Tag: लेखक

Morning Motivation

Morning Motivation

मराठी कथा   ||   प्रवासकथा   ||  निवांतक्षणी   ||  फिरस्ती  ||  प्रसन्न पहाट ||  निसर्ग 

रोजच्या जीवनात इतका पसारा असतो की तिथे मनाला प्रसन्न करणार्‍या साध्या-सरळ अनुभवांना मनसोक्त जगताच येत नाही. साधेपणात, निसर्गाच्या सानिध्यात माणसाचं खरं रूप माणसाला दिसतं. स्वतःचीच प्रतिमा अधिक उजळपणे दिसू लागते.

Related image

तीन मित्र भल्या पहाटे फिरण्यासाठी एका विशिष्ट ठिकाणी जातात. शहरापासून थोडसं दूर गेल्यावर निसर्गाचं मनमोहक रूप बघून ते हरवून जातात. सगळं नैराश्य लयाला जातं आणि एकटेपणा हवाहवासा वाटू लागतो. तेथे मिळालेले अनुभव हे सकाळच्या Morning Motivation च्या मेसेजपेक्षा अधिक सुखावह असतात!

https://marathi.pratilipi.com/story/%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8-x5p7NFpXcclz

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

अजून कथा वाचा… 

चेहरे आणि मुखवटे

“मोहजालात” अडकले…

“मोहजालात” अडकले…

“मोहजालात” अडकले…  ||

फार पाल्हाळ न लावता अगदी सुरुवातीलाच सांगतो की माझ्या “मोहजाल” नामक एका भयकथेला (?) प्रतिलिपी मराठी कथा या पोर्टलवर एका कथास्पर्धेत तिसरा वगैरे क्रमांक मिळाला आहे. तसं यात आग्रहाने सांगायचं निमित्त म्हणजे ही कथा काय आहे मलाही फार आठवत नाही.

पाच-सहा दिवसांखाली एका मित्राने मला सांगितलं की तुझ्या अशा अशा कथेचा तिसरा क्रमांक वगैरे आला आहे. मला विश्वास बसला नाही. मी तपासून बघितलं तेंव्हा खात्री पटली. आपण कधी कधी एखादं फूल तोडण्यासाठी प्रचंड धडपड करतो, ते आपल्याला मिळत नाही आणि कधीतरी फोनवर बोलत झाडाखाली थांबल्यावर त्या झाडावरूचं फूल हातात येऊन पडतं तसा भाग!

मोहजाल ही अत्यंत रद्दी कथा आहे असं माझं मत होतं. त्याला भयकथा म्हणावी की अर्धवट राहिलेली प्रणयकथा हे मलाच माहिती नाही. पण “मेरा नाम जोकर” सारखे अपघात चालूच असतात.

मोहजाल ही अत्यंत सामान्य दर्जाची कथा आहे असं माझं मत होतं. ते आजही आहे. त्याला भयकथा म्हणावी की अर्धवट राहिलेली प्रणयकथा हे मलाच माहिती नाही. पण “मेरा नाम जोकर” सारखे अपघात चालूच असतात.

माझ्या “खिडकी” अन “नरक्षी” या त्यातल्या त्यात बर्‍या असलेल्या कथांचा पहिला क्रमांक थोडक्यात हुकला होता. त्याचं रेटिंग आजही उत्तम आहे, अन प्रत्येक वाचकाला ती आवडतेच. पण मागील एका कथा स्पर्धेदरम्यान त्या कथा वाचकांपर्यन्त पोचल्या नाहीत. म्हणजे मराठी चित्रपटांचं होतं तसं झालं. त्यावेळेस एका मित्राने मला सांगितलेलं की कथेचं नाव काहीतरी सेंसेशनल ठेव. म्हणजे असं काहीतरी confusing ठेव की लोकांनी title बघितल्यावर वाचकांनी किमान ते वाचावं. मग ठरलं “मोहजाल.” या नावावरून “रसिक” नेमके आकर्षित होतील असं त्याचं म्हणणं होतं जे खरं ठरलं.

यावरून एक अनुभव आला! TRP काय असतो! आपल्याला काय आवडतं, काय वाटतं, काय पटतं यापेक्षा प्रेक्षकांना, वाचकांना काय हवं आहे ते महत्वाचं. चित्रपटात आयटम song त्यामुळेच असतात. news channel वरही असलंच भडक कंटेंट असतं. लोकांना तेच हवं असतं. म्हणूनच सलमान खानचे कथा नसलेले चित्रपट चालतात आणि श्रीदेवी कशी मेली याचं बाथटब मध्ये झोपून प्रात्यक्षिक दाखवणार्‍या वृत्तवाहिन्या TRP मध्ये अव्वल ठरतात.

सब #मोहजाल है…

असो!!! खालील लिंकवर “मोहजाल” ही कथा आहे!

https://marathi.pratilipi.com/story/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B2-ubLi2BNdyIka

केजरीवाल साठी खालील लिंकवर कथास्पर्धेचे निकाल!

https://marathi.pratilipi.com/blog/result-online-katha-mahotsav-91wu2s3pe7l6e64

योग…

योग…

#आयुष्य इतकंही खराब नाहीये की प्रत्येक सिग्नलवर लाल दिवा लागावाच. पण ते इतकंही सुखावह नाही की सिग्नलवर गाडी थांबवल्यावर बाजूला activa वर बसलेली एखादी सुंदर तरुणी यावी अन तिने तिचे विस्कटलेले रेशमी केस आरशात बघून नीट करत असताना आपण तिच्याकडे बघावं अन त्याच क्षणी तिने आपल्याकडे एक घायाळ करणारा कटाक्ष टाकावा!

 

एका लेखकाची व्यथा

एका लेखकाची व्यथा

लेखक मित्रांनो,

लेखक हा खरं तर कुठल्याही नवनिर्मितीचा जनक असतो. कल्पनेला सत्यात आणणे असो की माणसाची संवेदनशीलता जागी करणारा त्यांच्या भावनांना हात घालून त्यांच्यातील खरेपणा उघड करणे… लेखक इतक्या ताकदीचा असतो.

लेखकाच्या लेखणीने इतिहास घडतात. भले-भले राजे-महाराजेही लेखकांचा मान-सन्मान राखून असत. प्राचीन काळापासून आजपर्यंत अनेक विद्वान लेखक झाले आहेत ज्यांच्या लेखनाची, विचाराची समाजाने दाखल घेतली आहे अन त्यांनी समाजाला मार्गही दाखवले आहेत.

लेखक हा नेहमीच एखाद्या बी प्रमाणे असतो जेथून एक आनंद देणार, सावली देणारं झाड निर्माण होतं. पण आजकाल लेखकांना कितपत किम्मत आहे, कितपत मान आहे हा वादाचा विषय होत आहे. प्रत्येक गल्लीत दोन-तीन लेखक तर सहज सापडतील.

पण स्वतःच्या पायावर उभा राहिलेला मनुष्य जेंव्हा, त्याला रांगण्यापासून चालण्या-धावण्या पर्यंत ज्यांनी शिकवलं त्या जन्मदात्यांना विसरतो तिथे वाईट वाटतं.

चित्रपट क्षेत्रात तर लेखकाशिवाय काम सुरु होणं ही अशक्य आहे. लेखकही चित्रपट कसा असेल, कसा असावा ह्या बाबतीत केवळ दोन ओळींच्या संकल्पने पासून सुरुवात करतो अन अख्खा चित्रपट कागदावर उतरवतो. पण त्या कागदाचा प्रवास रिळात होईपर्यंत लेखकच गुंडाळला अन अंधुक होत जातो.

लेखकाला पद्धतशीरपणे वापरून घेण्याची रीत हल्ली बऱ्याच लोकांना अवगत होताना दिसत आहे. पैसा, ओळख, कथेचं क्रेडिट ते सन्मान यापैकी सगळ्या गोष्टी कुठल्याच लेखकाला मिळत नाही. मेंदूचा भुगा होईपर्यंत रात्र रात्र जागून तयार केलेल्या कथा-पटकथा, त्या मेहनतीचा योग्य मोबदला न देता कधी फुकट तर कधी माफक दरात ढापल्या जातात. नवख्या लेखकांना तर अक्षरशः गृहीत धरलं जातं. अनुभव घे म्हणून त्यांच्याकडून फुकटात कामे करून घेतली जातात.

चित्रपटाचे काम सुरु होईपर्यंत लेखकांना पैसे देणं ही तर अंधश्रद्धा समजली जाते. अन यदाकदाचित चित्रपट सुरूच होऊ शकला नाही तर लेखकाची मेहनत तर वाया जातेच पण पैसाही दिला जात नाही. लेखक बिचारा सगळी मेहनत पाण्यात गेली म्हणून हताश होऊन बसतो. स्क्रिप्टला कागदाचे तुकडे अन ‘अशा खूप स्क्रिप्ट पडल्या आहेत’ असं म्हणनार्‍यांचा तर अक्षरशः तिटकारा येतो.

मोठमोठ्या पुरस्कार सोहळ्यात सहाय्यक अभिनेता, नवोदित कलाकार, फ्रेश चेहरा अजून काय-काय नावाने अभिनेते-अभिनेत्री यांना बक्षीस वाटली जात असताना कथा, पटकथा, संवाद याला एकच गृहीत धरून एकच पुरस्कार असतो. हे म्हणजे जिथे उगम झाला त्यालाच विसरण्याचा प्रकार आहे. लेखक चित्रपटाच्या मुख्य प्रवाहातील समजला जातच नाही. तो फक्त एक………

मोठमोठ्या लेखकांच्या कथा स्क्रिप्ट घेऊन त्या तोडून मोडून सर्रास वापरली गेल्याचीही उदाहरणे आहेत. अशा वेळेस हतबल होण्याशिवाय पर्याय नसतो. लेखकांना स्वतःच्या हक्कासाठी संघटना स्थापन कराव्या लागतात असे दिवस आहेत. असं का होत आहे याचाही विचार करावा लागेलच. त्यांच्याकडे जाणीवपूर्वक कमीपणाने बघण्याची काहींची मानसिकता असते. सर्वच असे असतात असं नाही पण इतर कलाकारांच्या दृष्टीने लेखकांना मानधन कमी देणे हा त्याचाच भाग आहे.

लेखक हे बऱ्याचदा संवेदनशील माणसे असतात; असं असल्याने त्यांचा व्यावहारिक पद्ध्तीने फायदा उचलला जातो. चित्रपट येऊन जातातही पण लेखकाला राहिलेल्या रकमेसाठी, कामाच्या मोबादल्यासाठी निर्मात्या-दिग्दर्शकाकडे खेटे मारावे लागतात; एखाद्या मजुराप्रमाणे!

लेखकांनीही आता सगळी निरर्थक मूल्ये बाजूला ठेऊन लेखकांनीच कठोर अन व्यावहारिक बनलं पाहिजे. हातात advance येईपर्यंत काम सुरु करू नये असा पवित्रा घेतला तर चित्रपटनगरी अन निर्माते-दिग्दर्शक भानावर येतील. लेखकाचं ना हरकत प्रमाणपत्र न मिळेपर्यंत चित्रपटच काय तर लघुपटही दाखवता येऊ नये अन महोत्सवात दाखल करून घेऊ नयेत.

तशा तर बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्या आणि करण्यासारख्या पण सुरुवात तरी व्हावी! अलीकडेच दोन-तीन वाईट अनुभव आले अन हताशपणा अन हतबलता जाणवत होती, त्यातूनच ह्या भावना उमटल्या.

धन्यवाद!

 

पुस्तक प्रकाशित करताय?

error: Content is protected !!