Tag: Share Market

BUYBACK – नफ्याची संधी

BUYBACK – नफ्याची संधी

शेअर बाजार मराठीत   ||  Share Market In Marathi  ||  Short Term Positional Investment  ||  Learn to Earn Without Risk


OPEN DEMAT ACCOUNT ONLINE

जेंव्हा कंपनी बाजारातून अर्थात, सामान्य shareholder कडून कंपनीचे shares परत विकत घेते याला BuyBack म्हणतात.

एखाद्या कंपनीने जर ठराविक rate ला shares buyback ची ऑफर देऊ केली असेट तर सामान्य shareholder (भागधारक) आपल्याकडील shares कंपनीला परत करू शकतो. Buyback चे दर हे सामान्यतः बाजार दरांपेक्षा जास्त असतात जेणेकरून सामान्य गुंतवणूकदार अधिक नफ्याच्या आशेने shares कंपनीला परत करेल. म्हणजे समजा, एखाद्या कंपनीच्या शेअरचा मार्केट रेट 70 रुपये असेल तर Buyback चा रेट हा सामान्यपणे 70 पेक्षा अधिक असतो. याला कारण असं की, गुंतवणूकदार अधिक रेट मिळणार या आशेने बाजारातून shares ची नव्याने खरेदी तर करतात आणि ते shares अधिक दराने देऊनही टाकतात.

Buyback केल्याने त्या कंपनीकडे स्वतःच्या कंपनीच्या shares ची मालकी वाढते. म्हणजे कंपनीचं shareholding वाढतं. आता जर स्वतः कंपनीच स्वतःच्या कंपनीत हिस्सेदारी वाढवते आहे तर नक्कीच त्या share चे रेट भविष्यात वाढणार आहेत असा त्याचा अर्थ होतो. जी कंपनी चांगला performance देत असते आणि ज्या कंपनीचा profit जास्त आहे त्या कंपनीलाच Buyback शक्य आहे.

वर्ष 2018 मध्ये अनेक कंपन्यांनी Buyback Offer आणलेली होती. यात मोठ्या कंपन्यासह PSU सुद्धा आहेत. खासकरून IT क्षेत्रातील कंपन्यांनी Buyback करण्याचं प्रमाण अधिक राहिलेलं आहे.

चांगल्या कंपन्यांचे Buyback offers असतील त्या काळात गुंतवणूकदाराला नफ्याची चांगली संधी असते. म्हणजे येणार्‍या काळात Tech Mahindra ही IT क्षेत्रातील मोठी कंपनी Buyback offer घेऊन येत आहे. सध्या तो शेअर 800 रुपयांच्या च्या आसपास कार्यरत आहे आणि Buyback चा रेट आहे 950. त्यासाठी 6 मार्च ही record date आहे. म्हणजे 6 मार्च पर्यन्त ज्यांच्याकडे हे shares आहेत ते गुंतवणूकदार Buyback साठी पात्र असतील. या Buyback मध्ये कंपनी सर्व गुंतवणूकदारांचे सर्वच्या सर्व shares Buy करत नाही. त्याचं एक प्रमाण निश्चित केलं जातं. म्हणजे माझ्याकडे 100 shares असतील तर त्यापैकी 40/45/48/35/13/66 असे ठरवून दिलेल्या प्रमाणात shares च कंपनी Buy करते.

एखादी कंपनी Buyback offer आणणार आहे अशी बातमी आधीच बाजारात असते. ती Business Channel किंवा Business Newspaper वगैरेच्या माध्यमातून सर्वांसमोर येत असते. जर Tech Mahindra सारखी कंपनी Buyback करणार आहे अशी बातमी समजल्यावर आपल्याला त्या कंपनीचे shares BUY करायला (जेवढे पैसे उपलब्ध आहेत तेवढेच) काहीच हरकत नाही. म्हणजे दोन महिन्यांपूर्वी Tech Mahindra 720 च्या आसपास होता त्यावेळेस जर हा share Buy करून ठेवला असता तर Buyback मध्ये 950 च्या रेटला तो देता आला असता.

खालील लिंकवर पहा Tech Mahindra च्या Buyback संबंधी बातमी-

https://www.moneycontrol.com/news/business/tech-mahindra-to-buyback-2-05-crore-shares-for-rs-1956-crore-3566641.html

सन 2018 मध्ये कोणत्या कंपन्यांनी Buyback offer आणली होती ती यादी पाहुयात. सोबतच येणार्‍या काळात कोणते Buyback आहेत त्याचीही माहिती घेऊ.

Aarti Drugs, Balrampur Chini Mills, Bharat Electronics, eClerx Services, Indiabulls Real Estate, KPR Mill and MOIL, While Mcleod Russel, ADF Foods, Indiabulls Real Estate, DCM Shriram, BSE, IOC, NMDC, Monte Carlo Fashions, SKF India, Oil India, HEG, Triveni Turbine Limited, Indian Energy Exchange, Baba Arts, NHPC, ONGC, Just dial, BHEL, Mphasis, Cochin Shipyard, KG Denim, KIOCL Limited, NLC India, National Aluminum,  Redington, Pressman Properties, NLC India, Navneet, TCS, DB Corp, HCL Tech, Navneet, Jagran Prakashan, Coal India, Tech Mahindra, Bosch, Ajanta Pharma, Tata Investment,

खालील लिंकवर पहा Buyback करणार्‍या कंपन्या व त्यासंदर्भातील माहिती-

https://www.sebi.gov.in/sebiweb/home/HomeAction.do?doListing=yes&sid=3&ssid=22&smid=17

Buyback ची news असेल तर ती एक संधी असते जेथे फार कसली Risk न घेता चांगला नफा कमावता येतो. सामान्य गुंतवणूकदारांनी ही संधी सोडता कामा नये.

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

Earn More…

Highest Dividend Paying Stocks

Highest Dividend Paying Stocks

Highest Dividend Paying Stocks

सर्वाधिक Dividend (लाभांश) देणार्‍या कंपन्या   ||  Dividend  ||  Trading In Dividend  ||  Share Market Basics

मुळात Dividend (ज्याला मराठीत लाभांश म्हणतात. नावाप्रमाणेच, कंपनीच्या लाभातील अंश) हा कंपनीच्या नफ्यातून भागधारकांना (Shareholders) दिला जातो. याचा अर्थ ज्या कंपनीला नफा अधिक होतो ती कंपनी Dividend अधिक देत असते. कंपनी नफा कमावत आहे म्हणजे चांगला Performance देत आहे. त्यामुळेच जास्त Dividend देणार्‍या कंपन्या आपल्या पोर्टफोलियोत असायला हव्यात.

जे अनुभवी गुंतवणूकदार आहेत ते Dividend वर चांगलं प्रॉफिट कमावतात. म्हणजे एखाद्या कंपंनिनेजर चांगला Dividend जाहीर केला तर त्या कंपनीचा शेअर ते Record Date पर्यन्त होल्ड करतात आणि साधारण नफा असला तरी मग तो विकून टाकतात. यामध्ये त्यांना Dividend चा लाभ मिळतो.

उदाहरण घ्यायचं झालं तर Nalco या शेअरबद्दल घेऊ. Nalco ही Aluminum क्षेत्रातील पब्लिक सेक्टर कंपनी आहे. कंपनीचे Fundamentals ही चांगले आहेत. या कंपनीने 1 मार्चला 4.5 रूपयांचा Dividend जाहीर केला आहे. तो भागधारकांना 31 मार्चपूर्वीच मिळणार आहे. यासाठी 12 मार्च ही रेकॉर्ड डेट असणार आहे. याबद्दलची सर्व माहिती खालील लिंकवर आहे.

https://www.moneycontrol.com/news/business/nalco-declares-interim-dividend-of-rs-4-50-per-share-3598091.html?utm_source=IW_DATA_stockpage

यात पट्टीचे गुंतवणूकदार किंबहुना traders खेळ खेळतात. एकतर Nalco ही चांगली Dividend देणारी कंपनी आहे हे त्यांना माहीत असतं. कोणती कंपनी चांगला Dividend देते याची माहिती इंटरनेटवर मिळते आणि ती या लेखाच्या शेवटीही आहे. अशा shares वर सतत लक्ष ठेवलं पाहिजे. साधारणपणे Quarterly Results किंवा AGM असेल किंवा विशेष Meeting असेल तर dividend जाहीर केला जातो. त्याआधी हा शेअर घेऊन ठेवायचा. चार पाच दिवसांपूर्वी Nalco 52 week low च्या जवळ होता. म्हणजे 47-48 च्या आसपास होता. त्यावेळी गुंतवणूकदार हा शेअर BUY करतात. Dividend च्या News मुळे तो शेअर वाढतो. आज Dividend जाहीर केला तर आजही तो BUY केला जातो. आजची त्याची किमत 52 आहे. मग 12 March या record date पर्यन्त तो hold केला जातो. कारण त्या दिवशी ते Dividend साठी eligible होतात. जर समजा तो share त्यांच्या Buying Price च्या वर असेल तर तो शेअर ते विकून टाकतात. म्हणजे 52 च्या वर असेल तर तो विकून Profit Book केलं पाहिजे. दुसरीकडे, त्याचा Dividend ही मिळेल. म्हणजे समजा, 50 च्या rate ने जर 1000 Quantity Buy केली तर गुंतवणूक झाली 50000 रुपये. जर record date ला 53-54 ला जाताच तो शेअर विकून आपलं profit book केलं तर परत 4.5 हा Dividend आपल्याला मिळतोच. म्हणजे 1000*4.5=4500 इतके पैसे मिळतात.

हे गणित तसं सोपं आहे आणि बर्‍याचदा कामीही येतं. पण कधी-कधी, कंपनी Dividend जाहीर करणार म्हणून त्या शेअरमध्ये आधीच Buying आलेलं असतं आणि आपण तो High Rate ला Buy करून बसतो. तिथे थोडसं गणित चुकू शकतं. पण कंपनी चांगली असेल तर तो शेअर होल्ड करायला हरकत नसते.


OPEN DEMAT ACCOUNT ONLINE

बघूयात अशाच काही कंपन्या ज्या चांगला Dividend देतात.

Vedanta

HPCL

IOC

NALCO

Coal India

Power Fin Corp

Reliance Ind

Hero Motocomp

Castrol

Hind Zinc

Infosys

TCS

GAIL

NTPC

NMDC

MRPL

इत्यादि कंपन्या चांगला Dividend देतात. पण जर दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार असेल तर सातत्याने चांगला Dividend देणार्‍या कंपन्या शोधल्या पाहिजेत. सामान्यतः NIFTY मधील कंपन्या सातत्याने Dividend देत असतात. जर Dividend दृष्टीने ट्रेडिंग करायची असेल तर मग या stocks चा आधार घेतला तरी चालेल. अशात मग Maruti Suzuki, SBI, Axis, ICICI Bank, Wipro, Colgate, Tata Steel अशा अनेक कंपन्यांनी चांगला आणि सातत्याने Dividend दिला आहे. असे shares पोर्टफोलियोतही ठेवायला हवेत. शेवटी पैसा येणं महत्वाचं आहे. त्यातही कमी risk आणि सामान्य मार्गाने!

अभिषेक बुचके   ||  @Late_Night1991

-SHARE MARKET CLASSES-


Go to e-book!

http://latenightedition.in/wp/?p=3335

शेअर बाजार मराठीत – सुरुवात

शेअर बाजार मराठीत – सुरुवात

शेअर बाजार मराठीत  ||  Share Market Classes  ||  Demat Account  ||   Basics Of Share Market

शेअर बाजर सामान्य माणसाच्या नेहमीच कुतुहुलचा विषय असतो. दैनंदिन आयुष्यात ‘शेअर बाजार’ हा शब्द सारखा कानावर पडत असला तरी त्याबद्दल पुरेशी माहिती नसल्याने प्रचंड क्षमता असलेल्या भव्य विश्वापासून आपण वंचित राहतो. शेअर बाजार हा खरं तर गुंतवणुकीचं एक माध्यम आहे. मुळात गुंतवणूक म्हणजे आपल्याकडे असलेल्या ‘बचत’ रकमेला गुंतवून त्यातून जास्तीत जास्त नफा मिळवणे. बँकेत केलेली एफडी हीसुद्धा एक प्रकारे गुंतवणूकच असते किंवा सोने खरेदी हीसुद्धा गुंतवणूकच म्हंटली पाहिजे. शेअर बाजारात पैसे लावणे म्हणजेही गुंतवणूकच आहे. असे एक ना अनेक कंगोरे आहेत या क्षेत्रात. हे खूप मोठं विश्व आहे आणि तितकच अभ्यासाचंही.

आपण लवकरच सुरू करत आहोत “शेअर बाजार मराठीत” अशी लेखमाला! याद्वारे सामान्यातील सामान्य माणसाला शेअर बाजार म्हणजे नेमकं काय असतो याची माहिती व्हावी आणि त्यामध्ये मूलभूत व्यवहार काय असतो हे जाणून घेता येईल. या लेखमालेत आपण शेअर बाजार म्हणजे काय? ते शेअर बाजारात पैसे कसे गुंतवायचे (आणि कमवायचे) हेसुद्धा माहीत करू घेणार आहोत. सर्वच्या सर्व माहिती मराठीत असल्याने भाषेचाही काहीच अडसर येणार नाही.

येथे प्रामुख्याने मी माझ्याबद्दल सांगणं हेसुद्धा खूप महत्वाचं आहे. मी काहीतरी माहिती सांगतो आहे याचा अर्थ मी त्यातील तज्ञ आहे का हा प्रश्न पडणे साहजिक आहे. तर खुलासा असा की, मी काही या क्षेत्रातील तज्ञ नाही. Sebi Authorized Analyst नाही किंवा या क्षेत्रात शिक्षण घेतलेला जाणकार नाही. मी गेली पाच वर्षे या क्षेत्राशी निगडीत आहे आणि आज या क्षेत्रात एक ब्रोकर म्हणून कार्यरत आहे. या लेखमालेमधून मी जे काही ज्ञान पाजळणार आहे ते माझ्या अंनुभावातून आलेलं आहे. मला या क्षेत्रात आल्यावर जे प्रश्न पडत गेले त्या प्रश्नांची उत्तरे मी विविध मार्गाने मिळवत गेलो. तीच प्रश्नोत्तरे, तो संवाद मी लेखमालेच्या माध्यमातून आपल्यासमोर मी मांडत आहे.

Click Below Link to Open Demat Account Online

https://5minwebsite.angelbroking.com/Diykyc/SubbrokerLead?SbTag=QkJDQg==

Share Market Classes

Share Market Classes

[Advertise]

Learn Share Market  ||  Basics Of Share Market  ||  Online Share Market Course  ||  शेअर बाजार मराठीत

**ANGEL BROKING LIMITED**
Service Truly Personalized
– Demat Account
– Free Book- Dematerialization
– Mutual Fund
– Stock Recommendations 
– Investment Adviser
– Portfolio Management
Contact – 9422611264

 

**ANGEL BROKING SERVICES**

Click Below Link to Open New Demat Account with Angel Broking Pvt Ltd

https://5minwebsite.angelbroking.com/Diykyc/SubbrokerLead?SbTag=QkJDQg==

🚀Angel Broking Provides Platform Which Consist Of  
📌 Equity
📌 Future & Option 
📌 Mutual Fund

🚀Trading softwares

📌Mobile App – Angel Eye
📌Laptop Browser – trade.angelbroking.com
📌Laptop/desktop app – Angel Speed Pro

**ANGEL PLATINUM ADVISORY **

1) Having high quality fundamental stocks

2) Balanced and diversified equity portfolio

3)From oct 2015 to march 2018 given 70.4% return where BSE100 given 31% means 39.4% out performance

4) 5000 annual fees including GST

5)Will get advisory on call or mails with personalize risk profile

6)Weekly P&L  of his portfolio with nifty comparison

7)Monthly news letter with personalized portfolio

8)Special monthly webinars on market and investments

9)Quarterly result update on recommended stock

JUST CLICK LINK BELOW AND CHANGE YOUR LIFE

https://5minwebsite.angelbroking.com/Diykyc/SubbrokerLead?SbTag=QkJDQg==

 

JOIN ONLINE SHARE MARKET CLASSES

मुहूर्त ट्रेडिंग Picks 2018

मुहूर्त ट्रेडिंग Picks 2018

मुहूर्त ट्रेडिंग  ||  Time To Build Portfolio  ||  शेअर बाजार मराठीत ||  Diwali Picks 2018

Image result for muhurat trading picks 2018

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही लक्ष्मी पूजनाच्या शुभ मुहूर्तावर शेअर बाजारात “मुहुर्त ट्रेडिंग” चा उत्साह आहे. September मध्ये Nifty ने 11760 चा All Time High बनवला आणि पुढच्याच महिन्यात, म्हणजे October मध्ये वर्षातील जवळपास Low बनवला. जागतिक अर्थव्यवस्था, क्रूड, डॉलर, ट्रेड वार, NBFC मधील अडचणी आणि राजकीय अनिश्चितता यामुळे भारतीय शेअर बाजार Volatile झालेला आहे. शेअर बाजारातील ही पडझड दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी संधी आहे असं अनेक तत्ज्ञ मानतात. एका सर्वेक्षणानुसार सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी जर शेअर बाजारात पैसे गुंतवले तर निवडणुका झाल्यावर, कोणतंही सरकार सत्तेत आलं तरी, त्यातून चांगला परतावा मिळतो असं निरीक्षण नोंदवलं आहे.

मुहुर्त ट्रेडिंगचं महत्व काय आहे हे आपण मागील लेखात बघितलं होतं. त्याच अनुषंगाने हा त्याचा पुढचा भाग.

विविध brokerage houses आणि तज्ञांनी मुहुर्त ट्रेडिंग 2018 साठी विविध shares सुचवले आहेत. ते कोणते आहेत हे खालील लिंकमध्ये नमूद केलं आहे. शिवाय आमच्याकडूनही काही शेअर्स सुचवले आहेत.

लक्ष्मी पूजनाच्या शुभ मुहूर्तावर संपत्तीचा संचय व्हावा, घरात लक्ष्मी सुखाने नांदावी हीच सदिच्छा!OPEN DEMAT ACCOUNT ONLINE

Top five stocks which investors could buy on the Muhurat Trading of 2018 with an investment horizon of 2-3 years?

  1. A) Take Solutions, Bajaj Electricals, Sandhar Technologies, ICICI Bank, and Maruti Suzuki India.

https://www.moneycontrol.com/news/business/markets/sensex-likely-to-top-45k-by-diwali-2019-icici-bank-maruti-among-karvys-muhurat-picks-3130471.html

  1. Top five stocks which investors could buy on this Muhurat Trading of 2018 with an investment horizon of 2-3 years?
  2. Thomas CookCapital FirstDelta CorpTata Elxsi, and Jubilant LifeSciences.

https://www.moneycontrol.com/news/business/markets/delta-corp-tata-elxsi-among-top-5-muhurat-trading-picks-dipan-mehta-3110621.html

Check “ मुहूर्त ट्रेडिंग टिप्स” from different brokerage houses.

https://hindi.timesnownews.com/business/article/top-stocks-to-buy-this-diwali-top-50-shares-by-reliance-security-prabhudas-liladhar-anand-rathi-hdfc-security-axis-direct-and-motilal-oswal-diwali/308391

Image result for muhurat trading picks 2018

MY PICKS FOR मुहुर्त ट्रेडिंग 2018

या Large Cap आणि Nifty मधील कंपन्या आहेत.

Share                   Current Market Price     Period

SAIL                            68                                (3 Months View)

Infosys                       670                             (3 to 6 Months)

Maruti Suzuki          7200                           (Long Term)

Yes Bank                   210                             (Long Term)

Hindustan Unilever 1620                            (Long Term)

Tata Motors               190                             (Long Term)

HDFC                         1820                           (Near Term)

Coal India                  260                             (Defensive)

Kotak Bank                1125                           (Short or Mid)

Sunpharma               580                             (Short to Long)

IOC                             140                             (1 Year)

If you are risky & experienced trader then I have some different ideas for you. Make a basket of following share. Distribute your money equivalently in following scrips.

Good shares with Low Price

Share                   Current Market Price     Period

NBCC                                     60                                (Long)

SAIL                           66                                (3 months)

LIC Housing Fin       420                             (1 year)

KPIT                           220                             (1 Year)

Bank Of Baroda       110                             (6 Months)

IOC                            140                             (1 Year)

Apollo Tyre             210                             (6 months)

Idea                         40                                (1 Year)

Snowman Log          36                                (3 Months)

AB Capital                 100                             (1 Year)

वर सुचवलेले stocks हे फक्त मुहुर्त ट्रेडिंगसाठी आहेत. अर्थात अन्य वेळेसही हे गुंतवणुकीस योग्यच आहेत पण सध्या त्यांची price गुंतवणुकीसाठी आकर्षक आहे. याशिवाय SBI, UPL, L&T, TCS, ITC असे अनेक शेअर्स हे गुंतवणुकीस योग्य आहेत पण त्यांचा भाव सध्या गुंतवणुकीस अनुकूल नाही.

 

-OPEN DEMAT ACCOUNT FREE-

Go to e-book!
 

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

मुहूर्त ट्रेडिंग!

मुहूर्त ट्रेडिंग!

मुहूर्त ट्रेडिंग!

शेअर बाजार मराठीत   ||  Share Market Investment  ||  शेअर बाजारातील संधी  ||  दिवाळी आणि शेअर बाजार

शेअर बाजार म्हणजे सगळा पैशांचा खेळ. पैसे लावायचे अन त्यातून पैसे कमवायचे हा बेसिक सिद्धांत. त्यामुळेच शेअर बाजारात गुंतवणूक करणारे पैशांची देवता असलेल्या लक्ष्मी मातेला प्रसन्न करू बघत असतात. शेअर बाजारात दोन मुहूर्त महत्वाचे मानले जातात. एक असतो तो “अक्षय तृतीया” आणि दूसरा म्हणजे “लक्ष्मी पूजन.”

अक्षय तृतीया म्हणजे चांगल्या गोष्टींचा संचय करणे, त्याचा क्षय न होऊ देणे, एखादी चांगली वस्तु आपल्याकडे अक्षयपणे राहावी अशी त्यामागची भावना. अक्षय तृतीयेच्या अशा शुभ दिनी शेअर बाजारात नियमित गुंतवणूक करणारा वर्ग कुठलातरी चांगला शेअर खरेदी करून ठेवतो. तो चांगला शेअर कायम आपल्याकडे राहावा, त्यातून संपत्ती वाढत जावी अशी त्यामागची भावना.

दूसरा महत्वाचा दिवस म्हणजे “लक्ष्मी पूजन.” ह्या दिवशी जगभरात दिवाळीचा उत्साह असतो. सर्वजण कुटुंबासोबत दिवाळी साजरी करत असतात. फटाक्यांची आतिषबाजी सुरू असते अन लक्ष्मीची पुजा केली जाते. लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न राहावी यासाठी हे सगळं उत्साही वातावरण असतं. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. पण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी “मुहूर्त ट्रेडिंग” नावाचा एक प्रकार असतो. थेट पैशांशी निगडीत असलेलं हे क्षेत्र असल्याने त्यादिवशी बंद ठेऊन कसं चालेल. त्यामुळे दरवर्षी लक्ष्मी पूजनाच्या संध्याकाळी शेअर बाजार, अर्थात NSE-BSE हे साधारणपणे एक तासासाठी चालू केले जातात. या कालावधीमध्ये गुंतवणूकदारांना शेअर्सची खरेदी-विक्री करता येते. शेअर बाजारात गुंतवणूक करणारे अनेकजण या दिवशी कुठलातरी शेअर खरेदी करून ठेवतात. यादिवशी Intraday Trade फार होत नाहीत. या मुहूर्तावर शेअरची Delivery घेण्याला महत्व असतं. कुठलातरी चांगला शेअर खरेदी करून ठेवावा जो चांगला परतावा देईल अशी त्यामागची भावना असते. अनेक नवगुंतवणूकदार या शुभ मुहूर्तावर नव्याने गुंतवणूक सुरू करतात. जे मोठे गुंतवणूकदार असतात ते या मुहूर्तावर नव्यानं रणनीती आखतात अन त्या दृष्टीने पाऊल टाकतात.

या वर्षी “मुहूर्त ट्रेडिंग” ची वेळ लक्ष्मी पूजनाच्या (7 नोवेंबर) संध्याकाळी 5.15 ते 6.40 अशी असणार आहे. या कलावधीत शेअर बाजार सुरू असेल. Equity Shares मध्ये पैसे लावणार्‍यांसाठी हा दिवस खूप महत्वाचा असतो. जी व्यक्ति या मुहूर्तावर ट्रेड करते ती दीर्घकाळ शेअर बाजारात राहते असंही काहीजण मानतात. शेअर्सच्या रूपाने लक्ष्मीला आपण आपल्या घरात घेत असतो.

आजपर्यंतचा इतिहास असं सांगतो की या मुहूर्तावर शेअर बाजार सकारात्मक अर्थात पॉजिटिव असतो. त्याला अपवादही आहेत. 2007 आणि 2012 च्या मुहूर्त ट्रेडिंगवर बाजार Negative मध्ये बंद झाला होता. योगायोग म्हणजे त्याच्या पुढच्या वर्षी शेअर बाजाराने negative returns दिले होते. 2008 ला तर जागतिक मंदीमुळे बाजार रसातळाला गेला होता.

गेल्या वर्षी, म्हणजे दिवाळी 2017 च्या मुहूर्त ट्रेडिंगला भारतीय शेअर बाजाराने पडझड अनुभवली होती. विशेष म्हणजे त्या वेळेस Nifty 10150 च्या आसपास होता आणि 2018 च्या दिवाळीलाही तो 10200 च्या आसपासच दिसतो आहे. त्यावेळेस क्रूड ऑइल 58$ च्या आसपास होतं जे आज 76$ च्या आसपास आहे. सन 2017 च्या दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगवर बाजार negative मध्ये बंद झाला आणि 2018 हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी वाईट ठरलं. याच वर्षात शेअर बाजाराने All Time Top बनवला आणि सध्या तो yearly Bottom बनवत आहे.

दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी सध्याचा बाजार हा एक अनमोल संधी आहे. एका सर्वेक्षणानुसार सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी शेअर बाजारात पैसा गुंतवला तर निवडणूक निकालानंतर सहा महीने या कालावधीत उत्तम परतावा मिळाल्याचा रेकॉर्ड सांगतो. सध्या भारतीय शेअर बाजार Yearly Low ला आहे. अनेक दिग्गज कंपन्यांचे शेअर्स Discount Price वर मिळत आहेत. अशा वेळेस Fundamentally Strong कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली तर चांगल्या परताव्याची संधी जास्त आहे.

यंदाच्या मुहूर्त ट्रेडिंगवर शेअर बाजार पॉजिटिव असावा अशी अपेक्षा करुयात.OPEN DEMAT ACCOUNT ONLINE

Links-

Year 2017 Muhurat Trading

https://www.moneycontrol.com/news/business/markets/muhurat-trading-market-live-sensex-opens-samvat-2074-lower-icici-bank-drags-2416267.html

Historical Data

https://www.moneycontrol.com/news/business/markets/last-10-years-data-suggests-that-diwali-month-belong-to-bears-will-2017-be-different-2409815.html

https://economictimes.indiatimes.com/markets/stocks/news/muhurat-trading-market-opens-in-green-for-ninth-time-in-the-past-11-sessions/articleshow/49746213.cms

अभिषेक बुचके (Sub Broker)

खजिना!

खजिना!

What Long Term Investment can give to Next Gen  

दीर्घकालीन गुंतवणूक  ||  Dematerialization  || शेअर बाजार मराठीत  || Long Term Investment

खजिना! गुप्तधन! लॉटरी! असे शब्द ऐकले की अंगावर रोमांच उभे राहतात. अचानक धनलाभ कोणाला नको असतो. पण हा धनलाभ सगळ्यांच्या नशिबी नसतो. अनेकदा अनेकजण तळघर, जुने वाडे वगैरे शोधत हयात वाया घालतात. कुठे लपवलेल्या सोन्याच्या मुद्रा, हीरे, दागिने सापडतात का ह्या अपेक्षेने. पण अशांच्या नशिबी बर्‍याचदा निराशा येते.

आज हे सगळं का आठवतं आहे? तर अशाच एका खजिना सापडलेल्या व्यक्तीची भेट झाली होती. त्याचीच ही कहाणी. त्यांना हा खजिना कुठे तळघरात, जमिनीत पुरलेला वगैरे सापडला नाही, तर तो त्यांच्या घरातच कित्येक दिवस पडून होता. फक्त तो खजिना आहे हे त्यांना माहीत नव्हतं.

एक गृहस्थ आहे. त्यांचं नाव दिनकर (बदललेलं नाव). त्यांना वडलांची जुनी ट्रंक साफ करत असताना काही कागदपत्रे सापडली. ती कागदपत्रे होती Share Certificates. दिनकरला साधारणपणे अंदाज आला की हे shares शी संबंधित काहीतरी आहे. माझ्या एका मित्राच्या माध्यमातून त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. ते सगळे certificates बघितल्यावर मी दिनकर यांचं अभिनंदन केलं. ते लखपती झाले होते! त्यांच्या हाती खजिना लागला होता.

झालं असं होतं की दिनकरच्या वडलांनी दहा पंधरा वर्षांपूर्वी विविध कंपन्यांचे shares आणि Mutual Fund घेऊन ठेवलेले होते. मध्यंतरीच्या काळात दिनकर कामानिमित्त बाहेरगावी असल्याने त्यांना याबद्दल फार काही माहीत नव्हतं. वडील सेवानिवृत्त झाले आणि त्यांनी शहरही बदललं. कालांतराने दिनकर यांचे वडील वारले आणि ते shares काळाच्या ओघात तसेच पडून राहिले. आणि गुप्तधन जसं खर्‍या धन्याला बोलवत असतं तसे ते certificates दिनकर यांच्या हाती लागले.

खरं तर दिनकर यांचं नशीब बलवत्तर म्हणावं लागेल. कारण हा जो योग जुळून आला तो खूप योग्य वेळी जुळून आला. पहिला भाग म्हणजे दिनकर यांच्या वडलांनी सगळे shares आणि Mutual Fund हे joint नावाने घेतले होते. म्हणजे त्यांचं नाव प्रथम आणि त्यांच्या पत्नीचं, म्हणजे दिनकर यांची आई, नाव second holder म्हणून. दिनकर यांची आई हयात असल्याने Documentation चा भाग सुलभ झाला. दूसरा भाग म्हणजे SEBI च्या नव्या नियमांनुसार 5 Dec पूर्वी Physical Format मध्ये असलेले Shares हे Demat खात्यात जमा करणं आवश्यक आहे. म्हणजे दिनकर यांना योग्य वेळी ते Certificates सापडले.

याहून महत्वाचा भाग म्हणजे, दीर्घकालीन गुंतवणूक!

दिनकर यांच्या वडलांनी त्याकाळी टप्प्याटप्प्याने जे shares गोळा केले त्यातले बहुतांश दर्जेदार कंपन्यांचे आहेत.

यामध्ये 2005 मध्ये घेतलेला Infosys चे 5 shares आहेत. त्यावेळेसची ही गुंतवणूक फार तर 1000-1500 असेल. आज यांचं Valuation काढलं तर जवळपास 40000 (चाळीस हजार) इतकं ते होतं.

दूसरा शेअर होता LIC चा. साधारणपणे 2003 साली LIC चे 100 shares घेतलेले असावेत. तेंव्हा त्या शेअरची किम्मत 40 च्या आसपास होती. म्हणजे 4000 गुंतवणूक. सन 2010 ला LIC ने शेअर Split केला. Face Value 10 होती ती 2 झाली. ज्याच्याकडे एक शेअर होता त्याचे पाच झाले. म्हणजे दिनकरच्या वडलांचे 100 चे 500 शेअर्स झाले. पण दुर्दैवाने 2 रुपये Face Value असलेलं certificate त्यांच्याकडे नव्हतं. मग खटाटोप करून ते मिळवलं. आता 500 शेअर्स झाले. आज LIC च्या एका शेअरची किम्मत 500 आहे. म्हणजे 2003 साली 4000 गुंतवून त्याचं आजचा Valuation अडीच लाख फक्त!

तिसरा शेअर आहे Dr Reddy’s या कंपनीचा. या कंपनीचे 2002 ला 4 शेअर्स घेतले होते आणि 2005 ला 4 शेअर्स घेतले होते. म्हणजे 8 शेअर्स. सरासरी रेट जर गृहीत धरला तर 450 हा आहे. म्हणजे एकूण गुंतवणूक 3600 रुपये. या कंपनीने 2006 साली 1:1 असा बोनस दिला आहे. म्हणजे 8 शेअर्सचे 16 शेअर्स झाले. शेअरचा आजचा भाव 2500 आहे. म्हणजे आजचं Valuation आहे 40000 च्या आसपास. शिवाय, मध्यंतरीच्या काळात Dividend ही मिळाला नव्हता.

अजून एक शेअर certificate मिळालं ते ICICI Bank याचे. बहुदा 2003 साली याचे 19 शेअर्स घेतलेले होते. त्यावेळी याची किम्मत होती 45 रुपये. म्हणजे गुंतवणूक झाली 800 च्या आसपास. दरम्यान शेअरने बरेच चढ-उतार पाहिले. शेअर 2014 साली split झाला. FV 10 ची 2 झाली. एकाचे पाच शेअर्स झाले. म्हणजे एकूण 95 शेअर्स. त्यानंतर 2017 साली 1:10 या गुणोत्तरात बोनस मिळाला म्हणजे. एकूण शेअर झाले 104 वगैरे. आजचा बाजारभाव आहे 300. म्हणजे 30000 रुपये.

यामध्ये नमूद करण्यासारखे महत्वाचे शेअर्स म्हणजे L&T आणि Asian Paints हेही होते. त्यांचं valuation ही 70000 च्या आसपास होतं.

याप्रकारचे अजून काही certificate सापडले ज्यातील काही कंपन्या बंद झालेल्या होत्या तर काही दुसर्‍या कंपनीत Merge झाल्या होत्या. त्यांचं Valuation ही साधारणपणे 50000 वगैरे होतं.

सध्या हा सगळा शेअर्स चा गोतावळा Demat होण्याच्या process मध्ये आहे. ध्यानी-मनी नसताना दिनकर यांना हा खजिना सापडला. यामध्ये नशिबाने तर महत्वाची भूमिका बजावलीच पण दिनकर यांच्या वडलांची दूरदृष्टीही तितकीच कौतुकास्पद म्हंटली पाहिजे. एकतर त्यांनी चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली. दीर्घकालीन मुदतीवर असे शेअर्स नक्कीच चांगला परतावा देतात हे पुन्हा सिद्ध झालं. दूसरा भाग म्हणजे त्यांनी कागदपत्र काम व्यवस्थित केलं होतं. सगळे सर्टिफिकेट प्लॅस्टिक फाइलमध्ये व्यवस्थित जपून ठेवले होते आणि सगळे Joint नावाने होते. यामुळे dematerialization process करत असताना फार अडथळा आला नाही. पण असे शेअर्स आपल्या नावावर आहेत हे त्यांनी कोणाला सांगितलं नव्हतं किंवा काय झालं हे कोडं आहे. पण खजिना हा सगळ्यांच्या हाती लागत नसतो, तो खर्‍या वारसाच्या हातीच लागतो. तो योग्य हाती लागला याचं जास्त समाधान असतं.

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991DEMATERIALIZE YOUR SHARES ONLINE

DEMATERIALIZATION अनिवार्य

क्या से क्या हो गया…

क्या से क्या हो गया…

क्या से क्या हो गया, बेवफा तेरे प्यार में चाहा क्या, क्या मिला, बेवफा तेरे प्यार में …

शेअर बाजारातील पडझड  ||  Downfall In Indian Share Market  ||  मंदी हीच संधी  ||  गुंतवणूक  ||  शेअर बाजार मराठीत

ह्या ओळी आहेत देवानंदच्या guide या चित्रपटातील. वहीदा रेहमान आणि देवानंद यांच्या नात्यात जेंव्हा दुरावा येतो त्यावेळेस दारूचे घोट रिचवत देवानंद हे गाणं म्हणतो. देवानंद आणि वहीदा म्हणजेच guide राजू आणि नलिनी उर्फ रोसी हे एकमेकांना अपरिचित असतात तिथे ही गोष्ट सुरू होते. हळूहळू त्यांना एकमेकांबद्दल आत्मीयता वाटू लागते. त्यांच्या नात्यात विश्वास निर्माण होतो. नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. सगळी बंधने झुगारून ते एकत्र नांदू लागतात. ते एकमेकांचं आयुष्य व्यापून टाकतात. असं वाटतं की सगळं जग आपलं आहे. पण नियतीला जणू हे मान्यच नसतं. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली वहीदा आणि केवळ तिचा साथीदार बनून राहिलेला देव. खरं तर देवानंदच्या आधारानेच ती त्या शिखरावर पोहोचलेली असते, पण नंतर तिच्या विश्वात नवीन ग्रहांचं परिभ्रमन सुरू होतं. अचानक छोट्याशा गोष्टीवरून त्या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो आणि सगळा विचका होऊन बसतो.

Guide चित्रपटातील ही पार्श्वभूमी आणि तेथेच येणारं हे गाणं अत्यंत मनभेदक आहे. सांगायचं म्हणजे सध्या भारतीय शेअर बाजाराची अवस्थाही अशीच झाली आहे. सामान्य गुंतवणूकदार म्हणत आहे, “क्या से क्या हो गया, बेवफा तेरे प्यार में…” कारण ज्या सामान्य गुंतावणूकदाराच्या जिवावर अवघ्या महिन्यापूर्वी NIFTY ने all time high बनवला होता तो nifty त्या स्तरावरून जवळपास हजार दीडहजार पॉइंट खाली आला आहे. हा Nifty गेल्याच महिन्यात 11750 च्या आसपास होता जो केवळ पंधरा दिवसांत 10250 च्या जवळ येऊन ‘पडला’ आहे. ज्या पद्धतीने हा रक्तरंजित प्रवास झाला तो अविश्वसनीय आहे. कसलीच आणि कोणाचीच दया न दाखवता बाजाराने अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. केवळ सामान्य गुंतवणूकदारच नाही तर अनेक दिग्गज गुंतवणूकदार, ज्यांच्याकडे बघून देशातील सामान्य गुंतवणूकदार गुंतवणूक करत असतात त्यांचेही Portfolio मध्ये हाच कत्ल-ए-आम पाहायला मिळत आहे. घसरण आज थांबेल, उद्या थांबेल अशी तमाम जणांच्या आशा-अपेक्षांवर बाजार रोज पाणी फिरवत आहे. Nifty मध्ये 100 अंकांची घसरण तर सामान्य बाब बनून राहिली आहे. कुठलीच सकारात्मक बातमी बाजाराला मानवत नाहीये. बाजार सगळ्यांची “केह के लुंगा” असाच वागत आहे.OPEN DEMAT ACCOUNT ONLINE

मागे 15 Sept ला “मंदी सांगून येत नाही” असा लेख लिहिला होता. पण हीच ती मंदी का याचाही सुगावा लागू दिला नाही. सगळं अत्यंत निर्दयीपणे अन बेसावध असताना झालं. मोठ्या कष्टाने रचलेला पत्त्यांचा बंगला वार्‍याच्या एका झोताने नामशेष व्हावा तशी परिस्थिती आहे. सामान्य गुंतवणूकदार तर पोर्टफोलियोकडे बघूही शकत नाही. सगळ्यात वाईट अवस्था तर Leverage Position असणार्‍यांची आहे. तेजीत असताना एक दोन दिवसांसाठी घेतलेले shares Stoploss लावायलाही वेळ न मिळू देता कोसळले आहेत. उधारीच्या ह्या positions अजून किती काळ तारून नेता येतील हीच भीती आहे. एकतरी बाऊन्स यावा जेथून बाहेर पडायची संधि मिळावी अशी अनेकांची अपेक्षा आहे. तोही येत नाहीये. हे सगळं का होत आहे, बाजारात एवढी कसली भीती आहे हा विश्लेषणाचा भाग आहे.

अलीकडच्या काळात जे शेअर बाजारात आले आहेत त्यांच्यासाठी ही पडझड भीतीदायक वाटणारी आहे. बर्‍याचजणांना असं वाटत आहे की बाजारातील शेअर्स शून्य होतात की काय? अर्थात दिवसाला पन्नास पन्नास टक्के तुटणारे शेअर्स बघितले की ती भीती रास्तच वाटते. पण जी लोकं बाजारात किमान वीस-पंचेवीस वर्षे झाले काम करत आहेत त्यांना हे अगदीच अनपेक्षित नाही. कारण मंदी ज्यांनी बघितली त्यांना असे अनुभव आधीच आलेले असतील.

मंदी नेमकी कोणत्या लेवलला जाऊन थांबेल ते कोणीही सांगू शकत नाही. सध्या बहुतांश गुंतवणूकदारचे पैसे बाजारात अडकले आहेत. पण जे नव्याने पैसे लावू इच्छितात त्यांना मात्र ही संधि दवडुन चालणार नाही. जर शंभर रुपये बाजारात गुंतवायचे असतील तर त्यातील 25 रुपये गुंतवायची वेळ आलेली आहे. अनेक Fundamentally Strong Stocks ह्या पडझडीच्या कचाट्यात सापडून 52 week low ला आले आहेत. थोडसं जर Data कडे बघितलं तर लक्षात येईल की Nifty नेमका कसा behave करतो.

Oct 2016 ला Nifty 8300 च्या आसपास होता. तेथून Jan17 , Oct17 , Jan18 , April18 & July18 मध्ये या महिन्यांमध्ये सर्वाधिक returns दिले. अध्ये-मध्ये छोटे-मोठे profit-loss सुरू होते.

 

 

2008 ते 09 मधील Nifty Returns
2016 ते 2018 मधील Nifty Returns
1995 पासून Nifty चे Returns per Lack

दरम्यानच्या काळात Feb18 व March18 आणि आत्ता Sept18 मध्ये मोठी पडझड बघायला मिळाली. यात घाबरण्याची बाब अशी की सर्वाधिक पडझड ह्या महिन्यात, म्हणजे Oct मध्ये झाली आहे आणि Oct सुरू होऊन आता केवळ सहा-सात दिवस झाले आहेत. म्हणजे सहा दिवसातील पडझड ही वर्षभरातील (किंबहुना दोन वर्षातील) पडझडीसमान आहे.

पण सरासरी काढली तर Oct16 ते Oct18 यात 8300 ते 10000 असा फरक आहे जो असं दर्शवतो की बाजारात दीड-दोन हजार points ची तेजी आहे.

आता 1995 पासूनचा डाटा जर बघितला तर खूप बाबी समजू शकतील. या वीस वर्षांत 2000 आणि 2001 या सलग दोन वर्षात Nifty ने negative returns दिले. नंतर 2002 मध्ये ते सामान्यपणे राहिले आणि 2003 या वर्षात ते 73% इतके होते.

साधारणपणे 2008 लाही हीच अवस्था होती. जी काही मंदी-मंदी म्हणतात ती लेहमन ब्रदर्स नंतरची आर्थिक मंदी जी 2008 ला आलेली होती. 2008 साली Nifty ने सर्वात मोठी पडझड नोंदवली. त्याच वर्षात छोटे-मोठे बाऊन्सबॅकही येत राहिले. पण नंतर 2009 साली Nifty ने सर्वाधिक returns दिले. नंतर 2011 ला पुन्हा बाजारात निराशा होती. पण 2008 नंतर 2018 पर्यन्त Nifty ने खूप मोठा पल्ला गाठला. अडीच तीन हजारांचा Nifty 11000 पर्यन्त आला. यात काळा पैसा होता की आणखी काही हा वादाचा मुद्दा असला तरी देशात वाढणारा मध्यमवर्ग आणि जनसामान्यांत वाढती अर्थसाक्षरता ही बाजाराला फायद्याची ठरली. ती येणार्‍या काळात वाढतच राहील.

असा कल आहे की, जितकी मोठी मंदी येते नंतर तितकाच मोठ्या प्रमाणात तेजीही येते. ती ज्या वेगाने येते त्यावर अंदाज बांधणे कठीण आहे. सध्या महत्वाची अडचण काय आहे? तर Leverage Positions आणि Positional Trades किंवा Swing Call म्हणतात ते. ज्या गुंतवणूकदारांनी उपलब्ध कॅशमध्ये गुंतवणूक केली आहे, योग्य प्रमाणात ती गुंतवणूक केली आहे त्यांना यात घाबरण्याचे काहीच कारण नाही. पुढच्या वर्षी ह्याच दिवसात त्यांचा पोर्टफोलियो पुन्हा चमकताना दिसू शकतो. जे आधीच बाजारात होते आणि पूर्ण शक्तिनिशी Trade किंवा Invest करत होते त्यांचा शक्तिपात झाला आहे. त्यांच्यात आता नव्याने बाजारात उतरण्याची शक्ति नाही. कारण एकतर अनेकांचे Funds zero तरी झाले आहेत किंवा अडकूनतरी आहेत. आता खरी संधी आहे नवीन गुंतवणूक करू इच्छिणार्यांची. त्यांना जर दीर्घकाळासाठी पैसा लावायचा असेल तर ती सुरुवात इथेच होऊ शकते. अर्थात, ती टप्प्याटप्प्याने करावी लागेल. त्यातून जे Returns मिळतील ते दुप्पटही असू शकतात. चांगले शेअर्स निवडून त्यात SIP पद्धतीने गुंतवणूक ही येणार्‍या काळासाठी खूपच फायदेशीर ठरू शकते.

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

-START LONG TERM INVESTMENT-

 

Go to e-book!
 

श्रद्धा और सबुरी

श्रद्धा और सबुरी

श्रद्धा और सबुरी

Indian Share Market  ||  Opportunities In Investment  ||  शेअर बाजार मराठीत  ||  गुंतवणूक

Image result for share market

DHFL आणि Yes Bank हे आज भारतीय शेअर बाजारातील चर्चेचे विषय आहेत. DHFL सारखी एक strong NBFC एका दिवसात पन्नास टक्के तुटते आणि आठ दिवस झाले तरी त्यात म्हणावी तशी recovery येत नाही. बरं असही नाही की त्यात काहीतरी मोठी नकारात्मक बातमी बाहेर आली आहे किंवा कसला घोटाळा उघडकीस आला आहे. PNB किंवा PC Jeweller मध्ये जेंव्हा irregularities उघडकीस आल्या तेंव्हा त्यातही टप्प्याटप्प्याने तूट झाली होती, पण इथे कशातच काही नसताना हा सगळा प्रकार होत आहे. यात नक्कीच काहीतरी NEWS असेल जेणेकरून हा शेअर पडतो आहे जे सामान्य गुंतवणूकदाराला अजून समजलं नाहीये. एखाद्याच्या चारित्र्यावर चिखल उडवून दिला म्हणजे लग्न जमायचीही बोंब होते तशातला भाग आहे हा. बरं चारित्र्यावर चिखल उडवावा असं काही घडलं आहे किंवा बघितलं आहे असं अजूनतरी काही नाही. इतरत्र उठलेला कल्लोळ बघूनच हा सगळा तमाशा सुरू आहे असं दिसतं आहे.

दुसर्‍या बाजूला आहे Yes bank. अगदी महिन्यापूर्वीची वस्तुस्थिती अशी आहे की, जवळपास 400 रुपयाला हा शेअर ट्रेड करत होता. त्यावेळेस अनेक Fundamental आणि Technical analyst या शेअरला BUY करा वगैरे म्हणत होते. शेअर मग कोसळू लागला. आणि राणा कपूर यांच्याबद्दलची बातमी आल्यावर तर हाहाकार माजावा तसा हा शेअर कोसळत निम्म्यवर आला आहे. अजूनही काही विश्लेषक याला Portfolio मध्ये ठेऊ नका असं म्हणत आहेत. महिन्यात असं काय घडलं हे अवर्णणीय आहे. पण यालाच शेअर बाजार म्हणतात. सामान्य गुंतवणूकदाराला यातील कसलाच थांगपत्ता नसतो.

या दोन शेअरमुळे अनेकांचे portfolio zero झाले आणि पैशांची माती झाली. अवघ्या पंधरा दिवसांच्या कलावधीत असं झालं. असे धक्के सामान्य गुंतवणूकदार पचवू शकत नाही. अशा धकक्यांमुळेच अनेक Traders शेअर बाजाराला राम राम करतात.

इतिहास बघितला तर असं दिसून येतं की यातून काहीच निष्पन्न होत नाही. सगळे बडे मासे याच्यातच पैसा कमवतात. चांगले शेअर्स zero होत नसतात हे माहीत असूनही सामान्य गुंतवणूकदार चिंतेत असतो कारण त्याचा कष्टाचा पैसा तिथे लागलेला असतो.

Divis Lab. ही एक Pharma sector मधील कंपनी आहे. या कंपनीचा दोन वर्षांचा ग्राफ बघितला तर काही निरीक्षणे लक्षात येतील. Sept 16 ला हा शेअर जवळपास 1300 च्या वर कार्यरत होता. मग Feb 18 मध्ये तो 760 पर्यन्त आला. त्यानंतर एक न्यूज आली आणि हा शेअर अजूनच कोसळला. कोसळत असताना 100 च्या पटीने तो पडत गेला आणि May 2017 मध्ये तो 540 च्या नीचांकी पातळीवर जाऊन बसला. त्यावेळेस अनेकजण overall pharma sector बद्दल नकारात्मक बोलत होते. कोणीही ते शेअर BUY करायचा सल्ला देत नव्हते. पण जवळपास महिन्याच्या आतच त्या शेअरने उसळी घ्यायला सुरुवात केली आणि Sept 17 मध्ये तो 970 ला पोहोचलाही. Nov पासून आजपर्यंत तो एकदाही 1000 च्या खाली गेलेला नाही. आज तो All Time High ला आहे.

अगदी अशीच story Sunpharma या Pharma क्षेत्रातील दिग्गज कंपनीची आहे. काही महिन्यांपूर्वी हा 450 च्या आसपास होता जो आता 650 च्या आसपास आहे. US FDA कडून काही Plants ला मंजूरी न मिळू शकणे ही नकारात्मक news होती जी या शेअर ला आणि संपूर्ण sector लाही खाली घेऊन गेली आणि आता अशाच पद्धतीच्या सकारात्मक news या संपूर्ण sector ला positive ठरत आहेत.

दूसरा शेअर आहे Infosys. IT क्षेत्रातील दिग्गज कंपनी. सन 2016 ते 2017 मध्ये IT कंपनीसाठी खूप कसोटीच होतं. या वर्षात IT शेअर्स ने negative returns दिले. नंतर Infosys साठी खूपच negative news आली. विशाल सिकका यांचं कंपनी सोडणं. तेंव्हा याचे शेअर्स खूप तुटले. जवळपास 850 च्या आसपास भाव बघायला मिळाले. Negative News ने बाजारातल्या सामान्य गुंतवणूकदारांना चक्रावून सोडलं आणि मोठे losses ही झाले. त्यावेळेस असं म्हंटलं जात होतं की ही कंपनी सहजासहजी परत पहिलं वैभव बघू नाही शकणार. पण आज, म्हणजे केवळ वर्षभरात Infosys ने आपला नवा उच्चांक गाठला. जवळपास 1450 चा High नोंदवला.

मॅगीची बातमी तर सर्वांना माहिती असेलच. दोन वर्षांपूर्वी मॅगीमध्ये घातक रसायने आहेत आणि ते मानवी शरीरसाठी धोकादायक आहेत वगैरे बातमी आली आणि मॅगी हे उत्पादन बनवणारी कंपनी Nestle  चा शेअर बराच कोसळला. मॅगी हे nestle च्या महत्वाच्या product पैकी एक आहे. त्यावर भारतात बंदी घातली जाईल अशी ती बातमी होती ज्यानंतर ह्या शेअरमध्येही हाहाकार माजल्याप्रमाणे विक्री झाली. पण अल्पावधीतच हा शेअर परत वर आला.

दोन-तीन महिन्यांपूर्वीही UPL या शेअरच्या बाबतीत अशाच प्रकारचे सेंटिमेंट होते. 700 रुपयांच्या मूल्यापासून तो शेअर 540 पर्यन्त खाली गेला होता. पण नंतर Clarity आल्यानंतर एका दिवसात तो 20% वाढला आणि पुन्हा 740 च्या स्तरापर्यंत गेला. हासुद्धा Yes Bank प्रमाणे Nifty मधील स्टॉक आहे.

असे एक नाही अनेक उदाहरणे देता येतील. अशा अनेक दिग्गज कंपन्या आहेत ज्या काहींना-काही निमित्त झाल्याने कोसळल्या. पण त्यांचे Fundamental strong असल्याने त्या क्षेत्रातील समस्या दूर होताच त्या परत चमकू लागल्या. शेअर बाजारात चढ आणि उतार ही मूलभूत बाब आहे. जसं सोयाबीन, ऊस, कापूस, तूर इत्यादिचे भाव कायम सारखे राहत नाहीत. कालानुरूप व परिस्थितीनुसार त्यांचे दर कमी जास्त होत असतात तसच शेअर्सच्या बाबतीतही आहे. चांगल्या दर्जाचे शेअर्स पडत असतील तर टप्प्याटप्प्याने त्यात गुंतवणूक करून थोडी वाट बघितली तर उत्तम परतावा मिळतो. यात patience हा खूप महत्वाचा factor आहे. कुठलही sector कायम वाढत राहील असं होत नाही. त्यात उतार चढ येतच असतात. तसं नसतं तर आजपर्यंत Nifty, Sensex लाखावर पोचले असते. यासाठीच Diversified Portfolio महत्वाचा असतो. गेल्या वर्षी खराब कामगिरी करणारे IT व Pharma ह्या वर्षी चांगलं काम करत आहेत. कोणीतरी कोसळणार आणि कोणीतरी वाढणार हा बाजाराचा मूलभूत नियम आहे त्यात panic होण्यासारखं काहीच नाही. जे वाढत आहेत त्यात Trade करून पैसा कमवायचा आणि जे कोसळत आहेत त्यात गुंतवणूक करून दीर्घकाळासाठी पैसे ठेवायचे आणि ते वाढले की त्यातून नफा वसूल करायचा हे शेअर बाजराचं मूलभूत तत्व आहे.

श्रद्धा आणि सबुरी हेच सध्यातरी हातात आहे!

  • अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

-SHARE MARKET CLASSES-

 

Go to e-book!

मंदी हीच संधी!

error: Content is protected !!