आपल्याला जर आपल्या रचना, संकल्पना, मत येथे मांडायचं असेल किंवा कुठलीही जाहिरात ह्या संकेतस्थळावर करायची असेल तर latenightedition.in@gmail.com यावर संपर्क करावा!

Tag: हळदी

Health Tips

Health Tips

#आरोग्यम धनसंपदा  #आयुर्वेद_आरोग्य   #Turmeric_Latte

#आयुर्वेद कोश ~ टरमरिक लाटे (latte ) !!!

कल्पना करा . . . तुम्ही स्टार बक्स च्या अलिशान कॉफी शॉप मध्ये बसला आहात . तुम्ही रोजही बसत असाल पण आमच्या सारख्याला औरंग्याला जसे स्वप्नात संताजी धनाजी दिसत असत तसे स्टार बक्स चे मेन्यु कार्ड दिसते . त्याचे ‘शुल्क ‘ बघून आम्ही गारद होतो . त्यामुळेच  ‘कल्पना ‘ करा असे म्हंटले . . . नुकत्याच एटीएम मधून काढलेल्या करकरीत नोटांमुळे खिशाला आलेली उब सांभाळत तुम्ही मेन्यु कार्ड बघता . . . आणि समोर दिसते ते काय ?? हळद दुध ?? सुंठ दुध ?? लवंग वेलदोड्याचा काढा ? रुपये १५० फॉर स्मॉल , २०० फॉर मिडीयम एंड २५० फॉर लार्ज कप . . . आम्ही एकदम स्टाइल मध्ये २ लार्ज टर्मरिक लाटे ऑर्डर करून ५०० रुपये धारातीर्थी पडतो . . खटाक कन फोन काढून स्टेटस अपडेट करतो . . ‘ हेविंग हेल्दी टर्मरिक लाटे  विथ . .. . @ स्टार बक्स ” . . . सोलिड हवा नं ?? परत त्याचे फायदे आणि २५० रुपये वर्थ आहेत हे सांगायला आपण सैराट . . .

अमेरिकेत सध्या टर्मरिक लाटे न धुमाकूळ घातला आहे . Times  of India  या वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार टर्मरिक लाटे यास २०१६ चा मिल्क ऑफ ईयर हा पुरस्कार जाहीर झाला आहे .  नोव्हेंबर २०१५ ते जानेवारी २०१६ या काळात त्याच्या मागणीत ५६ % वाढ झाली आहे . . . आपली आई बिचारी पी रे बाळा १ ग्लास म्हणून आग्रह करायची तेव्हा ‘गावठी ‘ वाटणारे हे ड्रिंक जागतिक पातळीवर मात्र ‘इन डिमांड ‘ आहे !!

‘तुज आहे तुज पाशी परी तू जागा चुकलाशी ‘ म्हणतात ते योग्यच . सगळे आपल्यापाशी आहे पण त्याची किंमत ती काय ?? भारतीय संस्कृतीत जे काही आहे ते अशास्त्रीय , भोंगळ , थोतांड आणि अंधश्रद्धा आहे असे मानणारी करंटी पिढी आज यत्र तत्र सर्वत्र उच्छाद मांडत आहे . . का प्यावी म्हणतात हे टर्मरिक लाटे ?? ती anti inflammatory आहे , रोग प्रतिकार शक्ती वाढवते , ताकद वाढवते आणि पचन सुधारते म्हणून ?? अरे छे . . . इतकी भुक्कड आणि क्षुल्लक अशी हळद नाही . .

” हरिद्रा काञ्जनि पीता निशाख्या वरवर्णीनी
कृमिघ्ना हलदी योषित्प्रिया हट्टविलासिनी
हरिद्रा कटूका तिक्ता रुक्षोष्णा कफपित्तनुत
वर्ण्या त्वकदोष मेहास्र शोष पांडू व्रणापहा ” (भा.प्र )

हरिद्रा , कांचनी , पीता , निशा ,वरवर्णीनी ,कृमिघ्नी , हळदी , योषिप्रिय , हट्टविलासिनी अशी नावे असलेली हळद तिखट , कटू , उष्ण असून कफ , पित्त , त्वचारोग , प्रमेह , रक्त विकार ,पांडू रोग आणि व्रण यांचा नाश करणारी आहे .

हा साक्षात्कार आयुर्वेदाला २०१६ मध्ये झालेला नाही . तुमचे लहानपण आठवा . . . फुटलेली कोपरं आणि सोललेली ढोपरं यावर प्रथम हळदीचा लेप लागत असे . . झाले का कोणाला ‘इन्फेक्शन ‘ ?? घसा बसला . . बरं वाटेनासं झालं की हळद आणि दुधाचा उतारा कसा कामी पडायचा ?? आठवतंय का ?? नाही . . . बरं लग्नाच्या आधी ‘हळदीचाच ‘ कार्यक्रम का असतो हो ??? गेला बाजार नीळ , गुलाल किंवा काव यांचा का समारंभ नसतो ?? काय गरज काय त्या ‘ओर्थ्रोडोक्स हळदी ची ??” ‘ पी हळद आणि हो गोरी असे होत नाही ‘ हि म्हण आठवते न ?? तर रंगाचा आणि हळदीचा , स्त्री आरोग्याचा आणि हळदीचा जवळचा संबंध आहे . . . पण लक्षात कोण घेतो ?? असो . . .

तर अशी ही हळद . . . सूज  नाहीशी  करणारी , वेदना कमी करणारी , वर्ण्य , कृमी नष्ट करणारी , त्वचा विकारांचा नाश करणारी , जखम निर्जंतुक करून भरून काढणारी , रुची वाढवणारी , रक्ताचे प्रसादान करणारी , प्रमेहाचा नाश करणारी , गर्भाशयाचे शोधन करणारी , पित्ताचे शमन करणारी , तापाचा नाश करणारी आणि विषघ्न आहे . . .

म्हणूनच ही हळद मंदिराच्या गाभाऱ्या पासून ते स्वयंपाक घराच्या फोडणीच्या डब्या पर्यंत हिंदू संस्कृतीत सर्वत्र अधिकाराने आणि मानाने आढळते . . . काळ जसा पुढे गेला तसे आपण ‘का ?’ हा प्रश्न टाळून ‘कशाला ?’ हा प्रश्न अधिक विचारात गेलो त्यामुळे प्रत्येक गोष्टच अनावश्यक आणि अस्थायी वाटायला लागली . एतद्देशीय जे जे ते ते भंपक अशा समजुतीतून अत्यंत अभिमानशुन्य आणि निरस पिढी जन्माला आली हे मेकेले चे यश . . .तो धूर्त माणूस काय म्हणतो बघा …

”…. i propose that we replace her (India’s ) old and ancient education system ,her culture ,for if the Indians think that all is foreign and English is greater than their own . They will loose their self esteem ,their native culture and they will become what we want them a truly dominated nation ”

Lord Mecaulay 2 Feb 1835

याचा आनंद आणि अभिमान वाटतो न आपल्याला ?? गोष्ट सोप्पी आहे . . . हळदीचे दुध  . . . खंत इतकीच आहे की या दुधाचा ‘व्यावसायिक वापर ‘ करावा असे ना कोणत्या उत्पादकास वाटले . . . या दुधात खरेच ‘औषधी गुण ‘ आहेत असे आपले पूर्वज सांगत होते ते ना आम्हास कधी पटले . . . आजवर आम्ही स्व इच्छेने ना कधी ते पिले  पण आता आम्ही ते रोज पिणार . . . ते कोठे मिळते याचे ‘joints  ‘ शोधणार . . . का ??? कारण ते खरच पिण्याच्या लायकीचे असते हे आता सिद्ध होऊन आले आले . . . चिअर्स . . . !!

(टीप – १ . लेख वाचून कोणी हळदीचे दुध पिणार असाल तर घरी हळदीचे दुध दे म्हणून मागावे . . टर्मरिक लाटे वगैरे मागितले तर घरच्यांची आणि तुमची गैरसोय होईल .
२. हळदीचे दुध घरोघरी आणि वर्षानुवर्षे बनत असल्याने त्याची ‘रेसिपी ‘ सांगायची आवश्यकता नाही . या लेखाचा हेतू हळद आणि तिचे महत्व अधोरेखित करायचा आहे .
३. दारू हळद आणि खायची हळद वेगळी असते . जे चकाकते ते सोने नसते तसेच जी पिवळी असते ती हळद नसते . . . त्यामुळे उत्तम दर्ज्याची हळद वापरावी )

वैद्य . @अंकुर रविकांत देशपांडे
आयुर्वेद कोश
9175338585

(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)

धन्यवाद!!!

Source: WhatsApp. लेख महत्वाचा वाटला म्हणून कसलीही भीड न बाळगता चांगलं ज्ञान share केलं.

latenightedition.in

error: Content is protected !!