#नळदुर्ग #महाराष्ट्रातील_किल्ले #पर्यटन #भटकंती #निसर्ग #पाऊस #Nature #Photography #FortsInMaharashtra
Category: Travelyaari
पन्हाळ्याची स्वारी!
#पन्हाळ्याची महती आणि माहिती! #Panhalgad Trip शिवरायांच्या, संभाजी महाराजांच्या, मावळ्यांच्या आणि अशा अनेक शूरवीरांच्या अन महात्म्यांच्या पदस्पर्शाने पवन झालेल्या पन्हाळा ह्या गडावर जाण्याचा योग आला हे भाग्यच!!! ह्याच पन्हाळ्याला सिद्दी जौहरने वेढा घालून स्वराज्याच्या राजाची नाकाबंदी केली होती; ह्याच पन्हाळ्यावरून विशालगडाकडे जाताना बाजीप्रभू, शिवाकाशी, बांदल आणि अनेक शूर मावळे स्वराज्यासाठी अन त्याच्या राजासाठी धारातीर्थी पडले!…
कोकणातील कातळशिल्प – भाग २
#रम्य कोकण, गूढ कोकण! काहीच दिवसांपूर्वी आपण Petroglyphs In Konkan/Maharashtra ह्या शीर्षकाखाली कोकणातील गूढ चित्र आणि शिल्पंबद्धल बोललो होतो. आनंदाची बाब म्हणजे, ह्या विषयावर अजून लिखाण येत आहे. वृत्तपत्र माध्यमातून ‘भटकंती’ करणारे निसर्ग-वैज्ञानिक याबद्धल माहिती सांगत आहेत. ही अत्यंत महत्वाची अन दिलासादायक गोष्ट आहे. कातळशिल्प म्हणजे काय आणि त्याबदधल इतर माहिती मागील भागात पाहिली आहे…
Petroglyphs In Konkan/Maharashtra
*कोकणातील कातळचित्र* महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक लेख वाचण्यात आला होता जो खरच खूप उत्कंठावर्धक आहे. तो लेख नेमका काय आहे तो खाली दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे. हा पेपर सहज माझ्या हाती लागला अन अशी नावीन्यपूर्ण माहिती मला मिळाली. नंतर इंटरनेट वर ह्या लेखाचा मी बराच शोध घेतला आणि शेवतो तो सापडला. आज माझ्या ब्लॉगच्या…
भस्माचा डोंगुर…
भारत देश हा अनेक आख्यायिका आणि कथांनी भरलेला आहे. अशी कितीतरी गावे अन ठिकाणे सापडतील की ज्याला काहीतर आख्यायिका किंवा कथा आहे. अनेक स्थळे अशी असतात जेथे सत्य-असत्य, आधुनिकता-आख्यायिका, श्रद्धा-अंधश्रद्धा, प्रतिगामी-पुरोगामी, पुराण-विज्ञान अशा गोष्टीना स्थान नसतं. कथा अन आख्यायिका ह्या भारतातील प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनु पाहतात; काही जण त्याचा आदर करून त्याच्यापुढे विलीन होतात, काही…
घाटशिळ तीर्थ….
अनेकदा तुळजापूर च्या आई भवानी च दर्शन घेण्याचा योग आला, पण ह्यावेळेस तेथील मंदिराजवळील एक अनोखं ठिकाण सुद्धा पाहायला मिळालं. त्या ठिकणाला घाटशिळ तीर्थ अस म्हणतात. तुम्ही तुळजापूर ला गेलात आणि तिथे स्वतःची गाडी पार्क करण्यासाठी एक जागा आहे तेथून फक्त एखाद किमी च्या अंतरावर हे सुंदर व रम्य ठिकाण आहे. ह्या जागेला तस आध्यात्मिक-पौराणिक…
Mood Travelling
अलीकडेच एका मित्राच्या लग्नासाठी नांदेड जवळ पानभूसी नावच्या एका खेड्यात जाण्याचा योग आला होता. तिथे एक प्राचीन मंदिर होत. परकीय आक्रमणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी जसे परळी, औंढा नागनाथ किंवा तुळजापूरच मंदिर थोडसं जमिनीत बांधलं आहे तसच हे मंदिरही तळघरात बांधण्यात आल होत. पण एक विशेष म्हणजे अस की ह्या मदिरातील गाभार्यात जाण्यासाठी भिंतीजवळून अरुंद अशी वाट…
Accurate Angle – पर्वती
पुण्याची पर्वती || दृश्य || मनमोकळे आकाश || माझाक्लिक पर्वतीवरून दिसणारे पुण्याचे रूप…!