Tag: माहितीसाठी

Share Market Classes

Share Market Classes

[Advertise]

Learn Share Market  ||  Basics Of Share Market  ||  Online Share Market Course  ||  शेअर बाजार मराठीत

**ANGEL BROKING LIMITED**
Service Truly Personalized
– Demat Account
– Free Book- Dematerialization
– Mutual Fund
– Stock Recommendations 
– Investment Adviser
– Portfolio Management
Contact – 9422611264

 

**ANGEL BROKING SERVICES**

Click Below Link to Open New Demat Account with Angel Broking Pvt Ltd

https://5minwebsite.angelbroking.com/Diykyc/SubbrokerLead?SbTag=QkJDQg==

🚀Angel Broking Provides Platform Which Consist Of  
📌 Equity
📌 Future & Option 
📌 Mutual Fund

🚀Trading softwares

📌Mobile App – Angel Eye
📌Laptop Browser – trade.angelbroking.com
📌Laptop/desktop app – Angel Speed Pro

**ANGEL PLATINUM ADVISORY **

1) Having high quality fundamental stocks

2) Balanced and diversified equity portfolio

3)From oct 2015 to march 2018 given 70.4% return where BSE100 given 31% means 39.4% out performance

4) 5000 annual fees including GST

5)Will get advisory on call or mails with personalize risk profile

6)Weekly P&L  of his portfolio with nifty comparison

7)Monthly news letter with personalized portfolio

8)Special monthly webinars on market and investments

9)Quarterly result update on recommended stock

JUST CLICK LINK BELOW AND CHANGE YOUR LIFE

https://5minwebsite.angelbroking.com/Diykyc/SubbrokerLead?SbTag=QkJDQg==

 

JOIN ONLINE SHARE MARKET CLASSES

DEMATERIALIZATION अनिवार्य

DEMATERIALIZATION अनिवार्य

Physical Shares To DEMAT is now mandatory  ||  Shares Demat मध्ये ठेवणे बंधनकारक  ||  माहितीसाठी

आज शेअर बाजारात येणार्‍या प्रत्येकाला विविध Apps, Software आणि Websites च्या माध्यमातून Trading करायची माहिती आहे. कोणीही क्षणात शेअर BUY आणि SELL करू शकतो. त्यासाठी त्याला ब्रोकरला किंवा अन्य कोणाला विनंती करण्याची गरज राहिलेली नाही. पण ज्यावेळेस इंटरनेट नव्हतं किंवा टेक्नॉलजी आजइतकी विकसित नव्हती तेंव्हा share बाजारात व्यवहार कसे होत असावेत?

तेंव्हा Physical Share Certificates च्या माध्यमातून shares ची खरेदी-विक्री केली जायची. त्यामध्ये मध्यस्थ अर्थात ब्रोकर ची भूमिका अत्यंत महत्वाची असायची. एखादा शेअर buy किंवा sell करण्यासाठी भरपूर कसरत करावी लागायची. आज सारखे ZERO PAISA ब्रोकेरेज चाळे त्यावेळेस परवडणारे नव्हते. आज गुंतवणूकदारांचे shares हे Demat Account मध्ये असतात. म्हणजे, तुमच्याकडे किती shares आहेत, कधी BUY किंवा SELL केले आहेत याची माहिती तुम्हाला Demat ला LOGIN केली की लागलीच मिळू शकते. पण पूर्वी तुमच्याकडे जे Shares चे Physical Certificates असायचे. म्हणजे एक कागदी Certificate ज्यावर लिहिलेलं असायचं की तुमच्याकडे कोणत्या कंपनीचे किती shares वगैरे आहेत. त्याची खरेदी-विक्री करण्यासाठी ब्रोकरच्या माध्यमातून केली जायची. त्याकाळी जी माणसे गुंतवणूक करायची त्यांच्या घरात अशी Certificates पडून असायची. तो काळ वेगळा होता. आता असे व्यवहार फार कोण करत नाही.

जसा जसा टेक्नॉलजीचा वापर वाढत गेला तसं तसं Share Market आणि त्याच्यातील व्यवहार सुलभ आणि Global होऊ लागले. Demat Account नावाची Concept आली. गुंतवणूकदाराला Demat च्या माध्यमातून Shares ची खरेदी-विक्री करता येऊ लागली. कागदोपत्री होणारा व्यवहार कालबाह्य झाला. जे shares असायचे ते Demat वरती. पण सर्वच गुंतवणूकदार ह्या बदलात सामील झालेच असं नाही. म्हणजे, ज्यांच्याकडे पूर्वी घेतलेले shares होते, ते त्यांच्याकडे Physical मध्ये होते, ते shares त्यांनी Demat मध्ये transfer केले असतीलच असं नाही. त्यांच्याकडे ते अजूनही Physical Format मध्ये असू शकतात. जोपर्यंत Physical form मधील shares Demat account मध्ये जमा होत नाहीत तोपर्यंत त्या shares चा खरेदी-विक्री सौदा करणे अशक्य झालं आहे.

DEMATERIALIZATION

ज्या प्रोसेसच्या माध्यमातून Physical Format मधील shares आपण Demat Account ला जमा करतो त्याला आपण DEMATERIALIZATION म्हणतो.

जवळपास दहा बारा वर्षांपासून share market मधील सर्व व्यवहार ऑनलाइन होतात. Physical व्यवहार बंद झाले आहेत. आजही असे अनेक गुंतवणूकदार आहेत ज्यांच्याकडे Physical Format मध्ये shares पडून आहेत. आता त्यांचे व्यवहार होणं शक्य नाही. जर त्याचे व्यवहार करायचे असतील तर त्यांना Demat करावं लागेल.

दोन वर्षांपूर्वी नोटबंदीचा अनुभव घेतलेल्या भारतीयांना “कालबाह्य” आणि “हे आता चालणार नाहीत” याचा अर्थ योग्य प्रकारे समजला असावा. जशा हजार पाचशेच्या नोटा कालबाह्य ठरवल्या गेल्या, त्यांच्याद्वारे होणारे व्यवहार बंद केले गेले होते.

SEBI (Security Exchange Board Of India) च्या नवीन अधींनियमनुसार Physical Format मध्ये असलेले Shares 5 Dec च्या आत Demat Account उघडून त्यात ते shares जमा करून घेणे बंधनकारक केलेलं आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे Physical Format मध्ये shares असतील तर घाई करा आणि Demat Account सुरू करून 5 Dec पूर्वी पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून घ्या.

.

– Deadline to dematerialise physical shares is Dec 5 –

Read Related News Below –

https://www.thehindubusinessline.com/economy/deadline-to-dematerialise-physical-shares-is-dec-5/article24255939.ece

https://www.india-briefing.com/news/india-demat-shares-mandatory-beneficial-ownership-rule-16966.html/

https://economictimes.indiatimes.com/hindi/markets/share-bazaar/goodbye-share-certificates-go-demat-till-december/articleshow/64758641.cms

= > WHAT IS DEMATERIALIZATION?

आधीच्या काळी shares खरेदी-विक्री प्रक्रिया Electronic पद्धतीने होत नसत. त्या काळी Physical Certificate असायचे ज्याद्वारे व्यवहार केले जात असत. ते Cerificate गुंतवणूकदाराला सांभाळून ठेवावे लागत आणि विक्री करताना submit करावे लागत. पण Electronic पद्धतीमुळे ही प्रक्रिया जवळजवळ बंद झाली आहे. असं असलं तरी, काही लोकांकडे जुन्या काळी घेऊन ठेवलेले Shares Physical Format मध्ये असू शकतात. ते जर Electronic Format अर्थात Demat मध्ये ठेवण्यासाठी काही मूलभूत प्रक्रिया करावी लागते. याला आपण Dematerialization म्हणतो. एकंदरीत Physical Format मध्ये असलेले shares Electronic माध्यमात convert करणे. यासाठी Demat Account असणे अतिशय आवश्यक आहे.

उदाहरणार्थ, जर एखाद्या गुंतवणूकदारणे 1999 काळी SBI चे shares घेऊन ठेवले आहेत. त्याकाळी Physical Certificate द्वारे व्यवहार केला जात असे. समजा त्या गुंतवणूकदाराने मध्यंतरीच्या काळात त्या shares ला काहीच केलेलं नाही. आज जर ते shares विकायचे असतील तर सर्वात आधी ते Physical Certificate त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर एक Demat Account असणे आवश्यक आहे. त्यात Physical Certificate आणि Demat एकाच्याच नावे असणे आवश्यक आहे. मग एका प्रक्रियेनुसार ते shares Demat वर जमा करता येतात त्यानंतर मग Demat खात्यावरून त्याचा व्यवहार करता येईल.

ही Dematerialization ची प्रक्रिया थोडीशी किचकट आहे. Demat Account सुरू केल्याच्या नंतर लागलीच ते shares त्याच्यात जमा होणार नाहीत. त्यासाठी ब्रोकर कडून एक फॉर्म घ्यावा लागतो. त्याला DRF फॉर्म म्हणतात. तुमच्याकडे असलेले सर्व certificates वरील माहिती त्या फॉर्ममध्ये भरून ते फॉर्म तुमच्या DP अर्थात Depository Participant कडे सुपूर्द करावे लागतात. त्यानंतर DP सर्व बाबी तपासून ज्या कंपनीचे ते shares आहेत त्या कंपांनीच्या Registrar कडे सुपूर्द करतात. सर्व बाबींची पडताळणी झाल्यानंतर जवळपास 20 ते 25 दिवसांच्या कालावधीत ते share तुमच्या Demat Account ला जमा होतात.

Dematerialization ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. शिवाय, Registrar कडे सर्व बाबींची काटेकोर पडताळणी केली जाते. बर्‍याचदा काही Queries काढल्या जातात ज्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. पण सर्व कागदपत्रे व्यवस्थित असतील तर काही अडचण येत नाही.

पुढील लेखात जाणून घेऊ या निर्णयाचे फायदे, नुकसान आणि शेअर बाजारावर त्याचे पडसाद… 

अभिषेक बुचके

-CONTACT US TO DEMAT YOUR SHARES-

 

Go to e-book!

 

Infosys दीर्घकालीन गुंतवणुक

#उद्योजकमहाराष्ट्र ३ – मुलाखत

#उद्योजकमहाराष्ट्र ३ – मुलाखत

 मराठी उद्योजकांची मुलाखत ||  Marathi Businessman  ||  महाराष्ट्रातील उद्योग

नमस्कार महाराष्ट्र!

#उद्योजकमहाराष्ट्र ही संकल्पना राबवताना अनेक उपक्रम घ्यायचे असं ठरलं आहे. त्यातील एक उपक्रम आज सुरू करत आहोत. ट्विटरवरील जे उद्योजक आहेत त्यांची मुलाखत घेऊन त्यांचा उद्योग/व्यवसाय अन त्याबाबतीत आलेले अनुभव आपण जाणून घेणार आहोत. 

हे अनुभव अनेकांना उपयोगी अशी अपेक्षा करतो अन हा उपक्रम सुरू करतो! या मुलाखतीत आपण सुरुवातीला पाहुण्यांशी संवाद साधूया अन त्यानंतर ज्यांना प्रश्न असतील, शंका असतील त्यांनी त्या विचाराव्यात!

#उद्योजकमहाराष्ट्र नमस्कार, आज आपल्यासोबत आहे मराठी ट्विटरविश्वातील सुपरिचित चेहरा हेमंत आठल्ये | @hemantathalye मराठी ट्विटरकर हेमंतना वेगवेगळ्या भूमिकेतून भेटत असतात. विविध उपक्रम, विषय ठामपणे मांडण्यात त्यांची वेगळी ओळख नेहमीच दिसून येते. पण आज आपण हेमंत यांना आपण एक उद्योजक म्हणून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला, सुरू करुयात या संवादाला!

प्रश्न१

@hemantathalye तुमचं #उद्योजकमहाराष्ट्र या उपक्रमात स्वागत. आमच्या मंचावरील तुम्ही पहिले पाहुणे. सर्वात आधी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही मूळ कुठचे? आता कुठे असता?

हेमंत यांचं उत्तर

मला आपण संधी दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो! मी मूळचा नगर जिल्ह्यातला. वांबोरी नावाचं गाव आहे. गेली दहा वर्षांपासून पुण्यात असतो!

प्रश्न २ 

तुमचं शिक्षण कुठे झालं अन कोणत्या शाखेत झालं? आणि पुण्यात येण्याचं कारण काय?

हेमंत यांचं उत्तर

शिक्षण फार नाही. बारावी नंतर दोन वर्षाचा डिप्लोमा केलेला. नंतर नोकरी! नोकरी हेच येण्याचं कारण!

अच्छा,तर रोजगाराच्या निमित्ताने पुण्यात येणं झालं. Ok.

प्रश्न ३ 

शिक्षणानंतर डिप्लोमा वगळता अजून कुठला विशेष कोर्स वगैरे केला आहे का? आणि डिप्लोमा कुठे केला?

हेमंत यांचं उत्तर

वेब डिझायनिंगचा दोन वर्षाचा कोर्स केलेला. त्यावेळी हे क्षेत्र फारसे कुणाला माहित नव्हते. व माझाही फारसा काही विचार मनात नव्हता. बीएससी ऍग्री अथवा बीए संस्कृत करावी अशी घरच्यांची इच्छा होती. पण आमची गाडी डिझायनिंगमध्ये रुळली

प्रश्न ४

मग शिक्षणानंतर थेट व्यवसाय सुरू केला की नोकरी केली?

हेमंत यांचं उत्तर

नऊ वर्षे नोकरी केली. नंतर व्यवसायात शिरलो!

प्रश्न ५

नऊ वर्षे नोकरी म्हणजे मोठा अनुभव! नोकरीचा एकंदरीत अनुभव कसा होता? नोकरी करताना व्यवसाय करायचा विचार डोक्यात कसा आला? की तो आधीपासूनच होता?

हेमंत यांचं उत्तर

चांगला अनुभव होता. नोकरी हाही एक व्यवसायाचं आहे! फरक इतकाच यात तुमच्या काही हातात नसत आणि असुरक्षितता अधिक. नोकरी करत असतांना बंधन फार असायची! अगदी छोट्या मोठ्या गोष्टीतही परवानग्या! त्यामुळे पुढे जाऊन स्वतः उद्योगात उतरायचे हे मत बनत गेले

प्रश्न ६

म्हणजे नोकरी करण्यापूर्वी व्यवसायाचा कसलाही विचार तुमच्या डोक्यात नव्हता? नोकरीचा अनुभव घेतल्याच्या नंतर व्यवसाय हा तुम्हाला करियरसाठी योग्य मार्ग वाटू लागला असं म्हणता येईल का?

हेमंत यांचं उत्तर

हो! म्हणजे असं काही ठरलेलं नव्हतं! जसजसे अनुभव आले तसं घुसमट व्हायची. पोटभर पगार पण स्वातंत्र्य नाही. काम कमी आणि इतर लफडी जास्त असं झालेलं. गेमाडपंथी सिनिअर आणि त्याचे पॉलिटिक्स! विटलो होतो!

प्रश्न ७

मग तो क्षण कोणता होता जेंव्हा आर पारचा निर्णय घेतला आणि ‘आता व्यवसाय करायचाच’ हा विचार पक्का झाला? काही घटना किंवा ट्रिगर ? अन त्यावेळेस भावना काय होती?

हेमंत यांचं उत्तर

एका ठराविक काळानंतर जेंव्हा सकाळी तुम्हाला उठल्यावर कंपनीचा विचार आला की निराश वाटू लागत तेंव्हा समजून जा की तुमचा त्या कंपनीतील रस संपला आहे. शेवटच्या कंपनीत तेच तेच काम आणि शिकण्यासारखं काही नाही. तेव्हा ठरवलेलं! एकदा प्रयत्न करून पाहुयात!

प्रश्न ८

चांगल्या पगाराची नोकरी सोडून व्यवसाय सुरू करताना सर्वात महत्वाची गोष्ट असते कुटुंबियांची प्रतिक्रिया! घरच्या मंडळींकडून या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया काय आली?

हेमंत यांचं उत्तर

उत्तर अपेक्षित जे होत तेच मिळालं. महिन्याकाठी लाखभराच्या जवळ जाणारा पगार सोडून व्यवसाय तेही कोणतीही ओळख नसतांना! घरच्यांना सगळंच न पटणारं होत!

उपप्रश्न

येथे जाणून घ्यायला आवडेल की, त्यावर तुमची कसे व्यक्त झालात? कुटुंबीयांना कसं समजावलं?

उत्तर

अजूनही अनेकांना माझा हा निर्णय पटलेला नाही. कारण एकच की कुटुंबातील काही जणांनी प्रयत्न केले व ते अयशस्वी झाले. त्यांची भीती ही होती की अपयश आलं तर पुढे काय? माझं म्हणणं असं होत की एका व्यवसायात अपयशी झालो तर दुसऱ्या व्यवसायात शिरेन!

व्वा! तुमच्या धाडसाचं कौतुक! हा आत्मविश्वास व्यवसायात महत्वाचा असतो. पुढे जाऊयात…

प्रश्न ९ 

व्यवसाय सुरू करताना मनात कुठे दडपण किंवा भीती होती का, की आपण आता एका सुरक्षित कवचातून बाहेर पडत आहोत अन संघर्षाचा काळ येणार आहे?

हेमंत यांचं उत्तर

खरं सांगू का, माझ्या मित्रांनी व वडिलांनी त्या काळात मला धीर दिलेला. सोबत संतांचे विचारांनी मनःशांती तर मिळायची सोबत नवी ताकदही मिळायची! मनावर ताबा ठेवला तर यश नक्की मिळते!

उपप्रश्न

थोडसं वैयक्तिक प्रश्न आहे, पण अत्यंत महत्वाचा… ज्यावेळेस तुम्ही हा निर्णय घेतला तेंव्हा तुमच्यावर कुटुंबातील जबाबदारी कितपत होती? घर पूर्णतः तुमच्या पगारावर अवलंबून होतं?

उत्तर

हो! त्यावेळी दोन मुली! घराचं लोन! थोडक्यात सगळ्याच जबाबदाऱ्या होत्या! कमावता एकच व्यक्ती! त्यामुळे निर्णय अधिकच गंभीर होता. परंतु हा निर्णय कधी ना कधी घ्यावा लागणार होता. वयाच्या पन्नाशीत निर्णय घेण्यापेक्षा तिशीत घेतला तर वीस वर्षांचा फायदा!

प्रश्न १०

मग त्या काळात स्वतःला काय सांगत होता? डोक्यात, मनात नेमका काय विचार चालू होता? कुटुंबियांसाठी खासकरून…?

हेमंत यांचं उत्तर

घरात साधारण दीड एक वर्ष तंग वातावरण होत! चिमुरड्याच काय त्या जमेच्या बाजू. चिमुरड्यांना पाहिलं की ताण कमी व्हायचा! घरातून अपेक्षेप्रमाणे विरोध जसा होता. तसाच कामात अपेक्षेप्रमाणे पाठिंबा! यश जेव्हा मोठ्या प्रमाणात मिळेल तेव्हा वातावरण निवळेलं!

प्रश्न ११

आता मूळ विषयाकडे येऊयात. कोणता व्यवसाय करायचा अन कुठे करायचा हे कसं निश्चित केलं?

हेमंत यांचं उत्तर

माझ्यासाठी सर्वात सोपा व्यवसाय म्हणजे वेब डिझायनिंगच होता. नऊ वर्षे तेच करत आलेलो. त्यामुळे तेच करायचं ठरवलेलं. मी जे काम करतो त्यासाठी हे विश्वची माझे ग्राहक असा प्रकार आहे आणि अनेक फ्रीलान्सिंगच्या वेबसाईटस! त्यामुळे सुरवात होऊ शकली!

प्रश्न १२

कुठलाही व्यवसाय सुरू करताना ‘भांडवल’ हा कळीचा मुद्दा असतो, त्याबाबतीत काय केलं? म्हणजे, ती सगळी जुळवाजुळव कशी केलीत?

हेमंत यांचं उत्तर

पैसे नव्हते पण लॅपटॉप होता. नेट महाराजांनी फार मदत केली! भांडवल म्हणजे पैसे वगैरे नव्हते. जे होते ते घर खर्चासाठी वापरावे लागणार होते. नेटपॅक आणि लॅपटॉप हेच काय ते भांडवल. सुरवातीला ओळखीच्या लोकांना भेटून कामाची माहिती देत होतो. त्यातून काही कामे मिळाली

प्रश्न १३

म्हणजे, तुम्ही जो व्यवसाय करू इच्छित होता तोच व्यवसाय सुरू करायला xyz लाख इतकं भांडवल आवश्यक असतं का? आणि सुरुवातीला एकटेच काम करत होता का?

हेमंत यांचं उत्तर

खरं तर हे व्यवसायावर अवलंबून असत. मी माझा व्यवसाय छोट्या पद्धतीने सुरु केला. सुरवात घरातून केलेली. नंतर ग्राहकांच्या सुविधेसाठी आता घराच्याऐवजी दुसऱ्या जागी बसून व्यवसाय करतोय. इच्छाशक्ती महत्वाची! एकटाच आहे पण लागेल तशी मदत घेतो!

उपप्रश्न

म्हणजे कमीत कमी साधनात अन केवळ स्वतःच्या कामावर या क्षेत्रात व्यवसायला सुरुवात करता येते. त्यासाठी विशिष्ट भांडवल, ऑफिस अन इतर पसारा आवश्यक असतोच असं काही नाही.

उत्तर

100%  ग्राहकाला काम योग्य होणं हे अधिक महत्वाचं!

बरोबर. पुढच्या प्रश्नाकडे वळू…

प्रश्न १४

सध्या ऑफिसमध्ये किती मनुष्यबळ आहे? कोणकोणती साधने आहेत? काय-काय मशीन्स असतात यात?

हेमंत यांचं उत्तर

इथं वन मॅन आर्मी आहे. लवकरच अजून काही संलग्न गोष्टी सुरु करेन. त्यात मनुष्यबळाची आवश्यकता भासेल. तशी व्यवस्था मी तयार करतो आहे. साधने म्हणशील तर एक डेस्कटॉप, एक टॅब, दोन-तीन मोबाईल व नेट असं आहे. बाकी सोशल मीडियावर फोकस!

संवाद

आम्ही तुमची मुलाखत घेत आहोत, नोकरी देताना तुम्ही आमची मुलाखत घ्याल अशी अपेक्षा करतो… गमतीचा भाग… :-}

प्रश्न १५

तुम्ही आता कोणकोणत्या सेवा देऊ करता? म्हणजे तुमची कंपनी कोणकोणत्या services provide करते?

हेमंत यांचं उत्तर

वर्तमानात वेब साईट डिझायनिंग/मेंटेनंस करतो. डिजिटल मार्केटिंगमध्ये लवकरच उतरत आहे. तशी व्यवस्था निर्माण करतो आहे

प्रश्न १६

या सर्व सेवा पुरवताना ग्राहक तुमच्यापर्यन्त येईल यासाठी काय विशेष प्रयत्न करावे लागतात? म्हणजे just dial वर listing सारख्या गोष्टी? कंपांनीच्या जाहिरातीबद्दल जाणून घेऊ.

हेमंत यांचं उत्तर

दोन पद्धती वापरतो. एक म्हणजे सोशल मीडिया! आणि दुसरे म्हणजे प्रत्यक्ष भेटी. अनेकजण प्रत्यक्ष भेटीवर जास्त भर देतात! जस्ट डायल वगैरे अजून तरी वापरले नाही. फक्त प्रोफाइल केलेली आहे!

प्रश्न १७

नेमके कशा प्रकारचे ग्राहक अपेक्षित असतात या व्यवसायात; अन कोणत्या प्रकारचे ग्राहक तुमच्याकडे येतात?

हेमंत यांचं उत्तर

नवीन व्यवसाय सुरु केलेल्यांना वेबसाईटची आवश्यकता असते. अनेकदा व्यवसायाची ब्रॅण्डिंग करणे देखील आवश्यक असते त्यामुळे प्रस्थापित व्यावसायिकही ग्राहक म्हणून येतात!

प्रश्न १८

सध्या तुम्ही कोणकोणत्या शहरांत सेवा देऊ करता?

हेमंत यांचं उत्तर

माझा व्यवसाय ऑनलाईन आहे. त्यामुळे भूगोलाचे बंधन नाही. काही परदेशी ग्राहकही आहेत.

प्रश्न १९

व्यवसायात सर्वात महत्वाचा भाग आहे नफ्याचा! हे गणित कसं असतं? म्हणजे कोणत्या सेवेत सर्वाधिक नफा असतो? किंवा मार्जिन किती असतं हे विचारणे रास्त ठरेल!

हेमंत यांचं उत्तर

मी अनेकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु याच गणित प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. कामाचा वेळ व कामाची काठिन्यता यावर मी कामाचे मूल्य ठरवतो. कोणताही व्यवसाय नफ्यातच असतो. फक्त नफा कमी जास्त असतो.

प्रश्न २०

या व्यवसायाला जोडून समांतर असा दूसरा व्यवसाय करता येणे शक्य आहे का? असेल तर तो कोणता असू शकतो असं तुम्हाला वाटतं?

हेमंत यांचं उत्तर

हो शक्य आहे! एकच काय अनेक केले जाऊ शकतात. सध्याला मी डिजिटल मार्केटिंगच्या दृष्टीने गेल्या काही दिवसांपासून काम करीत आहे! पुढे जाऊन इन्स्टिट्यूट टाकण्याचा विचार आहे.

मस्त! त्यासाठी शुभेच्छा!

प्रश्न २१

नोकरी सांभाळून ह्या व्यवसायाला सुरुवात करता येईल का?

हेमंत यांचं उत्तर

हो, पण वेळेचं गणित जमवायला हवं!

प्रश्न २२

या व्यवसायात प्रामुख्याने कोणत्या अडचणी येतात?

हेमंत यांचं उत्तर

साधारण वर्ष/दोन वर्ष काहीही उत्पन्न आले तरी टिकून राहण्याची मानसिकता. व त्या गरजेइतकं आर्थिक पाठबळ. अमराठी व्यावसायिकांचे हे सूत्र आहे.

प्रश्न २३

व्यवसाय जेंव्हा सुरू करता तेंव्हा कोणत्या विशिष्ट बाबींची काळजी घ्यावी? किंवा कोणत्या गोष्टी टाळाव्यात? तुम्ही कोणाचं सहकार्य घेतलं होतं?

हेमंत यांचं उत्तर

सर्वात महत्वाचं मार्केट. म्हणजे मार्केटची वर्तमान परिस्थिती काय आहे. आपण जो व्यवसाय करणार त्यासाठी लागणारा माल व कुठे किती पैशात विकला जाऊ शकतो याच गणित जमवण. अहंकार टाळावा. शिकता येईल तितकं शिकावं

प्रश्न २४

जेंव्हा हा व्यवसाय स्थिरतेकडे जाईल तेंव्हा काय करणं अपेक्षित आहे? काही टिप्स?

हेमंत यांचं उत्तर

माझाही व्यवसाय नवीन आहे. त्यामुळे अशा काळाचा अनुभव नाही. परंतु माझ्यामते एका व्यवसायावर व्यावसायिकाने अवलंबून राहू नये. जेणेकरून भविष्यकाळात व्यवसाय अडचणीत आला तर इतर व्यवसायातून उभारी घेता येईल!

प्रश्न २५

व्यवसाय सुरू करताना याची नोंद कुठे करावी लागते का? किंवा काही परवाने घ्यावे लागतात का?

हेमंत यांचं उत्तर

सुरवातीला लागायची. किमान शॉप ऍक्ट घ्यावा लागायचा. जर कंपनी प्रायव्हेट लिमिटेड करायची असल्यास निकष बदलतात. परंतु सामान्य व्यवसायास कुठल्याही नोंदीची गरज नाही.

याला जोडून प्रश्न विचारतो, कंपनी प्रायवेट लिमिटेड करताना त्याची नोंद कुठे करत असतात याबद्दल सांगू शकाल?

उत्तर

त्यातही अनेक प्रकार असतात एलएलपी वगैरे. मलाही माहिती घ्यावी लागेल!

प्रश्न २६

GST चा या व्यवसायावर काही परिणाम? GST भरण्याची प्रक्रिया किंवा कर, परवाने या सरकारी बाबी त्रासदायक आहेत का?

हेमंत यांचं उत्तर

दहा लाखाच्यावरील व्यावसायिकांना ते आवश्यक आहे. मी अजून छोटा व्यावसायिक आहे. परंतु त्रासदायक नसावे कारण गरज सरकारला आहे!

हे सकारात्मक आहे!

प्रश्न २७

येणार्‍या काळात या क्षेत्रात कितपत वाव आहे असं आपल्याला वाटतं? या क्षेत्रात सध्या किंवा भविष्यातील आव्हाने काय असतील?

हेमंत यांचं उत्तर

खूप वाव आहे. भारतात सध्याला वेब आणि मोबाईल अँपसाठी प्रचंड वाव आहे. जितकं कराल तितकी संधी!

प्रश्न २८

स्त्रीला तिचं वय अन पुरुषाला त्याचा पगार विचारू नये असं म्हणतात, पण तुम्हाला या व्यवसायातून वार्षिक उत्पन्न किती मिळतं?

हेमंत यांचं उत्तर

फार नाही येत साधारण महिन्याकाठी २०-२५ हजारांचा पल्ला गाठतो!

प्रश्न २९

शेवटचा प्रश्न. नोकरी सोडून हा व्यवसाय सुरू केलात, समाधानी आहात की निर्णय चुकला असं वाटतं?

हेमंत यांचं उत्तर

अगदी सांगायचं झालं तर घरी आल्यावर कधी डोकं दुखत नाही. आणि आवडीचे क्षेत्र असल्याने कामाचं ओझं वाटत नाही! सर्वात मोठा संघर्षाचा काळ जरी असला तरी तितकाच सुखाचा काळ देखील आहे!

खूप खूप धन्यवाद हेमंत! आमच्या उपक्रमात तुम्ही पहिले पाहुणे म्हणून सहभागी झालात यासाठी धन्यवाद! आपल्या व्यवसायात वाढ व्हावी अन आपण उत्तरोत्तर प्रगती साधत राहाल यासाठी शुभेच्छा!!! #उद्योजकमहाराष्ट्र

 

Twitter – @mh_udyog  ||  mhudyojakmandal@gmail.com

ब्लॉग – https://mhudyojakmandal.blogspot.in/

Admin

अभिषेक बुचके  ||   ट्वीटर – @Late_Night1991   ||  latenightedition.in

#उद्योजकमहाराष्ट्र – २

#उद्योजकमहाराष्ट्र – २

#उद्योजकमहाराष्ट्र – २

नमस्कार महाराष्ट्र!

 

#उद्योजकमहाराष्ट्र ही संकल्पना राबवताना अनेक उपक्रम घ्यायचे असं ठरलं आहे. त्यातील एक महत्वाचा उपक्रम आज सुरू करत आहोत.  हा उपक्रम दोन्हीही बाजूने अतिशाय महत्वाचा ठरणार आहे.

 

नव्याने व्यवसाय सुरू करताना खूप अडचणी येत असतात. बर्‍याचदा कोणाचं सहकार्य मिळत नाही आणि मार्गदर्शनही मिळत नाही आणि मग नैराश्य येऊ लागतं. किंवा बर्‍याचदा कोणता व्यवसाय सुरू करावा किंवा तो सुरू करताना सुरुवात कोठून करावी किंवा नवा व्यवसाय सुरू करताना कोणत्या बाबी आवश्यक आहेत याबाबत बर्‍याचदा संभ्रम असतो अन अनेक प्रश्न असतात. ते प्रश्न कोणाला विचारावेत हासुद्धा महत्वाचा प्रश्न असतो. यावर एक सहकार्य आणि छोटीशी मदतव् हावी म्हणून आम्ही हा छोटासा उपक्रम हाती घेत आहोत.

 

हा उपक्रम आहे मुलाखतीचा! यामध्ये आपण विविध उद्योजकांची मुलाखत घेऊन त्यांच्या उद्योगाबाबतीत माहिती तर घेणारच आहोत शिवाय त्यांच्या मार्गाने या उद्योगक्षेत्रातील विविध बाबी उलगडून दाखवणार आहोत.

 

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात अनेकजण उद्योग/व्यवसाय करतात. त्या लोकांच्या मुलाखती घेऊन आपण नवख्यांना मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. यातून जे मुलाखत देत आहेत ते त्यांच्या व्यवसाय/उद्योगाचाही मार्केटिंग करता येईल. त्यांचा व्यवसाय/उद्योग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल यासाठीही आमचे प्रयत्न असणार आहेत. शिवाय यासाठी कसलेही मूल्य असणार नाही.

 

महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी काहीतरी करता यावे यासाठी आमचे हे प्रामाणिक प्रयत्न आहेत. तर आपला मुलाखत हा उपक्रम आता कायमस्वरूपी सुरू असेल. त्यात जर कोणाला सहभाग घ्यायचा असेल किंवा आपल्या उद्योग/व्यवसाय बद्दल माहिती द्यायची असेल तर नक्की संपर्क करावा.

 

ट्विटर हँडल – @mh_udyog  || ईमेल – mhudyojakmandal@gmail.com  ||

ब्लॉग – mhudyojakmandal.blogspot.com

 

Admin

अभिषेक बुचके  ||  ट्विटर हँडल @Late_Night1991  || latenightedition.in

#उद्योजकमहाराष्ट्र – १

#उद्योजकमहाराष्ट्र – १

#उद्योजकमहाराष्ट्र – १

“महाराष्ट्र उद्योजक मंडळ”

मराठी माणूस व्यवसायात मागे पडतो असं म्हणतात पण ते काही खरं नाही. तसं असतं तर महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात व्यवसाय उभे राहुच शकले नसते. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात असे अनेक उद्योग-व्यवसाय आहेत जे केवळ मार्केटिंग च्या अभावामुळे मागे पडले असावेत. गुणवत्ता असूनही आपलं उत्पादन लोकांपर्यंत न पोहोचल्याने आपला व्यवसाय अपेक्षित प्रगती करण्यापासून वंचित राहतो.

व्यवसाय करत असताना कधीही आपल्याकडे असलेल्या सकारात्मक बाबींचं प्रदर्शन करून नवनवीन लोकांना जोडलं पाहिजे. तुमचं उत्पादन/सेवा जोपर्यंत एका मोठ्या जनसामुदायासमोर पोहोचत नाही तोपर्यंत त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात हिरीरीने कारभार करणार्‍या अनेक लहान-मोठ्या उद्योगसमूहाला, व्यावसायिकाला सोशल मीडिया वर हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून आम्ही “महाराष्ट्र उद्योजक मंडळ” ह्या सोशल फ्रंटची उभारणी करत आहोत!

तुम्ही जर व्यावसायिक असाल आणि महाराष्ट्राच्या कुठल्याही गावात, तालुक्यात, जिल्ह्यात आपला व्यवसाय कार्यरत असेल आणि तो जास्तीत जास्त जनसामुदायापर्यन्त विनामूल्य पोहोचवायचा असेल तर आमच्याशी संपर्क साधा!!

तुमचा व्यवसाय, उद्योगसमूह महाराष्ट्रातील जास्तीत जास्त ग्राहकांसमोर पोहोचवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे कार्य करत राहू.!

आजच्या डिजिटल युगात व्यवसायवृद्धीसाठी सोशल माध्यमांचा वापर करणे हे अत्यंत महत्वपूर्ण झालेलं आहे. पण बर्‍याच जणांना त्याचं ज्ञान नसतं तर बरेच उद्योजक वेळेअभावी ते करू शकत नाहीत. हीच कमी आम्ही भरून काढू इच्छितो!

यासाठी तुम्हाला फक्त एक पाऊल उचलायचं आहे! आमच्याशी संपर्क!

आमचा ईमेल – mhudyojakmandal@gmail.com

आमचा ब्लॉग – https://mhudyojakmandal.blogspot.in/

आमचं ट्वीटर हँडल – @mh_udyog

यापैकी कोठेही तुम्ही संपर्क साधू शकता. लवकरच फेसबुक व Whatsapp याबद्दलही माहिती देऊ.

करायचं एकच आहे की आपल्या उद्योगाची, उद्योगसमूहाची किंवा उत्पादनाची माहिती द्यायची आहे. आपल्याकडे जर business card असेल किंवा उद्योगाची माहिती देणारी Image असेल किंवा Video वगैरे असेल तर ते आम्हाला देऊ शकता. आम्ही आमच्या परीने आपल्याला सर्व प्रकारे सहाय्य करण्याचा प्रयत्न करू.

व्यवसाय कुठलाही असोत, तुमची आयटी कंपनी असेल, शोरूम असेल, हॉटेल असेल, सेवा केंद्र असेल, खानावळ असेल, महिलांच्या बचत गटातील उत्पादने असतील, शेतकर्‍यांचे दूध-फळे-भाज्या-धान्य असेल किंवा कोणतंही उत्पादन असेल आणि ते सोशल मीडियावर प्रसारित केल्याने आपला फायदा होत असेल तर आमच्याशी नक्कीच संपर्क साधा.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे यासाठी तुम्हाला कोणालाही कसलेही पैसे देण्याची गरज नाही हे ठळकपणे अधोरेखित करू इच्छितो.

मराठी उद्योजकाला पुढे नेण्यासाठी ही संकल्पना जन्मास घातली आहे हे आमच्या कायम लक्षात असेल.

या संपूर्ण उपक्रमात तुमच्या सर्वांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या सूचना व संकल्पना आम्ही नक्की लक्षात घेऊ. चुकत असू तर तेही सांगा!!!

महाराष्ट्र धर्म वाढवावा…! ह्याच प्रेरणेने आम्ही कार्य करत राहू…

संकल्पना व आयोजक

अभिषेक बुचके  || Twitter  @Late_Night1991  ||  latenightedition.in

एका लेखकाची व्यथा

एका लेखकाची व्यथा

लेखक मित्रांनो,

लेखक हा खरं तर कुठल्याही नवनिर्मितीचा जनक असतो. कल्पनेला सत्यात आणणे असो की माणसाची संवेदनशीलता जागी करणारा त्यांच्या भावनांना हात घालून त्यांच्यातील खरेपणा उघड करणे… लेखक इतक्या ताकदीचा असतो.

लेखकाच्या लेखणीने इतिहास घडतात. भले-भले राजे-महाराजेही लेखकांचा मान-सन्मान राखून असत. प्राचीन काळापासून आजपर्यंत अनेक विद्वान लेखक झाले आहेत ज्यांच्या लेखनाची, विचाराची समाजाने दाखल घेतली आहे अन त्यांनी समाजाला मार्गही दाखवले आहेत.

लेखक हा नेहमीच एखाद्या बी प्रमाणे असतो जेथून एक आनंद देणार, सावली देणारं झाड निर्माण होतं. पण आजकाल लेखकांना कितपत किम्मत आहे, कितपत मान आहे हा वादाचा विषय होत आहे. प्रत्येक गल्लीत दोन-तीन लेखक तर सहज सापडतील.

पण स्वतःच्या पायावर उभा राहिलेला मनुष्य जेंव्हा, त्याला रांगण्यापासून चालण्या-धावण्या पर्यंत ज्यांनी शिकवलं त्या जन्मदात्यांना विसरतो तिथे वाईट वाटतं.

चित्रपट क्षेत्रात तर लेखकाशिवाय काम सुरु होणं ही अशक्य आहे. लेखकही चित्रपट कसा असेल, कसा असावा ह्या बाबतीत केवळ दोन ओळींच्या संकल्पने पासून सुरुवात करतो अन अख्खा चित्रपट कागदावर उतरवतो. पण त्या कागदाचा प्रवास रिळात होईपर्यंत लेखकच गुंडाळला अन अंधुक होत जातो.

लेखकाला पद्धतशीरपणे वापरून घेण्याची रीत हल्ली बऱ्याच लोकांना अवगत होताना दिसत आहे. पैसा, ओळख, कथेचं क्रेडिट ते सन्मान यापैकी सगळ्या गोष्टी कुठल्याच लेखकाला मिळत नाही. मेंदूचा भुगा होईपर्यंत रात्र रात्र जागून तयार केलेल्या कथा-पटकथा, त्या मेहनतीचा योग्य मोबदला न देता कधी फुकट तर कधी माफक दरात ढापल्या जातात. नवख्या लेखकांना तर अक्षरशः गृहीत धरलं जातं. अनुभव घे म्हणून त्यांच्याकडून फुकटात कामे करून घेतली जातात.

चित्रपटाचे काम सुरु होईपर्यंत लेखकांना पैसे देणं ही तर अंधश्रद्धा समजली जाते. अन यदाकदाचित चित्रपट सुरूच होऊ शकला नाही तर लेखकाची मेहनत तर वाया जातेच पण पैसाही दिला जात नाही. लेखक बिचारा सगळी मेहनत पाण्यात गेली म्हणून हताश होऊन बसतो. स्क्रिप्टला कागदाचे तुकडे अन ‘अशा खूप स्क्रिप्ट पडल्या आहेत’ असं म्हणनार्‍यांचा तर अक्षरशः तिटकारा येतो.

मोठमोठ्या पुरस्कार सोहळ्यात सहाय्यक अभिनेता, नवोदित कलाकार, फ्रेश चेहरा अजून काय-काय नावाने अभिनेते-अभिनेत्री यांना बक्षीस वाटली जात असताना कथा, पटकथा, संवाद याला एकच गृहीत धरून एकच पुरस्कार असतो. हे म्हणजे जिथे उगम झाला त्यालाच विसरण्याचा प्रकार आहे. लेखक चित्रपटाच्या मुख्य प्रवाहातील समजला जातच नाही. तो फक्त एक………

मोठमोठ्या लेखकांच्या कथा स्क्रिप्ट घेऊन त्या तोडून मोडून सर्रास वापरली गेल्याचीही उदाहरणे आहेत. अशा वेळेस हतबल होण्याशिवाय पर्याय नसतो. लेखकांना स्वतःच्या हक्कासाठी संघटना स्थापन कराव्या लागतात असे दिवस आहेत. असं का होत आहे याचाही विचार करावा लागेलच. त्यांच्याकडे जाणीवपूर्वक कमीपणाने बघण्याची काहींची मानसिकता असते. सर्वच असे असतात असं नाही पण इतर कलाकारांच्या दृष्टीने लेखकांना मानधन कमी देणे हा त्याचाच भाग आहे.

लेखक हे बऱ्याचदा संवेदनशील माणसे असतात; असं असल्याने त्यांचा व्यावहारिक पद्ध्तीने फायदा उचलला जातो. चित्रपट येऊन जातातही पण लेखकाला राहिलेल्या रकमेसाठी, कामाच्या मोबादल्यासाठी निर्मात्या-दिग्दर्शकाकडे खेटे मारावे लागतात; एखाद्या मजुराप्रमाणे!

लेखकांनीही आता सगळी निरर्थक मूल्ये बाजूला ठेऊन लेखकांनीच कठोर अन व्यावहारिक बनलं पाहिजे. हातात advance येईपर्यंत काम सुरु करू नये असा पवित्रा घेतला तर चित्रपटनगरी अन निर्माते-दिग्दर्शक भानावर येतील. लेखकाचं ना हरकत प्रमाणपत्र न मिळेपर्यंत चित्रपटच काय तर लघुपटही दाखवता येऊ नये अन महोत्सवात दाखल करून घेऊ नयेत.

तशा तर बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्या आणि करण्यासारख्या पण सुरुवात तरी व्हावी! अलीकडेच दोन-तीन वाईट अनुभव आले अन हताशपणा अन हतबलता जाणवत होती, त्यातूनच ह्या भावना उमटल्या.

धन्यवाद!

 

पुस्तक प्रकाशित करताय?

अरविंद जगताप यांचे पत्र…

अरविंद जगताप यांचे पत्र…

{{ COPY }}

#पत्रास_कारण_की…  #आवाहन

चला_हवा_येऊ_द्या या शोसाठी पत्र लिहीणारे व अख्ख्या महाराष्ट्राला चटका देणारे अरविंद जगताप यांचे मराठ्यांना पत्र. सर्वांनी नक्की वाचा.

प्रिय मराठयांनो,

माझं गाव #कोपर्डी. माझं नाव…… जे तुमच्या मुलीचं असेल ते. सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन. तुम्ही एकदिलाने लाखोंच्या संख्येने शांतपणे आणि शिस्तीत मोर्चा कसा काढतात हे जगाला दाखवून दिलं. एकत्र यायला कुठल्या नेत्याची गरज नाही हे सिध्द केलं. मला तुमचा अभिमान आहे. कारण मी पण मराठा आहे. पण स्वातंत्र्य मिळण्याआधी जो महाराष्ट्रात राहणारा तो मराठा असं समजायचे लोक. मराठा ही फक्त जात नाही. समाज नाही. साम्राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. अटकेपार झेंडे लावणारे मराठे. जातीपातीच्या भानगडीत न पडता शिवाजी महाराजांच्या नावाने जीव ओवाळून टाकायला तयार असणारे मराठे. मराठा तितुका मेळवावा असं अभिमानाने वाटावं असे एकदिल आणि एकजीव मराठे.

पण हे कौतुक करायचे दिवस आहेत? उस पिकवणारा शेतकरी कधी उसतोड कामगार झाला हे आपलं आपल्याला तरी कळलं का? सगळ्या गावाने ज्याच्यावर अवलंबून रहावं असा #कुणबी अचानक सगळ्या जगावर अवलंबून असल्यासारखा का वागतोय? गावगाड्याला धीर देणारा मराठा आत्महत्या का करतोय? लोकांच्या चुका आहेत पण आपल्याही काही चुका झाल्याच ना.

आज लोकांच्या भीतीने घराचा उंबरठा न ओलांडणारी लेक कालपर्यंत उंबऱ्याआड का होती? आपणच अडवून ठेवलं होतं तिला. आपण #भावकीला बांध ओलांडू द्यायचा नाही म्हणून अडून बसलो. लोक देशाची सीमा ओलांडून जात होते. नवे नवे देश पहात होते. बारीक विचार केला तर आज फक्त आपणच जाती आणि मातीला चिकटून बसलोय. ह्या जातीचा आणि मातीचा अभिमान सोडला पाहिजे आपल्याला. खरंच आपल्याला काय दिलं या जातीने? अभिमान. इतिहास. पण या इतिहासाच्या ओझ्याखाली आपण एवढे द्बलोय की आपण आपल्या हजारो भावांवर दरवर्षी विष पिऊन जीव द्यायची वेळ आलीय हे पण मान्य करायला तयार नाही. आपल्याला अभिमान पाहिजे फक्त शिवाजी महाराजांचा. ज्यांनी जात मानली नाही. प्रत्येक जातीचा माणूस त्यांच्या दरबारात होता. सेवेत होता. प्रेमात होता. विचार करा महाराज जर फक्त मराठ्यांनी युध्द लढायचं असं ठरवून युध्द लढले असते तर काय झालं असतं? मुसलमान, ब्राम्हण, न्हावी, धनगर, माळी ….मला सांगा कुठली जात #शिवाजी महाराजांच्या मदतीला आली नाही? महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या प्रत्येक जातीने शिवाजी महाराजांच्या #स्वराज्याच्या स्वप्नाला साकार करण्यात मदत केली. आणि जेंव्हा गुन्हा झाला तेंव्हा महाराजांनी त्याची जात बघितली नाही. त्याला तटस्थपणे शिक्षा दिली. मग आपण एका गुन्हेगाराच्या जातीत का अडकलोय? या देशात यापुढे कुठल्याच जातीचा, कुठल्याच धर्माचा कुठलाच हरामखोर बलात्कार करू शकणार नाही असा मोर्चा आपण का नाही काढायचा? जातीला भीती दाखवायची नाही. गुन्हेगारांना भीती दाखवायचीय गरज आहे. आणि महाराष्ट्रात तरी आपण मराठे मोठे भाऊ म्हणून हे नक्कीच करू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक किंवा अहिल्याबाई होळकर. नकळत एका जातीत गुंतले. गुंतवले गेले. त्यांना आपल्याला जातीच्या चौकटीतून मुक्त करायचंय. आणि हो शिवाजी महाराजांना त्याच मार्गावर नेऊ नका. सध्या जातीपाती पलीकडे जयंती साजरी केला जाणारा हा एकमेव मराठी माणूस आहे याची जाणीव ठेवा. देव सुद्धा जातीपातीत वाटले गेलेत. फक्त शिवाजी महाराज उरलेत. जे अजूनही सगळ्यांचे आहेत. त्यांच्यासाठी. त्यांची शप्पथ आहे तुम्हाला.

मला सांगा मराठा जातीच्या नावाने राजकारण करणारा कोण #अॅट्रॉसिटीबद्दल उघडपणे बोलतोय? मग तुमचा आयुष्यात कधी अॅट्रॉसिटीशी संबंध आलेला नसताना कशाला विषय काढता? अन्याय झाला तर किती संख्येने तुम्ही एकत्र येऊ शकता हे लक्षात आलं आता. पुन्हा पुन्हा हे दाखवून द्यायचं का? कुणी अॅट्रॉसिटीचा गैरवापर केला तर पुन्हा एकत्र येऊ असेच शांतपणे. पण आता ती गरज आहे का? अॅट्रॉसिटीला एवढा विरोध एकट्याच जातीने का करायचा? एकाच जातीला भीती आहे असं दाखवून द्यायचंय का? मग? खरंतर आता दाखवून द्यायचं की आपण मोठे भाऊ आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विद्वत्ता बघून मोठ्या भावासारखे पाठीशी उभे राहिलेले शाहू महाराज, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड आठवा. तुम्ही प्रोत्साहन देणारे आहात. चिथावणी देणारे नाही. तुम्हाला अॅट्रॉसिटी नाही, महाराष्ट्रातला जातीयवाद संपवायचा आहे. शपथ घ्या. आवळा दाखवून कोहळा काढणाऱ्या भुरट्या लोकांच्या सभेला गर्दी करणारे आपण उरलो नाही. आता आपण आरक्षणाच्या नावाने वर्षानुवर्ष मूर्ख बनणारे लोक नाही. इतर जातींना धाक दाखवण्यासाठी आपण एकत्र आलो नव्हतो आणि इथून पुढेही यायचं नाही. आपल्या नावाने, आपल्या महाराजांच्या नावाने राजकारण करणारे आणि सगळ्याच पक्षात असलेले कावळे हुसकवायला आपण जमलोय. जमणार आहोत. आता कुठल्याच पक्षाने कुठल्याच जातीचा आणि शिवाजी महाराजांचा फायदा घ्यायचा नाही. महाराज कुणाच्या घरची मालकी नाही. महाराज महाराष्ट्राचे आहेत. देशाचे आहेत. जगातले सगळ्यात थोर योद्धे आहेत. आणि या भूतलावर असे निर्व्यसनी, चारित्र्यवान आणि सगळ्या जातींना आणि धर्मांना सोबत घेऊन लढलेले राजे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे सुद्धा झाले नाही. महाराज फक्त मराठ्यांचे नव्हते. स्वराज्याचे होते. आणि आपण मराठे म्हणजे जात नाही महाराष्ट्र आहोत. भारतात राहणारा प्रत्येकजण भारतीय आहे आणि महाराष्ट्रात राहणारा प्रत्येकजण मराठा आहे. शिवरायांचा भक्त आहे.

जात म्हणून जमलेल्या मराठयांनो, कळकळीची विनंती आहे आता स्वप्नात रमायचं नाही. भुरट्या लोकांच्या #दरबारात जमायचं नाही. शेतातल्या बांधात अडकायचं नाही. आता जगाच्या सीमेचा विचार करायचा. काळी आई म्हणून मातीला चिटकून बसायचं नाही. मातीत काहीच येत नाही हाती. मातीत फक्त मातीच होते आता. इथून पुढ पेरते व्हा हा मंत्र विसरून जायचा. आता कर्ते व्हायचं. ज्याला शेती करायची त्याला करुद्या. पिकवू द्या. घाम गाळू द्या. इथून पुढ जातीला नाही शेतीला आरक्षण पाहिजे. शेती करणाऱ्याला मोफत शिक्षण आणि शिष्यवृत्ती पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरातला एकतरी पोरगा नौकरीत पाहिजे. नाहीतर खा म्हणावं ढेकळं. मराठा राजकारणामुळे गरीब शेतकरी बदनाम झाला. हा जातीचा नाही शेतीचा प्रश्न आहे. सवलत झेड पी आणि ग्रामपंचायतीत वर्षानुवर्ष खुर्च्या उबवणाऱ्या मुजोरांना कशाला पाहिजे? गरज आहे ती कोरडवाहू शेतकऱ्याला. अल्पभूधारक शेतकऱ्याला. जात कोणतीपण असो शेतकऱ्याला आरक्षण द्या म्हणून मागणी करा. आरक्षण लोकांचं पोट भरणाऱ्याला मिळालं पाहिजे. शहरातल्या झोपडीवर डिश अँटेना दिसतो. गावात पक्षाचे झेंडे दिसतात. हा फरक आधी संपला पाहिजे. मोर्चात घरच्या भाकरी बांधून येणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगात बळ कसं येईल हा महत्वाचा प्रश्न आहे. संख्याबळ महत्वाचं नाही. मोर्चात येणाऱ्या मजुराच्या आर्थिक ताकदीचा प्रश्न महत्वाचा आहे जातीच्या ताकदीपेक्षा. एकच प्रश्न विचारू? बलात्कारामुळे एवढे लाखो लोक जमताय तुम्ही. माझे शेतकरी बांधव आत्महत्या करतात तेंव्हा का एकत्र येत नाही? इथून पुढे एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही असं काहीतरी करा आता एकत्र येऊन. एवढ नक्कीच करा. तरुणपणीच विधवेचं जीवन जगायची वेळ आलेल्या आपल्या बहिणींसाठी एकत्र येऊन काहीतरी करायला पाहिजे. प्रत्येक जातीत जातीच्या नावाने आग लावणारे हरामखोर नेते आहेत. त्यांच्या भल्यासाठी वेळ घालवू नका. अॅट्रॉसिटी पेक्षा आपल्या शेतकरी बांधवांच्या आत्महत्येचा प्रश्न जास्त मोठा आहे. त्यात लक्ष घाला. हात जोडून विनंती करते, माझ्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घ्यायला माझा एखादा मराठी भाऊ जेलमध्ये गेला हे मला कधीच आवडणार नाही. माझा एखादा भाऊ पोलीस ऑफिसर झाला तर मला जास्त अभिमान वाटेल. माझा प्रत्येक भाऊ कायद्याचा रक्षक झाला पाहिजे हे माझं स्वप्न आहे. मोर्चातून काही घडलं पाहिजे ना? मग हे घडवा. एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची सोय करा. शेतकऱ्याला आरक्षण मिळवून द्या. शेतीतून, मातीतून जन्मलेले अधिकारी घडू द्या. बलात्काराएवढीच शेतकरी आत्महत्येची पण तळमळ वाटू द्या. एकाही मराठा नेत्याने आपल्या शाळेत, कॉलेजमध्ये शेतकऱ्याच्या मुलाला मोफत शिक्षणाची घोषणा केली नाही. एकाही मराठा नेत्याच्या साखर कारखान्यात मराठा जातीच्या उसाला जास्त भाव नाही. एकाही मराठा नेत्याच्या पक्षात मराठा तरुणाला विधानसभेत सोडा नगरसेवक म्हणून फुकट उमेदवारी नाही. एकही मराठा नेता आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या बायकांसाठी काही चांगली योजना घेऊन येत नाही. मग काय करायचं? गप्प बसायचं? नाही. आधी जातीच्या नावाने बोंब मारणाऱ्या लोकांपेक्षा शेतीच्या नावाने एक होणारी माणसं बघायची. टाटा सफारी, स्कॉर्पिओ किंवा बुलेटच्या मागे नंबर प्लेटवर धुळीत माखलेले महाराज शोधायचे. नंबरप्लेटसोबत मालक पण घासून पुसून साफ करायचा. शोधायचा नवीन मावळा. ज्याच्या नंबरप्लेटवर नाही हृदयात शिवाजी महाराज आहेत. जो जातीसाठी नाही देशाच्या मातीसाठी शिवाजी महाराज मानतो. मला तर आज राजकारणात असा एकपण नेता दिसत नाही. एकपण पक्ष दिसत नाही. पण तुम्ही महाराष्ट्र धर्म म्हणून असेच एकत्र राहिला तर यांच्यातल्या एखाद्याला अक्कल येईल. पुन्हा महाराजांच्या मनातलं स्वराज्य येईल. महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र पहायचा असेल तर आधी सगळ्या जातीला बरोबर घेऊन चालायला शिकलं पाहिजे.

लक्षात ठेवा. इथून पुढे मोर्चा मराठ्यांचा पाहिजे. पण धर्म पाहिजे महाराष्ट्राचा. महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मराठा आहे ही भावना पुन्हा निर्माण झाली पाहिजे. कारण माझ्या शिवाजी महाराजांचं कौतुक कशामुळे आहे? ‘तर महाराष्ट्र धर्म राहिला काही. तुम्हा कारणे.’ माझ्या शिवाजी महाराजांच्या मनात होतं तसं सुराज्य पाहिजे. माझ्या जिजाऊच्या स्वप्नातला महाराष्ट्र पाहिजे. शेतकऱ्यासाठीची महात्मा फुलेंची तळमळ आठवा, आंबेडकरांचे शेतकऱ्यासाठीचे विचार वाचा, शरद जोशींचे प्रयत्न आठवा, आज मराठा नसलेले किती लोक शेतकऱ्यासाठी त्याने आत्महत्या करू नये म्हणून काम करतात त्याचा विचार करा. आता तुम्ही सुरुवात चांगली केलीय. आदर्श घालून दिलाय. मी कारण झाले. पण पुन्हा कोपर्डीची आठवण नको. कोपर्डीचं नाव निघालं की प्रत्येक नराधमाची दातखीळ बसली पाहिजे. कोपर्डीचं नाव निघालं की प्रत्येक मराठ्याने सांगितलं पाहिजे ही महाराष्ट्रातली मुलीवरच्या अत्याचाराची शेवटची घटना. यानंतर पुन्हा कुठल्या हलकट कुत्र्यांची मुलींकडे वाईट नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही. कारण एक मराठा म्हणजे फक्त एक लाख मराठा नाही. एक मराठा म्हणजे एक महाराष्ट्र. माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र.

इथून पुढे प्रत्येक मोर्चात नगर, खैरलांजी, दिल्ली, मुंबई प्रत्येक मुलीवर झालेल्या अन्यायाचा निषेध झाला पाहिजे. माझ्या शिवाजी महाराजांची शप्पथ आहे तुम्हाला.
मी आपण मराठा असं म्हणतेय कारण मी मराठा ही जात मानत नाही. मराठा हे साम्राज्य मानते. जो शिवाजी महाराजांना मानतो तो मराठा. जो महाराष्ट्रात राहतो तो मराठा.

जय हिंद!

लेखक – अरविंद जगताप.

महत्वाची सूचना – ही माहिती आम्हाला WhatsApp व facebook वर उपलब्ध झाली. सध्या महाराष्ट्रात मराठा मोर्चा खूप गाजत आहे आणि चला हवा येऊ द्या मधील अरविंद जगताप यांचे पत्र तर सगळ्या महाराष्ट्राचे डोळे उघडणारं तर कधी पानवणारं असतं. त्यामुळे ही माहिती share करणे आम्हाला महत्वाचं वाटत असलं तरी ते अरविंद जगताप यांचेच आहे याची पुर्णपणे खात्री आम्ही देऊ शकत नाही.

संबंधित पोस्ट

बनी तो बनी..

केस गळतीवर उपाय

केस गळतीवर उपाय

{{ COPY }}

#Hair Loss Treatment  ||  #गळणार्‍या केसांची समस्या  || #केस गळतीवर उपाय  || अकाली वृद्धपणा

#गंजेपन व बाल झड़ने से परेशान हैं तो —-

काले लंबे घने बाल

1-दही को तांबे के बर्तन से ही इतनी देर रगडे़ कि वह हरा हो जाए। इसे सिर में लगाने से गंजेपन की जगह बाल उगना शुरू हो जाते हैं।

2-#मेथी के बीजों का पेस्ट बालों में लेप करने से बालों का झड़ना बन्द हो जाता है।
Patanjali Kesh Kanti Milk Protein Hair Cleanser Shampoo, 200ml

3-#चुकन्दर (बीट) के पत्ते का रस सिर में मालिश करने से गंजेपन का रोग मिट जाता है और नये बाल आना शुरू हो जाते हैं।

4-#नीम के पत्ते 10 ग्राम तथा बेर के पत्ते 10 ग्राम लेकर दोनों को अच्छी तरह पीसकर इसका उबटन (लेप) तैयार कर लें। इसके बाद इस लेप को सिर पर लगाकर 1 से 2 घण्टे बाद धोने से बाल उग आते हैं। इसका प्रयोग एक महीने तक करने से लाभ मिलता है।
Patanjali Hair Conditioner, Almond, 100g

5-#उड़द की दाल को उबालकर पीस लें। रात को सोने के समय सिर पर लेप करें। इससे गंजापन धीरे-धीरे दूर हो जाता है और नये बाल आना शुरू हो जाते हैं।

6-गंज (सिर पर कहीं से बाल उड़ जाने को गंज कहते हैं) वाले भाग पर #प्याज का रस रगड़ने से बाल वापस उगने लगते हैं और बाल गिरने रुक जाते हैं।

7-प्याज के रस में नमक और #कालीमिर्च का पाउड़र मिलाकर #मालिश करने से सिर की दाद के कारण सिर के उड़ गये बाल फिर से आने लगते हैं।
Indulekha Bringha Hair Oil Selfie Bottle, 100ml

8-प्याज का रस #शहद में मिलाकर गंजेपन की जगह पर लगाने से फिर से बालों का उगना शुरू जाता है।

9-पके केले के गूदे को #नींबू के रस में मिलाकर लगाने से गंजेपन का रोग मिट जाता है।

10-हरे #धनिया का पानी निकालकर (पत्ते का रस) सिर पर मालिश करने से गंजेपन का रोग मिट जाता है और नये बाल आना शुरू हो जाते हैं।

11-#अलसी के तेल में #बरगद (वटवृक्ष) के पत्तों को जलाने के बाद उसे पीसकर और छानकर रख लें। इस तेल को सुबह-शाम सिर में लगायें। इसी तरह इसे लगाते रहने से सिर पर फिर से बालों का उगना शुरू हो जाता है।
Amway Nutrilite Hair,Skin And Nails – 60 Tablets

12-बालों में भाप देने से बाल रेशम की तरह चमकदार और स्वस्थ होते हैं। इससे बालों का झड़ना भी बन्द हो जाता है। भाप देने के लिए सबसे पहले एक भगोने में गर्म पानी लें और एक तौलिये में इसे भिगोकर हल्का सा निचोड़कर बालों में लपेट लें। ठंड़ा होने पर दूसरे तौलिया को इसी तरह भिगोकर लपेटें। इसी तरह 10 मिनट तक भाप दें। जिस दिन बालों में भाप देनी है उससे एक दिन पहले ही सिर में तेल लगा लें।

13-सूखे #आंवले को रात में पानी में भिगोकर रख दें। सुबह इसी पानी से सिर को धोयें। इससे बालों की जड़ें मजबूत हो जाती हैं |

14-कम उम्र में बाल गिरते हों और बाल सफेद हो गये हों तो इसके लिए #तुलसी के पत्ते और #आंवले का चूर्ण पानी के साथ मिलाकर सिर में मालिश करें। इसके 10 मिनट बाद सिर को धो लें। इससे बालों का झड़ना कम होता है तथा बाल काले और लंबे भी होते हैं।

15-#मेंहदी के पत्ते और चुकन्दर के पत्ते को चटनी की तरह पीसकर सिर में लगाने से बालों का गिरना बन्द हो जाता है और नये बाल आ जाते हैं।

खुलासा – संबंधित माहिती एका seminar मधून प्राप्त झालेली आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचून त्याचा लाभ व्हावा यासाठी ही पोस्ट…

अध्यात्म, आयुर्वेद आणि औषधे

 

पुस्तक प्रकाशित करताय?

पुस्तक प्रकाशित करताय?

#पुस्तक_प्रकाशन  }{  #आर्थिक गणिते  }{  #लेखकांची किम्मत  }{  #ऑनलाइन जग  }{  #Publishing_Book?  }{ बनवाबनवी  }{ फसवाफसवी  }{

अलीकडेच एका मराठी पुस्तक प्रकाशकाची भेट घडली. असच मित्रासोबत बसलेलो असताना माझ्या लिखानाबद्धल विषय निघाला. मी एक कादंबरी अन एक-दोन कथासंग्रह वगैरे खरडले होते. त्यातील “संक्रमण” नावाची कादंबरी मी अगोदरच BookGanga.com वर ई-पुस्तक स्वरुपात प्रकाशित केली होती आणि इतर कथासंग्रह ह्याच वेबसाइट वर Android App च्या स्वरुपात प्रसिद्ध केले होते.

मला मित्राने विचारले की, हे सगळं साहित्य (असं तो म्हणाला. माझं लिखाण साहित्य वगैरे आहे का ते मला माहीत नाही) खर्‍या पुस्तक स्वरुपात म्हणजेच hard copy स्वरुपात का आणत नाहीस. मी आधी हसलो आणि नंतर त्याला ह्या बाबतीत ज्या काही अडचणी आहेत त्या स्पष्ट केल्या. त्याला त्यावर विश्वास बसत नव्हता. त्याने सांगितलं की त्याच्या ओळखीचे कोणीतरी प्रकाशक आहेत म्हणे. आपण जाऊन भेटू असं तो म्हणाला.

मला त्यात फार उत्साह नव्हता. कारण तिथे गेल्यावर काय वाढून ठेवलेलं आहे हे मला आधीच्या अनुभवावरून माहीत होतं. मी डोक्यातून हा विचार काढून टाकला होता. पण तिसर्‍याच दिवशी त्या मित्राचा फोन आला. बिचार्‍याने माझ्यासाठी त्या प्रकाशकाची वेळ घेतली होती. त्या प्रकाशकाने त्याला फोनवर काहीच माहिती दिली नाही. या…बसू…बोलू असं सांगितलं. मित्राचा उत्साह वाढलेला होता. तो मंनापासून माझी मदत करू इच्छित होता. लेखक म्हणजे कोणीतरी भारी माणसं असतात असा त्याचा गोड गैरसमज होता. तो मला काहीतरी ग्रेट वगैरे समजायचा. मी मनात लोळून-लोळून हसायचो.

शेवटी संध्याकाळच्या वेळी आम्ही त्या प्रकाशकांना भेटायला निघालो. आधी मी त्याला पाणीपुरी वगैरे खाऊ घातली. तो परत जाताना खाऊ म्हणत होता, पण जाताना त्याचा मूड नसणार हे मला आत्ताच माहीत होतं. आम्ही पोटपूजा करून तिकडे निघालो.

एका जुनाट इमारतीत ते ऑफिस थाटलं होतं. आम्ही आत गेलो. प्रकाशक साहेब एकटेच काहीतरी वाचत बसले होते. त्यांचा चेहरा गंभीर होता. आमच्या मित्राला बघताच त्यांनी त्याला ओळखलं. बसा वगैरे म्हणाले आणि आम्ही बसलो. ओळख-पाळख झाली. चहा पाणी झालं. मित्राने विचारलं, काही कामात होता का? ते म्हणाले, थोडंसं. ते कसलंतरी साप्ताहिक चालवत होते. त्याचं काहीतरी काम चालू होतं. मग विषयाला हात घातला. मी कादंबरीचा विषय सांगितला. त्याचं आजच्या काळाशी काय संलग्नता आहे, त्याचं सामाजिक वगैरे महत्व काय हे सांगितलं. काही प्रश्नोत्तरे झाली.

मग महाशय बोलायला लागले. त्यांनी टेबलवर, काचेखाली एक कोटेशन ठेवलं होतं. त्यांनी त्याचं दर्शन आम्हाला दिलं. आणि सांगू लागले… ते सांगत होते अन माझ्या मित्राचा चेहरा मात्र हळूहळू पडत होता. बिचारा निराश होत होता. मला ह्याची सवय असल्याने मी सहजपणे हे बघत होतो. महाशयांनी भारी स्कीम सांगितली… तुमची कादंबरी चारशे पानांची आहे… मग काहीतरी कॅलक्युलेशन… मग एक रक्कम सांगितली… पन्नास हजारांच्या आसपास… म्हणजे आम्ही त्यांना तितकी रक्कम द्यायची… ते हजार प्रती छापणार… त्यातील दोनशे आम्हाला देणार… ती रद्दी आम्ही घरी घेऊन यायची… बाकीच्या उरलेल्या आठशे प्रतींचं ते काहीही करणार… काहीही म्हणजे, त्या विकणार… त्यांचे वितरकांशी ओळखी असतात, ग्रंथालय वगैरे असतात तिथे त्या खपवणार… असा तो प्रकार!!!

मित्राचे डोळे मोठे होत गेले आणि नंतर चेहरा बारीक करून बसला तो. मित्राने विचारलं की यात आमचा आर्थिक फायदा काय? तर ते सर्वप्रथम खो-खो हसले अन नंतर म्हणाले की यात आर्थिक फायदा नसतो. फक्त मोठ्या लेखकांनाच royalty किंवा मानधन असतं. बाकीच्यांची हाऊस असते. त्याला मी स्वतः खुमखुमी किंवा खाज म्हणतो. महाशय पलीकडच्या कोपर्‍यात ठेवलेल्या वही-डायर्‍यांच्या गठ्ठयाकडे बोट करत म्हणाले म्हणाले, ते पहा अनेक लेखकांनी माझ्याकडे त्यांचं साहित्य दिलं आहे. ते मी वाचवं अन आवडलं तर छापावे. यावर परत हसणं. मग आम्ही ठीक आहे वगैरे म्हणून बाहेर पडलो. मोफतचा चहा बरा होता.

बाहेर आलो.

आमचा मित्र भलता संतापला. म्हणाला हा शुद्ध धंदा आहे. मी म्हणालो, मग काय सेवा करायला बसले आहेत का ते? आमची चर्चा झाली. आम्ही जर स्वतः प्रिंटिंग प्रेस मध्ये जाऊन छपाई करून घेतली तर आम्हाला पन्नास हजारांत हजार प्रती छापून मिळाल्या असत्या. पण ती रद्दी योग्य माणसांच्या हातात कशी पोचवायची?? म्हणजे वाचकांपर्यंत कशी पोचवायची? वितरण कसं करायचं? का घरोघरी डिटर्जंट घेऊन फिरणार्‍या salesman प्रमाणे घरी जाऊन स्वतःचे पुस्तकं विकायचे. आणि ग्रंथालय अन इतर दुकानांचे उंबरठे झिजवायचे.

हा विचार मी पहिल्यांदा कादंबरी लिहिली अन प्रकाशन करायच्या (गैर)विचारात पडून हिंडहिंड केली तेंव्हाच सोडून दिला होता.

आपल्याकडे दहात पाच माणसे लेखक असतात. पुण्यासारख्या शहरांत तर ते जास्त आहे. जवळजवळ सगळेच (अस्सल पुणेकर) लेखक असतात. अशा लेखकांची पुस्तके प्रकाशक कशाला छापत बसतील. त्यांना काय पैसा जास्त झाला आहे म्हणून? आजकाल प्रकाशक स्वतः विषय घेऊन एखाद्या जाणकार अन मोठ्या व्यक्तीकडे जातात अन पुस्तक लिहून मागतात. त्यांना एकदाच मानधन देतात. कारण त्या लेखकाच्या नावावर पुस्तकं खपून त्यांना पैसा मिळू शकतो.

रोज नवनवे लेखक येऊन पुस्तके छापा म्हणतील तर ते त्यांनाही अशक्य आहे. पण प्रकाशकांनी जरा नम्रपणा दाखवायला हवा. ज्याप्रकारे अनेक लेखकाचे लिखाण त्या कोपर्‍यात पडून होतं ते जरा वाईट वाटलं. कारण लेखकही मेहनत करून लिहीत असतो. बुद्धी खर्च करत असतो. त्यालाही किम्मत आहेच की. एखादा मजूर तुमच्याकडे राबला किंवा कोण इंजीनियरने तुम्हाला सॉफ्टवेअर तयार करून दिलं तर तुम्हाला पैसे मोजावेच लागतात तसा विचार करायला हवा. लेखकाची कृती फुकट घ्यायची अन त्यावर पैसा कमवायचा हा चुकीचा प्रकार आहे. म्हणजे ते प्रकाशक म्हणाले त्याप्रमाणे मीच त्यांना पैसे देणार अन आठशे प्रतींचे पैसेही तेच घेणार यात माझा आर्थिक तोटाच आहे. त्यात त्या प्रकाशकला काहीच कष्ट घेण्याची गरज नाही.

ह्या सगळ्यापेक्षा एक उत्तम अन सहज-सोपा प्रकार आता समोर उभा आहे. ऑनलाइन जग!

स्वतःच्या कृती, लेखन तुम्ही ह्या जगात सहज प्रकाशित करू शकता. बूकगंगा सारखे प्लॅटफॉर्म खूप उपयोगी आहेत. अगदी नाममात्र पैशांत तुम्ही स्वतःच्या पुस्तकाची ई-आवृत्ती काढू शकता. आज जवळजवळ सगळेच लोक स्मार्ट फोन वापरतात. त्यांना हे पुस्तकं कधीही विकत घेता येतील अशी सोय आहे. शिवाय पैसे देवाण-घेवाण यात सगळी प्रक्रिया ऑनलाइन असल्याने कसलाच अविश्वास किंवा गोंधळ नाही. हजार लेखक आले तरी त्यांना सामावून घेण्याची ह्या माध्यमाची ताकत आहे. उगाच उंबरठे झिजवण्यात काही अर्थ नाही. काळाची पावले ओळखली पाहिजेत.

#भालचंद्र नेमाडेंची #बिढार ही कादंबरी वाचली होती. त्यात एक किस्सा आहे. त्यात एक तरुण एक अप्रतिम कादंबरी लिहितो पण त्याला प्रकाशक फसवतो. सगळे डोर प्रकाशकाच्या हातात असतात. मेहनत याची असते पण प्रकाशक ते सगळं उद्ध्वस्त करून टाकतो. ही घोर समस्या आहे. लेखकांना अशी वागणूक अन किम्मत म्हणजे फार वाईट!

@व्यंकटेश माडगुळकर हेही याबद्धल लिहितात. त्यांच्या काळीही लेखकांना आर्थिक स्थैर्य नव्हतं. प्रपंच चालवण्यासाठी काहीतरी वेगळा उद्योग करावा लागतो. लेखकाच्या लेखनावर पैसे लावणारा प्रकाशक पैसा कमावतो अन लेखक फक्त ‘नावापुरता’ राहून ‘नामानिराळा’ होतो. परदेशात लेखकांना मान अन किम्मत आहेच शिवाय मोठा आर्थिक पाठींबाही मिळतो. त्यांची कदर आहे तिकडे.

आपल्याकडे आज चेतन भगत किंवा अजून तरुण लेखक केवळ लेखन यावर पैसे कमावत आहेत. काही लेखक ऑनलाइन लिहिणं पैसे कमवतात. उत्तम आहे. जुने-जाणते जेष्ठ लेखकही आज स्थैर्य प्राप्त करून आहेत. पण सुरूवातीला त्यांनाही ह्याच अवहेलनेतून जावे लागले असेल.

@पू ल देशपांडे यांच्यासारख्या जेष्ठ-श्रेष्ठ लेखकलाही अनेकांनी पैशाला फसवलं होतं. तरी आजचा काळ थोडासा सुखदायी म्हणावा लागेल. कारण टीव्ही, चित्रपट अन जाहिरात क्षेत्र खूप विस्तारलं आहे जेणेकरून अनेक लेखकांना नियमित पैसे मिळत आहेत.  जो मूळरूपाने लेखक आहे. जो कादंबरी-कथा लिहून पारंपरिक पद्धतीने त्या प्रकाशित करू इच्छितो त्याचं अवघड आहे एकंदरीत! पण दहात दोन चांगली उदाहरणे आहेत. बाकी अजून अंधारात चाचपडत आहेत.

माझा मित्र संतापला होता. पण सगळी चर्चा झाल्यावर जरा ताळ्यावर आला. जाताना परत पोटपूजा झाली. आजच्या भेटीनंतर त्याच्यालेखी लेखकांची किम्मत कदाचित कमी झाली असावी.

 

एका लेखकाची व्यथा

error: Content is protected !!