 

3. Dividend म्हणजे काय याबद्दल मूलभूत माहिती खालील लिंकवर…

Dividend Information In Marathi

4. सध्या शेअर बाजारात मंदी आहे. पण ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य संधी मानली जाते. त्याबद्दल थोडीशी माहिती अन NIFTY मधील चांगले shares खालील लिंकवर…

गुंतवणुकीसाठी योग्य संधी

 

5. माझ्या क्षमतेनुसार काही shares मी लांब व मध्यमकालीन गुंतवणुकीसाठी निवडले आहेत. त्याबद्दलच्या दोन वेगवेगळ्या posts ची लिंक खाली आहे…

Midcap Money 1

 

Top Stocks To BUY

 

6. लहान किमतीचे शेअर हे गुंतवणूकदारांना आकर्षित करत असतात. त्याबद्दल माहिती आणि काही shares खालील लिंकवर…

Good Shares With Low Price

 

7. गुंतवणूक गुरु वार्रेन बफेट चा एक interview इथे आहे.

Warren Buffett interview

 

8. आता सर्वात महत्वाचं… वाचलंच पाहिजे असं… 

गुंतवणूक-फसवणूक

 

[ खुलासा – We are not SEBI Registered Adviser. आम्ही SEBI द्वारे प्रमाणपत्र प्राप्त असलेले गुंतवणूक सल्लागार नाही. ही सर्व माहिती वैयक्तिक अनुभव व आकलनानुसार लिहिलेली आहे… ]

अभिषेक बुचके – latenightedition.in@gmail.com

-LEARN SHARE MARKET ONLINE-


Go to e-book!

How to Copyright Script In INDIA

How to Copyright Script In INDIA

How to Copyright Script In INDIA  || Content Copyright  || कथा/कविता/स्वलेखन कसे कॉपीराइट करावे?  || copyright process in INDIA  ||   माहिती ||  चित्रपटकथा व साहित्य कॉपीराइट 

 

कोणत्याही लेखकाला स्वतःच्या लिखाणाच्या चोरीची भीती वाटत असते. स्वतः मंनापासून, मेहनत करून लिहीलेल्या कविता, कथा, चित्रपटकथा, संकल्पना ह्या चार लोकांना share करत असताना, सांगत असताना मनात भीती असते की माझी कलाकृती कोणी चोरून स्वतःच्या नावाने खपवेल… ट्विटरवर टाकलेल्या चारोळ्याही कोणी चोरल्या तरी राग येतो. कारण कुठलंही मंनापासून केलेलं लिखाण हे अपत्याप्रमाणे असतं. त्याला जन्म देताना प्रसूतीवेदना झालेल्या असताना. चांगलं-वाईट कसही असलं तरी ते आपलं असतं. ते कोणीही स्वतःच्या नावाने खपवत असेल, त्याचं क्रेडिट घेत असेल तर राग येणं साहजिक आहे. चोरी करणार्‍याला त्या भावनेची कदर नसते. त्याला वाहवा मिळवायची असते किंवा व्यावहारिक दृष्टीकोणातून वापर करायचा असतो. जेंव्हा आपल्याला समजतं की आपल्या ओळी, संकल्पना, लिखाण कोणीतरी चोरून वापरत आहे तेंव्हा आपण हतबल होतो. त्यात ‘ते माझं आहे’ असं म्हणताना पुरावा असावा लागतो तरच तुम्ही खरे ठरता.

लेखकांची, त्यांच्या मेहनतीची काडीचीही कदर न करणारे भरपूर आहेत. अनेक बड्या लेखकांना अशा चोर मंडळींमुळे मनस्ताप सहन करावा लागतो. लेखक म्हणून करियर करू इच्छीनार्‍या नवख्या मित्रांना तर यात कसलच मार्गदर्शन नसतं. त्यांचा वापर केला जातो. चित्रपट क्षेत्रात तर अशा गोष्टी होतच असतात. पण काय करावं, कसं सुरू करावं याची माहिती नसल्याने बर्‍याच गोष्टी अडकून राहतात.

मग आपलं लिखाण कसं copyright करावं याचा शोध सुरू होतो. ह्या क्षेत्रात माहितीतील व्यक्ति असेल तर मार्ग लवकर सापडतो, नाहीतर विनाकारण वेळ वाया जातो. उगाच वेगवेगळे अन किचकट मार्ग धुंडाळण्यात आपण हैराण होतो.

ह्या सगळ्या अंनुभावातून गेल्यानंतर मला यातून एक सोप्पा अन सहज मार्ग सापडला… तेंव्हाची Film Writers Association (FWA) अन आता त्यालाच Screenwriters Association (SWA) म्हणतात.

http://fwa.co.in/

 ही संस्था मुंबई स्थित संस्था आहे. लेखकांच्या हक्कासाठी ही संस्था काम करत असते. अतिशय शिस्तीने अन उत्तमरीत्या संस्थेचं कामकाज हो असतं.

ही एक अतिशय उपयुक्त संस्था आहे. येथे तुम्ही तुमचं लिखाण copyright करून घेऊ शकता. चित्रपटकथा, संकल्पना, कविता, गाणी इत्यादि तुम्ही येथे नोंदवून त्याचे कॉपीराइट स्वतःच्या नावाने घेऊ शकता.

लिखाण Copyright करताना काही नियम व संकेत पाळायचे आहेत ते आपल्याला सदस्य झाल्यावर मिळतील.

संस्थेत सदस्यता मिळवण्यासाठी काही मूलभूत बाबींची पूर्तता करावी लागते. सुरूवातीला एकदाच registration fee भरावी लागते. फार नसते, पाच हजारांच्या कमीच.

Image result for copyright symbol

सदस्य कसे व्हाल?

यासाठी तुम्हाला काही बाबींची पूर्तता करावी लागेल.

सर्वात महत्वाचं, तुम्ही लेखक/कवि आहात याचा पुरावा देता आला पाहिजे. त्यासाठी तुमचं एखादं article/ लेख पेपरमध्ये (किंवा मासिकात) छापून आलेला हवा, ज्याची प्रत तुम्हाला सदस्यपद घेताना द्यावी लागेल.

नसेल तर एखाद्या लघुपटासाठी (short film) साठी तुम्ही लिखाण केलेलं हवं. किंवा एखाद्या दिग्दर्शकाने तुम्हाला लेटर दिलं तरी तुमचं काम होऊन जाईल.

एकंदरीत, तुम्ही लेखक आहात याचा पुरावा त्यांना दिला पाहिजे.

नंतर तुमचे ओळखपत्र. म्हणजे आधार कार्ड, घरचा पत्ता इत्यादी.

एक संस्थेच्या नावाने DD.

 

बास इतकीच कागदपत्रे पुरेशी आहे. ही सगळी कागदपत्रे त्यांच्या पत्त्यावर कूरियर तरी करा किंवा थेट ऑफिसमध्ये जाऊन submit करू शकता.

तुमच्या कागदपत्रांचा पडताळणी झाल्यावर, अंदाजे महिन्याभरात तुम्हाला सदस्यता मिळते. संस्थेचं अधिकृत ओळखपत्र मिळतं ज्यावर तुमचा स्वतंत्र ओळखक्रमांक असतो. ही सदस्यता एक वर्षापूरता मर्यादित असते; नंतर ती वाढवता येते. त्याला खर्च जास्त नसतो.

एकदा तुम्ही सदस्य झालात तर तुमचं लिखाण करणं अतिशय सोप्पं आहे.तुम्हाला FWA (SWA) च्या वेबसाइटवर जायचं आहे. दिलेल्या User Name आणि Password सह Login करा आणि तुमचं लिखाण pdf स्वरुपात upload करा. एका पानाला दोन रुपये वगैरे दराने तुमचं लिखाण copyright झालं.

ही संस्था अधिकृत संस्था आहे. मागे झालेल्या दिग्दर्शक-लेखक आणि कथेचे मालकीहक्क वादात लिखाणाचे copyright खूप महत्वाची कामगिरी बजावणारा ठरला.

 

लिहिताना आपण मंनापासून लिहितो. त्यामागेही मेहनत असते. ते कोणालाही स्वतःच्या वैयक्तिक हेतुसाठी वापरायला मिळू नये. फसगत झाली की खूप वाईट वाटतं. त्यामुळे थोडेसे कष्ट घ्या अन स्वलेखन copyright करून घेत चला…

YOU CAN CONTACT ME HERE – LATENIGHTEDITION.IN@GMAIL.COM REGARDING THIS…

ह्या विषयात काही विचारायचं असेल तर latenightedition.in@gmail.com येथे संपर्क करू शकता…

 

FTII Orientation & Interview 2016

गणपतीचे घर

गणपतीचे घर

मी जर तुम्हाला म्हणालो की मी गणपतीचे घर पाहुन आलोय तर तुमचा विश्वास बसेल का..? तुम्ही म्हणाल देवाच घर कोणी जिवंतपणी कसं बघु शकतं पण हो पण हे शक्य झाल कारण आम्ही आम्ही म्हणजे मी व माझे काही भाऊबंध गेल्या महिन्यात दि. १८-६-२०१७ मध्ये हमरापुर ता. पेण जि. रायगड या गावात गेलेलो खुप दिवसांपासुन त्याच रुटीन लाईफला मी कंटाळलो होतो शुक्रवारी मला माझ्या मामेभावाचा फोन आला म्हणाला आपल्याला रविवारी पेणला जायचे आहे मी त्याला जास्त काही विचारलं नाही कारण तीथे जाण्याचं कारण मला ठाऊक होतं ते तुम्हालाही कळेलच पुढे. मी एका पायावर तयार झालो. कारण शनिवार रविवार माझा सुट्टीचा दिवस होता आणी खुप दिवसांपासून बाहेर फिरायला गेलो नव्हतो तर हा चान्स मला सोडायचा नव्हता. शनिवारी बॅग भरली आणी दुपारच्या सुमारास मी मुंब्रात उतरलो कारण मला तिथुनच रविवारी सकाळी ट्रेनने हमरापुरला चायचे होते. त्याच कारण असं की माझ्या भावाला म्हणजेच (Lucky) आणी (Virus) सुरजला गणपतीची कार्य शाळा सुरु करायची होती तर त्यासाठीच आम्ही गणपती (Booking) करायला तेथे गेलो होतो.
सकाळी ठरल्याप्रमाणे ६:४५ ची दिवा हमरापुर गाडी पकडायची होती पण दिव्याला पोचता पोचता ७:३० वाजले गाडी हुकली आणी त्याला कारणीभूत मीच होतो मी उशिरा उठलो होतो पण त्यानंतरची ९:३० ची गाडी होती त्यादरम्यान आम्ही चहा नाश्ता उरकला आणी ९:३० च्या गाडीत बसलो. गाडीत आमची मस्ती मजाक चालुच होती. ती कोण थांबवणार कारण सगळेच आम्ही लहानपणीचे मित्र होतो तर मग काय विचारुच नका. नुकताच पाऊस सुरु झाल्यामुळे ओसाड जमिन हिरवागार दिसत होती कुठे नवीन लालसर तांबूस पालव्या फुटलेल्या, तर कुठे हिरवी गवतं झुलत होती. ट्रेनच्या खिडकीतून मस्त निसर्ग दिसत होतं. जवळपास १:३०-२ पर्यंत आम्ही हमरापुरला पोहचलो असेन डोक्यावर ऊन लई तापलेलं मध्ये मध्ये काळे ढग नुसती हुल देऊन जात होते.आम्ही स्टेशनवरुन गावात चार एक किलोमीटर चालत गेलो होतो कारण ज्या व्यक्तीकडुन आम्ही दरवर्षी गणपतींच्या मुर्त्या घ्यायचो त्याचं घर स्टेशनपासुन लांब होतं शिवाय खाजगी गाडीने तिथपर्यंत जाणे व्यर्थ होते कारण तीथल्या प्रत्येक घरात गणपतीच्या मुर्त्या बनवण्याचे काम चालु होतं आणी तेच बघत बघत आम्ही गेलो. तिथल्या प्रत्येक घरात एक उंदा कलाकार होता याची प्रचिती त्यांच्या सुबक व रेखीव मुर्त्या पाहिल्यावर होते. अगदी एक फुटापासुन ते ७-८ फुटापर्यंतच्या मुर्त्यापण तितक्याच रेखीव होत्या जितक्या लहान मुर्त्या होत्या. आम्ही जवळपास २-३ किलोमीटर तुडवला असेल तेथे दादर, दिवे, जोहे अशा छोट्या छोट्या गावात सगळ्यांकडे गणपतीच गणपती दिसत होते. कोणी सिंहासनावर तर कोणी मोरावर तर कोणी शंकराच्या खांद्यावर तर कोणी नंदीच्या चेह-यावर बसलेल्या अशा कित्येक प्रकारच्या मुर्त्या होत्या पण सगळ्यात जास्त चर्चा एकली ती बाहुबलीच्या गणपतीची हत्तीच्या तोंडावर उभे राहुन हत्तीने सोंडेत पकडलेल्या धनुष्यातुन तो बाण मारत होता एकदम हुबेहूब जसा त्या बाहुबली फिल्ममध्ये तो प्रभास त्या हत्तीवर ऊभा राहुन बाण मारत आहे तसाच.
खरच त्या कलाकाराला माझा मानाचा मुजरा कारण त्याने मुकुट, धनुष्यबाण,हत्तीची सोंड या सगळ्यांवर कोरीवकाम केले होते ती मुर्ती एवढी जिवंत वाटत होती की काही संदेहच नव्हता. आम्ही शेवटी एकदाचे त्या माणसाच्या घरात पोहोचलो घरुन कळले की तो बाजुच्याच गावात खाजगी कामासाठी गेलाय. तोपर्यंत आम्ही त्याच्या मुर्त्या बघण्याचं ठरवलं त्याच्या घराचं पुर्ण अंगण गणपतींच्या मुर्त्यांदी भरुन गेलेलं अंगणाला ताडपत्रीचे शेड केले होते एवढच नव्हे तर त्याचा माळा देखील मुर्त्यांनी भरलेला होता. आम्ही सा-या मुर्त्या डोळ्याखालुन घातल्या कारण आम्हाला ठराविक आणी आकर्षक मुर्त्या हव्या होत्या.
आमच्या पोटात भुकेने थैमान घातले होते पाण्याच्या बाटल्या पटापट संपत होत्या तो माणुस येईपर्यंत आम्ही जेवणासाठी छोटे हॉटेल बघत होतो शेवटी एका छोट्या धाब्यावर जेवणाची सोय झाली जेवण खुप चविष्ट व रुचकर होतं सगळ्यांनीच भुकेमुळे आडवा हात मारला. जेवण उरकल्यावर त्या माणसाकडे गेलो तेथे आवडले तेवढे जवळपास दिड-दोन फुटांचे ५० गणपती बुक केले.आनी स्टेशनवर यायला निघणार तेवढ्यात पावसाने हजेरी लावली. मग काय..? निघालो भिजत परत चार किलोमीटर चालायच म्हणजे जिवावर आलेलं पण पावसाची साथ होती तर ते अंतर एकदम किरकोळ वाटलं एकदाच स्टेशन गाठलं संध्याकाळची ५:३० ची ट्रेन होती. आम्ही तर ४:३० लाच पोचलो मग स्टेशनवरच भारत× पाक सामना पाहिला स्टेशनवर गर्दी कमी होती पण तरी सगळे त्या मोबाईलजवळ घोळका करुन बसले होते त्यातल्या त्यात त्यांचापण टाइमपास झाला. ५:३० ला ट्रेन आली गर्दी फार होती पण पनवेल नंतर बसायला जागा मिळाली. आणी संध्याकाळी ८:३०-९ पर्यंत घरी परतलो. खरच हमरापुर बद्दल बोलायचं झाल तर तिथले कलाकार जे परंपरागत त्यांची कला जोपासण्याचं काम सातत्याने करत आहे. तिथली लोक तिथलं धाब्यावरचं जेवण सारच फार अप्रतिम होतं. तिथल्या बोलक्या मुर्त्या माणसं खरच मनाला भावली माझी एक दिवसाची एक छोटीशी पिकनिक खुप उत्तम ठरली. किमान मुंबईतला थकवा तरी त्या छोट्या पिकनिकने दुर झाला. सलाम त्या सच्च्या कलाकारांना आणी सलाम त्या गणपतीच्या गावाला.
©निरंजन साळस्कर

FTII Orientation & Interview 2016

FTII Orientation & Interview 2016

#FTII Orientation & Interview For Feature Film Screenplay Writing 2016

#Paper Pattern or Format #What Is Asked?

#एफटीआयआय च्या Orientation & Interview ची प्रक्रिया 

FTII Selection Process

We had a discussion on written test examination of FTII Feature Film Screenplay Writing which was taken in August 2015. We seen the type of the questions and format of the paper. That was difficult and tough task. The next step after the written exam is Orientation and Interview which is conducted in FTII Pune campus.
We will discuss what actually happens in this part or we can say filter.
FTII (Film & Television Institute Of INDIA) gives you quality education and which is one of the top most institute in INDIA regarding the creative field of FILM INDUSTRY.
There are lot of people who come for the written test. Means not only National but also International artist (struggling) likes to learn in this reputed institute. Out of these crowd only 40 people get selected for next stage/filter; we call it as Orientation & Interview.

Schedule & Verification
The schedule of O&I (Orientation & Interview) is of about 4-5 days. On the first day you have to verify your all the educational documents and need to submit self-attested copy of the document to the institute. This is fist important, necessary and compulsory stage. If you don’t have proper documents then, in any case, you are not allowed for further tasks.
So, keep all the important documents in original and in self attested copy with you. Keep two passport sized (not selfi type) photographs with you and original identity proof as well.

Orientation
After verification is done then actual work get started. Firstly, some external faculty who is an industry professional; a well-known film writer conduct a lecture. It is mind blowing and amazing thing. Your all concepts regarding writing, movies gets upto mature level. This is 2-3 hours lecture or we call it as conversation which is very important for the newcomers. After this lecture faculties of the institute gives you information about institute, writing, course and just informal talk. This is first day.
Either on first day, in the evening or on second day, they will show you a movie. Generally, naturally the film is art film, independent film and like those things. This is FTII. Here you will not get masala or entertainment movies. Some people feel guilt if they make a joke or comedy scene in a movie…hahaha… This was a joke…. Leave it…. Don’t dare to ask which movie they shown to us.

Second day is very important. Whatever film they had shown to you, the assignment is given on that topic. Type of the assignment may be whatever, you cannot get prepare for it. Emotions come through the heart and thought comes through the writers mind!!! Just be with yourself. Do the things that you feel correct.
Assignment may be like, write analysis of the movie, write the film from your perspective or write sequel, write some dialogue … anything… there is no limit… they want to check you, want to analyze your writing skill, your brain…
Next task is about writing. There is lot of writing for writers! They will give you a sketch or sequence of the sketch and asked you to write some story or a dialogue… or they will give u a word or a sentence and asked you to write… they will ask you which book you like write on that… take some idea and make a some story… write a biopic on a personality… write about any character you like from mainstream movie… write a story on ur friend, relative or someone u like…. Such things… not difficult and not easy!!! These things comes from your brain spontaneously not by preparing something…

Third important part of the orientation is group discussion. The topic of group discussion is not fixed. They make four groups of students. Means each group is having 8-10 members. Each group goes in front of panel. Ok. I forget to tell you that, there is a panel of 5-6 members, to whom we can call faculties. These people are direct or indirectly related with the FTII. One of them is lecturer at the institute for feature film screenplay writing and other respected members are from industry or pass out candidates or alumni. These people are to judge you, your writing, your way of thinking. They are simply fabulous. Because, till the end of the process, you will unable to know their perception regarding you and the criteria for selection of candidates. Simply great!

Ok we were at group discussion. So, a group goes in front of panel and you have discuss with them regarding a topic told by them. The topic may the movie you watched, an event, a question in written test. Anything! Your mind should be present, that enough! This is just to share your view, your way of thinking regarding a subject. That’s it.
Final stage in orientation is personal interaction with the panel. You have to go individually in front of panel. What happens there? They just ask you some questions. Like what you like, what kind of movies you watch, do you read books, tell about that, tell a story written by you………. They can ask anything regarding this…. You have to speak truth…. They analyze your written things in answer paper. Such things that explore you in front of them!!!!! That’s over….

Interview
This is similar like personal interaction with panel in orientation stage. But the people or panel is different. Here also, respected persons from industry, writers, directors, editors, HOD of the department and dean of the institute. This will be like a press conference of yours. You have to answer the questions asked by them. But difference is that, these are gentlemen/gentlewomen who ask questions one by one and kindly or politely. Nothing to worry. Here also they ask simple questions. Whats your educational qualification, where are you from, why FTII, tell something about you, what you did, narrate us any story written by you, why you like writing….

Finally
The field and the place is professional but it is a field of artists, creative people. Here, nothing is like your ordinary interviews and exams where you need to go with lot of preparation on different topics. In FTII, you should be with youself and your ideas… that’s it! Go with free and open mind. Talk politely but clearly. If you are honest, if you deserve then you will be definitely selected. Forget about all other things.
Note: You need not go in formal dress but, you should be well dressed. Staying facility is good. You will get free ‘tea’ during orientation; don’t expect more than that. You can talk in either Hindi or English; while majority staff and working people is Marathi. But language doesn’t matter… FTII campus is ‘cool’ area. It is not like any other colleges or universities or institute. It is having smell and spark of creativity.

 

Image result for ftii

मराठी पोरांनो…
आपण आपलं भाग्य समजलं पाहिजे की एफटीआयआय सारखी संस्था आपल्या महाराष्ट्रात आहे. त्यात प्रवेश मिळवणं अवघड असलं तरी ती ह्या क्षेत्रात येणार्यां मराठी तरुणांनी त्यात प्रवेश घेण्याचं स्वप्न बघायला पाहिजे. येथे न शिकताही मोठे होणारे दर्जेदार कलाकृती देणारे आहेत, येथे शिकूनही यशस्वी न होऊ शकणारेही बरेच आहेत. याचा मेळ कधीच बसत नसतो. कपाळावरील चार आठयांच्या मध्ये असलेल्या नशिबाने, मनगटातील उर्जेने, मनातील उर्मीने अन मेंदूच्या कर्तुत्वाने तुम्ही सिद्ध होत असता. क्षेत्र कुठलही निवडा चिकाटी अन श्रद्धा पाहिजे. असो. भाषण नको.
वर रामायण इंग्लिश मध्ये सांगितलं आहे त्याला मराठीत पुन्हा कधीतरी व्यक्त करीनच. विशेष म्हणजे एफटीआयआय मध्ये भाषेची बंधने नाहीत. तुम्ही इंग्लिश किंवा हिन्दी भाषेचा वापर करू शकता. स्टाफ बहुतांश मराठी आहे, पण विद्यार्थी अन शिकवणारी काही मंडळी इतर भाषिक असल्याने सगळ्यांसमोर हिन्दी किंवा इंग्लिश भाषा वापरा. ह्या कलेच्या दालनात प्रांत, भाषा, धर्म, लिंग वगैरे गौण आहे. सगळे कलेचे उपासक आहेत. बाकी, मायबोली झिंदाबाद! तुम्ही तुमच्यासोबत असा म्हणजे झालं. सगळं ठीक होतं.

 

FTII Examination Paper Pattern For Screenplay Writing

Health Tips

Health Tips

#आरोग्यम धंनसंपदा    #घरचा वैद्य

#ताक पिण्याचे फायदे :

१. आम्लपित्त : उन्हाळ्यात आम्लपित्त म्हणजेच एसिडिटीचा अधिक त्रास होतो अशा काळात ताकमध्ये काली मिरी आणि काळं मीठ एकत्र करून प्यायल्याने एसिडिटी बरी होते.

२. रोग प्रतिकार शक्ती : ताकमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. त्यातील लॅक्टोज तुमच्यामधील रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. ज्यामुळे तुम्हाला अधिक उर्जा मिळते.

३. कफ : कफची समस्या असेल तर ताकमध्ये ओवा टाकूण प्यावं. पोट साफ होण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लस्सीमध्ये पुदीना टाकूण प्यावे.

४. पचनक्रिया : ताक रोज नियमित प्यायल्याने पचनसंबंधित समस्या कधीच येत नाही. अधिक जेवन झाल्यास ताक पिल्याणे मोठा फायदा होतो.

५. विटामिन : ताकमध्ये विटामिन सी, ए, ई, के आणि बी असतं. जे शरिरासाठी अधिक लाभदायक असतात. यामधून मोठ्या प्रमाणात पोषकतत्व मिळतात. यामुळे कॅलरीज आणि फॅट देखील कमी होतं

Scientific अध्यात्म!

Scientific अध्यात्म!

*** पाश्चात्त्य अंकगणितापेक्षा कैकपटीने प्रगत असलेले प्राचीन हिंदु अंकगणित ***

#Ancient INDIA’s Mathematics

 

१. अंक हे सध्याच्या दशमान पद्धतीचे जनक असणे

अतिप्राचीन भारतात गणितावर बरेच संशोधन झाले आहे.

 

त्याविषयी विश्वकोशात दिलेल्या माहितीनुसार,

 

प्राचीन काळातील भारतीयांनी गणितासाठी वापरलेल्या चिन्हांना ‘अंक’ म्हटले आहे.

 

हे अंक म्हणजे (१ ते ९ आणि ०) सध्याच्या दशमान पद्धतीचेजनक आहेत.

 

आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला.

शून्य ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे.

 

२. दशमान पद्धतीची संकल्पना

‘आसा’ या वैदिक काळाच्या प्रारंभी असलेल्या वायव्य भारतात राहणार्‍या भारतीय गणिततज्ञांनी सर्वप्रथम दशमान पद्धतीची संकल्पना मांडली.

 

अंकाच्या स्थानानुसारत्याची किंमत पालटेल, या ‘आसा’ यांनी मांडलेल्या संकल्पनेतून जगाला अंकलेखनाच्या दशमान पद्धतीचीदेणगी मिळाली.

 

अशा पद्धतीने लिहिलेले आकडे ‘हिंदासा’ नावाने ओळखले जाऊ लागले. साधारणतः वर्ष५०० मध्ये आर्यभट्टांनी दशमान पद्धती सगळीकडे रुजवली.

 

त्यांनी शून्यासाठी ‘ख’ या शब्दाचा वापरकेला. नंतर त्याला ‘शून्य’ असे संबोधले गेले.

 

३. भारतीय पद्धतीत दहाच्या सतराव्या घातापर्यंतचे अंक ऐकिवात असणे

इंग्रजीत संख्यांना सलग संज्ञा नाहीत.

‘थाऊजंड’,

‘मिलियन’,

‘बिलियन’,

‘ट्रिलियन’,

‘क्वाड्रिलियन’

अशा एक सहस्रांच्यापटीतील संख्यांनाच संज्ञा आहेत.

भारतीय पद्धतीत दहाच्या सतराव्या घातापर्यंतचे अंक अनेकदा ऐकिवातअसतात,

 

उदा. खर्व,  निखर्व,  पद्म,  महापद्म ते अगदी परार्धापर्यंत.

 

अर्थात आपण केवळ नावे ऐकून आहोत. त्यानुसार नेमकी संख्या सांगणे शक्य होत नाही; कारण त्याची आपल्याला सवयच नाही.

 

४. भारतीय दशमान पद्धतीनुसार असणारे आकडे

विविध कोशांमध्ये किंवा पुस्तकांत भारतीयदशमान पद्धतीनुसार खालीलप्रमाणे आकडे लिहिले जातात.

१ एक

 

१० दहा

 

१०० शंभर

 

१००० सहस्र

 

१०,००० दश सहस्र

 

१,००,००० लाख

 

१०,००,००० दहा लाख

 

१,००,००,००० कोटी

 

१०,००,००,००० दहा कोटी

 

१,००,००,००,००० अब्ज

 

१०,००,००,००,००० खर्व (दश अब्ज)

 

१,००,००,००,००,००० निखर्व

 

१०,००,००,००,००,००० पद्म

 

१,००,००,००,००,००,००० दशपद्म

 

१,००,००,००,००,००,००,०० नील

 

१०,००,००,००,००,००,००,०० दशनील

 

१०,००,००,००,००,००,००,००० शंख

 

१,००,००,००,००,००,००,००,००० दशशंख

 

५. एकावर शहाण्णव शून्य असणारी संख्या – दशअनंत !

 

आता यापुढील संख्या किती सांगता येईल का ? प्रयत्न करून पहा.

 

एकावर शहाण्णव शून्य म्हणजे ही संख्या आहे दशअनंत;

 

पण ही संख्या मोजायची कशी ?

 

भारतीय पद्धतीत त्याचेही उत्तर आहे.

 

अर्थात ते शब्द आता वापरात नाहीत.

 

या शब्दांची सूची कोणत्याही पुस्तकात आता उपलब्ध नाही. c

 

काही जुन्या पुस्तकांत त्यांचे संदर्भ आहेत.

 

अशाच एकाची पुढील सूची पहा.

 

एकं (एक),

दशं (दहा),

शतम् (शंभर),

सहस्र (हजार),

दशसहस्र (दहा हजार),

लक्ष (लाख),

दशलक्ष,

कोटी,

दशकोटी,

अब्ज,

दशअब्ज,

खर्व,

दशखर्व,

पद्म,

दशपद्म,

नील,

दशनील,

शंख,

दशशंख,

क्षिती,

दश क्षिती,

क्षोभ,

दशक्षोभ,

ऋद्धी,

दशऋद्धी,

सिद्धी,

दशसिद्धी,

निधी,

दशनिधी,

क्षोणी,

दशक्षोणी,

कल्प,

दशकल्प,

त्राही,

दशत्राही,

ब्रह्मांड,

दशब्रह्मांड,

रुद्र,

दशरुद्र,

ताल,

दशताल,

भार,

दशभार,

बुरुज,

दशबुरुज,

घंटा,

दशघंटा,

मील,

दशमील,

पचूर,

दशपचूर,

लय,

दशलय,

फार,

दशफार,

अषार,

दशअषार,

वट,

दशवट,

गिरी,

दशगिरी,

मन,

दशमन,

वव,

दशवव,

शंकू,

दशशंकू,

बाप,

दशबाप,

बल,

दशबल,

झार,

दशझार,

भार,

दशभीर,

वज्र,

दशवज्र,

लोट,

दशलोट,

नजे,

दशनजे,

पट,

दशपट,

तमे,

दशतमे,

डंभ,

दशडंभ,

कैक,

दशकैक,

अमित,

दशअमित,

गोल,

दशगोल,

परिमित,

दशपरिमित,

अनंत,

दशअनंत.’

 

वर्ग संख्या ट्रिक्स

41 ते 50 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग :

41 चा वर्ग = 16  81

42 चा वर्ग = 17  64

43 चा वर्ग = 18  49

44 चा वर्ग = 19  36

45 चा वर्ग = 20  25

46 चा वर्ग = 21  16

47 चा वर्ग = 22  09

48 चा वर्ग = 23  04

49 चा वर्ग = 24  01

50 चा वर्ग = 25  00

वर्ग संख्यांच्या मांडणीकडे नीट लक्ष द्या

16,17,18,19,20,21,22,23,24,25  अशी चढत्या क्रमाची मांडणी तयार झालेली आहे, ती पहा. त्याचबरोबर

81,64,49,36,25,16,09,04,01,00 अशी उतरत्या क्रमाची 9,8,7,6,5,4,3,2,1,0 यांच्या वर्गाची मांडणी तयार झालेली आहे.

वरील दोन्ही मांडण्यांचा परस्पर संबंध ध्यानात ठेवणे सहज शक्य आहे.

51 ते 60 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग :

सोपी रीत

51 ते 60 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग ध्यानात ठेवणे हा लेख वाचल्यानंतर सहज शक्य आहे.येथे केलेली मांडणी व थोडीशी स्मरणशक्ती वापरल्यास आपण कायमस्वरुपी 51 ते 60 चे वर्ग ध्यानात ठेवू शकतो व हवे तेव्हा आठवू शकतो.

51 चा वर्ग =  26   01

52 चा वर्ग =  27   04

53 चा वर्ग =  28   09

54 चा वर्ग =  29   16

55 चा वर्ग =  30   25

56 चा वर्ग =  31   36

57 चा वर्ग =  32   49

58 चा वर्ग =  33   64

59 चा वर्ग =  34   81

60 चा वर्ग =  36   00 (3500+100)

वरील मांडणीकडे लक्षपूर्वक पहा.

51 ते 59 च्या वर्गसंख्यांच्या मांडणीमद्ये 26,27,28,29,30,31,32,33,34 अशी क्रमवार चढती मांडणी तयार झालेली दिसते.त्याचबरोबर 01,04,09,16,25,36,49,64,81 अशी क्रमवार 1 ते 9 यांच्या वर्गाची चढती मांडणी दिसून येते.

60 च्या वर्गामद्ये क्रमवार पुढील साख्या 35 व क्रमवार पुढील 10 चा वर्ग 100 यांची बेरीज (3500+100= 36  00) अशी रचना तयार होते.

तसेच

91 चा वर्ग  82  81

92 चा वर्ग  84  64

93 चा वर्ग  86  49

94 चा वर्ग  88  36

95 चा वर्ग  90  25

96 चा वर्ग  92  16

97 चा वर्ग  94  09

98 चा वर्ग  96  04

99 चा वर्ग  98  01

100 चा वर्ग 100 00

अश्याप्रकारे आणखी निरीक्षणातून

सोप्या ट्रिक्स तयार करू शकतात .

महान व्यक्तींचे जन्मदिनांक

महान व्यक्तींचे जन्मदिनांक

💐महान हस्तियों का जन्म💐

January

12-1-1863 स्वामी विवेकानंद

28-1-1865 लाला लजपतराय

1-1-1894 जगदीश चंद्र बोंज

23-1-1897 सुभाष चंद्र बोंज

13-1-1949 राकेश शर्मा

20-1-1900 जनरल के.ऍम.    करिअप्पा

——————————————

February

18-2-1486 महाप्रभु चेतन्य

18-2-1836 रामकुष्ण परमहंस

22-2-1873 मोहम्मद इकबाल

13-2-1879 सरोजिनी नायडु

29-2-1896 मोरारजी देसाइ

——————————————

March

23-3-1910 डॉ. राममनोहर लोहिया

——————————————

April

15-4-1469 गुरु नानक देवजी

14-4-1563 गुरु अर्जुन देवजी

14-4-1891 डॉ.भीमराव आंबेडकर (बाबासाहेब आंबेडकर)

——————————————

May

5-5-1479   गुरु अमरदास

31-5-1539 महाराणा प्रताप

6-5-1861   मोतीलाल नेहरु

7-5-1861   रविन्द्रनाथ टेगोर

9-5-1866   गोपालकृष्ण गोखले

24-5-1907 महादेवी वर्मा

2-5-1921   सत्यजित राय

——————————————

June

26-6-1838 बंकिमचंद्र चट्टो         पाध्याय

——————————————

July

23-7-1856 लोकमान्य तिलक

31-7-1880 प्रेमचंद मुनशी

29-7-1904 जे. आर. डी. टाटा

——————————————

August

27-8-1910  मधर टेरेसा

29-8-1905  ध्यानचंद

——————————————

September

26-9-1820 ईश्वरचंद्र  विद्यासागर

4-9-1825  दादाभाई नवरोजी

10-9-1887 गोविंद वल्लभ पंत

5-9-1888  डॉ. राधाकृष्ण

11-9-1895 विनोबा भावे

27-9-1907 भगतसिंह

15-9-1861 ऍम.विश्वसरेइया

15-9-1876 शरदचंद्र चटोपाध्याय

——————————————

October

1-10-1847 डॉ. ऐनी.बेसन्ट

2-10-1869 महात्मा गांधीजी

22-10-1873 स्वामी रामतीर्थ

31-10-1875 सरदार वल्लभभाई पटेल

31-10-1889 आचार्य नरेन्द्रदवे

11-10-1902 जयप्रकाश नारायण

30-10-1909 डॉ. होमी भाभा

19-10-1920 पांडुरंग शास्त्रीजी

आठवले पु. दादा

——————————————

November

13-11-1780 महाराणा रणजीतसिंह

4-11-1845 वासुदेव बळवंत फडके

7-11-1858 बिपिनचंद्र पाल

30-11-1858 जगदीशचंद्र बोज

5-11-1870 देशबंधु चितरंजनदास

11-11-1888 मौलाना आज़ाद

4-11-1889 जमनालाल बजाज

19-11-1917 श्रीमती इंदिरागांधी

23-11-1926 श्री सत्यसाई बाबा

4-11-1939 शकुंतलादेवी

12-11-1896 सलीमअली

——————————————

December

9-12-1484 महाकवि सूरदास

25-12-1861 मदनमोहन मालविया

27-12-1869 ठक्कर बापा

7-12-1879 चक्रवर्ती राजगोपालचारी

3-12-1884 डॉ. राजेन्द्रप्रसाद

30-12-1887 कनैयालालमुनशी

11-12-1931 राजेन्द्रकुमार जेन ओसो रजनीश

22-12-1887 रामानुजम

एसी आणि ऊर्जा बचत

एसी आणि ऊर्जा बचत

#Energy Consumption & AC/ How To Save Electricity While Using AC

घरात एसी असेल तर तुमच्या वीजबिलाचा आकडा नेहमी जास्तच असतो. मात्र, एसीचा वापर करुनही वीजबिल आटोक्यात ठेवण्यासाठी व ऊर्जाबचत करण्यासाठी खालील उपाययोजना फायदेशीर ठरू शकते-
* तुमच्या एसीचं थर्मोस्टॅट्स सेटिंग २४ अंश सेल्सियस ते २६ अंश सेल्सियस या रेंजमध्ये ठेवा. योग्य त्या थंडाव्यासाठी ही प्रमाणित रेंज आहे. थर्मोस्टॅट सेटिंगमधील १ अंश सेल्सियसमधील बदलही तुमच्या विजेच्या बिलामध्ये ३ टक्के ते ५ टक्के कपात वा वाढ करू शकतो.
* दर महिन्याला एसीचा फिल्टर तपासा आणि स्वच्छ करा. यामुळे थंडावा वाढेल आणि ऊर्जेचा वापर कमी होईल.
* एसी चालू असताना तुमच्या खोलीमधून थंड हवा बाहेर जाणार नाही याची खात्री करा. त्यामुळे रूम एअर कंडिशनर्सचा ऊर्जा वापर कमी होण्यास मदत होते.
* एसीचा वापर करताना तुमच्या खोलीमध्ये सूर्यकिरणे येणार नाहीत याची काळजी घ्या. असे केले नाही तर तुमच्या खोलीमध्ये उष्णता वाढेल आणि खोली थंड होण्यामध्ये वेळ लागेल. एसी वापरताना तुम्हाला नसíगक सूर्यप्रकाश हवा असेल तर तुम्ही खिडक्यांवर रिफ्लेक्टिव्ह फिल्मचा वापर करू शकता. अशा फिल्म्स प्रकाशाला अडथळा न आणता ४०-६० टक्के उष्णता कमी करू शकतात, ज्यामुळे तुमची रूम छान आणि प्रकाशित राहील.
* एसी तज्ज्ञाद्वारे प्रत्येक मोसमाच्या सुरुवातीला कंडेन्सर/ इव्हॅपोरेटर कॉइल्स स्वच्छ करण्याद्वारे तुमच्या एसीची पूर्ण सíव्हस करण्याची शिफारस केली जाते. तथापि, अशा सíव्हसेसची वारंवारता एसी लावलेल्या ठिकाणावर अवलंबून असते. धूळ, प्रदूषण आणि खारे पाणी असलेल्या ठिकाणी एसीची जास्तवेळा सíव्हसिंग करण्याची गरज असते.
* एसी सुरू असताना पंखेही चालू असतील तर एसीची हवा घरभर खेळती राहण्यास मदत होते.

रूम एअर कंडिशनर्सवरील स्टार्स वीज वाचविण्यात कसे सहाय्यभूत ठरतात?
रूम एअर कंडिशनर्स खरेदी करताना ग्राह्य धरण्यात येणारा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. बहुतांश ग्राहक एसी खरेदी करताना किमतीला भुलतात. मात्र प्रत्यक्ष एसी घरात बसविल्यावर येणाऱ्या वीजबिलाचा विचार करीत नाहीत. एसीवरील स्टार्स हे कमीतकमी २ वर्षांमध्ये तुमची खरेदी किंमत शक्य तितकी कमी करण्यास मदत करतात.
एसीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी युनिटशी संबंधित मुद्दे समजून घ्या.
* कूल मोड- कूल मोड नॉर्मल मोड आहे; जेव्हा एअर कंडिशनर सेट केलेले तापमान आणि सेट केलेल्या फॅन स्पीडवर चालतो. यामध्ये ऊर्जा बचत शक्य आहे आणि ती सेट केलेल्या तापमानावर अवलंबून आहे.
* फॅन मोड- फॅन मोडमध्ये फॅन सतत चालू राहतो आणि कॉम्प्रेसर बंद राहतो. निश्चितच यामुळे ऊर्जा बचत होते. कारण कॉम्प्रेसर बंद राहतो, जो सर्वाधिक ऊर्जा वापरतो.
* ड्राय मोड- पावसाळ्यासारख्या जास्त आद्र्रतेच्या दिवसांत हा मोड योग्य आहे. समुद्राजवळ राहणाऱ्या लोकांकरिता हा मोड जास्त महत्त्वाचा आहे. पावसाळ्यामध्ये हवेचे तापमान खूपच कमी असते, आद्र्रता कमी झाल्यामुळे रूममध्ये या मोडवर एसी ठेवलयाने घरात चांगली हवा खेळती राहते. म्हणूनच ड्राय मोडमध्ये एअर कंडिशनर चालू केल्यामुळे हवेतील जास्तीची आद्र्रता कमी होण्यामध्ये मदत होते. कारण कूल मोडच्या तुलनेत फॅन कमी वेगाने चालतो आणि कॉम्प्रेसर खूपच कमी काळासाठी चालू राहतो. यामुळे ऊर्जेचा वापर कमी होण्यामध्ये मदत होते. इथे हवा शुष्क करण्याचा उद्देश असतो, रूम थंड करण्याचा नाही.
स्लीप मोड- स्लीप मोड तापमान २ अंशापर्यंत वाढेपर्यंत प्रत्येक एका तासानंतर १ अंशद्वारे सेट केलेले तापमान वाढवतो. त्यानंतर एअर कंडिशनर आणखी ६ तास चालतो. यामुळे वीज बचत होते.
अनेकदा एसी घेताना आपल्यासमोर वीजच्या वाढत्या बिलाचे चित्र समोर उभे राहते. परंतु एसी काळजीपूर्वक वापरल्यास तुम्हाला आरामदायी थंड हवाही मिळेल आणि वीजबिलही वाढणार नाही.

error: Content is protected !!